Learning Sanskrit

श्लोकोऽयं मह्यं रोचते - 68

ती
तीर्थे तोयव्यतिकरभवे जह्नुकन्यासरय्वो-
र्देहत्यागादमरगणनालेख्यमासाद्य सद्यः।
पूर्वाकाराधिकचतुरया सङ्गतः कान्तयासौ
लीलागारेष्वरमत पुनर्नन्दनाभ्यन्तरेषु॥ रघुवंशः ८-९५॥
tīrthe toya-vyatikara-bhave jahnu-kanyā-sarayvo-
rdeha-tyāgād-amaragaṇanā-lekhyam-āsādya sadyaḥ।
pūrvākārādhika-caturayā saṅgataḥ kāntayāsau
līlāgāreṣvaramata punar-nandanābhyantareṣu॥

अजविलापसर्गे अन्तिमश्लोकः अयं मया विश्रान्तिपूर्वं पठितः आसीत्।

सर्गेऽस्मिन् इन्दुमत्याः मरणं सम्भवति अजश्च तस्याः अदर्शनं स्वस्य तया विना जीवनमिति द्वेपि स्थिती षड्विंशति श्लोकेषु वर्णिते। यद्यपि लघ्वी सा कथा पठितॄणां मनसि गाढं भावम् जनयति। विलापानन्तरं वसिष्ठमहर्षिः शिष्यद्वारा लघुसन्देशं प्रेष्यति -
मरणं प्रकृतिः शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधैः।
क्षणमप्यवतिष्ठते श्वसन्यदि जन्तुर्ननु लाभवानसौ॥
आत्मनात्मविवेकी त्वम् समाश्वसिहीति। तदनन्तरम् अजस्तु दशरथे राज्यधुरं न्यस्य गङ्गासरय्वोः तीरे देहं तत्याज। यदि कालिदासः एवं समापयिष्यत् तर्हि रसविच्छित्तिः अभविष्यत्। अतः अजः इन्दुमत्या सह स्वर्गनन्दवने अरमत इत्युक्त्वा सर्गं समापयति। "Happy Ending" इत्यतः प्रथमम् अवदम् "विश्रान्तिपूर्वं मया पठितः श्लोकः" इति।
Categories: Learning Sanskrit

परम श्रेयासाठी प्रार्थना

Slez - Sat, 08/19/2017 - 10:14
हे प्रभो !दुर्गुण झडोनी । सद्गुण जडोत ।गुणातीततेची । आंस पडो ।।१।।श्रद्धा दृढ होवो । भक्ती नित्य घडो स्वभावचि होवो । तपस्विता ।।२।।इंद्रियांसी नको । विषयांची बाधा ।प्रज्ञा स्थिर राहो । सर्वकाळ ।।३।।यज्ञ तप दान । ऐसी कर्मे तरी ।सदैव होतील । ऐसे करी ।।४।।सर्वभूतात्मता । व्हावी ती क्रमानें ।कृपा असो द्यावी । दासावरी ।।५।।(१) दुर्गुण झडोनी सद्गुण जडोत 

Categories: Learning Sanskrit

गीतेचा सारांश अभंगवृत्तात

Slez - Fri, 08/18/2017 - 13:15
गीतेचा सारांश अभंगवृत्तातरचयिता - श्रीपाद अभ्यंकरप्रथमावृत्ती - एप्रिल २०१०

पदे  एकूण पदे गीतेत श्लोक फरक (+/-)नमन १ ते ४४

अध्याय १५ ते १५ ११४७-३६अध्याय २१६ ते ४४२९७२-४३अध्याय ३४५ ते ६९२५४३-१८अध्याय ४७० ते १००३१४२-११अध्याय ५१०१ ते ११९१९२९-१०अध्याय ६१२० ते १४६२७४७-२०अध्याय ७१४७ ते १७७३१३०+१अध्याय ८१७८ ते २१४३७२८+९अध्याय ९२१५ ते २३७२३३४-११अध्याय १०२३८ ते २८९५२४२+१०अध्याय ११२९० ते ३३९५०५५-५अध्याय १२३४० ते ३६१२२२०+२अध्याय १३३६२ ते ३८५२४३५-११अध्याय १४३८६ ते ४०७२२२७-५अध्याय १५४०८ ते ४२६१९२०-१अध्याय १६४२७ ते ४४५ १९२४-५अध्याय १७४४६ ते ४८३३८२८+१०अध्याय १८४८४ ते ५५९७६ ७८-२सर्व मिळून
५५९७००-१४१
ॐ श्रीपरमात्मने नमः ।॥१॥ नमन गणेशा । कृपा असो द्यावी । सिद्धीस नेण्यास । उपक्रम ॥०-१॥॥२॥ "अभंग" वृत्तात । रचण्या सारांश । भगवद्गीतेच्या । अध्यायांचा ॥०-२॥॥३॥ अभंग वृत्त हे । सरळ रसाळ । भक्तिभावाचीही । हीच रीत ॥०-३॥॥४॥ इदं न मम ह्या । श्रद्धेने सादर । करीतो श्रीपाद । अभ्यंकर॥०-४॥
॥५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश पहिल्या । अध्यायाचा ॥१-१॥॥६॥ राजे धृतराष्ट्र । पुसती सांग बा । सञ्जया रणात । काय झाले ॥१-२॥॥७॥ दुर्योधनाने ना । द्रोणाना कथिले । कोणत्या पक्षात । कोणकोण ॥१-३॥॥८॥ शेजारी भीष्मानी । उत्साहे गर्जूनी । फुंकीला त्वेषाने । सिंहनाद ॥१-४॥॥९॥ तुंबळ माजले । अर्जुन कृष्णास । म्हणे रथ न्यावा । मधोमध ॥१-५॥॥१०॥ ज्येष्ठ श्रेष्ठ आप्त । स्वकीय पाहूनी । सम्भ्रम जाहला । अर्जुनास ॥१-६॥॥११॥ ज्यांचेसाठी घाट । राज्याचा करावा । तेच समर्पित । ठाकले कीं ॥१-७॥॥१२॥ युद्धाने माजती । वैधव्य दुःशील । संकर बुडवी । कुलधर्म ॥१-८॥॥१३॥ ऐसे पापी युद्ध । करण्यापरीस । मारोत मजला । निहत्थाच ॥१-९॥॥१४॥ म्हणत ऐसेनी । गाण्डीव टाकूनी । अर्जुन उतारा । रथातूनी ॥१-१०॥॥१५॥ इथेच संपला । अध्याय पहिला । अर्जुनविषाद- । योग नांव ॥१-११॥
॥१६॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश दुसऱ्या । अध्यायाचा ॥२-१॥॥१७॥ अर्जुन संमोही । पाहूनी श्रीकृष्ण । म्हणती हें काय । भलतेंच ॥२-२॥॥१८॥ कैसे हें किल्बिष । अनार्य अयोग्य । अस्वर्ग्य मांडले । अशोभनीय ॥२-३॥॥१९॥ अर्जुन म्हणतो । समोरी पहा ना । प्रिय वंदनीय । भीष्म द्रोण ॥२-४॥॥२०॥ युद्ध म्हणूनी कां । यांनाही मारावे । भिक्षासेवनीही । स्मरावेसे ॥२-५॥॥२१॥ गुरूना मारूनी । भोगूं जे कां भोग । रक्तरंजित ते । लांछनीय ॥२-६॥॥२२॥ आम्ही जिंकावे कीं । ह्यानीच जिंकावे । दिशाहीन आहे । मन माझे ॥२-७॥॥२३॥ सद्धर्म कोणता । कोणता अधर्म । तूंच आता मज । समजूं दे ॥२-८॥॥२४॥ श्रीकृष्ण हंसूनी । म्हणती अर्जुना । प्रवाद हा किती । विपर्यस्त ॥२-९॥॥२५॥ शोक करावेसे । नाहीत त्यांचाच । शोक तूं मांडीला । अनाठायी ॥२-१०॥॥२६॥ तुझ्या मारण्याने । मरतील कोणी । ह्याच विचारी कीं । गफलत ॥२-११॥॥२७॥ आत्मा तो केवळ । जाण देहधारी । देहहानीचे ना । त्यास कांहीं ॥२-१२॥॥२८॥ वस्त्र जीर्ण होतां । टाकावें लागते । तैसेच आत्म्यास । देहाविशी ॥२-१३॥॥२९॥ शस्त्राने ना कटे । आगीत ना जळे । पाण्याने ना भिजे । आत्मा ऐसा ॥२-१४॥॥३०॥ शिवाय हे पहा । जन्मल्यास मृत्यू । अटळचि आहे । शोक कैसा ॥२-१५॥॥३१॥ धर्माचे म्हणता । क्षत्रियास तरी । युद्धासम नाही । धर्मकार्य ॥२-१६॥॥३२॥ युद्ध न करणे । अधर्म होईल । अपकीर्ती आणि । पाप माथी ॥२-१७॥॥३३॥ कीर्तिवंतालागी । अपकीर्ती होणे । यावीण मरण । दुजे काय ॥२-१८॥॥३४॥ युद्धात मेल्यास । पावशील स्वर्ग । जिंकशील तरी । राज्य भोग ॥२-१९॥॥३५॥ फळाविशी चिंता । आत्ताच कशास । कर्मबन्धनेच । तोडावीत ॥२-२०॥॥३६॥ मानी सुखदुःख । सम लाभहानी । जयपराजय । तेही सम ॥२-२१॥॥३७॥ समत्व योगाने । बुद्धीस निश्चल । करीता कर्मात । कुशलता ॥२-२२॥॥३८॥ अर्जुनाने केला । प्रश्न एक तेव्हां । बोले चाले कैसा । स्थितप्रज्ञ ॥२-२३॥॥३९॥ सांगती श्रीकृष्ण । निष्काम तो सदा । नाही शुभाशुभ । ईर्षा द्वेष ॥२-२४॥॥४०॥ विषयांचा तरी । सर्वत्र पसारा । इन्द्रिये चळती । सम्मोहित ॥२-२५॥॥४१॥ सम्मोहाकारणे । स्मृतिभ्रंश होतो । मग बुद्धिनाश । सर्वनाश ॥२-२६॥॥४२॥ निशा सर्वभूतां । योग्यास तो दिन । भूतांच्या उजाडी । रात्र पाहे ॥२-२७॥॥४३॥ ऐसी ब्रम्हस्थिती । येतां अविचल । अन्तकाळी सुद्धा । शान्त शान्त ॥२-२८॥॥४४॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । ऐशा संवादाने । गीतोपनिषदी । सांख्ययोग ॥२-२९॥
॥४५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश तिस-या । अध्यायाचा ॥३-१॥॥४६॥ अर्जुनाचा प्रश्न । म्हणसी तूं बुद्धि । कर्माहूनी श्रेष्ठ । निखालस ॥३-२॥॥४७॥ तरी घोर कर्मी । गुंतवूं पाहसी । मनात दुविधा । होते पहा ॥३-३॥॥४८॥ श्रीकृष्ण सांगती । कर्म टाकूनीया । नैष्कर्म्य न होते । मुळी सुद्धा ॥३-४॥॥४९॥ कोणताही जीव । क्षणैक न राहे । कर्म न करीता । ध्यानी धरी ॥३-५॥॥५०॥ कर्मास न व्हावे । माणसाने वश । अवश राहूनी । कर्म व्हावे ॥३-६॥॥५१॥ संन्यास सम्पूर्ण । आणि समबुद्धि । झाली तरी सिद्धि । येत नाही ॥३-७॥॥५२॥ मानव्य दिव्यत्व । यांचा कांहीं मेळ । जमेल तो योग । श्रेयस्कर ॥३-८॥॥५३॥ यज्ञशिष्ट तेच । सेवूनीया सन्त । सर्व दोषाहून । मुक्त होती ॥३-९॥॥५४॥ आत्मबुद्धीने जे । उपभोग घेती । पापांचा घडाच । सांचवीती ॥३-१०॥॥५५॥ अन्नाने घडतो । भूतांचा पसारा । अन्न संभवते । पर्जन्याने ॥३-११॥॥५६॥ पर्जन्य घडतो । यज्ञाचे कारणे । यज्ञ तो घडतो । कर्मातून ॥३-१२॥॥५७॥ कर्मांची साखळी । ब्रम्हाने रचीली । ब्रम्हाचा उद्भव । अक्षरी गा ॥३-१३॥॥५८॥ असे सारे चक्र । आहे गा नेमस्त । ठेवावी तयाची । बांधीलकी ॥३-१४॥॥५९॥ असक्त राहूनी । रहावे कर्मात । परम साधते । ऐशा योगे ॥३-१५॥॥६०॥ श्रेष्ठतेने वागे । त्याचे अनुयायी । वाढता बनतो । जनसंघ ॥३-१६॥॥६१॥ इथे रणांगणी । स्वतःसाठी मज । आहे कांही काय । साधायाचे ॥३-१७॥।६२॥ जरी मीच कर्म । टाकूनी राहीन । उच्छाद माजेल । जगभर ॥३-१८॥॥६३॥ संन्यास अध्यात्म । धरूनीया मनी । करी युद्धकर्म । मदर्पण ॥३-१९॥॥६४॥ रहावे स्वधर्मी । गरीबीत सुद्धा । परधर्म तरी । भयावह ॥३-२०॥॥६५॥ अर्जुन कृष्णास। करी एक प्रश्न । कोणी कां जातात । वाममार्गी ॥३-२१॥॥६६॥ काम आणि क्रोध । जीवनाचे वैरी । युक्त झाकाळूनी । फसवीती ॥३-२२॥॥६७॥ खेळ ह्यांचा चाले । ताबा घेऊनीया । मनाचा बुद्धीचा । इन्द्रियांचा ॥३-२३॥॥६८॥ काम तोही शत्रू । नको थारा त्यास । विवेकी रहावे । सर्वकाळ ॥३-२४॥॥६९॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । संवादाने सिद्ध । गीतोपनिषदी । कर्मयोग ॥।३-२५॥
॥७०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश चवथ्या । अध्यायाचा ॥४-१॥॥७१॥ श्रीकृष्ण सांगती । अथपासूनीया । योगाचा तो कैसा । इतिहास ॥४-२॥॥७२॥ विवस्वतालागी । मीच तो कथिला । त्याने तो कथिला । मनूलागी ॥४-३॥॥७३॥ मनूने कथिला । इक्ष्वाकू राजास । परंपरा ऐसी । थोर ह्याची ॥४-४॥॥७४॥ कालौघात पहा । नाशही पावला । आज उजळला । तुझेसाठी ।४-५॥॥७५॥ अर्जुन विचारी । तुझी जन्मकथा । आहे वर्तमान । समोरीच ॥४-६॥॥७६॥ विवस्वत तरी । पुराण पुरुष । तुवाच कथिले । त्यास कैसे ॥४-७॥॥७७॥ श्रीकृष्ण सांगती । तुझे नि माझेही । जन्म खूप झाले । गुह्य तेही ॥४-८॥॥७८॥ माझे स्मरणात । आहेत ते सारे । तुज नाही जाण । उरलेली ॥४-९॥॥७९॥ प्रकृति असते । माझे ठायी नित्य । लय प्रकटन । करीतो मी ॥४-१०॥॥८०॥ अधर्म माजता । घेतो अवतार । ताराया सुष्टाना । दुष्टनाशे ॥४-११॥॥८१॥ गुण आणि कर्म । यांच्या निकषाने । चातुर्वर्ण्य मीच । स्थापीयेला ॥४-१२॥॥८२॥ मीच जाण त्याचा । कर्ता नि अकर्ता । कर्मापासून त्या । अलिप्त मी ॥४-१३॥॥८३॥ कर्मे करावीत । अलिप्त राहून । तेणे कर्मबाधा । नाही होत ॥४-१४॥॥८४॥ मुळात कर्माची । व्याख्याच गहन । केल्याने होते ते । कर्म एक ॥४-१५॥॥८५॥ विरुद्ध विशेष । विपरीत ऐशा । विकर्माने सुद्धा । कर्मज्ञान ॥४-१६॥॥८६॥ अकर्म देखील । कर्माचाच पैलू । कर्म समजण्या । कामी येतो ॥४-१७॥॥८७॥ कोणतेही कर्म । सुरू करताना । कामना संकल्प । असू नये ॥४-१८॥॥८८॥ ज्ञानाग्नीने ज्याची । कर्मे भस्म झाली । पंडित त्यासीच । समजावे ॥४-१९॥॥८९॥ कर्मफलाचे ना । ज्यास देणेघेणे । कर्मे करूनीही । निष्कर्मी तो ॥४-२०॥॥९०॥ सर्व इन्द्रियांच्या । प्राणाच्या कर्मांचे । हवन अर्पावे । योगाग्नीत ॥४-२१॥॥९१॥ योगाग्नी होतसे । ज्ञानदीपाने नि । आत्मसंयमाने । प्रज्वलित ॥४-२२॥॥९२॥ ब्रम्हाने विशद । केले बहु यज्ञ । द्रव्ययज्ञ आणि । तपोयज्ञ ॥४-२३॥॥९३॥ स्वाध्याययज्ञ नि । ज्ञानयज्ञ सुद्धा । प्राणायामयज्ञ । योगयज्ञ ॥४-२४॥॥९४॥ साऱ्यांची निष्पत्ति । होते कर्मातून । अमृत असते । यज्ञशिष्ट ॥४-२५॥॥९५॥ द्रव्ययज्ञाहूनी । ज्ञानयज्ञ श्रेष्ठ । ज्ञानात विरती । सारी कर्मे ॥४-२६॥॥९६॥ ज्ञानबोध होण्या । करी प्रणिपात । आणि परिप्रश्न । सेवा सुद्धा ॥४-२७॥॥९७॥ ज्ञानोपदेश तो । ज्ञानी तत्त्वदर्शी । ऐशा गुरुसंगे । मेळवावा ॥४-२८॥॥९८॥ ऐसे ज्ञान होता । मोह ना होईल । पाहतां स्वस्थायी । सारी भूतें ॥४-२९॥॥९९॥ अज्ञानाकारणें । झालासे सम्मोह । ज्ञानाने उच्छेद । करी त्याचा ॥४-३०॥॥१००॥ ऐसा सिद्ध झाला । गीतोपनिषदी । ज्ञानकर्मसंन्यास । नामे योग ॥४-३१॥
॥१०१॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश पांचव्या । अध्यायाचा ॥५-१॥॥१०२॥ अर्जुन कृष्णास । कर्मयोग आणि । कर्मसंन्यासही । सांगतोसि ॥५-२॥॥१०३॥ मनी द्विधा होते । तरी दोहोमध्ये । श्रेयस्कर काय । समजावे ॥५-३॥॥१०४॥ श्रीकृष्ण म्हणती । दोन्ही श्रेयस्कर । कर्मयोग परी । जास्त योग्य ॥५-४॥॥१०५॥ कर्म करतां ही । द्वेष ना आकांक्षा । नित्य तो संन्यास । सहजीच ॥५-५॥॥५-६॥ सांख्य आणि योग । वेगळे म्हणणे । बालिशपणा तो । पांडित्य ना ॥५-६॥॥१०७॥ कोणतेही एक । जरी साध्य केले । सारखेच फळ । दोहोंचेही ॥५-७॥॥१०८॥ योग न साधता । संन्यासचि केला । दुःखास कारण । तेंही होते ॥५-८॥॥१०९॥ उठता बसता । ऐकता पाहता । जागेपणी किंवा । स्वप्नात वा ॥५-९॥॥११०॥ इन्द्रियांची कार्ये । इन्द्रियार्थी ऐसे । म्हणूनी करावी । ब्रम्हार्पण ॥५-१०॥॥१११॥ कर्मे तरी जाण । मनाने बुद्धीने । कायेने घडत । असतात ॥५-११॥॥११२॥ साऱ्याच कर्मांची । फळे टाकल्याने । योग्यास साधते । मनःशान्ति ॥५-१२॥॥११३॥ कर्म वा कर्तृत्व । देव ना निर्मीतो । देव नाही घेत । पापपुण्य ॥५-१३॥॥११४॥ कर्मफलाविशी । आसक्त राहणे । अज्ञानाने ज्ञान । गुर्फटणे ॥५-१४॥॥११५॥ अज्ञानतिमिर । ज्याचा दूर झाला । सूर्यासम ज्ञान । उजाळते ॥५-१५॥॥११६॥ उल्हास न व्हावा । प्रिय मिळाल्याने । अप्रिय मिळतां । खेद नको ॥५-१६॥॥११७॥ स्पर्शजन्य जे जे । भोग ते सारेच । नसती शाश्वत । सुखकारी ॥५-१७॥॥११८॥ आदिअन्त त्यांच्या । प्रकृतीत आहे । त्यांत ना रमतो । बुद्धिवन्त ॥५-१८॥॥११९॥ येणे रीती झाला । गीतोपनिषदी । कर्मसंन्यासाचा । योग सिद्ध ॥५-१९॥
॥१२०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सहाव्या । अध्यायाचा ॥६-१॥॥१२१॥ श्रीकृष्ण सांगती । सदा सारी कर्मे । फळाविशी संग । सोडूनीया ॥६-२।॥१२२॥ करणारा योगी । म्हणावा संन्यासी । जाण संन्यासही । योग एक ॥६-३॥॥१२३॥ योगमार्गावर । स्वतःच स्वतःचा । बन्धू किंवा शत्रू । असतो गा ॥६-४॥॥१२४॥ प्रमाणित हवे । सारेच वर्तन । नको अति खाणे । भुकेजणे ॥६-५॥॥१२५॥ अति जागरण । स्वप्नशीलता वा । केल्याने योग ना । साध्य होतो ॥६-६॥॥१२६॥ पुनीत प्रदेशी । स्थिर आसनाने । नाही अति उंच । किंवा खोल ॥६-७॥॥१२७॥ एकाग्र मनाने । इन्द्रियावरती । ताबा ठेऊनीया । ध्यान व्हावे ॥६-८॥॥१२८॥ जेव्हां जेव्हां मन । पळाया पाहील । काबूत आणावे । लगोलग ॥६-९॥॥१२९॥ धीरे धीरे ऐसी । साधना वाढता । विचाररहित । मन व्हावे ॥६-१०॥॥१३०॥ सर्वभूताठायी । आपणासी पाहे । पाही सर्वभूतें । स्वतःठायी ॥६-११॥॥१३१॥ मज जळी काष्ठी । पाषाणीही पाहे । पाहे सर्वभूतें । मजठायी ॥६-१२॥॥१३२॥ मजसी तो प्रिय । सर्वथा सदैव । मीही त्यासी प्रिय । सर्वकाळ ॥६-१३॥॥१३३॥ अर्जुन विचारे । ऐसा साम्ययोग । सर्वकाळ स्थिर । राहील कां ॥६-१४॥॥१३४॥ मानवी मनाचा । गुण चंचलता । वारा बन्धनात । राहतो कां ॥६-१५॥॥१३५॥ श्रीकृष्ण सांगती । साम्यस्थिति आहे । कठीण जरूर । अशक्य ना ॥६-१६॥॥१३६॥ मनास काबूत । ठेवाया लागती । प्रयत्न आणीक । साधनाही ॥६-१७॥॥१३७॥ अर्जुनाचे मनी । तरीही जिज्ञासा । श्रद्धाळू चळता । त्याचे काय ॥६-१८॥॥१३८॥ श्रीकृष्ण सांगती । भले जे जे केले । वांया नाही जात । कधीच तें ॥६-१९॥॥१३९॥ योगभ्रष्टासही । शक्य पुनर्जन्म । पवित्र श्रीमन्त । कुळामध्ये ॥६-२०॥॥१४०॥ किंवा कुणा योगी- । कुळामध्ये शक्य । जन्मलाभ जरी । दुर्लभ हें ॥६-२१॥॥१४१॥ पूर्वसंचिताचा । संयोग लाभता । पुनश्च साधना । सुरू होते ॥६-२२॥॥१४२॥ अनेक जन्मांच्या । ऐशा साधनेने । परम गतीची । प्राप्ति होते ॥६-२३॥॥१४३॥ तपस्व्याहून नि । ज्ञान्याहून आणि । कर्मी लोकांपेक्षा । श्रेष्ठ योगी ॥६-२४॥॥१४४॥ म्हणून अर्जुना । बन योगी बरा । माझा गा आग्रह । तुजलागी ॥६-२५॥॥१४५॥ योग्यामध्ये सुद्धा । युक्ततम जाण । मद्गत जो झाला । अन्तरात्मी ॥६-२६॥॥१४६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । आत्मसंयमाचा । योग सिद्ध ॥६-२७॥
॥१४७॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सातव्या । अध्यायाचा ॥७-१॥
॥१४८॥ श्रीकृष्ण सांगती । समग्रपणाने । मज जाणशील । ऐसे ज्ञान ॥७-२॥॥१४९॥ अवगत होतां । जाणावेसे काहीं । बाकी न उरेल । ऐक तेंच ॥७-३॥॥१५०॥ हजारोंच्या पैकी । एकादाच कुणी । सिद्धीसाठी यत्न । करूं जातो ॥७-४॥॥१५१॥ त्यांच्यापैकी कोणी । एकादा क्वचित । तत्त्वाने मजसी । ओळखतो ॥७-५॥॥१५२॥ अपरा प्रकृती । आहे गा अष्टधा । भूमी आप वायू । अग्नि आणि ॥७-६॥॥१५३॥ आकाश नि मन । बुद्धि अहंकार । जीवांची प्रकृति । परा जाण ॥७-७॥॥१५४॥ ऐशा साऱ्या जगा । प्रकट करीतो । मीच प्रलयही । घडवीतो ॥७-८॥॥१५५॥ माझ्यावीण कांही । नाहीच आगळे । धाग्यात मणि कां । ओवलेले ॥७-९॥॥१५६॥ प्रवाही पदार्था-। मधील रस मी । चन्द्र्सूर्यांचे ते । तेज मीच ॥७-१०॥॥१५७॥ सर्व वेदांतील । ॐ कारही मीच । अवकाशी नाद । तोही मीच ॥७-११॥॥१५८॥ मानवी पौरूष । हवेतील गंध । सर्वभूतांठायी । श्वास मीच ॥७-१२॥॥१५९॥ सात्त्विक राजस । तामस ते भाव । माझ्यातून होती । प्रसृत गा ॥७-१३॥॥१६०॥ त्रिगुणात्मक ह्या । भावांच्या मोहांत । असते जग गा । गुर्फटले ॥७-१४॥॥१६१॥ माझ्याशी शरण । होती जे जे कोणी । तरून ते जाती । माया सारी ॥७-१५॥॥१६२॥ आसूरी वृत्तीचे । अज्ञानी वा मूढ । मजकडे कधी । येतील ना ॥७-१६॥॥१६३॥ मजकडे येण्या । प्रवृत्त होतात । चार कारणानी । जन पहा ॥७-१७॥॥१६४॥ असह्य दुःखांचे । प्रयत्न थकतां । आर्त जन येती । मजकडे ॥७-१८॥॥१६५॥ जिज्ञासा दाटतां । मनांत कोण मी । जिज्ञासूही येती । मजकडे ॥७-१९॥॥१६६॥ इच्छित फलाच्या । प्राप्तीच्या आशेने । अर्थार्थीही येती । मजकडे ॥७-२०॥॥१६७॥ ज्ञानी जे जाणती । मी कोण समग्र । ते तरी राहती । मम ठायी ॥७-२१॥॥१६८॥ कामनांचा गुंता । हरपतो ज्ञान । ज्याची जी प्रकृति । तैसे होते ॥७-२२॥॥१६९॥ अज्ञानी म्हणती । होतो मी अव्यक्त । आता व्यक्त झालो । समजती ॥७-२३॥॥१७०॥ मी तरी अव्यय । मग जन्म कैसा । भूत वर्तमान । भविष्यही ॥७-२४॥॥१७१॥ जाणतो मी सारे । मज न जाणती । कोणी युक्तभावे । मोहामुळे ॥७-२५॥॥१७२॥ इच्छा द्वेष ह्यानी । मोहात् द्वंद्वात । पहा सारी भूतें । गुंतलेली ॥७-२६॥॥१७३॥ पुण्यकर्मी जन । पापमुक्त होतां । द्वंद्व मोह त्यांचे । सरतात ॥७-२७॥॥१७४॥ माझेठायी मग । आश्रय धरीतां । सारे ब्रम्हज्ञान । आकळते ॥७-२८॥॥१७५॥ काय तें अध्यात्म । कर्म अधिभूत । काय अधिदैवी । अधियज्ञी ॥७-२९॥॥१७६॥ सारे जाणूनीया । अन्तकाळी सुद्धा । युक्तच राहते । त्यांचे चित्त ॥७-३०॥॥१७७॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ज्ञानविज्ञानाचा । योग सिद्ध ॥७-३१॥
॥१७८॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश आठव्या । अध्यायाचा ॥८-१॥॥१७९॥ अर्जुनाचा प्रश्न । ब्रम्ह म्हंजे काय । अध्यात्म तें काय । कर्म काय ॥८-२॥॥१८०॥ अधिभूत काय । अधिदैवी काय । अधियज्ञी काय । सांग मज ॥८-३॥॥१८१॥ आत्म्यासी नियत । ठेऊनी ज्ञेय तूं । अन्तकाळी कैसा । सांग मज ॥८-४॥॥१८२॥ अक्षर परम । तेचि ब्रम्ह जाण । अध्यात्म म्हणजे । स्वभावचि ॥८-५॥॥१८३॥ कर्म तरी जाण । भूत वर्तमान । भविष्य हें सारे । घडवीते ॥८-६॥॥१८४॥ जे जे नष्ट होते । अधिभूत सारे । पुरूष तो जाण । अधिदैवी ॥८-७॥॥१८५॥ देहधा-यामध्ये । श्रेष्ठ जो मी येथे । मीच अधियज्ञी । अर्जुना गा ॥८-८॥॥१८६॥ अन्तकाळी जो कां । मजसी स्मरूनी । देह टाकण्याचा । यत्न करी ॥८-९॥॥१८७॥ मजठायी तो गा । निश्चित पोचतो । होते हे ऐसेच । निःसंशय ॥८-१०॥॥१८८॥ देह टाकताना । जो जो कांही भाव । स्मरणी राहतो । तैसी गति ॥८-११॥॥१८९॥ आत्म्यास मिळते । म्हणूनी अर्जुना । सदैव मजसी । स्मरूनीया ॥८-१२॥॥१९०॥ कर्म वा युद्ध वा । मजसी अर्पूनी । राहशील पहा । मम ठायी ॥८-१३॥॥१९१॥ प्रयाणाचे वेळी । अचल मनाने । योगबलाने नि । भक्तिपूर्ण ॥८-१४॥॥१९२॥ भुवयांच्या मध्ये । आणूनीया प्राण । दिव्यपुरुषत्व । प्राप्त होते ॥८-१५॥॥१९३॥ सारी नऊ द्वारे । संयत करूनी । मनास रोधूनी । हृदयांत ॥८-१६॥॥१९४॥ प्राण नेऊनीया । मस्तकीच्या चक्री । ॐ कार स्थितीत । स्थिर होत ॥८-१७॥॥१९५॥ प्राण सोडण्यास । प्रयत्न केल्याने । परम गति गा । प्राप्त होते ॥८-१८॥॥१९६॥ चित्ती माझ्याविना । अन्य कांही नाही । केवळ स्मरती । मज नित्य ॥८-१९॥॥१९७॥ ऐशा नित्ययुक्त । योग्यास सुलभ । मजप्रत येणे । अन्तकाळी ॥८-२०॥॥१९८॥ मजप्रत येतां । नाही पुनर्जन्म । तें तो अशाश्वत। दुःखपूर्ण ॥८-२१॥॥१९९॥ पुनरावर्तन । भुवनी भरले । मजप्रत येतां । सरतें तें ॥८-२२॥॥२००॥ ब्रम्हाचा दिवस । सहस्र युगांचा । रात्रही सहस्र । युगांची गा ॥८-२३॥॥२०१॥ उजाडणे म्हंजे । अव्यक्तामधून । सारे व्यक्त होते । समजावे ॥८-२४॥॥२०२॥ रात्री सारे पुन्हा । अव्यक्तात लीन । होते इतुकेच । समजावे ॥८-२५॥॥२०३॥ भूतग्राम सारे । येणे रीती होते । अव्यक्त नि व्यक्त । पुनःपुन्हा ॥८-२६॥॥२०४॥ परं भाव परी । आहे सनातन । जाण अविनाशी । अक्षर हा ॥८-२७॥॥२०५॥ परम गति ती । परम धाम तें । तिथून नाहीच । परतणें ॥८-२८॥॥२०६॥ आहेही संकेत । अन्तकाळासाठी । असतां उजेड । शुक्लपक्ष ॥८-२९॥॥२०७॥ उत्तरायणाचा । महीना असतां । योग्यास ब्रम्हत्व । शक्य होते ॥८-३०॥॥२०८॥ रात्री सायंकाळी । कृष्णपक्षामध्ये । दक्षिणायनाच्या । सहा मासी ॥८-३१॥॥२०९॥ ज्यांना अन्तकाळ । येतो त्या योग्याना । चन्द्रज्योतीसम । प्रत्यय गा ॥८-३२॥॥२१०॥ शुक्ल आणि कृष्ण । गति ऐशा दोन । आवृत्ति निवृत्ति । त्यांचे भाव ॥८-३३॥॥२११॥ जगाची रहाटी । ऐसीच चालते । योग्यास नसते । त्याचे कांहीं ॥८-३४॥॥२१२॥ वेदाध्ययनाने । यज्ञांनी तपाने । दानाने मिळते । जें जें पुण्य ॥८-३५॥॥२१३॥ त्याहून श्रेष्ठसे । योग्यास मिळते । स्थान म्हणूनीया । व्हावे योगी ॥८-३६॥॥२१४॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । अक्षरब्रम्ह हा । योग सिद्ध ॥८-३७॥
॥२१५॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश नवव्या । अध्यायाचा ॥९-१॥॥२१६॥ श्रीकृष्ण सांगती । गुह्यतम ऐसे । विज्ञानासहित । ज्ञान ऐक ॥९-२॥॥२१७॥ अव्यक्ती राहून । मीच सारे जग । निर्मीले मत्स्थायी । सारी भूतें ॥९-३॥॥२१८॥ कल्पाचीये अन्ती । सारी भूतें जाती । मीच निर्मिलेल्या । प्रकृतीत ॥९-४॥॥२१९॥ कल्पाचे प्रारंभी । पुन्हा सारी भूतें । प्रसृत करीतो । प्रकृतीत ॥९-५॥॥२२०॥ भूतांचा मी कर्ता । धाताही भूतांचा । प्रकृतीचे योगे । चालवीतो ॥९-६॥॥२२१॥ प्रकृतीचे वशी । ठेवूनीया भूतें । ऐसेनी असक्त । राहतो मी ॥९-७॥॥२२२॥ परं भाव माझा । मूढ न जाणती । मजला माणूस । समजती ॥९-८॥॥२२३॥ परंतु महात्मे । मजसी अव्यय । जाणूनी अनन्य । भजतात ॥९-९॥॥२२४॥ जगाचा मी पिता । माता आणि धाता। ऋक् साम यजु मी । ॐ कार मी ॥९-१०॥॥२२५॥ अनन्य चित्ताने । भजती जे मज । त्यांचा योगक्षेम । वाहतो मी ॥९-११॥॥२२६॥ इतर दैवते । भजतात जे कां । तीही भक्ती येते । मजप्रत ॥९-१२॥॥२२७॥ देवयज्ञ आणि । पितृयज्ञ किंवा । भूतयज्ञ ऐसे । आचरती ॥९-१३॥॥२२८॥ सर्वच यज्ञांचा । प्रभू मी भोक्ता मी । मजसी तत्त्वाने । जाणावे कीं ॥९-१४॥॥२२९॥ पत्री फळे फुले । तोयही भक्तीने ।अर्पीतां होतो मी । संतुष्ट बा ॥९-१५॥॥२३०॥ जें जें करशील । जें जें तूं खाशील । देशील घेशील । सर्व सर्व ॥९-१६॥॥२३१॥ करी मदर्पण । तरी शुभाशुभ । कर्माचे तुजसी । राहील ना ॥९-१७॥॥२३२॥ मदर्पण भाव । कोणी आचरती । स्त्रिया वैश्य शूद्र । कोणीही गा ॥९-१८॥॥२३३॥ परम गतीच । मिळते अर्पणी । ब्राम्हण राजर्षी । यांना खास ॥९-१९॥॥२३४॥ पुण्यशील वृत्ती । भक्तीमध्ये रत । होतां सुख मिळे । शाश्वत तें ॥९-२०॥॥२३५॥ होई तूं मन्मना । मद्भक्त मद्याजी । करी तूं नमन । मजप्रत ॥९-२१॥॥२३६॥ मत्परायणसा । योग साधशील । मम ठायी भक्ता । राहशील ॥९-२२॥॥२३७॥ कृष्णार्जुन यांच्या । संवादाने सिद्ध । योग राजविद्या- ॥ राजगुह्य ॥९-२३॥
॥२३८॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ दहाव्या । अध्यायास ॥१०-१॥॥२३९॥ श्रीकृष्ण सांगती । माझे जें प्रभुत्व । महर्षीना सुद्धा । आकळे ना ॥१०-२॥॥२४०॥ मीच बहुविध । भाव रुजवीले । भूतांचिये ठायी । पहा किती ॥१०-३॥॥२४१॥ बुद्धि ज्ञान क्षमा । सुख दुःख भय । अभय अहिंसा । तप दान ॥१०-४॥॥२४२॥ यश अपयश । भव नि अभाव । शम दम तुष्टि । समताही ॥१०-५॥॥२४३॥ सात ते महर्षी । आणि चार मनु । माझेच भाव ते । ध्यानी घेई ॥१०-६॥॥२४४॥ त्यांचेच वंशज । सारी प्रजा खरी । माझ्यातून सारे । प्रवर्तते ॥१०-७॥॥२४५॥ ऐसे हे जाणून । बुद्ध जे जाहले । माझे संकीर्तनी । रमतात ॥१०-८॥॥२४६॥ ऐशा प्रियजना । देतो बुद्धियोग । अनुकंपा माझी । समजती ॥१०-९॥॥२४७॥ नाशीतो अंधार । त्यांच्या अज्ञानाचा । ज्ञानदीपाने मी । उजाळतो ॥१०-१०॥॥२४८॥ अर्जुन रंगला । स्तुति उधळीत । तूंच परब्रम्ह । परंधाम ॥१०-११॥॥२४९॥ शाश्वत पुरुष । दिव्य आदिदेव । कितीसे वर्णीती । ऋषीमुनी ॥१०-१२॥॥२५०॥ देवर्षी नारद । असित व्यासही । स्वतःही मजसी । सांगीतले ॥१०-१३॥॥२५१॥ मजसी सांगण्या । वाटते कारण । तुजसी जाणीले । नाही कोणी ॥१०-१४॥॥२५२॥ केवळ तूंच तूं । स्वतःस जाणीसी । भूतभावन तूं । जगत्पते ॥१०-१५॥॥२५३॥ कोणकोणत्या गा । विभूतीरूपांत । दिसतोस सांग । सांगोपांग ॥१०-१६॥॥२५४॥ सांग विस्ताराने । कितीवेळा ऐकूं । कान अतृप्तचि । राहतात ॥१०-१७॥॥२५५॥ श्रीकृष्ण सांगती । माझ्या विभूतींचा । नाही कांहीं अंत । तरी ऐक ॥१०-१८॥॥२५६॥ प्रमुख उल्लेख । केवळ सांगतो । सर्वभूताठायी । आत्मा मीच ॥१०-१९॥॥२५७॥ सर्वच भूतांचा । आदि मध्य अंत । आदित्यांच्यामध्ये । विष्णू जाण ॥१०-२०॥॥२५८॥ ज्योतिर्मयामध्ये । रवि आहे जाण । मरीची मी जाण । मरुतात ॥१०-२१॥॥२५९॥ नक्षत्रसमूही । चन्द्र मी शीतल । वेदांमध्ये श्रेष्ठ । सामवेद ॥१०-२२॥॥२६०॥ देवांमध्ये तरी । वासुदेव ज्ञात । इन्द्रियांचे ठायी । संवेदना ॥१०-२३॥॥२६१॥ भूतांची चेतना । रुद्रांचा शंकर । यक्षरक्षसांचा । वित्तेश मी ॥१०-२४॥॥२६२॥ वसू मी पावक । पर्वतांचा मेरु । पुरोधसांमध्ये । बृहस्पति ॥१०-२५॥॥२६३॥ सेनानीत स्कंद । जलाशयामध्ये । सागर मी भृगु । महर्षीत ॥१०-२६॥॥२६४॥ ॐ कार वाणीत । यज्ञीं जपयज्ञ । स्थावरामध्ये मी । हिमालय ॥१०-२७॥॥२६५॥ वृक्षांत अश्वत्थ । देवर्षी नारद । गन्धर्वांचा जाण । चित्ररथ ॥१०-२८॥॥२६६॥ सिद्धांमध्ये मुनि । कपिल आणिक । अश्वांमध्ये जाण । उच्चैःश्रवा ॥१०-२९॥॥२६७॥ अमृतातून गा । उद्भव माझा ही । गजेन्द्रामध्ये मी । ऐरावत ॥१०-३०॥॥२६८॥ नरांमध्ये राजा । आयुधांत वज्र । गायींमध्ये जाण । कामधेनु ॥१०-३१॥॥२६९॥ प्रजनी कन्दर्प । सर्पात वासुकी । अनन्त नागात । वरुण मी ॥१०-३२॥॥२७०॥ पितरामध्ये मी । अर्यमा आणिक । संयमींच्यामध्ये । यम मीच ॥१०-३३॥॥२७१॥ दैत्यांत प्रल्हाद । बदलांचा काल । मृगांचा मृगेन्द्र । मीच जाण ॥१०-३४॥॥२७२॥ पक्षांत गरुड । वाहत्यांचा वात । शस्त्रधा-यामध्ये । राम मीच ॥१०-३५॥॥२७३॥ सरपटणा-या । जीवांत मकर । प्रवाहामध्ये मी । भागीरथी ॥१०-३६॥॥२७४॥ सर्गांचा मीच गा । आदि मध्य अंत । विद्यांमध्ये जाण । अध्यात्म मी ॥१०-३७॥॥२७५॥ प्रवादीं वाद मी । अक्षरीं अकार । समासांमध्ये मी । द्वन्द्व जाण ॥१०-३८॥॥२७६॥ अक्षय काल मी । धाता मी विश्वाचा । सर्वहर मृत्यू । मीच जाण ॥१०-३९॥॥२७७॥ उद्भव करीतो । मीच भविष्याचा । कीर्ति श्री नि वाचा । स्मृति मेधा ॥१०-४०॥॥२७८॥ धृति क्षमा सारे । नारीरूपी भाव । सामामध्ये मीच । बृहत्साम ॥१०-४१॥॥२७९॥ छन्दांत गायत्री । मासी मार्गशीर्ष । ऋतूंत वसन्त । मज जाण ॥१०-४२॥॥२८०॥ छळांमध्ये द्यूत । तेजस्व्यांचे तेज । जय व्यवसाय । तेही मीच ॥१०-४३॥॥२८१॥ सात्विकांचे सत्त्व । वृष्णींचा मी कृष्ण । पाण्डवामध्ये मी । धनंजय ॥१०-४४॥॥२८२॥ मुनींमध्ये व्यास । कवींचा उशना । दमनसाधनीं । दण्ड मीच ॥१०-४५॥॥२८३॥ वर्तनांत नीति । गुह्यांमध्ये मौन । ज्ञानीयांचे ज्ञान । मीच जाण ॥१०-४६॥॥२८४॥ सर्वच भूतांचे । मूळबीज मीच । त्यावीण नसते । चराचरीं ॥१०-४७॥॥२८५॥ माझ्या विभूतींच्या । वैविध्यास कधी । नसतोच अन्त । झलक ही ॥१०-४८॥॥२८६॥ जे जे विशेषत्व । ऊर्जित श्रीमत । माझ्याच तेजाचा । जाण अंश ॥१०-४९॥॥२८७॥ अन्यथा तुजसी । जाणून हे सारे । काय मतलब । अर्जुना गा ॥१०-५०॥॥२८८॥ सारे जग मज । अंश मात्र माझे । ऐशापरी जाण । प्रमाण गा ॥१०-५१॥॥२८९॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । विभूतियोग हा । ऐसा सिद्ध ॥१०-५२॥
॥२९०॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अकराव्या ॥११-१॥॥२९१॥ अर्जुन म्हणतो । गुह्य हें सांगूनी । केला अनुग्रह । मजवरी ॥११-२॥॥२९२॥ ऐकूनी हें सारे । गेला माझा मोह । माहात्म्य अव्यय । भगवंता ॥११-३॥॥२९३॥ पहावे वाटते । ईश्वरी स्वरूप । शक्य कां पाहणें । इये डोळां ॥११-४॥॥२९४॥ श्रीकृष्ण म्हणती । पहा गा अर्जुना । शेकडो हजारो । रूपें तरी ॥११-५॥॥२९५॥ अनेक वर्णांच्या । अनेक आकृती । नानाविध दिव्ये । पाहूनी घे ॥११-६॥॥२९६॥ पाही आदित्यांना । वसूना रुद्राना । दोन्ही अश्विनीना । मरुताना ॥११-७॥॥२९७॥ कधी ना देखीली । ऐसीही आश्चर्ये । घेई पाहूनीया । प्रसन्न मी ॥११-८॥॥२९८॥ एकवटलेली । चराचर सृष्टी । सारे जग पाही । एके ठायी ॥११-९॥॥२९९॥ मानवी डोळ्यानी । पाहणे ना शक्य । दिव्यदृष्टी देतो । पाहण्यास ॥११-१०॥॥३००॥ संजय वर्णीतो । धृतराष्ट्रालागी । दर्शन जे झाले । अर्जुनास ॥११-११॥॥३०१॥ अनेक शरीरे । किती तळपत्या । दिव्य आयुधांनी । नटलेली ॥११-१२॥॥३०२॥ दिव्य वस्त्रे माळा । दिव्य गन्धलेप । अद्भुत दर्शन । देवाचे ते ॥११-१३॥॥३०३॥ हजारो सूर्यही । एकाच वेळी कां । प्रकट होतील । आकाशात ॥११-१४॥॥३०४॥ निव्वळ भासच । महान तेजाचा । म्हणावे इतुके । तेजःपुंज ॥११-१५॥॥३०५॥ रोमांच उठले । अर्जुनाचे देही । कृष्णास वंदन । करी म्हणे ॥११-१६॥॥३०६॥ दिसतात देव । ब्रम्हा ईश ऋषी । विशेष भूतांचे । संघ किती ॥११-१७॥॥३०७॥ अनेक बाहूनी । सजलेसे रूप । यासी आदि मध्य । अंत नाही ॥११-१८॥॥३०८॥ आगीचा डोंब कां । झाला तेजोमय । प्रकाश प्रकाश । सर्वदूर ॥११-१९॥॥३०९॥ विश्वाचे निधान । तूंच गा निश्चित । शाश्वत धर्माचे । गुपित तूं ॥११-२०॥॥३१०॥ सूर्यचन्द्र डोळे। तेजाचेच वस्त्र । विश्वात भरला । तेजाग्नि तूं ॥११-२१॥॥३११॥ पृथ्वी नि आकाश । यातील अंतर । आणि सर्व दिशा । व्यापल्यास ॥११-२२॥॥३१२॥ अद्भुत नि उग्र । ऐशा ह्या रूपाने । कंपित जाहले । तीन्ही लोक ॥११-२३॥॥३१३॥ सुरांचे संघही । कांहीसे भ्यालेले । स्तुतिसुमने की । उधळती ॥११-२४॥॥३१४॥ महर्षी सिद्धांचे । संघ विनवती । स्वस्ति म्हणताती । स्तवनात ॥११-२५॥॥३१५॥ रुद्रादित्य वसू । गंधर्व नि यक्ष । विस्मित पाहती । तुज सारे ॥११-२६॥॥३१६॥ नभी भिडलेले । नेत्र विस्फारित । रूप ऐसे तुझे । पाहूनिया ॥११-२७॥॥३१७॥ दिशाहीन मन । धृति हरपली । वाटते कालाग्नि । झेप घेतो ॥११-२८॥॥३१८॥ सा-या कौरवाना । राजाना भीष्माना । द्रोण कर्ण ह्याना । कितीकाना ॥११-२९॥॥३१९॥ वाटते सर्वाना । विक्राळ हें तोंड । ओढूनीया घेते । वेगे किती ॥११-३०॥॥३२०॥ दातांमध्ये चूर्ण । होताहेत सारे । तुकडे तुकडे । होऊनीया ॥११-३१॥॥३२१॥ जैसे कीं पतङ्गा । ज्योत आकर्षिते । नाश त्यांचा होतो । शीघ्रतेने ॥११-३२॥॥३२२॥ तैसेच वाटते । कराल मुख हें । जगाचाच घास । घेते काय ॥११-३३॥॥३२३॥ सांग तूं कोण बा । उग्ररूपधारी । प्रसन्न होई गा । वंदितो मी ॥११-३४॥॥३२४॥ श्रीकृष्ण म्हणती । लोकक्षयासाठी । ठाकलो आहे मी । काल जाण ॥११-३५॥॥३२५॥ तुजसी कांहीही । वाटत असेल । इथे जे समोरी । योद्धे उभे ॥११-३६॥॥३२६॥ त्यांच्यापैकी कोणी । नाही उरायचे । आधीच मारले । मीच त्याना ॥११-३७॥॥३२७॥ निमित्त केवळ । व्हावयाचे तुज । होई सज्ज यश । होईल गा ॥११-३८॥॥३२८॥ भीष्म द्रोण कर्ण । जयद्रथ आणि । कितीक मृतांचे । दुःख कैचे ॥११-३९॥॥३२९॥ ऐकून कृष्णाचे । वचन अर्जुन । वंदन करूनी । म्हणे ऐसे ॥११-४०॥॥३३०॥ तुझ्या ह्या रूपाला । राक्षसही भ्याले । सारेच वंदन । करतात ॥११-४१॥॥३३१॥ "सखा" ऐसे तुज । बरळलो किती । प्रमाद कितीक । झाले वाटे ॥११-४२॥॥३३२॥ पिता पुत्रालागी । सखा सखयास । क्षमा करतो की । तैसे कर ॥११-४३॥॥३३३॥ कधी न देखीलें । ऐसें तुझें रूप । पाहूनी झालो मी । भयग्रस्त ॥११-४४॥॥३३४॥ तरी नेहमीच्या । किरीटधारी नि । गदाधारी रूपी । राही बरा ॥११-४५॥॥३३५॥ श्रीकृष्ण सांगती । केवळ प्रसन्न । होऊनी दावीलें । ऐसे रूप ॥११-४६॥॥३३६॥ देवांचे मनीही । आस दर्शनाची । ऐशा ह्या रूपाच्या । नेहमीच ॥११-४७॥॥३३७॥ वेदाभ्यास तप । दान यज्ञ केले । तरी ऐसे रूप । नव्हे साध्य ॥११-४८॥॥३३८॥ केवळ अनन्य । भक्ती करणारा । मजसी तत्त्वाने । जाणतो गा ॥११-४९॥॥३३९॥ गीतोपनिषदी । संवाद चालता । देखीले अर्जुने । विश्वरूप ॥११-५०॥
॥३४०॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ बाराव्या । अध्यायास ॥१२-१॥॥३४१॥ अर्जुनाचा प्रश्न । नेहमीच युक्त । राहूनी जे भक्ती । करतात ॥१२-२॥॥३४२॥ किंवा जे तुजसी । मानती अव्यक्त । अक्षर यांपैकी । श्रेष्ठ कोण ॥१२-३॥॥३४३॥ माझेशी जे मन । ठेऊनी श्रद्धेने । भजती ते तरी । युक्त खरे ॥१२-४॥॥३४४॥ अव्यक्त अक्षर । मानूनी स्वयत्ने । इन्द्रिये ताब्यात । ठेऊनीया ॥१२-५॥॥३४५॥ सर्वभूतां हित । स्वतः समबुद्धि । तेही पहा येती । मजप्रत ॥१२-६॥॥३४६॥ अव्यक्तीं आसक्ती । ती तो कष्टप्रद । अव्यक्त निधान । अखेरचे ॥१२-७॥॥३४७॥ जे कां सारी कर्में । मजसी अर्पूनी । अनन्यपणाने । ध्याती मज ॥१२-८॥॥३४८॥ भवसागरी मी । त्वरेने तारीतो । समुद्धार त्यांचा । करीतो मी ॥१२-९॥॥३४९॥ बुद्धीचा निवेश । करी मम ठायी । माझेच निवासी । राहशील ॥१२-१०॥॥३५०॥ मम ठायी चित्त । करणे कठीण । वाटल्यास इच्छा । मनी धरी ॥१२-११॥॥३५१॥ इच्छा करणेही । वाटेल कठीण । मदर्थचि करी । सारी कर्मे ॥१२-१२॥॥३५२॥ हेही जरी वाटे । कठीण तरी गा । सर्वकर्मफले । त्यागावीत ॥१२-१३॥॥३५३॥ अभ्यासापरीस। ज्ञान जाण श्रेष्ठ । ज्ञानापेक्षा श्रेष्ठ । जाण ध्यान ॥१२-१४॥॥३५४॥ ध्यानापेक्षा श्रेष्ठ । कर्मफलत्याग । त्यागाने मिळते । नित्य शांति ॥१२-१५॥॥३५५॥ मित्र सर्वभूतां । सुखदुःखी सम । सतत संतुष्ट । क्षमाशील ॥१२-१६॥॥३५६॥ माझे नाहीं कांही । ऐसा मनी दृढ । मनबुद्धि मज । अर्पिलेली ॥१२-१७॥॥३५७॥ जयाविशी वाटे । सर्वानाच प्रेम । ज्याचे मनी प्रेम । सर्वांसाठी ॥१२-१८॥॥३५८॥ नाही अति हर्ष । नाहीच उद्वेग । नाही आकांक्षा वा । नाही भय ॥१२-१९॥॥३५९॥ नाही शुभाशुभ । ना मानापमान । स्तुति वा निंदा वा । मानी सम ॥१२-२०॥॥३६०॥ ऐसा भक्त मज । नेहमीच प्रिय । हे जे सांगीतले । अमृतचि ॥१२-२१॥॥३६१॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ऐसा झाला सिद्ध । भक्तियोग ॥१२-२२॥
॥३६२॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ तेराव्या । अध्यायास ॥१३-१॥॥३६३॥ श्रीकृष्ण सांगती । देह जाण क्षेत्र । ह्यास जाणणारा । क्षेत्रज्ञ तो ॥१३-२॥॥३६४॥ सारीच क्षेत्रे मी । जाणीतो म्हणूनी । क्षेत्रक्षेत्रज्ञत्व । तें ज्ञान माझे ॥१३-३॥॥३६५॥ क्षेत्र म्हंजे काय । विकारही त्याचे । प्रभाव तयाचा । कैसा असे ॥१३-४॥॥३६६॥ कितीक ऋषीनी । छंदात वर्णीले । मांडीली वैशिष्ट्ये । ब्रम्हसूत्री ॥१३-५॥॥३६७॥ पांची महाभूतें । अहंकार मन । बुद्धि नि अव्यक्ती । दशेन्द्रियें ॥१३-६॥॥३६८॥ पंचप्राण इच्छा । द्वेष सुख दुःख । चेतना नि धृति । ऐसा मेळा ॥१३-७॥॥३६९॥ तोचि जाण क्षेत्र । ह्याचा स्वभावचि । सदा बदलतो । नाही स्थिर ॥१३-८॥॥३७०॥ ज्ञान सिद्ध होण्या । हवें अमानित्व । अहिंसाही हवी । नको दंभ ॥१३-९॥॥३७१॥ क्षांति नि ऋजुता । भावें गुरुसेवा । पावित्र्य नि स्थैर्य । विनिग्रह ॥१३-१०॥॥३७२॥ सद्गुणचि ज्ञान । याच्या जें उलटें । अज्ञान म्हणती । भगवंत ॥१३-११॥॥३७३॥ जाणावेसे जें जें । ज्ञेय तया नांव । प्रकाशते तेव्हां । ज्ञान होते ॥१३-१२॥॥३७४॥ ज्ञान सिद्ध होण्या । क्षेत्र स्वच्छ हवें । म्हणूनी सद्गुण । जोपासावे ॥१३-१३॥॥३७५॥ प्रकृति पुरुष । दोन्ही ते अनादि । प्रकृति स्वभावें । गुणमयी ॥१३-१४॥॥३७६॥ प्रकृतिस्थ होतां । प्रकृतिनुरूप । पुरुष भोगतो । गुण तैसे ॥१३-१५॥॥३७७॥ भोगांत गुंतला । जीव तें पाहून । दूरच राहतो । परमात्मा ॥१३-१६॥॥३७८॥ जीवानें धरीतां । नैतिक भूमिका । शाब्बास म्हणतो । जवळूनी ॥१३-१७॥॥३७९॥ आर्तता जाहल्या । देव धांव घेतो । जैसे द्रौपदीस । सांवरीले ॥१३-१८॥॥३८०॥ भूतमात्री जरी । विखुरलें वाटे । अखंड सर्वत्र । एक तत्त्व ॥१३-१९॥॥३८१॥ सर्वान्तरी वास । करीतें जरी हें । सर्वासभोंवती । हेंचि आहे ॥१३-२०॥॥३८२॥ कोठेही न जाई । थांबे ना कधीही । जवळीच आहे । दूर सुद्धां ॥१३-२१॥॥३८३॥ नव्हे हा व्यत्यास । आहे प्रमेयचि । ज्यास उमगलें । धन्य झाला ॥१३-२२॥॥३८४॥ त्यानेच ना दिले । सारेच जीवन । अर्पण करावें । त्याचें त्यास ॥१३-२३॥॥३८५॥ क्षेत्रक्षेत्रज्ञाचा । ऐसा पहा योग । गीतोपनिषदी । झाला सिद्ध ॥१३-२४॥
॥३८६॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ चौदाव्या । अध्यायास ॥१४-१॥॥३८७॥ आधी तेराव्यात । म्हटले पुरुष । होतो गुणमयी । प्रकृतिस्थ ॥१४-२॥॥३८८॥ सत्त्व रज तम । गुणांचे प्रभाव । इथे चौदाव्यात । सांगीतले ॥१४-३॥॥३८९॥ गुण ठेवताती । पुरुषा देहात । अपुल्या प्रकारे । गुंतवूनी ॥१४-४॥॥३९०॥ सुख आणि ज्ञान । बंधने सत्त्वाची । रजाची बंधने । राग तृष्णा ॥१४-५॥॥३९१॥ प्रमाद आळस । निद्रा तमोगुणी । बंधने ही भूल । पाडताती ॥१४-६॥॥३९२॥ रज आणि तम । याहूनी अधिक । जरी सत्त्वगुण । सात्त्विक तो ॥१४-७॥॥३९३॥ तसेंच ठरतें । कोण बा राजसी । कोण बा तामसी । म्हणावा तें ॥१४-८॥॥३९४॥ फळ तें निर्मळ । सात्त्विक गुणांचे । निष्पत्ति दुःखद । राजसाची ॥१४-९॥॥३९५॥ तामस्यास फळ । अज्ञान म्हटलें । कनिष्ठ तें पहा । दुःखाहून ॥१४-१०॥॥३९६॥ त्रिगुणांचा खेळ । माझाच हें ज्यास । समजलें तोच । खरा द्रष्टा ॥१४-११॥॥३९७॥ देहधारी होणें । कारण त्रिगुणा । त्यांच्या पलीकडे । ध्यान हवें ॥१४-१२॥॥३९८॥ ऐसे ज्ञान होतां । जन्म मृत्यू जरा । ऐसी सारी दुःखें । नष्ट होती ॥१४-१३॥॥३९९॥ ऐसे मुक्त होणें । तेंच अमरत्व । त्रिगुणापल्याड । ध्यान हवें ॥१४-१४॥॥४००॥ अर्जुनाचा प्रश्न । कैशा आचाराने । त्रिगुणापल्याड । जाणें शक्य ॥१४-१५॥॥४०१॥ श्रीकृष्ण सांगती । प्रसंग येतात । सुखाचे दुःखाचे । जातातही ॥१४-१६॥॥४०२॥ प्रसंगांचे सुद्धा । असतात गुण । त्यांना त्यांचेजागी । असो द्यावें ॥१४-१७॥॥४०३॥ सुख वा दुःख वा । लोह कीं सुवर्ण । प्रिय कीं अप्रिय । सारे सम ॥१४-१८॥॥४०४॥ निंदा किंवा स्तुति । मान अपमान । मित्र किंवा शत्रू । सारे सम ॥१४-१९॥॥४०५॥ ऐशा मनोभावें । माझे ठायीं भक्ति । अविचल होतां । ब्रम्हस्थिति ॥१४-२०॥॥४०६॥ तेंच तरी माझे । अमृत अव्यय । शाश्वत धर्माचें । अधिष्ठान ॥१४-२१॥॥४०७॥ गीतोपनिषदी । त्रिगुणात्मभेद । विवरणारा हा । योग ऐसा ॥१४-२२॥
॥४०८॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । पंधराव्या ॥१५-१॥॥४०९॥ अश्वत्थ वृक्षाच्या । उदाहरणाने । सांगीतले कैसे । फोफावती ॥१५-२॥॥४१०॥ मानव जीवनी । विषयप्रवाळ । गुणही ठेवती । गुंतवूनी ॥१५-३॥॥४११॥ ऐशा अश्वत्थास । छाटण्या समूळ । शस्त्र तें केवळ । निःसङ्गता ॥१५-४॥॥४१२॥ वाटेतील गुंता । छाटतां दिसतो । राजमार्ग आणि । नित्यस्थान ॥१५-५॥॥४१३॥ तैसे नित्यस्थान । लाभण्यास हवी । मानमोहशून्य । अध्यात्मता ॥१५-६॥॥४१४॥ माझे सुद्धा जाण । तेंच स्थान नित्य । चन्द्रसूर्याविना । तेजाळतें ॥१५-७॥॥४१५॥ माझेच अंश गा । जीवांत राहूनी । मन नि इन्द्रियें । चालवीती ॥१५-८॥॥४१६॥ केवळ ज्ञानीच । जाणती मजसी । गुणमयी तरी । गुणातीत ॥१५-९॥॥४१७॥ सूर्याचें चन्द्राचें । अग्नीचें जें तेज । जग उजाळतें । माझेंच तें ॥१५-१०॥॥४१८॥ मीच सोमरस । पोषीतो औषधी । जीवांच्या देही मी । वैश्वानर ॥१५-११॥॥४१९॥ प्राण नि अपान । समान वायूनी । पचवीतो अन्न । चतुर्विध ॥१५-१२॥॥४२०॥ वेदाभ्यासानेही । माझे ज्ञान होते । वेद मी वेदान्त । करवीता ॥१५-१३॥॥४२१॥ सर्वांचे हृदयीं । निविष्ट असा मी । स्मृति मी ज्ञान मी । विवेकही ॥१५-१४॥॥४२२॥ पुरुष असतो । क्षर नि अक्षर । सर्व देहीं स्थित । क्षर तरी ॥१५-१५॥॥४२३॥ दुसरा अक्षर । परमात्मा ऐसा । ईश्वरीय वास । लोकत्रयी ॥१५-१६॥॥४२४॥ मी तरी उत्तम । अक्षराहूनही । पुरुषोत्तमसा । सर्वश्रुत ॥१५-१७॥॥४२५॥ ऐसे गुह्यांमध्ये । गुह्यतम शास्त्र । जाणून होई गा । बुद्धिमंत ॥१५-१८॥॥४२६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । पुरुषोत्तमाचा । योग सिद्ध॥१५-१९॥
॥४२७॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ सोळाव्या । अध्यायास ॥१६-१॥॥४२८॥ प्रथमच्या तीन । श्लोकांमध्ये यादी । मांडली सव्वीस । सद्गुणांची ॥१६-२॥॥४२९॥ मग सांगीतले । अज्ञान मत्सर । क्रोध लोभ आणि । मद दंभ ॥१६-३॥॥४३०॥ गुणसंपदा ही । दैवी वा आसुरी । असते बहुधा । अभिजात ॥१६-४॥॥४३१॥ दैवी संपदेने । मोक्ष तो सुलभ । आसुरी संपदा । गुंतवीते ॥१६-५॥॥४३२॥ आसुरी वृत्तीचे । लोक न मानती । आचारसंहिता । शुचिता वा ॥१६-६॥॥४३३॥ आशाअपेक्षांत । सदा रममाण । भ्रष्टाचारा देती । खतपाणी ॥१६-७॥॥४३४॥ कामभोगासाठी । अन्याय मार्गानी । द्रव्यार्जना देती । प्रोत्साहन ॥१६-८॥॥४३५॥ आज मिळवीलें । उद्या आणीकचि । मिळवीन हीच । खुमखुमी ॥१६-९॥॥४३६॥ आज ह्या शत्रूस । दिली खास मात । जिंकेन अजून । इतराना ॥१६-१०॥॥४३७॥ मी तो सार्वभौम। माना ईश्वरचि । कोणाची हिम्मत । माझेपुढे ॥१६-११॥॥४३८॥ अशांची पूजने । ढोंगे ती केवळ । गर्विष्ठपणाचा । तमाशाच ॥१६-१२॥॥४३९॥ ऐसे कामातुर । अहंकारी क्रोधी । मनाने मजसी । हेटाळती ॥१६-१३॥॥४४०॥ ऐशा नराधमा । हीन योनिक्रम । मिळतो सदैव । जन्मोजन्मी ॥१६-१४॥॥४४१॥ काम क्रोध लोभ । नरकास नेती । रहावे सावध । निरंतर ॥१६-१५॥॥४४२॥ शास्त्र विधी ह्याना । देऊनीया छाट । कामकारकशा । कर्मी रत ॥१६-१६॥॥४४३॥ कैसेनी पावेल । सिद्धि सुख गति । कार्य नि अकार्य । ध्यान हवें ॥१६-१७॥॥४४४॥ शास्त्रविधियुक्त । करावीत कर्मे । सतर्क सशक्त । आचरावी ॥१६-१८॥॥४४५॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । दैवासुरभेद । विवरला ॥१६-१९॥
॥४४६॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । सतराव्या ॥१७-१॥॥४४७॥ सोळाव्याचे अंती । श्रीकृष्ण म्हणाले । शास्त्रविधियुक्त । कर्म करी ॥१७-२॥॥४४८॥ इथे अर्जु्नाने । प्रश्न विचारीला । जरी श्रद्धायुक्त । कर्म केले ॥१७-३॥॥४४९॥ शास्त्रविधियुक्त । नाहीच जाहले । कैसी ती म्हणावी । कर्मनिष्ठा ॥१७-४॥॥४५०॥ अर्जुनाने प्रश्नी । श्रद्धा आणि निष्ठा । ऐसे दोन शब्द । वापरले ॥१७-५॥॥४५१॥ उत्तरांत कृष्ण । म्हणाले श्रद्धा ही । सात्त्विक राजसी । तामसीही ॥१७-६॥॥४५२॥ व्यक्तीची श्रद्धा गा । सत्त्वानुरूपचि । पुरुष असतो । श्रद्धामय ॥१७-७॥॥४५३॥ ज्याची जैसी श्रद्धा । तैसाचि तो वागे । सात्त्विक करीती । देवपूजा ॥१७-८॥॥४५४॥ राजस पूजीती । यक्षराक्षसास । तामसी पूजीती । भूतेंप्रेतें ॥१७-९॥॥४५५॥ शास्त्रविधिविना । घोर तपे केली । दंभ अहंकार । माजतती ॥१७-१०॥॥४५६॥ देहांत वसतो । माझाही जो अंश । त्याचेही करीती । उच्चाटन ॥१७-११॥॥४५७॥ आहार असतो । त्रिविध आणिक । यज्ञ तप दान । त्रिविधचि ॥१७-१२॥॥४५८॥ सात्त्विक आहारें । आयुष्य वाढतें । बल सत्त्व सुख । वाढताती ॥१७-१३॥॥४५९॥ रस्य स्निग्ध स्थिर । हृद्य ऐसी सत्त्वें । आहारीं असतां । सात्त्विक तो ॥१७-१४॥॥४६०॥ कटू वा आंबट । खारट तिखट । दाहक कोरड्या । पदार्थांचे ॥१७-१५॥॥४६१॥ सेवन ठरतें । राजस आहार । देती दुःख शोक । अस्वस्थता ॥१७-१६॥॥४६२॥ तामस सेवीती । नासलें आंबलें । नीरस उच्छिष्ट । चवहीन ॥१७-१७॥॥४६३॥ नसतां फलांची । अपेक्षा तरीही । यज्ञ विधियुक्त । सात्त्विक ते ॥१७-१८॥॥४६४॥ राजसींचे यज्ञ । फलाशा धरून । दंभही असतो । कार्यात त्या ॥१७-१९॥॥४६५॥ मंत्रतंत्राविना । शास्त्रविधिविना । घडतात यज्ञ । तामस्यांचे ॥१७-२०॥॥४६६॥ तपांचे प्रकार । कायिक वाचिक । आणि मानसिक । जाणावेत ॥१७-२१॥॥४६७॥ देव द्विज गुरु । प्राज्ञ यांची पूजा । शौच आर्जव नि । ब्रम्हचर्य ॥१७-२२॥॥४६८॥ अहिंसा पाळणें । ऐसी सारी तपें । कायिक ठरती । लाभदायी ॥१७-२३॥॥४६९॥ उद्वेगरहित । बोलण्याची रीत । सत्य प्रिय आणि । हितकारी ॥१७-२४॥॥४७०॥ स्वाध्याय अभ्यास । सारे मिळूनिया । वाङ्मयीन तप । सिद्ध होते ॥१७-२५॥॥४७१॥ मनीं प्रसन्नता । सौम्यत्व संयम । शुद्धतेने तप । मानसिक ॥१७-२६॥॥४७२॥ त्रिविध तपांचा । श्रद्धेने आचार । फलाकांक्षेविना । सात्त्विकांचा ॥१७-२७॥॥४७३॥ राजस करीती । तपाचरण तें । व्हावा सत्कार हा । दंभ मनीं ॥१७-२८॥॥४७४॥ तामस्यांचे तप । वेड्या कल्पनांचे । काढण्यास कांटा । शत्रूंचा वा ॥१७-२९॥॥४७५॥ सात्त्विक करीती । दानासाठी दान । मनी न धरीती । उपकार ॥१७-३०॥॥४७६॥ राजस्यांचे दान । उपकार मनीं । कांहीं फलाशाही । दानापोटी ॥१७-३१॥॥४७७॥ तामस्यांचे दान । अयोग्य लोकांना । स्थान काळवेळ । अयोग्यचि ॥१७-३२॥॥४७८॥ ब्रम्हाचा प्रसिद्ध । मंत्र ॐ तत्सत् हा । त्याचेही त्रिविध । उपचार ॥१७-३३॥॥४७९॥ ब्रम्हवादी लोक । यज्ञतपदाना । प्रारंभ करीती । ॐ काराने ॥१७-३४॥॥४८०॥ मुमुक्षु जनांचे । ध्यान "तत्" वरती । यज्ञी तपी दानी । फलत्यागी ॥१७-३५॥॥४८१॥ साधुभाव ज्यांचा । त्यांची सारी कर्मे । केवळ सत्कर्मे । असतात ॥१७-३६॥॥४८२॥ श्रद्धेविना यज्ञ। तप दान केले । इहपरलोकी । असत्य तें ॥१७-३७॥॥४८३॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । त्रिविध श्रद्धेचे । विवेचन ॥१७-३८॥
॥४८४॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अठराव्या ॥१८-१॥॥४८५॥ अध्यायाप्रारंभी । अर्जुन विनवी । संन्यास नि त्याग । स्पष्ट करा ॥१८-२॥॥४८६॥ श्रीकृष्ण म्हणाले । कामनाप्रेरित । कर्मांचा त्याग जो । संन्यास तो ॥१८-३॥॥४८७॥ साऱ्याच कर्मांच्या । फलाशेचा त्याग । तोच समजावा । त्याग खरा ॥१८-४॥॥४८८॥ कांहींचे म्हणणें । कर्मे सदोषचि । असतात तरी । त्यागावीत ॥१८-५॥॥४८९॥ माझे मत तरी । यज्ञ तप दान । कर्में ही पावन । करणारी ॥१८-६॥॥४९०॥ त्यागूं नयेत ती । परि कर्मीं संग । आणि त्यांची फलें । त्यागावीत ॥१८-७॥॥४९१॥ नियत कर्मांचा । संन्यास अशक्य । तैसा प्रयत्नही । तामसी तो ॥१८-८॥॥४९२॥ दुःखकष्टप्रद । वाटती जी कर्में । त्यागणे राजस । अर्थशून्य ॥१८-९॥॥४९३॥ कर्में जी नियत । करणें फलाशा । त्यांची सोडूनीया । सात्त्विक तें ॥१८-१०॥॥४९४॥ देहधारी होतां । कर्में न करीता । राहणें केवळ । अशक्य तें ॥१८-११॥॥४९५॥ श्वासोच्छ्वास तरी। घडत असतो । कर्म तें टाळणें । अशक्यचि ॥१८-१२॥॥४९६॥ कर्मफलत्याग । करणारा तोच । म्हटला जातसे । त्यागी खरा ॥१८-१३॥॥४९७॥ कर्मांची फळेंही । असती अनिष्ट । इष्ट किंवा मिश्र । म्हणावीसी ॥१८-१४॥॥४९८॥ परंतु ही दृष्टी । त्यानाच ना लागू । ज्यानी फलत्याग । नाही केला ॥१८-१५॥॥४९९॥ कर्मसिद्धीलागी । पांच तत्त्वें पहा । कृतान्ती सांख्यानी । सांगीतली ॥१८-१६॥॥५००॥ अधिष्ठान कर्ता । करणें विविध । विविध चेष्टा नि । दैव ऐसी ॥१८-१७॥॥५०१॥ ऐसे असताना । कर्माचें कर्तृत्व । कर्त्याचे केवळ । कैसे होय ॥१८-१८॥॥५०२॥ ’मी केलें’ हा भाव । नाही ज्याचे मनीं । अलिप्त ठेवीतो । बुद्धिस जो ॥१८-१९॥॥५०३॥ त्याच्या युद्धकर्मी । कितीकही मेले । त्याचा दोष त्यास । नाही येत ॥१८-२०॥॥५०४॥ ज्ञान ज्ञेय आणि । परिज्ञाता सारे । उद्युक्त करीती । कर्माप्रत ॥१८-२१॥॥५०५॥ कर्माचे फलित । राहते संचित । कर्म कर्ता आणि । करणांत ॥१८-२२॥॥५०६॥ ज्ञान कर्म कर्ता । यांचे त्रिगुणात्म । विश्लेषण घेई । समजून ॥१८-२३॥॥५०७॥ सर्वांभूतीं भाव । एकचि अव्यय । ह्याचें ज्ञान होणें । सात्त्विक तें ॥१८-२४॥॥५०८॥ सर्वांभूतीं भाव । वेगळाले ऐसे । ज्ञान तें राजस । समजावें ॥१८-२५॥॥५०९॥ तत्त्वार्थहीन नि । अत्यल्प उथळ । ज्ञान तें तामसी । समजावें ॥१८-२६॥॥५१०॥ नियत कर्माचा । आचार निःसंग । रागद्वेषाविना । सात्त्विक तें ॥१८-२७॥॥५११॥ कामप्रेरित वा । अहंकारयुक्त । कर्म तें राजसी । समजावें ॥१८-२८॥॥५१२॥ मोहाने प्रेरित । हिंसाक्षययुक्त । कर्म तें तामसी । समजावें ॥१८-२९॥॥५१३॥ निःसंगवृत्तीचा । भाव अकर्त्याचा । तरी योग्य धृति । उत्साहही ॥१८-३०॥॥५१४॥ सिद्धि कीं असिद्धि । याची नाही खंत । कर्ता तो सात्त्विक । समजावा ॥१८-३१॥॥५१५॥ रागलोभ दावी । दृष्टी कर्मफलीं । हिंसाही करेल । राजस तो ॥१८-३२॥॥५१६॥ कर्मायोग्य ज्ञान । कसब नसतां । हट्टी वा आळसी । खीळ पाडी ॥१८-३३॥॥५१७॥ करी टाळाटाळ । हेतू ही अस्वच्छ । कर्ता तो तामसी । समजावा ॥१८-३४॥॥५१८॥ बुद्धि धृति सुख । यांचेही त्रिविध । भेद कैसे होती । ध्यानी घेई ॥१८-३५॥॥५१९॥ कार्य तें कोणतें । कोणतें अकार्य । बुद्धि ती सात्त्विक । विवेकाची ॥१८-३६॥॥५२०॥ कार्य-अकार्याचा । विवेक ना जाणे । बुद्धि ती राजस । समजावी ॥१८-३७॥॥५२१॥ अधर्मास धर्म । अकार्यास कार्य । विपरीत बुद्धि । तामसी ती ॥१८-३८॥॥५२२॥ मन-इन्द्रियांची । कर्में योगयुक्त । चालवीते धृति । सात्त्विक ती ॥१८-३९॥॥५२३॥ धर्म-अर्थ-कामी । रमणारी धृति । कधी फलाकांक्षी । राजस ती ॥१८-४०॥॥५२४॥ स्वप्न-शोक-भय । दुःखानी ग्रसित । धृति असमर्थ । तामसी ती ॥१८-४१॥॥५२५॥ सुखही असते । तीन प्रकारांचे । सात्त्विक राजस । तामसही ॥१८-४२॥॥५२६॥ आधी जणूं विष । अंती अमृतशा । सात्त्विक सुखात । प्रसन्नता ॥१८-४३॥॥५२७॥ विषयवासना । इन्द्रियोपभोग । ह्यानी अमृतसे । वाटे आधी ॥१८-४४॥॥५२८॥ अंती विषासम । ज्याचा परिणाम । सुख तें राजस । समजावें ॥१८-४५॥॥५२९॥ प्रारंभापासून । मोही गुंतवून । निद्रा नि आळस । वाढवीती ॥१८-४६॥॥५३०॥ बेताल वागणें । तेंही वाढवीती । सुखें ती तामसी । समजावी ॥१८-४७॥॥५३१॥ ऐसे पाहूं जाता । त्रिगुणात्म भेद। जीवनाच्या साऱ्या । पैलूमध्ये ॥१८-४८॥॥५३२॥ ब्राम्हण क्षत्रिय । वैश्य शूद्र संज्ञा । कर्मांची वाटणी । करण्यास ॥१८-४९॥॥५३३॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५०॥॥५३४॥ ब्राम्हण म्हणावें । कोणास त्यासाठी । ब्रम्हकर्मछटा । ऐशा जाण ॥१८-५१॥॥५३५॥ शांति नि संयम । तपाचरण नि । शुद्धता आणिक । क्षमावृत्ति ॥१८-५२॥॥५३६॥ पारदर्शकता । ज्ञानी व विज्ञानी । देवावर श्रद्धा । ब्राम्हण्य तें ॥१८-५३॥॥५३७॥ क्षात्रतेज शौर्य । धृति नि दाक्षिण्य । युद्धातून नाही । पलायन ॥१८-५४॥॥५३८॥ दानशूरता नि । ईश्वरीय निष्ठा । क्षत्रिय वृत्तीचे । प्रमाण हे ॥१८-५५॥॥५३९॥ कृषि गोरक्षण । वाणिज्य वैश्याचे । सेवातत्परता । शूद्रकर्म ॥१८-५६॥॥५४०॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५७॥॥५४१॥ श्रीकृष्ण सांगती । आपापल्या कामी । राहूनही सिद्धि । शक्य सर्वां ॥१८-५८॥॥५४२॥ उद्धारास हवा । समर्पण भाव । रहावें मच्चित्त । अर्जुना गा ॥१८-५९॥॥५४३॥ अहंकारामुळे । जरी तुझे मनी । युद्ध न करीन । करशील ॥१८-६०॥॥५४४॥ प्रत्येकाचा पिंड । स्वभावानुरूप । स्वतःच्या कर्मानी । घडतसे ॥१८-६१॥॥५४५॥ आणि सर्वाभूती । ईश्वराचा अंश । चालवीतो सारी । यंत्रे जणूं ॥१८-६२॥॥५४६॥ त्यासी जा शरण । पार्था सर्वभावें । त्याच्या प्रसादाने । यश होतें ॥१८-६३॥॥५४७॥ शिष्यधर्म किंवा । पौत्रधर्म सारे । सोडूनी शरण । मजसी ये ॥१८-६४॥॥५४८॥ पापांचे क्षालन । करेन तूं नको । संशय मुळीच । मनी धरूं ॥१८-६५॥॥५४९॥ जें जें कांही गुह्य । तुज सांगीतलें । अभक्तास नाही । सांगायाचें ॥१८-६६॥॥५५०॥ कांही कैसे गुह्य । एकाग्र चित्ताने । ऐकून मनांत । ठसलें का ॥१८-६७॥॥५५१॥ संशय मनींचे । निवलेसे काय । अज्ञानतिमिर । निमाला कां ॥१८-६८॥॥५५२॥ अर्जुन म्हणाला । कबूली देतसा । संशय कसला । नाही आतां ॥१८-६९॥॥५५३॥ मोह निरसला । तुझ्या प्रसादाने । पाळीन आदेश । तुझे सारे ॥१८-७०॥॥५५४॥ संजय म्हणतो । श्रीकृष्ण अर्जुन । यांचा हा संवाद । रोमांचक ॥१८-७१॥॥५५५॥ ऐकाया मिळाला । व्यासांच्या कृपेने । सद्गदित आहे । मन माझे ॥१८-७२॥॥५५६॥ कानांत घुमतो । जणूं तो संवाद । आनंदलहरी । उसळती ॥१८-७३॥॥५५७॥ आठवतें रूप । कृष्णाचें अद्भुत । विस्मयचकित । पुन्हां होते ॥१८-७४॥॥५५८॥ जेथें जेथें कृष्ण । अर्जुन आहेत । तेथेंच विजय । निश्चयीच ॥१८-७५॥॥५५९॥ गीतोपनिषदी । मोक्षसंन्यासाचा । योग अखेरचा । ऐसा सिद्ध ॥१८-७६॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
Categories: Learning Sanskrit

ईशावास्योपनिषत् - अभंगवृत्तात

Slez - Fri, 08/18/2017 - 13:10
ईशावास्योपनिषत् - अभंगवृत्तात ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||हरिः ॐ असे हेंही पूर्ण | असे तेंही पूर्ण | पूर्णातुनि पूर्ण | उपजते ||शान्ति-1||पूर्णातुनि पूर्ण | जरि काढियेले | शेष जें राहतें | तेंही पूर्ण ||शान्ति-2||ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् | तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम् ||1||जें जें जगीं "जगत्" | म्हणावेसे आहे | अणोरेणवी कीं | ईश्वरचि ||1||अर्पण करूनी | उपभोग घ्यावा | धन कां कोणते | आपुलेच ||2||कुर्वन्नेवेह कर्माणि | जिजीविषेच्छतं समाः | एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति | न कर्म लिप्यते नरे ||2||शतकोत्तरी कां | जगावेसें वाटे | कर्मचि सर्वथा | करणेचे ||3||ऐसेचि जीवन | पर्याय ना कांही | निर्लेप रहावें | कर्मी रत ||4||असुर्या नाम ते लोकाः | अन्धेन तमसावृताः | तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति | ये के चात्महनो जनाः ||3||मोहांधकाराने | जग व्यापलेले | मोहांचे कशास | आकर्षण ||5||तरीही मोहित | वागतात लोक | आत्मघातकी ही | वृत्ति तरी ||6||अनेजदेकं मनसोजवीयः | नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् | तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत् | तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ||4|| सत्यप्रकाशाचा | वेग प्रकाशाचा | देवांनाही तें कां | समजले ||7||जागीच राहून | पळत्यासी लांघी | जीव याचेवीण | जगतो कां ||8||तदेजति तन्नैजति | तद्दूरे तद्वन्तिके | तदन्तरस्य सर्वस्य | तदुसर्वस्यास्य बाह्यतः ||5||कोठेही न जाई | थांबे ना कधीही | जवळीच आहे | दूर सुद्धा ||9||सर्वांचे अंतरी | वास की याचाच | सर्वांसभोवती | हेंच आहे ||10||यस्तु सर्वाणि भूतानि | आत्मन्येवावतिष्ठति | सर्वभूतेषु चात्मानम् | ततो न विजुगुप्सते ||6||भूतमात्र सारे | अपुलेच ठायी | सर्वांभूतीं पाहे | आपणासी ||11||ऐसी जी कां स्थिति | साधीयेली ज्याने | जिंकावे हरावें | कोणासंगे ||12||यस्मिन् सर्वाणि भूतानि | आत्मैवाभूत् विजानतः | तत्र को मोहः कः शोकः | एकत्वमनुपश्यतः ||7||भूतमात्र सारे | जरी आत्मरूप | भेट कीं वियोग | कोणासंगे ||13||भूतमात्र सारे | जरी एकरूप | हरवतें काय | काय हवें ||14||स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणम् | अस्नाविरं शुद्धमपापविद्धम् | कविर्मनीषी परिभूः स्वयंभूर्- याथातथ्यतः | अर्थान्व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ||8||काव्यात्म होवोनी | गुह्यार्थ गमता | समानता सिद्ध | शाश्वतचि ||15||तादात्म्य निष्पाप | शुभ्र निर्गुणाशी | स्वयंभू विशुद्ध | निष्कलंक ||16||अन्धं तमः प्रविशन्ति | येऽविद्यामुपासते | ततो भूय इव ते तमः | य उ विद्यायां रताः ||9||अभ्यासिती जे कां | अविद्या सदैव | गर्तेत पडती | अंधकारी ||17||विद्याच केवळ | अभ्यासणाऱ्यास । त्यालाही अंधार । भेटेल ना ||18||अन्यदेवाहुर्विद्यया | अन्यदाहुरविद्यया | इति शुश्रुम धीराणाम् | ये नस्तद् विचचक्षिरे ||10||विद्याभ्यासीयांचे | अपुले म्हणणें | अविद्यावाल्यांचे | आणीकचि ||19||गूढार्थ तो घ्यावा | त्यांचेचकडून | धीरगंभीर जे | विचक्षणी ||20||विद्यां चाविद्यां च | यस्तद्वेदोभयं सह | अविद्यया मृत्युं तीर्त्वा | विद्ययामृतमश्नुते ||11||समतोल त्याने | बरा साधीयेला | विद्या नि अविद्या | दोन्ही येतां ||21||अविद्या जाणोनी | मृत्यूस तो लांघी | विद्येने साधतो | अमरत्व ||22||अन्धं तमः प्रविशन्ति | येऽसंभूतिमुपासते | ततो भूय इव ते तमः | य उ संभूत्यां रताः ||12||निर्गुण ध्यानाने | ज्यांची उपासना | गर्तेत पडती | अंधकारी ||23||सगुणपूजनी | सदा जे आसक्त | अंधारचि भेटे | त्यांना सुद्धा ||24||अन्यदेवाहुः संभवात् | अन्यदाहुरसंभवात् | इति शुश्रुम धीराणाम् | ये नस्तद् विचचक्षिरे ||13||सगुणपूजक | म्हणतात कांही | निर्गुणाचा वाद | आणीकचि ||25||सन्मार्ग तो घ्यावा | त्यांचेचकडून | धीरगंभीर जे | विचक्षणी ||26||संभूतिं च विनाशं च | यस्तद्वेदोभयं सह | विनाशेन मृत्युं तीर्त्वा | संभूत्यामृतमश्नुते ||14||सगुण तो जन्म | विनाशे निर्गुण | समजतां होते | बुद्धि स्थिर ||27||विनाशाचे ज्ञाने | मृत्यूलाही जिंकी | संभूतीने लाहे | अमरत्व ||28||हिरण्मयेन पात्रेण | सत्यस्यापि हितं मुखम् | तत्त्वं पूषन्नपावृणु | सत्यधर्माय दृष्टये ||15||हिरण्मयी पात्री | सदा झांकलेले | असते निखळ | सत्य जाणा ||29||मोहाचे वेष्टण | सदा दिपवते | भेदूनी पहावा | सत्यधर्म ||30||पूषन्नेकऋषे | यम सूर्य प्राजापत्य | व्यूह रश्मीन् समूह | ततो  यत्ते रूपं कल्याणतमम् तत्ते पश्यामि | योsसावसौ पुरुषः | सोsहमस्मि ||16||अहो एक ऋषि | यम पोषकही | दर्शक रक्षक | विश्लेषक ||31||कल्याणकारक | रूप तेज ज्याचे | मीच तो पुरुष | गमे मज ||32||वायुरनिलममृतम् | अथेदं भस्मान्तं शरीरम् | ॐ क्रतो स्मर कृतं स्मर | क्रतो स्मर कृतं स्मर ||17||अनिलानलानो | वाहूनीया न्यावे | भस्मचि होणार | शरीर हें ||33||काया-वाचा-मनें | भक्ति आचरतां | कर्म अग्निभूत | ॐ-काराने ||34||अग्ने नय सुपथा राये अस्मान् | विश्वानि देव वयुनानि विद्वान् | युयोध्यस्मज् जुहराणमेनः | भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम ||18||अग्नि गा विद्वाना | सन्मार्गाने नेई | विश्वातील सारे | जीवजंतू ||35||तुझीया ज्वाळानी | पापे नाश करी | पुनःपुन्हा घेई | वन्दने ही ||36||ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||असे हेंही पूर्ण | असे तेंही पूर्ण | पूर्णातुनि पूर्ण | उपजते ||शान्ति-1||पूर्णातुनि पूर्ण | जरि काढियेले | शेष जें राहतें | तेंही पूर्ण ||शान्ति-2||||ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||सुशान्त सुशान्त सुशान्त हो s !!!सस्नेहम् अभ्यंकरकुलोत्पन्नः श्रीपादः ।"श्रीपतेः पदयुगं स्मरणीयम् ।"
Categories: Learning Sanskrit

श्रीरामायणातील सुंदरकाण्ड - अभंगवृत्तात

Slez - Fri, 08/18/2017 - 13:04
 हरिः ॐ श्रीरामायणातील सुंदरकाण्ड (अभंगवृत्तात)हरिः ॐ रामायणातील सुंदरकाण्ड (अभंगवृत्तात)अनुक्रमणिका
१ मंगलाचरण ............................................   पदे १ ते ६२ रामायणाची तोंडओळख ...............................        ७ ते १२३ सुन्दरकाण्डाच्या प्रारंभासाठी किष्किंधाकाण्डातील    शेवटचा प्रसंग ........................................       १३ ते २६४ हनुमानाला खुणेची अंगठी ............................        २७ ते ३२५ विश्रांतीसाठी मैनक पर्वत समुद्रातून उफाळतो .........        ३३ ते ४३६ सरसा सर्पीण वाटेत ...................................       ४४ ते ६१७ समुद्रकिनारी राक्षसिणीला मारले .......................      ६२ ते ६६८ लंकिणी राक्षसिणीला ठोसा .............................      ६७ ते ९४९ लघुरूपात सीतेचा शोध .................................      ९५ ते १०११० विभीषणाशी भेट व त्यांचेकडून मार्गदर्शन ............      १०२ ते १२१११ अशोकवनात सीता दिसली, पण रावण तिथे ..........      १२२ ते १३९१२ सीता आणि त्रिजटा यांचा संवाद .....................      १४० ते १६२१३ सीतेशी भेट, भुकेल्या मारुतीला फळे खाण्याची अनुमति      १६३ ते १८६१४ अशोकवनात धुडगुस, राजपुत्र अक्षाला फेकून दिले, इंद्रजिताच्या  ब्रम्हास्त्राचा मान, कैद झालेला मारुती दरबारात .......      १८७ ते २१९१५ रावणाचा मारुतीला प्रश्न ..............................     २२० ते २२९१५ - १ मारुतीचे उत्तर, रामदूत असल्याचा दावा ..........     २३० ते २५२१५ - २ देहदंडाची शिक्षा, विभीषणाची मध्यस्थी, शेपटीस आग      लावण्याची आज्ञा मारुतीने लंका पेटवली .............   २५३ ते २९११६ सीतामाईकडून चूडामणि ...............................     २९२ ते ३०११७ सुग्रीवाना व श्रीरामाना वृत्तांतनिवेदन,  सेना जमली, समुद्राचे काठी ...........................      ३०२ ते ३३३१८ रावण विभीषणाचे ऐकत नाही .........................     ३३४ ते ३५९१९ विभीषण रामाकडे, पाठोपाठ रावणाने धाडलेले  राक्षस हेरही प्रभूदर्शनाने मोहित, लक्ष्मणाचा  त्यांच्याकरवी रावणाला संदेश ........................       ३६० ते ४१०२० रावण संदेश धुडकारतो, शुकमुनींचा उद्धार ............      ४११ ते ४५२२१ सागराला रामबाणाचा धाक, नल-नीलानी सेतू बांधावा      ४५३ ते ४६७२२ उपोद्-घात ..........................................      ४६८ ते ४७४

हरिः ॐ रामायणातील सुंदरकाण्ड (अभंगवृत्तात)(१)प्रथम वंदन । सदा कार्यारंभी । देवाधिदेवास । गणेशास ॥१॥तसेच वंदन । रामा रघुराया । सर्वथा कृपाळु । जगदीशा ॥२॥नमन आणिक । अञ्जनीसुतास । भक्तांमध्ये श्रेष्ठ । हनुमान ॥३॥वंदन वाल्मीकि । ऋषीना त्यांचीच । जग उद्धाराया । रामकथा ॥४॥ऋषींची महत्ता । त्यांची कथा खरी । होण्यासाठी होती । अवतार ॥५॥आणिक वंदन । तुलसीदासाना । चरित मानस । रचियेले ॥६॥(२)रामायणामध्ये । पहा सात काण्डे । आधी बालकाण्ड । अयोध्याकाण्ड ॥७॥अरण्यकाण्ड नि । किष्किंधाकाण्डही । सुंदरकाण्ड नि । युद्धकाण्ड ॥८॥उत्तरकाण्ड गा । साती काण्डातही । सुंदरकाण्ड तें । कौतुकाचे ॥९॥सुंदरकाण्डात । हनुमान गेला । सीतेस शोधाया । लंकेकडे ॥१०॥अष्टौ सिद्धी सा-या । वापरून कैसे । रामदूत काज । निभावले ॥११॥म्हणून पठण । सुंदरकाण्डाचे । व्हावे भक्तिभावे । नित्यनेमे ॥१२॥(३)सुंदरकाण्ड हें । किष्किंधाकाण्डाचा । संदर्भ घेऊन । सुरूं होते ॥१३॥म्हणूनी पाहिला । पाहिजे प्रसंग । किष्किंधाकाण्डाचे । अखेरीचा ॥१४॥जटायूचा भाऊ । सम्पति सांगतो । रावण लंकेस । सीतेसह ॥१५॥सभा तेव्हां झाली । आतां शोध हवा । लंकेस जाऊन । करायला ॥१६॥अंगद म्हणाला । जाईन मी सज्ज । विश्वास ठेवा कीं । मजवरी ॥१७॥जांबवंत तरी । पाहती मारुति । बोलत कां नाहीं । गप्प गप्प ॥१८॥स्तुति आरंभिली । पवनसुताची । विवेकी विज्ञानी । बलभीमा ॥१९॥कोणतेही काज । तुजसाठी नाही । कठीण हें तरी । सर्वमान्य ॥२०॥पर्वताएवढा । मोठाही होशील । लहान होतोसी । माशीसम ॥२१॥अणिमा गरिमा । लघिमा महिमा । ईशित्व वशित्व । प्राकाम्यता ॥२२॥कामावसायिता । ऐशा आठी सिद्धी । वरताती तुज । भक्तश्रेष्ठा ॥२३॥रामकाजासाठी । अवतार तुझा । तेजःपुंज देह । सूर्यासम ॥२४॥लंकेस जाऊनी । रावणा मारूनी । आणणे त्रिकूट । उखाडूनी ॥२५॥हें सारे शक्य । केवळ तुजसी । सीतेची अवस्था । पहा तरी ॥२६॥(४)जांबवंतानी जें । केले आवाहन । ऐकूनि मारुति । संतोषला ॥२७॥म्हणाला आभार । मित्रा जांबवंता । जाण मज दिली । कार्य काय ॥२८॥सीतामाईचे मी । दर्शन घेऊन । येईन तोंवर । विश्राम ना ॥२९॥खाऊं कीं दोघेही । कंदमुळें साथ । आत्ता तरी लंका । गांठायची ॥३०॥सर्वाना वंदन । करूनी निघाला । कपिवर आला । प्रभूंकडे ॥३१॥रामानी दिधली । खुणेस आंगठी । आणि यशस्वी हो । आशिर्वाद ॥३२॥(५)हनुमान आला । समुद्रकिनारी । फुगविली छाती । महाश्वासें ॥३३॥हृदयी आसन । दिलें रघुनाथा । घेतलें उड्डाण । दक्षिणेस ॥३४॥झेप घेण्यासाठी । पर्वताचे माथी । जोर दिला कांहीं । हनुमानें ॥३५॥तेवढ्या दाबाने । पर्वत दबला । पहा पाताळात । पोहोंचला ॥३६॥सागर पाहतो । हा तो रामदूत । आकाशमार्गाने । निघाला कीं ॥३७॥मैनक पर्वता । त्याने सांगितले । विसावा देण्यास । ऊठ बरा ॥३८॥सागराचे जळी । फँवारा उडाला । मैनक उठला । उंच-उंच ॥३९॥मारुति म्हणाले । आभार मैनका । परि मज आतां । विश्राम ना ॥४०॥लंकेस जाईन । शोधून काढीन । सीतामाई कोठे । आहे कैसी ॥४१॥मनी आता नाही । दुसरा विचार । परतेन तेव्हां । पुन्हा भेटूं ॥४२॥अलगद हात । मैनका लावून । मारुति वेगाने । पुढे गेला ॥४३॥(६)मनोवेगे जातो । हनुमान देखा । कौतुके पाहती । देवगण ॥४४॥परीक्षा पहावी । त्याच्या त्या निष्ठेची । ऐसे मनी आले । देवाजींच्या ॥४५॥सुरसा नांवाच्या । सर्पिणीस त्यांनी । धाडीले मार्गच । अडविण्या ॥४६॥मारुतीचे पुढे । ठाकली सर्पीण । जबडा थोरला । पसरूनी ॥४७॥वाटले तिजला । जबडा पाहूनी । घाबरेल आता । हनुमान ॥४८॥म्हणाली वानरा । निघालास कुठे । गिळून टाकाया । आले तुज ॥४९॥मारुती कां कधी । संकट पाहूनी । घाबरूनी काज । त्यजेल बा ॥५०॥ त्याने केला देह । जबड्यापेक्षाही । दुप्पटसा मोठा । क्षणार्धात ॥५१॥तिनेही जबडा । आणि मोठा केला । तरीही दुप्पट । हनुमंत ॥५२॥आणिक जबडा । तिने पसरता । माशीसम छोटा । हनुमंत ॥५३॥करी सर्पिणीचे । कानी गुणगुण । परत जाताना । भेटूंच कीं ॥५४॥आत्ता तरी मज । जाऊं दे ना माये । प्रभूचे कामास । लगबग ॥५५॥सुरसा म्हणाली । यशस्वी हो बाळा । परीक्षा मी केली । उत्तीर्ण तूं ॥५६॥रावणाची लंका । आहे मोहमाया । भयाणही आहे । सावध जा ॥५७॥देवानाही आहे । काळजी मनात । रावण पाहिजे । संपविला ॥५८॥म्हणून देवानी । मला पाठविले । सावध करण्या । परीक्षेने ॥५९॥श्रीरामाचे काम । करशील नीट । ।विश्वास वाटतो । मला सुद्धा ॥६०॥ऐसा सुरसीचा । आशिष मिळता । मारुति निघाला । भरारीने ॥६१॥(७)लंकेजवळील । सागरात एक । राक्षसी कपटी । रहातसे ॥६२॥नभी उडणा-या । पक्षांची प्रतिमा । पाण्यात पाहूनी । झेप घेई ॥६३॥चट्टामट्टा करी । कितीक पक्षांचा । दैनंदिन तिचा । उपद्व्याप ॥६४॥तसाच प्रयोग । हनुमंतावर । करण्याचा बेत । तिचा होता ॥६५॥परन्तु चकवा । देऊनी तिजला । आघात करूनी । मारीयेले ॥६६॥(८)समुद्राचे काठी । होती वनराई । मनास मोहन । घालणारी ॥६७॥वानर जातीस । सहज भुरळ । घालील ऐसीच । होती शोभा ॥६८॥पण वायुसुता । नव्हती उसंत । क्षणभरसुद्धा । थांबण्यास ॥६९॥डोंगरानजीक । दिसला किल्ल्याचा । भला मोठा तट । उंचापुरा ॥७०॥साधासा वानर । होऊनी मारुति । चढला डोंगर । माथ्यावरी ॥७१॥तटाजवळील । एका वृक्षावर । बसूनी करीतो । निरीक्षण ॥७२॥निशाचरांच्या त्या । वस्तीच्या रक्षणा । धिप्पाड राक्षस । सारीकडे ॥७३॥मायावीही होते । त्यातील कितीक । अंतर्ज्ञानाने ते । ध्यानी आले ॥७४॥राजवाडा कोठे । तिथेच असेल । सीतामाईस कां । कोंडलेले ॥७५॥सूर्यास्त होईल । आता इतुक्यात । अंधारात कोणा । दिसेन ना ॥७६॥तरीही मच्छर । होऊनी सर्वत्र । संचार करावा । हेंच बरें ॥७७॥तोंवरी अंदाज । घेऊं सारीकडे । व्यवस्था कैसी बा । रावणाची ॥७८॥झाडांच्या फांद्यांना । झोके देत जाणे । वानरास तरी । काम सोपे ॥७९॥महाल दिसले । छोटे मोठे ऐसे । ज्याचा जैसा हुद्दा । तेणे रीती ॥८०॥गर्द झाडीमागे । आणि एक तट । दिसला तिथे कां । राजवाडा ॥८१॥मारुति निघाला । तिकडेच जाण्या । द्वारीच लंकिणी । राक्षसीण ॥८२॥वानरा तूं कोठे । ऐसा निघालास । सारे पशूपक्षी । खाद्य माझे ॥८३॥चुकवूनी माझी । नजर कुणीही । नाहीच जायाचे । नेम आहे ॥८४॥तिच्या वल्गनेस । उत्तर म्हणून । जोरदार ठोसा । लगावला ॥८५॥सा-याच प्रश्नांची । उत्तरे शब्दात । नाही कांही देत । बसायाचे ॥८६॥विवेक तो सारा । होता अवगत । मारुतीस त्याने । तैसे केले ॥८७॥जबड्याचे तिच्या । दात निखळले । हा तरी वानर । साधा नव्हे ॥८८॥अचानक एक । पुराण प्रसंग । आठवूनी म्हणे । मारुतीला ॥८९॥ब्रम्हाने रावणा । वर जरी दिला । मलाही संकेत । खास दिला ॥९०॥जेव्हा तुज कोणा । वानराचा ठोसा । पडेल जाण तूं । संकेत तो ॥९१॥राक्षसकुळाच्या । नाशाचीच नांदी । प्रभूचें दर्शन । तुज जाण ॥९२॥धन्य मी जाहलें । रामदूताचे कीं । दर्शन जाहलें । हनुमंता ॥९३॥अडवूं शकेल । नाही तुज कोणी । तरीही जाई गा । संभाळून ॥९४॥(९)घेऊनीया मग । अति लघुरूप । सतत स्मरण । श्रीरामाचे ॥९५॥करीत निघाला । नगर धुंडण्या । कोठे कां दिसेल । सीतामाई ॥९६॥घराघरामध्ये । महाली महाली । धुंडीत चाललें । लघुरूप ॥९७॥एका प्रासादात । स्वतः दशानन । पाहीला जाताना । शयनास ॥९८॥तिथे तरी नाही । दिसली वैदेही । कांहीसे हायसे । वाटलेही ॥९९॥धुंडीत राहीला । इकडे तिकडे । लघुरूपामुळे । वेळ लागे ॥१००॥ नाही उमगले । किती वेळ गेला । ब्रम्हमुहूर्तही । सुरू झाला ॥१०१॥(१०)एका प्रासादात । सारेच आगळे । सर्वत्र पावित्र्य । दाटलेले ॥१०२॥ईशान्य दिशेस । नेटक्या देऊळी । हरीची मूरत । विराजित ॥१०३॥छोट्या वृंदावनी । तुळस साजिरी । पणती तेवती । कोनाड्यात ॥१०४॥देवाचीये दारी । उभा क्षणभरी । नमन करूनी । निघणार ॥१०५॥तेव्हाच वाटले । कोणी जागे झाले । कानी आले शब्द । जय श्रीराम ॥१०६॥कपि चमकला । ऐसा श्रद्धापूर्ण । इथे आहे कोण । रामभक्त ॥१०७॥ओळख ह्याची का । करूनीया घ्यावी । कालापव्यय हा । ठरूं नये ॥१०८॥कदाचित ह्याची । ओळख झाल्यास । मदत होईल । निजकामी ॥१०९॥रामभक्त येतो । वाटले बाहेर । प्रासादाचे दारी । पोहोचला ॥११०॥हनुमंत घेई । ब्राम्हणाचे रूप । मंद मंद बोले । रामजप ॥१११॥यजमान आले । पुसती विप्रास । रामप्रहरास । कैसे आले ॥११२॥वाटते प्रभूनी । मजवरी कृपा । करूनी आपणा । धाडीयेले ॥११३॥किंवा कां स्वतःच । प्रभू रामचंद्र । माझे दारी आज । प्रकटले ॥११४॥ऐसी रामभक्ती । पाहूनी मारुति । ओळख आपुली । देता झाला ॥११५॥यजमानानीही । ओळख दिधली । रावणाचा भ्राता । विभीषण ॥११६॥मारुतीने मग । सांगीतले कैसे । प्रभूंचे दर्शन । त्यास झाले ॥११७॥सीतेस शोधणे । आहे काम मज । कृपया दावावा । मार्ग मज ॥११८॥विभीषण तेव्हां । सांगते जाहले । अशोकवनात । सीतामाई ॥११९॥पाळत ठेवतो । रावण कैसेनी । खबरदारीही । कैसी हवी ॥१२०॥विभीषण देती । यशाचा आशिष । निरोप दिधला । सौहार्दाने ॥१२१॥(११)अशोकवनात । थेट पोहोचला । देखीयेली दीन । सीतामाई ॥१२२॥रोडावला देह । डोईवर जटा । एक वेणी देखे । पादांगुष्ठ ॥१२३॥राक्षसिणी चार । होत्या पहा-यास । आतां केव्हां कैसा । पुढे होऊं ॥१२४॥नजर टाकतां । इकडेतिकडे । रावणाची स्वारी । येतां दिसे ॥१२५॥रावण बोलला । साम दाम दण्ड । भेद सा-या नीति । चतुराई ॥१२६॥म्हणे एकवार । पाही मजकडे । राम काय तुझा । मजसम ॥१२७॥शिवाय देशील । मजसी नजर । कौतुक करेन । पहा कैसे ॥१२८॥ सा-या माझ्या राण्या । मंदोदरी सुद्धा । दासी होतील त्या । तुझे पायी ॥१२९॥गवताची पात । ओठास धरून । स्मरूनीया मनी । रघुपति ॥१३०॥म्हणे दशानना । काजवा करेल । किती टिमटिम । त्याने काय ॥१३१॥कमळ फुलेल । कल्पनाच नाही । रामाचे बाणाची । तुज कांहीं ॥१३२॥शिवधनुष्य तें । छातीवरी येता । पंचप्राण तुझे । कासावीस ॥१३३॥विसरलास तूं । तेंच की धनुष्य । मोडले रामाचे । हाती कैसे ॥१३४॥परि तुज नाही । कांही सुद्धा लाज । कपटाने मज । आणीयले ॥१३५॥रावणा संताप । जाहला म्हणाला । इथे राम परि । येत नाही ॥१३६॥पुन्हा त्या रामाचे । नाव माझ्यापुढे । घेशील छाटीन । जीभ तुझी ॥१३७॥ऐसी देऊनीया । ताकीद सीतेस । धपाधप पाय । आपटीत ॥१३८॥रावण निघून । गेला तेव्हां सा-या । राक्षसिणी सुद्धा । घाबरल्या ॥१३९॥(१२)एका स्त्रीचे दुःख । स्त्रीच समजते । राक्षसिणीनाही । तैसे झाले ॥१४०॥त्यांच्यामध्ये होती । राक्षसीण एक । त्रिजटा नांवाची । रामभक्त ॥१४१॥तिला म्हणे एक । स्वप्न कीं पडले । वानर जाळीतो । लंका सारी ॥१४२॥रावणाची दशा । आणीक भयाण । वीस बाहु त्याचे । कापलेले ॥१४३॥तैसा ओरडत । जाई दक्षिणेस । लंका राख आता । विभीषणा ॥१४४॥सीता म्हणे तीस । नव्हे स्वप्न मात्र । प्रत्यक्ष असेच । घडेलही ॥१४५॥सीतेचे बोलणे । ऐकूनी सा-याच । सीतेचे जवळी । गोळा झाल्या ॥१४६॥जळेल कां लंका । खरेच गे सीते । कोणी सुद्धा नाही । उरणार ॥१४७॥सीतेने म्हटले । त्रिजटेचे स्वप्न । ऐकूनी बोलले । अचानक ॥१४८॥मला तरी आता । जीणे नको वाटे । त्याने ऐसे बोल । उमटले ॥१४९॥त्याचे तुम्ही मनी । घेऊं नका कांही । सख्यांचे वाईट । चिंतेन कां ॥१५०॥सीतेने दिलासा । दिल्याने सगळ्या । आपापल्या जागी । गेल्या सा-या ॥१५१॥त्रिजटा एकटी । राहीली तिजला । म्हणे सीतामाई । काकुळती ॥१५२॥खरेच वाटते । आता नको जीणे । रच एक चिता । माझ्यासाठी ॥१५३॥विरहयातना । असह्य झाल्यात । प्रभूस दया कां । येत नाही ॥१५४॥त्रिजटा म्हणाली । भलतेच काय । रामावरी नाही । विश्वास कां ॥१५५॥शिवाय पहा ना । चिता पेटविण्या । विस्तव रात्रीस । मिळेल कां ॥१५६॥ऐसे बोलूनीया । निघूनही गेली । त्रिजटा आपुल्या । घराकडे ॥१५७॥यातनांची आग । मनास जाळीते । विस्तव कां नाही । चितेसाठी ॥१५८॥ऐशा विचाराने । सीतेच्या मनाची । आणीक जाहली । तडफड ॥१५९॥आकाश पेटले । ता-यानी दिसते । एकही ना येत । पृथ्वीवर ॥१६०॥झाडानो तुम्ही ना । नांवाचे अशोक । आपुले नांव कीं । करा सार्थ ॥१६१॥सीतेचा पाहूनी । विलाप कपीस । वाटला तो क्षण । युगासम ॥१६२॥(१३)काय करावेसा । विचार करीत । अंगठी टाकली । मारुतीने ॥१६३॥सीतेने घेतली । उचलून हाती । खूण ओळखली । प्रभूंची ही ॥१६४॥आत्ता इथे कैसी । आली ही अंगठी । शंका नि आश्चर्य । मनी तिच्या ॥१६५॥इतुक्यात आले । मंद स्वर कानी । श्रीरामनामाचा । जपचि तो ॥१६६॥कोण रामभक्त । इथे आसपास । प्रकट कां नाही । तुम्ही होत ॥१६७॥आज्ञा ती मानून । कर जोडोनीया । समोरी ठाकले । कपिरूप ॥१६८॥मारुतीने सारी । कथा सांगितली । धाडीले रामानी । खुणेसह ॥१६९॥विश्वास दिधला । सक्षेम आहेत । राम नि लक्ष्मण । कोठे कैसे ॥१७०॥सीतामाई तुझा । शोध हा तो झाला । आता आहे घेणे । अंदाजही ॥१७१॥राक्षससेनेचा । कैसे तिचे बल । कमकुवतता । काही कैसी ॥१७२॥सीतेच्या मनात । आली काही शंका । राक्षससेनेचा । अंदाज तूं ॥१७३॥वानर साधासा । कैसा बा घेशील । वाटे सानमुखी। मोठा घास ॥१७४॥क्षमा करी माये । दावीतो नमुना । रामानी मजला । परखले ॥१७५॥ऐसे म्हणूनीया । काही उग्ररूप । तिजला केवळ । दिसेलसे ॥१७६॥दावीले सीताही । धास्तावली कांही । म्हणे क्षमा करी । हनुमाना ॥१७७॥तेव्हा पुन्हा साधा । होऊनी वानर । म्हणे सीतामाई । आशिष दे ॥१७८॥आणीक विनंति । साधीशीच आहे । भूक फार आहे । लागलेली ॥१७९॥इथे झाडांवरी । फळे लगडली । आहेतही खूप । वाटे खावी ॥१८०॥तुझ्या अनुज्ञेने । भूक भागवावी । देई गे अनुज्ञा । प्रार्थितो मी ॥१८१॥इथे परि पहा । विक्राळ राक्षस । पहारा ठेवण्या । नेमलेले ॥१८२॥त्यांची कांही भीती । मला न वाटते । केवळ अनुज्ञा । तुझी हवी ॥१८३॥लडिवाळ त्याचा । आग्रह पाहून । वात्सल्य दाटलें । तिचे मनी ॥१८४॥बरें जा घेई जें । हवें तें खाऊन । संभाळूनि राही । एवढेच ॥१८५॥नमन करूनी । आशिष घेऊनी । जवळील वनी । आला कपि ॥१८६॥(१४)फळे चाखताना । मुद्दामच बिया । राक्षसाना मारी । वेडावीत ॥१८७॥छोटी मोठी झाडे । उपटली तेव्हां । राक्षस चिडले । मारण्यास ॥१८८॥झाडांच्या फांद्याच । घेऊनीया हाती । लढाई त्यांच्याशी । आरंभिली ॥१८९॥कितीक जणाना । जागी लोळवीले । भ्यालेले पळाले । ओरडत ॥१९०॥साध्या वानराने । उच्छाद मांडला । अशोकवनात । नासधूस ॥१९१॥कितीक राक्षस । लोळवीले त्याने । आवरत नाही । कोणा मुळी ॥१९२॥दरबारातही । वार्ता पोहोचली । कसला गोंधळ । काय झाले ॥१९३॥रावणाने एक । सेनेची तुकडी । अशोकवनात । पाठविली ॥१९४॥मारुती करीतो । सैनिकांची थट्टा । कधी घोर रूप । कधी साधा ॥१९५॥सैनिक दिङ्मूढ । कैसी चालवावी । तल्वार करावा । कोठे वार ॥१९६॥भालेही फेकले । त्यांचे तर त्याने । तुकडेच केले । जैसे ऊंस ॥१९७॥काही भाले तर । उलट मारूनी । केले हताहत । सैनिकचि ॥१९८॥वार्ता ती ऐकून । रावण चिडला । म्हणाला अक्षास । राजपुत्रा ॥१९९॥जाई ये बघून । काय प्रकरण । आण तूं बांधून । वानरास ॥२००॥जैसा अक्ष आला । अशोकवनात । काही त्याचे ध्यानी । येण्या आधी ॥२०१॥मारुती शिरला । त्याचे पायामध्ये । प्रचंड होऊनी । फेकीयेले ॥२०२॥जंगलात अक्ष । जाऊनी पडला । घाबरूनी सेना । पलटली ॥२०३॥पळणा-यानाही । नाहीच सोडले । फटके मारूनी । पाडीयेले ॥२०४॥अक्षाचा जाहला । मृत्यू त्याची वार्ता । जरी रावणास । समजली ॥२०५॥पुत्रवधाचा त्या । करण्यास शोक । नव्हती उसंत । कोणासही ॥२०६॥हें तो वाटे युद्ध । एका वानराने । लंकेच्या विरुद्ध । मांडीयेले ॥२०७॥तेव्हा रावणाने । पुत्र इंद्रजित । यास आज्ञा केली । विजयी हो ॥२०८॥मारूं नको त्यास । बांधूनीया आण । समजाया हवे । कोण आहे ॥२०९॥भली मोठी सेना । सवे घेऊनीया । अशोकवनात । मेघनाद ॥२१०॥आला तरी काय । भीति मारुतीस । सैन्याची दाळण । उडविली ॥२११॥एक मोठा वृक्ष । भिरकावुनीया । रथाचे तुकडे । झाले क्षणी ॥२१२॥इंद्रजिताशीच । जाऊनी भिडला । जणू कीं जुंपली । साठमारी ॥२१३॥मारुतीने एक । ऐसा ठोसा दिला । लंकेशपुत्रास । मूर्च्छा आली ॥२१४॥सांवरला तेव्हां । ब्रम्हास्त्रच त्याने । संधान साधाया । खडे केले ॥२१५॥मारुतीने तेव्हा । धरिला विचार । ब्रम्हबाणाचा ह्या । अवमान ॥२१६॥होणे नव्हे योग्य । म्हणूनी नाटक । भोंवळ आल्याचे । त्याने केले ॥२१७॥इंद्रजितासही । आठवली आज्ञा । बांधीला वानर । नागपाशें ॥२१८॥घेऊनीया आला । दरबारामध्ये । सा-या लंकेमध्ये । कुतूहल ॥२१९॥(१५)हळूंहळूं डोळे । उघडूनी पाही । मारुती दर्बार । रावणाचा ॥२२०॥सोन्याच्या पत्र्यानी । हिरेमाणकानी । मढवीले खांब । चोहीकडे ॥२२१॥रत्नजडितशा । उच्च सिंहासनी । विराजला होता । लंकाधीश ॥२२२॥पाहूनी वानर । हसला कुत्सित । जरि एक क्षण । दशानन ॥२२३॥ पुत्रवध काय । ऐशा वानराने । केला विषादही । मनी आला ॥२२४॥लगेच सावध । होऊन रावण । पुसीतो रागाने । वानरास ॥२२५॥वानरा ठाऊक । नाही काय माझा । दरारा त्रिलोकी । कैसा आहे ॥२२६॥काय म्हणूनीया । अशोकवनात । उच्छाद मांडला । निष्कारण ॥२२७॥घेतले कितीक । राक्षसांचे प्राण । देहान्त शिक्षेस । पात्र कृत्य ॥२२८॥स्वतःच्या प्राणांची । पर्वा तुज नाही । औद्धत्य हें केलें । कोणासाठी ॥२२९॥(१५-१)राक्षस मारीले । हें जरी खरें । त्यांत माझा कांहीं । नाही दोष ॥२३०॥स्वतःच्या जीवाची । काळजी सर्वाना । असते मी तरी । भुकेलेला ॥२३१॥झाल्याने फळे मी । तोडत असतां । उगाच मजला । हटकले ॥२३२॥इतुकेच नव्हे । चाल करूनीया । आले मजवरी । तेव्हा मला ॥२३३॥स्वतःचे रक्षण । करावे लागले । उगाच जाहली । झोंबाझोंबी ॥२३४॥राजपुत्रानाही । तूच ना धाडीले । अवसर नाही । मज दिला ॥२३५॥असो जे जाहले । आता बंधनात । आहे हा समोर । तुझ्यापुढे ॥२३६॥ऐक दशानना । तू स्वतः जयाच्या । कृपेने लंकेश । म्हणवीतो ॥२३७॥तीन्ही जगांचा जो । आहे खरा स्वामी । कर्ता-धाता-हर्ता । विश्वाचाच ॥२३८॥खर नि दूषण । त्रिशिर नि वाली । ऐसे बलशाली । नष्ट केले ॥२३९॥शिवधनुष्यही । भंगले ज्या हाती । ज्याची सीतामाई । तुझ्या इथे ॥२४०॥त्याच श्रीरामाचा । दूत हा मी इथे । समज देण्यास । तुज आलो ॥२४१॥जाणतो रावणा । चरित्र गा तुझे । सहस्रबाहूने । काय केले ॥२४२॥वालीबरोबर । तुझा जो जाहला । प्रेमप्रसंग तो । जाणतो मी ॥२४३॥खरे तर होते । वालीने रावण । कांखेमध्ये होता । जखडला ॥२४४॥दरबारामध्ये । तेही रावणाच्या । वाच्यता करणे । अनुचित ॥२४५॥जें कां समजावे । समजेल खास । रावण स्वतःच । तेच पुरे ॥२४६॥तैशा बलशाली । वालीलाही ज्याने । यमसदनास । धाडीयेले ॥२४७॥त्याच श्रीरामाच्या । दूताचा हा सल्ला । ऐक तूं सीतेस । सोडूनी दे ॥२४८॥पुलस्ती मुनींचा । नातू ना आपण । डागाळूं नकोस । त्यांची कीर्ति ॥२४९॥श्रीरामांची मूर्ति । हृदयी धरून । शरण तूं जा गा । त्यांचे पायीं ॥२५०॥तरी दयावंत । प्रभू रामचंद्र । क्षमा करतील । अपराध ॥२५१॥लंकेचे हें राज्य । देतील तुजला । अखंड भोगाया । भक्तिप्रेमें ॥२५२॥(१५-२)जरी रावणाने । मनी समजलें । चरित्र वानर । जाणतो कीं ॥२५३॥दूत खरोखरी । आहे हा सर्वज्ञ । नव्हे कोणी साधा । वानर हा ॥२५४॥परि सर्वांपुढे । होतो अवमान । आव्हानच ह्याने । मांडीयेलें ॥२५५॥याचें आवाहन । मानणे मजला । लंकाधिपतीस । शोभते ना ॥२५६॥धरूनी आवेश । क्रोध नि संताप । मारुतीस म्हणे । दशानन ॥२५७॥स्वतःचे मरण । निकट असता । मजसी देतोस । उपदेश ॥२५८॥कोण्या वानराने । राक्षस मारावे । वरती म्हणावे । रामदूत ॥२५९॥ढोंग हें असलें । नाही चालणार । कळले पाहिजे । ह्यास नीट ॥२६०॥राक्षस मारणे । ऐसा घोर गुन्हा । केल्याने तुजला । देहदंड ॥२६१॥अरे कोणी ह्याला । टाका रे मारूनी । म्हणता राक्षस । पुढे झाले ॥२६२॥इतुक्यात तिथे । विभीषण आले । म्हणाले थांबा रे । अयोग्य हें ॥२६३॥खरे असो खोटे । म्हणवीतो दूत । दूतास मारणे । अशिष्ट तें ॥२६४॥खरे असल्यास । मारण्याने होते । शत्रूस निमित्त । आक्रमणा ॥२६५॥विवेक धरूनी । शिक्षा बदलावी । विनम्र सूचना । करीतो मी ॥२६६॥ठीक आहे ऐसे । मान्य करूनीया । रावण बोलला । कुत्सितसे ॥२६७॥म्हणती वानरा । स्वतःची शेपटी । भारी आवडती । असतसे ॥२६८॥आग लावूनी द्या । ह्याच्या शेपटीस । म्हणता राक्षस । सर्सावले ॥२६९॥शेपटीवरती । गुंडाळण्यासाठी । उपरणे दिली । सर्वानीच ॥२७०॥मारुतीने परि । थट्टा आरंभली । शेपटी करीतो । लांब लांब ॥२७१॥वस्त्रे गुंडाळली । जिथे त्यावरती । तेलही ओतणे । चाललेले ॥२७२॥सा-या लंकेतून । उपरणे आली । सर्व घरातून । तेल आले ॥२७३॥वस्त्रेही संपली । तेलही संपले । शेपटीची लांबी । संपेचि ना ॥२७४॥वस्त्रे गुंडाळून । तेल ओतणारे । राक्षस जाहले । घामाघूम ॥२७५॥शेवटी म्हणाले । आता हें तो पुरे । लावू आता आग । शेपटीस ॥२७६॥शेपटीस आग । लागता मारुती । लागला नाचाया । धावू पळू ॥२७७॥रावणास वाटे । कैसी वानराची । जाहली फजिती । नाचे आता ॥२७८॥मारुतीचे होते । नाटक केवळ । आगीचे चटके । लागल्याचे ॥२७९॥परंतु सर्वांचे । देखत आगीचे । डोंबात दर्बार । पेटला कीं ॥२८०॥पळापळ आता । सुरू जी जाहली । रावणही गेला । महालात ॥२८१॥उंच एक झेप । घेऊनी मारुती । आला महालाचे । छतावर ॥२८२॥ह्या छतावरूनी । त्या छतावरती । गेला पेटवीत । लंका सारी ॥२८३॥लंकेत लोकांची । झाली पळापळ । आरडाओरड । दंगा सारा ॥२८४॥पवनसुताच्या । सहाय्यास आले । पवन छप्पन्न । चहूंकडे ॥२८५॥आगीचा भडका । वाढतच गेला । महालीमहाली । पसरला ॥२८६॥रावणास मुळी । नव्हती कल्पना । परिणाम ऐसा । होईल कीं ॥२८७॥विनाशकाले ही । विपरीत बुद्धि । पश्चात्तापाचा ना । उपयोग ॥२८८॥विभीषणासंगे । भेट जाहल्याने । ठाऊक होता ना । त्याचा वाडा ॥२८९॥तेवढाच वाडा । सोडूनी मारुती । समुद्राचे काठी । पोहोचला ॥२९०॥पाण्यात सोडूनी । पेटती शेपटी । आग ती टाकली । विझवून ॥२९१॥(१६)तेथून पुनश्च । अशोकवनात । सीतामाईपुढे । नमस्कार ॥२९२॥करीत म्हणाला । प्रभूस सांगावा । आणि काही खूण । द्यावी मज ॥२९३॥वेणीमध्ये होता । एक चूडामणी । सीतेने काढून । दिला त्यास ॥२९४॥म्हणाली प्रभूना । देई गा निरोप । आता नाही धीर । राहवत ॥२९५॥एक मास मात्र । वेळ निभावेन । आणिक जगणे । होईल ना ॥२९६॥रावण काढील । माझी जरी छेड । जीवन तेथेच । संपवेन ॥२९७॥मारुतीने तरी । धीर दिला तीस । विश्वास ठेव गे । रामपदी ॥२९८॥सीतेचे चरण । वंदूनी निघाला । आकाशमार्गाने । रामांकडे ॥२९९॥"जय श्रीराम"शी । आरोळी दिधली । तिने लंकावासी । हादरले ॥३००॥(१७)एकाच झेपेत । समुद्र लंघूनी । किष्किंधेजवळी । पोहोचला ॥३०१॥मुखे रामनाम । जप चाललेला । वानरसेनेस । कानी आला ॥३०२॥सारेच वानर । उत्कंठित होते । हकीकत सारी । ऐकण्यास ॥३०३॥त्यांच्या घोळक्यात । मारुती अल्गद । मधुबनामध्ये । उतरला ॥३०४॥त्यानी मधुबनी । घातला धुड्गुस । बनाचे रक्षक । त्रस्त झाले ॥३०५॥वानरानी दिले । रक्षकाना ठोसे । भेटाया निघाले । सुग्रीवाना ॥३०६॥मारुतीने केला । राजाना प्रणाम । छातीस धरले । सुग्रीवानी ॥३०७॥मारुतीने लाज । वानरजातीची । राखीली पाहून । समाधानी ॥३०८॥म्हणाले जाऊया । रामचंद्रांकडे । त्यांच्याच कृपेने । यश आले ॥३०९॥पुढे राजे आणि । साथ जांबुवंत । थोडे त्यांच्यामागे । हनुमंत ॥३१०॥ऐशी सारी स्वारी । रामचंद्रांपुढे । आनंदी विनीत । पोहोचली ॥३११॥सुग्रीवानी केला । हनुमंताप्रती । इशारा चरण । वंदायास ॥३१२॥प्रभूंचे चरणी । माथा टेकूनीया । चूडामणि दिला । रामाकडे ॥३१३॥मणि पाहताच । रामानी धरीले । प्रेमाने छातीशी । मारुतीस ॥३१४॥आलिंगनाने त्या । मारुतीस झाले । धन्य धन्य माझे । जीवन गा ॥३१५॥रामांचे नयनी । अश्रू टपकले । मारुतीचा देह । रोमांचित ॥३१६॥शब्देवीण संवादु । ऐसा तो सोहळा । पाहूनी सर्वाना । धन्य झाले ॥३१७॥प्रभूनी सर्वाना । म्हटले पहा ह्या । पठ्ठ्याने केवळ । सीताशोध ॥३१८॥नाही केला त्याने । दहशत दिली । खुद्द रावणास । वीराने ह्या ॥३१९॥होय ना मारुती । ऐसे विचारता । आपुलीच कृपा । उत्तरला ॥३२०॥सेवकाकडून । सेवा घडवीली । सेवकास श्रेय । नको त्याचे ॥३२१॥आणिकही सेवा । घ्यावी करवून । इतुकीच आहे । अभिलाषा ॥३२२॥सीतेने संदेश । काय बा दिधला । उत्तर देताना । मारुतीचा ॥३२३॥कंठ की दाटला । म्हणाला कष्टाने । दिवस कंठते । सीतामाई ॥३२४॥आपुले स्मरण । सदा सर्वकाळ । तेच हवापाणी । मानते ती ॥३२५॥एका मासाचीच । मुदत बोलली । मुक्ति न झाल्यास । प्राणत्याग ॥३२६॥करेन म्हणाली । तिला जरी दिला । काहीसा विश्वास । आपुला मी ॥३२७॥तरीही विनंति । माझी आपणास । करावी पुढील । तजवीज ॥३२८॥प्रभूनी पाहता । सुग्रीवांचेकडे । सेनापति सारे । पुढे आले ॥३२९॥त्यानीही हुकूम । सैनिकाना दिले । शिस्तीने जमावे । मैदानात ॥३३०॥पाहता पाहता । लाखोंची की सेना । दाखल जाहली । शस्त्रसज्ज ॥३३१॥समुद्रतीरास । तरी पोहोचली । समुद्र करावा । पार कैसा ॥३३२॥विवंचनेत या । थांबले असता । लंकानगरीत । काय झाले ॥३३३॥ (१८)  लंकावासी तरी । होते भयभीत । धिंगाणा इतुका । वानराचा ॥३३४॥प्रत्यक्ष स्वामीच । आल्यास लंकेची । होईल अवस्था । कैसी काय ॥३३५॥मंदोदरी सुद्धा । दशाननालागी । सीतेस सोडण्या । विनवीते ॥३३६॥परंतु रावण । तिजला म्हणतो । तुलाही विसर । पडला का ॥३३७॥मंचकाखालती । किती देवगण । आहेत अजूनी । खितपत ॥३३८॥वानराने केल्या । मर्कटचेष्टा त्या । तुज ना शोभते । भय होणे ॥३३९॥दर्बारात तरी । मंत्रीगण सारे । कौतुक बोलती । रावणाचे ॥३४०॥देवानाही कैद । करता आपणा । व्यत्यय कसला । नाही झाला ॥३४१॥वानरांची आणि । मानवांची सुद्धा । आपणापुढती । तमा काय ॥३४२॥इतुक्यात आले । विभीषण तेथे । पाहती तमाशा । चाललासे ॥३४३॥आपमतलबी । करताती स्तुति । मनातून जरी । बिथरले ॥३४४॥रावणाची आज्ञा । होतां विभीषण । बोलला विचार । परखड ॥३४५॥रामदूताने जी । दशा इथे केली । त्याचे कांही कैसे । ध्यान नाही ॥३४६॥सीता पळवीली । अपराध झाला । ऐसे कोणा नाही । वाटत कां ॥३४७॥अपराधाचे त्या । प्रायश्चित्तासाठी । तिला परतणे । साधे सोपे ॥३४८॥ऐशा विवेकाने । लंकेचे रक्षण । होईल तें सुद्धा । स्पष्ट आहे ॥३४९॥विभीषणांचे ते । विचार ऐकून । मंत्री माल्यवंत । तोही म्हणे ॥३५०॥विभीषणांच्या ह्या । विचाराशी आहे । मीही सहमत । योग्य सर्व ॥३५१॥रावण चिडला । म्हणे ह्या दोघाना । घालवूनी द्या रे । समोरून ॥३५२॥माल्यवंत तरी । स्वतःच निघून । गेले स्वगृहास । खिन्नमने ॥३५३॥विभीषण तरी । आर्जवाने करी । विवेक करावा । विनवणी ॥३५४॥राज्याचे प्रजेचे । हित मनी धरा । अहंकारे होतो । सर्वनाश ॥३५५॥खूप ऐकले मी । विभीषणा तुझे । सहनशक्ती तूं । ताणू नको ॥३५६॥धाकटा बंधू तूं । म्हणून संयम । अजून राखला । आहे जाण ॥३५७॥एवढी रामाची । तुज आहे भक्ती । जा ना मग तूही । त्याचेकडे ॥३५८॥बोलणे खुंटले । पाहूनी हताश । झाला विभीषण । काय म्हणू ॥३५९॥  (१९)प्रभुचरणीच । आता रुजूं व्हावें । तशीच दिसते । ईश्वरेच्छा ॥३६०॥हें तरी सौभाग्य । वाटते लाभते । सफळ होते ना । तपश्चर्या ॥३६१॥परि वानरांच्या । सेनेत होईल । गैरसमजही । काय ठावें ॥३६२॥प्रभूंचे दर्शन । व्हावे हीच आस । त्यांचाच विश्वास । मनी धरूं ॥३६३॥भक्तिभाव ऐसा । मनी साठवून । आकाशमार्गाने । विभीषण ॥३६४॥समुद्र लंघूनी । पोचला निकट । जेथे रामसेना । जमलेली ॥३६५॥येतो विभीषण । पाहूनी सुग्रीव । म्हणे श्रीरामाना । इथे हा कां ॥३६६॥आज्ञा व्हावी तरी । त्यास बांधूनीया । आणाया सांगेन । वानराना ॥३६७॥श्रीराम म्हणती । नका होऊं ऐसे । तुम्ही उतावीळ । धीर धरा ॥३६८॥वाटते शरण । येतो हा मजसी । शरणागत ते । मज प्रिय ॥३६९॥कोटि पापे जरी । असतील केली । शरण आल्याने । नाश होती ॥३७०॥कोणी पापी जीव । माझ्याकडे कधी । येऊंच शकत । नाही पहा ॥३७१॥विभीषण तरी । इकडे येताहे । नक्कीच निष्पाप । मन त्याचे ॥३७२॥आणि हा लक्ष्मण । आहे ना शेजारी । कर्दनकाळ हा । राक्षसांचा ॥३७३॥प्रभूंचे वचन । ऐकूनी वानर । हर्षित जाहले । सुखावले ॥३७४॥विभीषणासच । पुढे घालूनीया । रामांचे समोरी । आणीयले ॥३७५॥ विभीषणाने  तो । प्रभूंचे चरणी । माथा टेकवीला । झडकरी ॥३७६॥म्हणे काकुळती । संचिताने झाला । पुलस्ती कुळात । जन्म जरी ॥३७७॥राक्षसांचा संग । भोगीत राहीलो । आता मात्र वाटे । धन्य धन्य ॥३७८॥आपुला हा संग । आता जन्मभर । असू द्यावा देवा । विनवणी ॥३७९॥करवून घ्यावी । सेवा चरणांची । विसर न व्हावा । क्षणभरी ॥३८०॥श्रीरामानी तरी । उचलूनी त्यास । धरीलें प्रेमाने । हृदयास ॥३८१॥लक्ष्मणाचे सुद्धा । चरण वंदीले । त्यानीही हृदयी । धरीयेले ॥३८२॥हृद्य तो प्रसंग । पाहूनी सर्वांचे । डोळे पाणावले । भक्तिपूर्ण ॥३८३॥हें सर्व होताना । डोईचा मुकुट । हातात धरीला । विभीषणे ॥३८४॥त्याचा तो मुकुट । स्वतः श्रीरामानी । विभीषणाडोई । ठेवीयेला ॥३८५॥विभीषणा तूंच । जनहितदक्ष । योग्यसा लंकेश । शोभतोस ॥३८६॥समुद्र लंघूनी । कैसेनी जाईल । सारे सज्ज सैन्य । सध्या चिंता ॥३८७॥विभीषण म्हणे । एकाच बाणाने । शुष्क की होतील । जलाशय ॥३८८॥आपुल्या बाणांचा । प्रताप थोरला । जाणतो सागर । ठावे मज ॥३८९॥तरी एक वार । सागर स्वतःच । देईल कां वाट । पहावे ना ॥३९०॥आपुले पूर्वज । सम्राट सागर । ह्यानीच केले हे । जलाशय ॥३९१॥त्यांच्या वंशजाच्या । विनंतीचा मान । ठेवतील काय । पहावे ना ॥३९२॥संवाद हा ऐसा । चालला असता । भली मोठी लाट । उसळली ॥३९२॥लक्ष्मण चिडला । म्हणे हा उद्धट । सागर देईल । वाट काय ॥३९३॥धनुष्यास बाण । लावण्यास आज्ञा । करावी सत्वर । मज बंधो ॥३९४॥सबूर लक्ष्मणा । प्रार्थना करणे । प्रथम कर्तव्य । ध्यानी हवे ॥३९५॥समुद्रकिनारी । ठेवूनीया दर्भ । प्रभूनी लावीले । पद्मासन ॥३९६॥हें सारे होताना । सैन्यात कुठेशी । कांही खळबळ । कैसी झाली ॥३९७॥रावणाने होते । विभीषणापाठी । तीघा मायावीना । धाडलेले ॥३९८॥वानर बनूनी । तेही तीघे होते । पहात प्रसंग । रममाण ॥३९९॥मायावी रूपाचा । विसर पडला । राक्षस जाहले । नकळत ॥४०१॥दक्ष वानरानी । बांधूनी तीघाना । खूप चोप दिला । तेव्हा त्यानी ॥४०२॥केली गयावया । नका आणि मारूं । माफ करा आम्हा । श्रीरामांची ॥४०३॥शपथ तुम्हाला । सांगतो आम्हीही । प्रभूंच्या दर्शने । सुखावलो ॥४०४॥ऐकूनी ते बोल । लक्ष्मण म्हणाले । सोडा त्याना आणा । माझ्याकडे ॥४०५॥भुर्जपत्रावरी । सन्देश लिहूनी । म्हणाले त्या हेर । राक्षसाना ॥४०६॥तुमच्या येण्याने । काम सोपे झाले । सन्देश देण्याचे । रावणास ॥४०७॥सांगावे अजूनी । वेळ नाही गेली । सीतेस परत । करूनीया ॥४०८॥युद्ध टाळूनीया । सर्वांचेच हित । साधावें सद्बुद्धि । धरूनीया ॥४०९॥रामानीही स्मित । करूनी दिधली । संमती बंधूचे । प्रस्तावास ॥४१०॥(२०)लंकेत येऊनी । रावणासमोर । दाखल जाहले । तीन्ही हेर ॥४११॥तीघांचा म्होरक्या । नांव त्याचे शुक । रावणाने त्यास । विचारीले ॥४१२॥स्वागत जाहलें । विभीषणाचे कां । शंकाच घेतली । त्याचेवरी ॥४१३॥भोगत ना होता । राजवैभव तो । आता न घरचा । घाटाचा ना ॥४१४॥दुर्बुद्धि झाल्याने । असेच होणार । मज शिकवतो । उपदेश ॥४१५॥शुक परि सांगे । रामानी प्रेमाने । स्वागतचि केले । विभीषणाचे ॥४१६॥लंकाधिपतीचा । मानही दिधला । ऐकून रावण । संतापला ॥४१७॥परि सांवरून । म्हणाला नाटक । झाल्याने लंकेश । कोणी होतो ॥४१८॥बरे सांग कैसी । आहे मर्कटांची । सेना जमवली । बेशिस्तशी ॥४१९॥माकडे अस्वले । घेऊनी लंकेशी । युद्धाचा करेल । घाट कुणी ॥४२०॥शुक परि सांगे । कधी महाराज । शत्रूस अशक्त । मानू नये ॥४२१॥एका वानराने । धिंगाणा घातला । तो तरी वाटतो । लहानगा ॥४२२॥सेनेत आहेत । आणीक कितीक । प्रचंड धिप्पाड । बलशाली ॥४२३॥द्विविद मलंद । नल नील गद । अंगद केसरी । बिकटास्य ॥ ४२४॥दधिमुख आणि । निशठ नि शठ । आणि शक्तिशाली । जांबवंत ॥४२५॥सुग्रीवासमान । वाटताती सारे । अगणित सेना । त्यांची आहे ॥४२६॥ वानरांची वृत्ती ।  जात्या खोडसाळ । तशात प्रेरणा । रामकाज ॥४२७॥सागरजलाची । करू आम्ही वाफ । किंवा पर्वतचि । टाकूं त्यात ॥४२८॥रावणाची लंका । उध्वस्त करूनी । सोडवून आणू । सीतामाई ॥४२९॥ऐसेच म्हणत । आहेत ते सारे । वृथा अभिमान । नाही त्यात ॥४३०॥परि विभीषण । यानी दिला सल्ला । त्यानुसार पूजा । सागराची ॥४३१॥आहे चाललेली । कोणत्याही क्षणी । होईल प्रसन्न । सागरही ॥४३२॥शुकाने दिलेला । वृत्तांत ऐकूनी । रावणास हंसूं । आवरेना ॥४३३॥समुद्र लंघणे । ज्याना नाही ठावे । समुद्राची पूजा । करतात ॥४३४॥विभीषण तरी । जात्या नेभळट । त्याचा म्हणे सल्ला । विचारला ॥४३५॥सांगा त्याना आता । तिथेच रहावे । सीता आहे इथे । सुखरूप ॥४३६॥रावण हंसत । असता शुकाने । पुढ्यात धरले । भुर्जापत्र ॥४३७॥डाव्या हातानेच । घेऊनीया आज्ञा । रावणाने केली । अमात्याना ॥४३८॥वाचा कोणी काय । सन्देश धाडीला । म्हणतात काय । सन्देशात ॥४३९॥लक्ष्मणाने होते । लिहिले रावणा । राक्षस जातीच्या । विनाशास ॥४४०॥कारण स्वतःच । नको तू होऊस । शरण तू येई । रामपदी ॥४४१॥ऐकून रावण । मनी बिथरला । आणून आवेश । गरजला ॥४४२॥सागर किनारी । स्वतः अडलेले । आम्ही तरी मुक्त । जातो येतो ॥४४३॥स्वतःची मर्यादा । ध्यानी न घेताच । रावणास धाक । दाखवीतो ॥४४४॥आणि कां रे शुका । तिकडे जाऊन । तूही मतिभ्रष्ट । जाहला का ॥४४५॥शत्रूसैन्याचीच । स्तुति सांगतोस । त्यासाठी तुजला । धाडीले कां ॥४४६॥ऐसे म्हणूनीया । रावणाने दिली । शुकास जोराने । थोबाडीत ॥४४७॥तेव्हा शुक मान । खाली घालूनीया । निघाला तो आला । रामपदी ॥४४८॥शुक तरी होता । खरा एक मुनी । अगस्तीनी शाप । होता दिला ॥४४९॥म्हणूनी राक्षस । कुळात राहीला । आता उद्धाराची । वेळ आली ॥४५०॥रामानी ठेवीता । हात डोक्यावर । ऋषित्व पुनश्च । सिद्ध झाले ॥४५१॥वंदूनी रामांचे । चरण शतधा । शुकमुनी गेले । निजाश्रमी ॥४५२॥(२१)तीन दिन झाले । अजूनी सागरा । पूजा नाही काय । राज येत ॥४५३॥रामानी म्हटले । लक्ष्मणास आण । बाण नि धनुष्य । आता माझे ॥४५४॥गर्विष्ठ दिसते । हें तो जलतत्त्व । अग्न्यस्त्र पाहीजे । ह्यास आता ॥४५५॥धनुष्यास बाण । लावूनी रामानी । अग्न्यस्त्राचा मंत्र । सुरूं केला ॥४५६॥जलचर सारे । अस्वस्थ जाहले । कितीकांचे प्राण । कासावीस ॥४५७॥झालेसे पाहून । सागर जाहला । भ्रम झटकूनी । सविनय ॥४५८॥दाखल जाहला । ब्राम्हण वेषात । हात जोडूनीया । प्रभूंपुढे ॥४५९॥क्षमा मागीतली । प्रभूंच्या पूजेचा । आदर न केला । त्याचेसाठी ॥४६०॥म्हणतो प्रभूना । कृपाळू होऊन । वाचवा येथील । जलसृष्टी ॥४६१॥प्रभूनी म्हटले । ठीक आता सांग । येथून लंकेस । जावे कैसे ॥४६२॥सागर बोलला । आपुल्या सैन्यात । नल आणि नील । दोघे बन्धू ॥४६३॥आहेत दोघाना । लहानपणीच । मुनीनी दिलेले । वरदान ॥४६४॥पर्वतास जरी । त्यांचा हस्तस्पर्श । झाल्यास सागरी । तरतील ॥४६५॥सेतू बांधण्याची । त्याना आज्ञा द्यावी । मीही काही भार । उचलेन ॥ ४६६॥वंदन करूनी । प्रभूंचे चरण । सागर सागरी । निवर्तला ॥४६७॥(२२)कैसा झाला सेतू । कैसे गेले सैन्य । लंकेस कैसेनी । झाले युद्ध ॥४६८॥तें सारें पहावे । पुढील काण्डात । सुन्दरकाण्ड हें । सिद्ध झाले ॥४६९॥प्रभूंच्या कृपेने । कैसे मारुतीने । भयभीत केले । रावणास ॥४७०॥सीतामाईचीही । भेट जाहल्याने । सफल जाहले । सारे कार्य ॥४७१॥त्यांच्याच कृपेने । अभंगरचना । जमली श्रीपाद । अभ्यंकरा ॥४७२॥सर्वानाच होवो । मनोकामनांची । पूर्ती श्रीरामांच्या । प्रसादाने ॥४७३॥सुन्दरकाण्डाच्या । वाचकाना सदा । श्रीरामभक्तीची । आस राहो ॥४७४॥॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
Categories: Learning Sanskrit

शेगांवस्थित श्रीगजाननमहाराजांच्या पोथीचा सारांश अभंगवृत्तात

Slez - Fri, 08/18/2017 - 12:56
|| ॐ श्रीगणेशाय नमः |||| श्रीशेगांवस्थिताय श्रीगजाननमहाराजाय नमः ||
अभंगवृत्तात रचयिता - श्रीपाद लक्ष्मण अभ्यंकर  


अध्यायक्रमांक  येथील पदें      गजानन-विजयमध्ये ओव्या                                  १ ………. २० ……………..१४६                                 २ ………. ४२ ……………..१४८                                 ३ ………. ३९ ……………..१५२                                 ४ ………. ५० ……………..१५५                                 ५ ………. ४८ ……………..१५४                                 ६ ………. ३१ ……………..१४५                                 ७ ………. ३० ……………..१५१                                 ८ ………. ४८ ……………..१५५                                 ९ ………. ५० ……………..१५४                               १० ………. ५२ ……………..१७१                               ११ ………. ५७ ……………..१९३                               १२ ………. ४६ ……………..१५१                               १३ ………. ४९ ……………..१७९                               १४ ………. ४३ ……………..१५२                               १५ ………. २८ ……………..१४१                               १६ ………. ३२ ……………..१५०                               १७ ………. ४७ ……………..१५९                               १८ ………. ४४ ……………..२०२                               १९ ………. ६८ ……………..३४९                               २० ………. ५१ ……………..२०९                               २१ ………. २७ ……………..२५३                           एकूण ………. ९०७ …………….३६६९
 || ॐ श्रीगणेशाय नमः |||| श्रीशेगांवस्थिताय श्रीगजाननमहाराजाय नमः ||
मंगलाचरण तथा प्रस्तावना
नमन गणेशा । नमो गजानना । अवतार नाना । भक्तांसाठी ॥१॥श्रीक्षेत्र शेगांवी । अज्ञेय प्रकट । जनें संबोधीलें । गजानन ॥२॥दासगणूजीनी । विजय ग्रंथात । चरित्रमहात्म्य । रचियेले ॥३॥कितीक भाविक । पोथी-पारायण । आपुल्या नेमाने । करतात ॥४॥नऊशे पदांत । इथे सामावले । सारे एकवीस । अध्याय की ॥५॥ऐशा रचियेल्या । सारांशाने पहा । पारायण होते । दीड तासी ॥६॥अभंगवृत्तात । सद्गुरुकृपेने । रचिले श्रीपाद । अभ्यंकरे ॥७॥अभंग वृत्त हें | सरल रसाळ | भक्तिभवाचीही हीच रीत ॥८॥भाविकांनी घ्यावा । आनंद भक्तीचा । मंगल लाभावे । सकळांना ॥९॥
अध्याय १नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ पहिल्या । अध्यायास ॥१॥
शके अठराशे । माघमासी तिथी । वद्यसप्तमीची । होती पहा ॥२॥शेगांवी मठांत । भोजने घालती । देवीदासराव । पातुर्कर ॥३॥उष्ट्या पत्रावळी । दारी पडलेल्या । चाटूनी पुसतो । अवलिया ॥४॥पाहती तें चित्र । बंकटलाल नि । मित्र दामोदर । कुळकर्णी ॥५॥
प्रेरणा जाहली । बंकटलालास । हा तरी महात्मा । आहे कुणी ।।६।।तजवीज केली । बंकटलालाने । सुग्रास भोजन । खाववीले ॥७॥
अज्ञाताजवळी । होता कमंडलू । अग्रवाल करी । विनवणी ॥८॥पाणी मी आणीतो । जरा धीर व्हावा । उत्तरले काय । महाराज ॥९॥
भुवनी भरले । परब्रम्ह तरी । भेद न कांहीच । मजलागी ॥१०॥
अन्न पोटी गेले । पाणी तेंही प्यावे । ऐसी रीत जनी । आहे खरी ॥११॥तुम्हासही जरी । येणे वाटे तुष्टी । आणावे उदक । बोललेले ॥१२॥
परत येईतो । आडाचे ओहोळी । गढूळच पाणी । कां हो प्याले ॥१३॥
ब्रम्हाने व्यापीली । सारीच भुवने । गढूळ निर्मळ । भेद कैसा ॥१४॥पाणी तरी ब्रम्ह । मलीनता ब्रम्ह । पिणाराही ब्रम्ह । ब्रम्ह सारे ॥१५॥
ईश्वराची लीला । आहे अनिर्वाच्य । श्रुतीही म्हणती । नेति नेति ॥१६॥सत्य टाकूनीया । व्यवहार मात्र । भरला तुमचे । मनात ना ॥१७॥जरा कांही आणा । मनात विचार । प्रारंभ जगाचा । कोठून गा ॥१८॥
पाया पडावया । दोघेही वांकले । परि क्षणी होते । दूर गेले ॥१९॥
नमो गजानना । अध्याय पहिला । मनी दृढ होवो । प्रार्थना गा ॥२०॥
अध्याय २नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ दुसऱ्या । अध्यायास ॥१॥
कोठे आढळेना । विरह यातना । उत्कंठा दर्शना । बंकटाला ॥२॥शेजारी रामजी । पंत देशमुख । त्यांना सांगीतली । मनःस्थिती ॥३॥पूर्व सुकृताने । दर्शन जाहले । पुन्हाही घडेल । धीर धरी ॥४॥
मंदीरी कीर्तन । गोविन्दबुवांचे । टाकळीकरांचे । रंगलेले ॥५॥बंकटाचा मित्र । पीतांबर शिंपी । सवें आला होता । कीर्तनाला ॥६॥
देवळाचे मागे । पाराकडे गेली । अचानक दृष्टी । बंकटाची ॥७॥पाही तो बैसले । महाराज तेथे । गेला लगोलग । त्यांचेकडे ॥८॥स्वामी कांही खाण्या । आणावें कां आजि । तुजला वाटते । तरी आण ॥९॥माळीणीकडून । भाकर पिठले । आणूनीया दिले । आनंदाने ॥१०॥
पीतांबर गेला । तुंबा घेऊनीया । पाणी आणावया । ओहोळासी ॥११॥तुंब्यामध्ये पाणी । भरते निर्मळ । जरी ओहोळाचे । गढूळचि ॥१२॥
बंकटलालासी । स्वामीनी म्हटले । भाकरीचे श्रेय । माळीणीचे ॥१३॥तुझी दे सुपारी । स्वामीनी म्हणता । नाणेही बंकट । देऊं गेला ॥१४॥नाणे व्यवहारी । मज नको कांही । तुझ्या भक्तीलागी । भेटलो मी ॥१५॥भाव तव मनी । म्हणूनी भेटलो । लगबगे जावे । कीर्तनास ॥१६॥
भागवतातील । हंसगीताख्यान । पहिला चरण । बुवांमुखें ॥१७॥दुसरा चरण । कोणी बा म्हटला । बुवाना जाहले । आश्चर्यचि ॥१८॥बुवा सांगताती । ऐशा अधिकारी । व्यक्तीस मंडपी । बोलवा हो ॥१९॥स्वामी परि नाही । जागचे हालत । बुवाही लागले । चरणासी ॥२०॥
सर्वव्यापी जरी । ईश्वर म्हणता । आंत कीं बाहेर । बिघडे कां ॥२१॥वाणी नि करणी । ठेवा एकसार । पोटार्थी कीर्तन ॥ करूं नये ॥२२॥
कोठे मी बैसलो । नको विवंचना । आपुली ठेवावी । समदृष्टी ॥२३॥
बुवानी श्रोत्याना । जागवीले तेव्हां । शेगावी हें रत्न । अनमोल ॥२४॥
बंकटलालाने । घरासी जाऊन । पित्यासी आग्रह । धरीयेला ॥२५॥भवानीरामही । करीती संमती । व्यर्थ परि गेले । चार दिन ॥२६॥सूर्यास्ताचे वेळी । भाग्य उजळले । चौकात पावले । महाराज ॥२७॥घरी नेऊनीया । सेवा नि भक्तीचा । योग घडवीला । सर्वानाच ॥२८॥
दुसरे दिवशी । होता सोमवार । सोहळाच झाला । शिवस्नाना ॥२९॥
काकांच्या मुलाच्या । मनी तेव्हां आले । प्रदोषभोजना । आमंत्रिले ॥३०॥दुपारीच अन्न ।  खूप झाले तरी । इच्छाराम वाढी । आग्रहाने ॥३१॥स्वामींचे स्वगत । गणप्या खादाड । समोरील अन्न । टाकूं नये ॥३२॥
परि जेव्हा झाला । खूपच आग्रह । वमन जाहले । भडभडा ॥३३॥
धर्माचाही पहा । नको अतिरेक । प्रादुर्भाव होतो । अधर्माचा ॥३४॥
लोकांसी जाहला । तेणे पश्चात्ताप । जागा साफ केली । पुनःपुन्हा ॥३५॥स्वामीना आसनी । बसवूनी मग । सोहळा जाहला । दर्शनाचा ॥३६॥दिंड्या दोन आल्या । भजन करीत । गजरही चाले । विठ्ठलाचा ॥३७॥महाराजांची तो । वेगळीच धुन । गण गण् गणात । बोते ऐसी ॥३८॥लोकाना वाटले । ॐ गं गणपतये । मंत्र तो प्रसिद्ध । म्हणतात ॥३९॥तेव्हापासूनीया । गजानन नाम । लोकानी ठेवीले । स्वामीजींचे ॥४०॥निरिच्छ आणीक । मुक्त साधू जरि । बंकटाचा स्वामी । भक्ताधीन ॥४१॥नमो गजानना । अध्याय दुसरा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४२॥
अध्याय ३नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ तिसऱ्या । अध्यायास ॥१॥
आर्त लोक येती । दर्शनास रोज । एके दिनी आला । परदेशी ॥२॥मृगाजिनधारी । कासेस लंगोटी । डोक्यास फडके । ऐसा कोणी ॥३॥जवळील लोकां । स्वामीनी म्हटलें । काशीहूनी आला । कोण पहा ॥४॥झोळीमध्ये बुवा । लपवीतो बुट्टी । काढ ती बाहेरी । झडकरी ॥५॥गोसाव्याने दिली । चिलीम भरून । त्यागावी म्हणून । प्रिय वस्तू ॥६॥गोसाव्याचे झाले । नवस फेडणे । गांजाची पडली । प्रथा परि ॥७॥
अंजनीमातेच्या । इच्छेपोटी शंभू । वानररूपे ना । वावरला ॥८॥विरागी योग्यास । व्यसन कां होते । ममत्वे ना लिंपे । एक वस्तू ॥९॥कधी वेदोच्चार । कधी मौनव्रत । "गण गण् गणात । बोते" मग्न ॥१०॥कधी पिशापरी । संचरण कधी । जागीच मुकाट । बसलेले ॥११॥
नामे जानराव । देशमुख होते । व्याधिग्रस्त तेणे । त्रस्त अति ॥१२॥वैद्यांचे आणीक । हकीमांचे सारे । उपाय जाहले । अगतिक ॥१३॥आप्तासी वैद्यानी । म्हटले वाटते । कांबळ्यावरती । घेण्या वेळ ॥१४॥कोणी इतुक्यात । केलीसे सूचना । स्वामींचे चरण । धरावे ना ॥१५॥शरण जाण्याने । संकट टळेल । देशमुखप्राण । वांचतील ॥१६॥एक आप्त आले । भवानीरामांकडे । तीर्थालागी हेतू । निवेदिला ॥१७॥आणलेल्या पात्री । पाण्यात पायाचे । अंगुष्ठ लावीले । तीर्थ होण्या ॥१८॥स्वामीनीही दिली । संमती मानेने । नेऊनी प्राशीले । जानरावा ॥१९॥थांबली घशाची । घर्घर लगेच । व्याधीस उतार । होत गेला ॥२०॥एकाच सप्ताही । आरोग्य जाहले । सर्वश्रुत झाला । चमत्कार ॥२१॥कृतज्ञ होऊनी । जानरावे मग । भंडा-याचा घाट । घातला की ॥२२॥
महाराजा तेव्हा । मनी काय आले । लोक-उपद्रव । वाढेल ना ॥२३॥
जनसमुदायी । ढोंगी भक्त एक । स्वामींचा लाडका । म्हणवीता ॥२४॥स्वामींसी प्रसाद । म्हणूनी मिठाई । मागे लोकांकडे । त्रास फार ॥२५॥स्वामींच्या सेवेचा । मक्ता जणूं ह्याचा । मिरवे लोकांत । ऐशापरी ॥२६॥जातीचा तो माळी । नांवाचा विठोबा । स्वामींशी सलगी । दावी लोकां ॥२७॥एके दिनी काय । घडली हो गोष्ट । परगांवीचे जे । भक्त होते ॥२८॥त्याना आतुरता । परतण्या होती । स्वामी परि तेव्हां । निद्रिस्त कीं ॥२९॥विठोबासी लोक । करीती विनंति । दर्शनाची सोय । कांही काढा ॥३०॥स्वामींचे खांद्यास । लावूनीया हात । उठवाया धार्ष्ट्य । केले त्याने ॥३१॥दर्शन घेऊनी । जन जैसे गेले । विठोबावरती । कडाडले ॥३२॥विसरलासी कां । आपुली पायरी । उपद्रव मज । करीसी तुं ॥३३॥तुवां भलताच । व्यापार कां ऐसा । माझे दर्शनाचा । चालवीला ॥३४॥काठीचे प्रहार । खाऊनी विठोबा । पळाला करीत । हायहाय ॥३५॥
दैवे लाभलेली । संतांची संगती । हीनशा स्वार्थाने । गमावली ॥३६॥संत कनवाळू । उदार प्रेमळ । दुष्टास देतील । दंड परि ॥३७॥संतांचे सन्निध । महंती करणें । सावधपणाचे । काम जाणा ॥३८॥नमो गजानना । अध्याय तिसरा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३९॥
अध्याय ४नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ चवथ्या । अध्यायास ॥१॥
अक्षय्य तृतीया । दिवशी व-हाडी । पितृश्राद्ध नेमे । करतात ॥२॥सकाळी सकाळी । स्वामीनी म्हटले । मुलाना चिलीम । भरूनी द्या ॥३॥मुलानी उत्साहे । भरली चिलीम । शिलगाया हवा । विस्तव ना ॥४॥चूली पेटवाया । होता अवकाश । विस्तव कोठून । मिळेल गा ॥५॥बंकटलालाने । सोनाराकडून । विस्तव आणण्या । धाडीयेले ॥६॥मुहूर्ताचे दिनी । कोणीही मागता । विस्तव देणेचे । होणे नाही ॥७॥मुले विनवीती । कोणतीही वस्तू । साधूसी नकारूं । नये जाण ॥८॥जालंधरनाथांचा । देऊनी हवाला । पुनश्च नकारे । जानकीराम ॥९॥म्हणे खरा साधू । निर्माण करीतो । कोणतीही वस्तू । योगबळे ॥१०॥तुम्ही सारी पोरे । बंकटलालही । वेड्याचे नादात । गुंतले कीं ॥११॥हिरमुसलेली । पोरे परतली । स्वामी हांक देती । बंकटाला ॥१२॥नुसतीच काडी । धरी चिलीमीस । कोरडा झुरका । स्वामी घेती ॥१३॥जणूं समर्थानी । अग्निदेवा आज्ञा । केली प्रकटण्या । झुरक्याने ॥१४॥निर्ज्योत काडीने । पेटली चिलीम । टाळ्या वाजवीती । पोरे सारी ॥१५॥
सोनाराचे घरी । पंगत बैसली । मानाचा पदार्थ । चिंचवण ॥१६॥परि चिंचवणी । कीड पडलेली । पाहूनी पंगत । बिघडली ॥१७॥जानकीरामाला । झाली उपरती । साधूच्या निंदेने । ऐसे झाले ॥१८॥बंकटलालासी । केली विनवणी । साधूची मागण्या । माफी आलो ॥१९॥बंकटलालाची । वेगळीच शंका । चिंचच पहावी । तपासून ॥२०॥चिंच तरी होती । सारी साफ स्वच्छ । कीड काय टिके । शिजताना ॥२१॥जानकीरामाने । स्वामींचे चरणी । क्षमा मागीतली । काकुळती ॥२२॥स्वामीनी म्हटले । चिंचवण तुझे । पाही निरखून । चांगलेच ॥२३॥वृत्त पसरले । सा-या गांवामाजी । महती दानाची । साध्या सुद्धा ॥२४॥
चंदू मकीनास । दिला अनुभव । आणीक आगळा । ज्येष्ठ मासी ॥२५॥लोकानी आणीले । आंबे जरी खूप । स्वामींचा आग्रह । चंदूलागी ॥२६॥अजून शिल्लक । आहेत पहावे । तुझ्या घरी दोन । कानवले ॥२७॥चंदूच्या पत्नीस । वाटले आश्चर्य । खापराच्या तळी । दोन बाकी ॥२८॥कैसेनी जाहले । अन्नब्रम्हालागी । एक मासावरी । दुर्लक्ष गा ॥२९॥
चिंचोली गांवीचा । म्हातारा माधव । कुळकर्णी आला । दीनवाणा ॥३०॥तारुण्यात केला । उधळेपणा ना । आता न उरला । वाली कोणी ॥३१॥उपाशी राहोनी । मुखे नाम घेई । स्वामी बोललेसे । परखड ॥३२॥कर्म न भोगीता । हट्ट करूनी कां । ऐसा मोक्ष येतो । आपसुक ॥३३॥स्वामीनी घेतले । जामदग्न्यरूप । बोबडी वळली । माधवाची ॥३४॥स्वामीनी म्हटले । तुवां केली पापें । काळ कीं भक्षील । याचपरी ॥३५॥सम्पूर्ण शरण । माधव विनवी । नका मज धाडूं । नरकाला ॥३६॥उद्धार करावा । अनंत सामर्थ्य । आहे आपणाचे । कृपा करा ॥३७॥खोदखोदूनीया । स्वामीनी पुसले । माग काय हवे । देईन गा ॥३८॥माधव म्हणतो । आणखी जीवित । आता नको कांही । द्यावी मुक्ति ॥३९॥पाहूनी तयाचे । मनीचा निर्धार । तथास्तु म्हटला । आशिर्वाद ॥४०॥म्हणती तुज ना । आता पुनर्जन्म । वैकुंठगमन । करी आता ॥४१॥
असेंच एकदा । स्वामीनी म्हटलें । वेदपठण तें । व्हावें वाटे ॥४२॥शिष्यांची तो चिंता । योग्य घनपाठी । नसती ब्राम्हण । गावांत कीं ॥४३॥स्वामीनी म्हटले । उद्या नारायण । पाठवील विप्र । सज्ज व्हावे ॥४४॥दुसरे दिवशी । दोन प्रहरासी । आले खरोखरी । विप्र पहा ॥४५॥स्वामींच्या इशारें । शास्त्रशुद्ध मंत्रे । वसंतपूजन । सजलें कीं ॥४६॥लोकांनी दक्षिणा । होती आज्ञेपरी । शंभर रुपये । जमवीली ॥४७॥अभ्यागत विप्र । जाहले संतुष्ट । आनंदीआनंद । सर्व लोकां ॥४८॥नेम जाहलासे । वसंतपंचमी । साजरी करावी । वेदमंत्रें ॥४९॥
नमो गजानना । चतुर्थ अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५०॥
अध्याय ५नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ पाचव्या । अध्यायास ॥१॥ 
जनसंपर्काने । उद्विग्न होऊन । निघूनीया जाती । रानीवनी ॥२॥असेच एकदा । गेले पिंपळगांवी । ध्यान लावीयेले । शिवालयी ॥३॥
गुराखी पोराना । झालें कुतूहल । समोर बैसोनी । न्याहाळती ॥४॥तर्क सुरूं झाले । जिवंत कीं मृत । भूत कीं महात्मा । कैसी स्थिति ॥५॥कोण्या भाबड्याने । हार चढवीला । रानटी फुलांचा । फुलें डोई ॥६॥कांदाभाकरीचा । ठेऊनी नैवेद्य । भजन बेसूर । आळवीले ॥७॥
विदेही आत्म्याच्या । शरीरास नोहे । कांही संवेदना । कसलीही ॥८॥
साय़ंकाळ होतां । घरी गेल्यावर । वार्ता निवेदिली । थोरांलागी ॥९॥भल्या पहाटेस । मंडळी पाहती । "जैसे थे"च होते । सारे कांही ॥१०॥पालखी आणोनी । स्वामी बैसवीला । वाजतगाजत । गांवी आले ॥११॥मारुती मंदीरी । सूर्यास्तापर्यन्त । किती काय केले । उपचार ॥१२॥कुणास प्रेरणा । करूं उपोषण । नेत्र उघडले । स्वेच्छेनेच ॥१३॥स्वामींची जागृती । पाहूनी लोकांत । स्पर्धा उसळली । पूजनास ॥१४॥
बाजारहाटासी । शेगांवी जे गेले । कौतुक बोलले । येथील ते ॥१५॥शेगांवाप्रमाणें । पिंपळगांवीही । लाधलासे भाग्यें । एक यती ॥१६॥
बंकटलालासी । वृत्त तें कळतां । आला लगबग । सपत्निक ॥१७॥नाना प्रकारानी । केली आळवणी । आत्महत्येचाही । धाक दिला ॥१८॥पिंपळगांवीच्या । जना आश्वासन । बंकटलालाने । आणि दिले ॥१९॥विरही न व्हावे । कधीही यावें की । आपुल्याच घरी । निःसंकोच ॥२०॥
वाटेत थट्टेने । बंकटलालासी । स्वामी सांगताती । मर्म कांही ॥२१॥तुवां निजगृही । लक्ष्मी जेर केली । पाहूनी वाटते । भय मज ॥२२॥मीही बंदिवान । होईन वाटले । संधी साधूनीया । निसटलो ॥२३॥
बंकटलालही । हजरजबाबी । तत्पर उत्तर । बोललासे ॥२४॥लक्ष्मीस ना तमा । कुलुपाची कांही । आपुलेच पायी । स्थिरावली ॥२५॥गप्पागोष्टीसंगे । पोचले शेगांवी । मुक्काम जाहला । कांही दिस ॥२६॥
निघाले पुनश्च । कोणा न कळत । आडगांवा जाण्या । व-हाडात ॥२७॥कडक उन्हाळा । भाजतो शरीर । घशास कोरड । घामेघूम ॥२८॥अकोल्याशेजारी । शेतात भास्कर । नकार तो देई । पाण्यासही ॥२९॥पाटलाने केली । निंदाही आणिक । तूं तो न दुबळा । भिक्षा कां रे ॥३०॥दुर्लक्षूनी बोल । विहीर दिसता । पाय वळवीले । तेथे जाण्या ॥३१॥भास्कराची हांक । विहीर ती शुष्क । पाणी नाही कोठे । कोसभर ॥३२॥स्वामी उत्तरले । दशा ही तुमची । पाहूनी प्रार्थना । मनी येते ॥३३॥कूप जलयुक्त । करण्या देवास । करून पाहीन । आळवणी ॥३४॥स्वामींचे ते बोल । ऐकून पाटला । वाटले कौतुक । भिका-याचे ॥३५॥ध्यान लावूनीया । स्वामीनी आरंभ । केला आळवणी । करण्यास ॥३६॥दाखले मांडले । पुराणांतरीचे । गोवर्धन आणि । प्रल्हादाचे ॥३७॥प्रसन्न होई गा । आपा नारायणा । पत्थरी पाझर । फुटो आता ॥३८॥चालली प्रार्थना । तोंवर कूपात । जळ ऐसे आले । ओसंडले ॥३९॥तेव्हां शांत होत । निःशब्द होवोन । स्वामीनी नयन । उघडले ॥४०॥घेऊनी ओंजळी । तृषा शांत केली । भास्कर पाहतो । अचंभित ॥४१॥चरण धरूनी । क्षमापन मागे । निंदा केली त्याची । लाज मनी ॥४२॥जैसीही स्फुरली । उपरती स्तुति । बोलत राहीला । चरणासी ॥४३॥नको हा संसार । म्हणतां स्वामीनी । म्हटले विचार । पुन्हा कर ॥४४॥संसार त्यागूनी । राहणे ना सोपे । कुंपणापल्याड । रान मोही ॥४५॥ओसाड प्रदेशी । कूप ओसंडला । वार्ता पसरली । वा-यासंगे ॥४६॥तृषा शमवीली । कितीक लोकांची । चमत्कारें कृपा । सर्व जनां ॥४७॥
नमो गजानना । पाचवा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४८॥
अध्याय ६नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सहाव्या । अध्यायास ॥१॥
बंकटलालाच्या । मित्रानी एकदा । कणसे पार्टीचा । बेत केला ॥२॥बंकटलालाचे । मळ्यावर सारी । तयारी जाहली । व्यवस्थित ॥३॥भक्ताना वाटले । स्वामीही सांगाती । आल्यास अलभ्य । लाभ खरा ॥४॥आगट्या पेटता । धूर जो उठला । भिडला कोठल्या । मोहोळाला ॥५॥माशा घोंघावत । येतां पळापळ । कणसें टाकूनी । गेली सारी ॥६॥स्वामी ते राहीले । झाडाचे खालीच । पाहती मजेने । पळापळ ॥७॥
बंकटलालाला । झाली हळहळ । फुकटचा त्रास । स्वामीना कीं ॥८॥एकाएकी माशा । दिसेनाशा झाल्या । स्वामींच्या आज्ञेने । गेल्या काय ॥९॥
सा-या अंगावर । पाहूनीया गांधी । बंकट विषण्ण । अति झाला ॥१०॥स्वामी ते आनंदी । म्हणती मी ब्रम्ह । माशा त्याही ब्रम्ह । दुःख कैसे ॥११॥
डंख बोचलेले । काढाया सोनारा । बोलूनी आणले । बंकटाने ॥१२॥योगयुक्तीने कां । देह फुलवीला । नांग्या काढण्यास । सोपे झाले ॥१३॥
नंतर लोकांनी । कणसें भाजूनी । सहल आनंदें । आटोपली ॥१४॥
असेच एकदा । स्वामी गेले वनी । अकोटाजवळी । मित्रभेटी ॥१५॥नृसिंहस्वामींचे । भेटीने जाहला । वार्तालापें मोद । परस्परां ॥१६॥
कुणकुण काय । गांवात लागली । वनाकडे रीघ । पहाटेच ॥१७॥परि स्वामी गेले । निघून तेथून । दर्यापुरापाशी । शिवर्गांवी ॥१८॥
येई तेथे एक । चंद्रभागेतीरी । व्रजभूषणसा । सूर्यभक्त ॥१९॥नित्यनेमे अर्घ्य । देण्यास येतसे । प्रभाती पंडित । नदीकांठी ॥२०॥आजही येऊन । समोर पाहतां । वाळवंटी तेज । अलौकिक ॥२१॥रविराज स्वतः । आपलेकरीता । आले ऐसे झाले । पंडिताना ॥२२॥स्वामींचेच पायी । अर्घ्यजल दिले । नमस्कार बारा । वाहीयेले ॥२३॥आशीष देऊनी । प्रेमाने तयास । सशिष्य शेगांवी । परतले ॥२४॥
शिवगांवाचेच । शेगांव हें नांव । शिवाचे स्वरूप । हनुमंत ॥२५॥
मारुती मंदीरी । श्रावणमासात । उत्सवाची रीत । दरवर्षी ॥२६॥बंकटलालासी । स्वामीनी म्हटलें । मंदीरी राहीन । इतःपर ॥२७॥यतीस ना योग्य । घरांत राहणें । मंदीर तें योग्य । भ्रमण वा ॥२८॥प्रसंगविशेषी । बोलावशील तूं । येईन ती चिंता । नको धरूं ॥२९॥
भास्कर पाटील । मारुती मंदीरी । येऊन राहीला । सेवेकरी ॥३०॥
नमो गजानना । सहावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३१॥
अध्याय ७नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सातव्या । अध्यायास ॥१॥  
पाटलाची पोरे । उद्दाम उर्मट । मुक्काम हलवा । धाक देती ॥२॥भास्कर पाटील । जाहले अस्वस्थ । स्वामीनीच त्यांना । समजावीले ॥३॥पोरकटपणा । केवळ पोरांचा । थोरांचे कर्तव्य । क्षमापन ॥४॥
पोरांचा म्होरक्या । हरी पाटील तो । म्हणे चल ऊठ । करूं कुस्ती ॥५॥स्वामीही लगेच । करूनीया मान्य । गेले तयासंगे । तालमीस ॥६॥हौद्याचे जवळी । बैठक मारूनी । हरीस म्हटले । उठव की ॥७॥हालता हालेना । देह तसूभर । हरी तो जाहला । घामाघूम ॥८॥जडत्व सिद्धीचा । प्रत्यय पाहून । स्वामींची महत्ता । उमगला ॥९॥शरणागत त्या । हरी पाटलाला । स्वामीनी दिधला । उपदेश ॥१०॥तरुण जमवा । वाढवा तयांची । शरीरसंपदा । योग्यकामी ॥११॥बळ मेळवोनी । गांवाचे रक्षण । करीतां समाज । मानेल कीं ॥१२॥
हरीस पटला । लोकां सांगूं गेला । तरी लोक ढोंग । म्हणताती ॥१३॥आपुल्या प्रकारें । आम्ही ठाव घेऊं । मनी ठरवीती । दुष्ट बेत ॥१४॥इक्षुदंड हाती । घेऊनी पातले । स्वामीना घेरूनी । बोललेनी ॥१५॥कसोटी कराया । ऊसानी मारतां । पाहूं वळ कैसे । उठतील ॥१६॥फुकाचे ना बोल । खरोखरी मार । देण्या सुरवात । त्यानी केली ॥१७॥आधी होता जोर । सपासप मार । जणूं तालबद्ध । खूप झाला ॥१८॥ऊंसही तुटले । हातही थकले । वळ ना उठला । एक अंगी ॥१९॥उलटे स्वामीनी । पोराना म्हटलें । श्रम खूप झाले । रस पिऊं ॥२०॥केवळ हातानी । ऊंस पिळूनीया । खरोखरी रस । पाजीयेला ॥२१॥खजील पोरानी । पाया पडूनीया । क्षमा मागीतली । कळवळे ॥२२॥
खंडू पाटलाला । वुत्तांत कळला । तरीही तो बोले । गण्या गजा ॥२३॥म्हातारा कुकाजी । खंडूस सुचवी । मूलबाळ माग । साधूकडे ॥२४॥स्वामींचे चरणी । लवून खंडोबा । संततीची कृपा । करा मज ॥२५॥स्वामीनी म्हटले । देवाघरी उणे । नाही एक शर्त । मात्र आहे ॥२६॥मुलाचे त्या नांव । ठेवावे भिकाजी । आम्रसभोजन । द्यावे द्विजा ॥२७॥एकाच वर्षाने । पुत्रलाभ झाला । अन्नदान केले । जैसी आज्ञा ॥२८॥संतति संपत्ती । पाटला पावली । पाहून मत्सर । देशमुखा ॥२९॥ 
नमो गजानना । सातवा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३०॥
अध्याय ८नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ आठव्या । अध्यायास ॥१॥ 
खंडू हांक देई । म-या महारास । टप्पा भरायला । पाठवाया ॥२॥तुमचे मी काम । नाही करणार । देशमुखांचाच । सेवक मी ॥३॥फालतु सेवक । काम नाकारतो । भाषाही तयाची । कायद्याची ॥४॥देशमुखपद । पाटला वरिष्ठ । ऐसाही प्रवाद । बोलतो कीं ॥५॥समज हे सारे । उद्धटपणाही । वाटे फूस देतो । देशमुख ॥६॥उद्दाम उत्तर । म-याचे ऐकून । संताप चढला । पाटलाला ॥७॥रागाचे भरात । काठीचा प्रहार । पाटलानी केला । म-यावर ॥८॥वर्मी कां लागले । बेशुद्ध होऊन । जागीच आडवा । म-या झाला ॥९॥
बातमी पोचली । देशमुखा कानी । तत्काळ म-यास । नेले त्यानी ॥१०॥सरकार दर्बारी । तक्रार नोंदेन । धाकही बोलले । जातां जातां ॥११॥तेणे हातपाय । खंडूचे गळाले । आगळीक तरी । झाली होती ॥१२॥बंधू अकोल्यास । श्रेष्ठ हुद्यावर । वशिल्याने अब्रू । वांचेल कां ॥१३॥महाराजांकडे । सांकडे घालाया । खंडू आला केला । दंडवत ॥१४॥स्वामीनी तयास । अभयवचन । दिलें तें सांत्वन । सत्य झालें ॥१५॥खंडूने स्वामीना । नेऊनी स्वगृही । सेवाभक्ती खूप । रुजूं केली ॥१६॥
तिथे असताना । तेलंगणाहून । भिक्षार्थी ब्राम्हण । कोणी आले ॥१७॥निद्रिस्त स्वामीना । उठावया वेद । मंत्र पदक्रम । म्हणूं गेले ॥१८॥स्वरप्रमाद कीं । खटकतां स्वामी । उठले ब्राम्हणां । हटकले ॥१९॥तीच सूक्ते पुन्हा । स्वामीनी बिनचूक । म्हणून दावीली । ब्राम्हणाना ॥२०॥स्वामीनी पुसीले । वेदमंत्र काय । तुम्ही पोटासाठी । अभ्यासीले ॥२१॥वेदविद्या ती तो । मोक्षासाठी खरी । फसवूं नका हो । भाविकांना ॥२२॥क्षमायाचना ते । करीती ब्राम्हण । रुपया दक्षिणा । देववीली ॥२३॥
स्वामी कंटाळले । गांवात रहाण्या । मळ्यामध्ये गेले । कृष्णाजीच्या ॥२४॥ब्रम्हगिरी आणि । शिष्य कांही त्यांचे । आले अभ्यागत । अचानक ॥२५॥कृष्णाजी पाटलां । म्हणती गोसावी । तीन दिन आम्ही । राहूं येथे ॥२६॥गांजाची आणीक । शिरापुरीचीही । व्यवस्था असावी । सांगीतलें ॥२७॥तुम्ही तरी एक । भ्रमिष्ट पोसला । वेदांत जाणतो । आम्ही पहा ॥२८॥कृष्णाजी पाटील । बोलला विनये । उद्याचे भोजनी । शिरापुरी ॥२९॥आत्ता तरी शक्य । भाक-या केवळ । भूक भागवावी । आज त्यानी ॥३०॥भोजनानंतर । श्रीब्रम्हगिरींचे । प्रवचन व्हावें । नेम तोही ॥३१॥शिष्य ते होतेच । ग्रामस्थही आले । "नैनं छिन्दन्ति" हा । निरूपणा ॥३२॥कोणी कुजबूज । करीत म्हणाले । गीता जगतोसा । योगी इथे ॥३३॥गांजा ओढणा-या । शिष्यानी ऐकली । कुजबूज तेव्हां । रागावले ॥३४॥स्वामी ते बाजूला । पलंगावरीच । चिलीम ओढीत । बसलेले ॥३५॥अचानक तेव्हां । ठिणगी पडून । पलंग पेटला । चहूंबाजू ॥३६॥भास्कर पाटील । स्वामीना विनवी । पलंग सोडून । उठावया ॥३७॥स्वामीनी म्हटले । जरा धीर धरी । आत्म्यासी पावक । जाळेचिना ॥३८॥ब्रम्हगिरीनाही । पलंगावरती । येण्यासी आग्रह । धरीयेला ॥३९॥"नैनं छिन्दन्ति" ह्या । उक्तीचा प्रत्यय । देण्यास आहे ना । नामी संधी ॥४०॥भास्कर पाटील । आणि ब्रम्हगिरी । यांच्यात लागली । खेंचाखेंच ॥४१॥ब्रम्हगिरी करी । गयावया आणि । स्वामींचे पायासी । क्षमा मागे ॥४२॥लोकही करती । स्वामीना आग्रह । पलंग सोडोनी । यावें आतां ॥४३॥स्वामी उतरले । लोकानी तत्काळ । पलंगाची आग । विझवीली ॥४४॥ब्रम्हगिरीलागी । केला उपदेश । आत्मज्ञान नोहे । पोटासाठी ॥४५॥अनुभवाचे जे । तेवढे बोलावे । पांडित्याचा दंभ । कशापायी ॥४६॥ब्रम्हगिरीना तैं । जाहली विरक्ती । रातोरात गेले । एकटेच ॥४७॥
नमो गजानना । आठवा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४८॥
अध्याय ९नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ नवव्या । अध्यायास ॥१॥ 
स्वामी राहती तें । शिवाचे मंदीर । सुबक जाहलें । जीर्णोद्धारें ॥२॥मोटे सावकार । यांनी पैका दिला । मोटे मंदीरसे । नांव झाले ॥३॥एके दिनी तेथे । आले हरिदास । टाकळि गांवीचे । गोविंदबुवा ॥४॥त्यांचा घोडा होता । भारी अवखळ । रात्रीचा दाव्याशी । बांधलेला ॥५॥दावे तोडूनीया । जाईल कीं घोडा । बुवांचे मनास । भारी चिंता ॥६॥अधूनमधून । उठून पाहती । आज तरी घोडा । निवांतसा ॥७॥आश्चर्य वाटले । निरखण्या गेले । घोड्याचे पायाशी । होते कांही ॥८॥कंदील घेऊनी । पाहती तों स्वामी । घोड्याचे पायांत । झोपलेले ॥९॥स्वामी ते निद्रिस्त । तरी "गण् गणात । बोते" ऐसा शब्द । गुंजे कानी ॥१०॥माजोरी तो अश्व । नरम जाहला । स्वामींचे चरणी । बुवा नत ॥११॥
बाळापुराहूनी । आले दोन भक्त । मनांत स्वामीना । गांजा द्यावा ॥१२॥परि दोन वेळां । विस्मरण झाले । तैसेच जाहले । तिस-यांदा ॥१३॥स्वामीनी जाणुन । मनोगत त्यांचे । म्हटले गांवात । जाऊं नका ॥१४॥पुढील खेपेस । विसर न व्हावा । विचारी आचारी । मेळ हवा ॥१५॥दर्शना आणीक । पांच वेळां यावें । सफल होईल । मनोगत ॥१६॥स्वामींचा आदेश । पाळतां फळला । आशीष दोघाना । सुखी झाले ॥१७॥
त्याच बाळापुरी । रामदासी करी । सज्जनगडाची । वारी नेमें ॥१८॥पुतळा भार्याही । संगे वारी करी । माघ वद्य तिथी । प्रतिपदा ॥१९॥वय झाले साठ । अशक्ततेमुळे । समाधीशी केली  विनवणी ॥२०॥येथून पुढती । वारी न झेपेल । समाधीदर्शना । मुकूं आम्ही ॥२१॥क्षमा मागूनीया । झाले निद्राधीन । स्वप्नांत सांत्वन । समर्थांचे ॥२२॥चिंता नको कांहीं । गांवीच करावा । उत्सव वार्षिक । तेंही ठीक ॥२३॥पुढील वर्षीच । माघनवमीस । देईन दर्शन । आश्वासीलें ॥२४॥दृष्टांतानुसार । माघवद्यपक्षी । उत्सवाचा थाट । बाळापुरी ॥२५॥ग्रंथपारायण । दिवसा चालावें । कीर्तन रंगावें । सायंकाळी ॥२६॥रोज दोप्रहरी । ब्राम्हणभोजन । आनंदीआनंद । कार्यक्रमी ॥२७॥नवमीचे दिनी । दोन प्रहरासी । स्वामी तेथे आले । अचानक ॥२८॥संतांचे चरण । पावले पाहून । आनंद मावेना । गगनांत ॥२९॥उत्स्फूर्त उद्घोष । स्वामीनी मांडला । जय जय रघुवीर । समर्थसा ॥३०॥त्याच रात्री स्वप्नी । समर्थ म्हणती । गजानन जाण । मीच आलों ॥३१॥ऐसी जाणूनीया । संता एकात्मता । स्वामीना आग्रह । खूप केला ॥३२॥इथेच रहावे । बाळापुरी आतां । स्वामी आश्वासती । तेव्हां त्यास ॥३३॥येईन मी पुन्हा । कालांतरें जाण । आम्ही ना राहतों । एके जागीं ॥३४॥
नमो गजानना । नववा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५०॥
अध्याय १०नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ दहाव्या । अध्यायास ॥१॥ 
एकदा स्वामींची । अमरावतीस । भिकाजीचे घरी । आली स्वारी ॥२॥नांव आत्माराम । नांवाप्रमाणेच । संतसेवाधर्म । पाळीतसे ॥३॥कितीक ते भक्त । येती भेटावया । गैरसोय मुळी । नाही कोणा ॥४॥कितीकांना वाटे । आपणाकडेही । चरणसेवेचा । योग व्हावा ॥५॥खापर्डे वकील । महान व्यक्तित्व । परि झाले लीन । घरी नेले ॥६॥
गणेश अप्पासा । लिंगायत वाणी । आणि त्याची भार्या । चंद्राबाई ॥७॥यांचेही मनात । आर्तता दाटली । स्वामीना आपुल्या । घरी न्यावे ॥८॥वाण्याचे मनात । भीड तरी होती । गरीबाचे घरी । येतील कां ॥९॥चंद्राबाई म्हणे । पहावे बोलून । असल्यास योग । येतील कीं ॥१०॥भेटीस दोघेही । मिळूनच आली । शब्द अडकला । गळ्यामध्ये ॥११॥स्वामीनीच हात । गणूचा धरीला । किती दूर घर । पुसीयेले ॥१२॥यावेसे वाटते । ऐसेही म्हटले । हर्षभरें गणू । आनंदित ॥१३॥
भिकाजीचा भाचा । बाळाभाऊ नांव । मुंबैहून आला । भक्त झाला ॥१४॥संसाराचा त्याला । वीट मनी आला । स्वामींचे सन्निध । राही सदा ॥१५॥
अमरावती तैं । सोडूनीया स्वामी । परतले पुन्हा । शेगांवास ॥१६॥माटे मंदिराच्या । निकट ओसाड । जागा होती तेथे । बसायाचे ॥१७॥मळ्यांत कां नाही । आतां येत स्वामी । कृष्णाजी पाटला । खंत वाटे ॥१८॥परंतु स्वामीनी । बंकटाकरवी । समज सर्वाना । कांही दिला ॥१९॥स्वामींचा मानस । जाणूनी सर्वानी । मठ एक तिथे । बांधीयेला ॥२०॥
स्वामींच्या सेवेला । बाळाभाऊ नित्य । लोकांत उठला । सल त्याचा ॥२१॥मिठाई मिळते । फुकट खायाला । म्हणूनी कां सेवा । पत्करली ॥२२॥स्वामीनीही त्यास । धाडीले मुंबैस । नोकरीवरती । रुजूं होण्या ॥२३॥बाळाभाऊ परी । देऊनी इस्तिफा । परतुनी आला । शेगांवास ॥२४॥लोकांनी स्वामीना । सुचवीलें तेव्हां । ठिकाणा येईल । मार खाता ॥२५॥स्वामीनीही तेव्हां । बाळास काठीने । झोडतां काठीही । मोडली कीं ॥२६॥स्वामी बोलावूनी । लोकाना म्हणती । पहा खूण कोठे । माराची कां ॥२७॥लोक पाहताती । जवळ येऊन । बाळाभाऊ दंग । आनंदात ॥२८॥एकांतिक भक्ति । पाहूनीया त्याची । वरमले सारे । लोक तेव्हां ॥२९॥
बाळापूर गांवी । सुखलाल सेठ । त्याची गाय द्वाड । मारकुटी ॥३०॥सुखलाला कानी । गोष्ट समजली । टाकळिकरांच्या । घोड्याची ती ॥३१॥बैलगाडीसंगें । गाय ती आणली । गरीब जाहली । स्वामींपुढे ॥३२॥
कारंजा गांवात । लक्ष्मणजी कुडे । उदर व्याधीने । त्रस्त अति ॥३३॥त्याला उचलोनी । लोकांनी आणीला । स्वामींचे दर्शना । संगे पत्नी ॥३४॥कुंकवाची भीक । मागण्यासी तिने । पायासी पदर । पसरला ॥३५॥स्वामी खात होते । एक आंबा तेव्हां । तोच पदरात । टाकीयेला ॥३६॥हाच आंबा देई । खाण्यास पतीला । औषध दुसरे । नको कांही ॥३७॥वैद्य जरी देई । कुपथ्याचा धाक । आदेश पाळीला । निःसंकोच ॥३८॥रेचक जाहले । पतीस अनेक । पोट ठीक झाले । व्याधी गेली ॥३९॥
कृतज्ञ वाटून । स्वामींचे दर्शना । लक्ष्मण पातला । शेगांवास ॥४०॥आग्रह करूनी । आणीले स्वामीना । आदराने घरीं । कारंजास ॥४१॥दक्षिणा देताना । वरवरी म्हणे । सर्वस्व आपुले । मी कां दाता ॥४२॥ऐसे म्हणताना । ताटात दक्षिणा । मोजकी ठेवीली । रुपयांची ॥४३॥त्याची ऐसी कृती । पाहून स्वामीनी । म्हटले दक्षिणा । विसंगत ॥४४॥तूंच ना म्हटले । सर्वस्व आपुलें । तरी घर खाली । करी आता ॥४५॥घरातील सर्व । सामान बाहेर । टाकूनी मोकळा । होई आता ॥४६॥कोठाराच्या चाव्या । देई मजकडे । दिङ्मूढ लक्ष्मण । गप्प उभा ॥४७॥स्वामीनी म्हटले । इतुके असत्य । भरलेल्या जागी । जेवेन ना ॥४८॥मायेचा हा गुंता । बोलण्यात खोट । याचे पहा फळ । भोगशील ॥४९॥रागाने निघून । गेले मग स्वामी । शापच ठरला । त्यांचा शब्द ॥५०॥लक्ष्मणाची पुढे । झाली वाताहत । कायावाचामने । एक हवे ॥५१॥
नमो गजानना । दहावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५२॥
अध्याय ११नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ अकराव्या । अध्यायास ॥१॥ 
पुढील वर्षीचे । रामनवमीस । बाळापूर गांवी । स्वामी गेले ॥२॥बाळकृष्णाकडे । उत्सवाचे दिनी । भास्करास कुत्रा । चावला कीं ॥३॥औषधे घेण्यास । लोकांचा आग्रह । स्वामींचे चरण । औषध हो ॥४॥स्वामीनी म्हटले । हत्या ऋण वैर । प्रायश्चित्त यांचे । टळेल ना ॥५॥जन्मजन्मांतरी । येतसे समोर । श्वानास गाईचा । द्वाडपणा ॥६॥दुधाचे स्वार्थाने । सुखलालाने ना । गाईस आणले । मजकडे ॥७॥श्वानदंशाने ह्या । कर्माची समाप्ती । जाहलीसे आता । समजावे ॥८॥तेव्हा द्वाडपणा । गाईचा शमला । परतूनी आला । श्वानाप्रति ॥९॥भास्करा पुसीले । तुज काय हवे । आयुष्य की मोक्ष । ठरव तूं ॥१०॥जरी मागशील । आणीक आयुष्य । पुढील जन्मीची । उधारी ती ॥११॥मरणचि जरी । आत्ता मागशील । दोन मास तरी । जगशील ॥१२॥विमुक्त होऊन । वैकुंठगमन । पावशील काय । तुज हवे ॥१३॥माझे जे कां हित । आपणासी ठावे । पूर्ण भरंवसा । तुम्हा पायीं ॥१४॥विषबाधा कांही । तुज न होईल । शेगावास आता । चल जाऊं ॥१५॥
शेगांवी लोकाना । भास्कर विनवी । अखेरची इच्छा । माझी जाणा ॥१६॥तीर्थक्षेत्रे जैसी । पंढर्पूर देहू । आळंदी तैसेच । येथे होवो ॥१७॥स्वामींचे स्मारक । बांधण्या वचन । लोकानी दिधले । भास्करास ॥१८॥स्वामीनी म्हटले । आता जाया हवे । त्र्यंबकेश्वरास । भास्करा गा ॥१९॥सारी तीर्थक्षेत्रे । आपुले चरणी । यात्रेचे तरी कां । प्रयोजन ॥२०॥स्वामीनी म्हटले । स्थानाचे आपुले । महत्त्व असते । ध्यानी धरी ॥२१॥
यात्रा करूनीया । नाशकास आले । तिथे संतबंधू । गोपाळदास ॥२२॥त्यांचेसंगे केला । अध्यात्मविचार । परस्परां खूप । समाधान ॥२३॥
शेगांवी परत । येतां श्यामसिंग । देई आमंत्रण । आडगांवा ॥२४॥तेथे आनंदाने । हनुमंजयंती । साजरी होताना । काय केले ॥२५॥स्वामीनी भास्करा । पाडूनी खालती । बैसले तयाचे । उरावरी ॥२६॥अतीव ताडण । झाले तेव्हां त्याना । बाळाभाऊ म्हणे । सोडा आता ॥२७॥स्वामींचा खुलासा । ऐशा ताडणाने । झाडा घालवीला । संचिताचा ॥२८॥भास्कराकारणें । बाळाभाऊनेच । होता मार खाल्ला । स्वामीहस्तें ॥२९॥तृतीया तिथीस । स्वामीनी म्हटले । आतां दोन दिस । तुझे बाकी ॥३०॥पंचमीचे दिनी । भास्करास केली । सूचना घालाया । पद्मासन ॥३१॥हरीचे चरणी । चित्त स्थिर होतां । स्वामी गरजले । हरहर ॥३२॥तेव्हांच सहजी । उडाला कीं प्राण । गुरुकृपा थोर । ऐसी केली ॥३३॥अर्ध्या कोसावर । द्वारकेश्वराचे । मंदिराजवळी । वृक्षवल्ली ॥३४॥तेथेच समाधी । बांधवूनी मग । अन्नदान झाले । दहा दिन ॥३५॥
कावळ्यांचा खूप । उपद्रव होतां । लोक मारूं गेले । कावळ्याना ॥३६॥स्वामी आश्वासती । नका मारूं ह्याना । उद्या न येईल । काक एक ॥३७॥मानवाची वाणी । पक्षी कां जाणेल । खातर कराया । जन आले ॥३८॥एकही कावळा । नजर ना येई । सामर्थ्य स्वामींचे । कळूं आले ॥३९॥
शेगांवास स्वामी । परतले तेव्हां । दुष्काळाची कामें । चाललेली ॥४०॥विहीर खोदण्या । सुरुंग लावीले । होते खोल खाली । एके जागी ॥४१॥सरबत्ती देण्या । पुंगळ्या सोडल्या । विस्तव दारूस । लागेचना ॥४२॥सुरुंगाजवळी । पाणी जमलेले । पुंगळी पाहिजे । हलवीली ॥४३॥जोखमीचे काम । करण्या हुकूम । गणू जव-यास । मेस्त्री करी ॥४४॥दरिद्री आणीक । अगतिक गणू । खाली उतरला । कामासाठी ॥४५॥सुरुंगाचे स्फोट । अचानक सुरूं । झाले गणू खाली । अडकला ॥४६॥गणू स्वामीभक्त । स्मरे त्यांचे नाम । सांपडले त्यास । खबदाड ॥४७॥एकावरी एक । सुरुंग उडती । शिळा एक आली । उडोनीया ॥४८॥तिने खबदाड । झाले कीं हो बंद । गणू पूर्णपणे । अडकला ॥४९॥स्फोट थंड झाले । अस्वस्थ लोकाना । वाटले प्रेतच । दिसणार ॥५०॥वाचवा वाचवा । गणूचा आवाज । ऐकूनी सावध । मेस्त्री झाला ॥५१॥शिळा हटवूनी । बाहेर निघतां । गणू धाव घेई । स्वामीपदीं ॥५२॥त्याचे पाठीवरी । ठेऊनीया हात । स्वामीच म्हणती । वाचलास ॥५३॥शिळेने झांकले । बरें खबदाड । एरव्ही तूं तरी । उतावीळ ॥५४॥हें काय म्हणावें । अपरोक्ष ज्ञान । कां स्वतःच स्वतःस । वांचवीलें ॥५५॥
नमो गजानना । अकरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५६॥
अध्याय १२नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ बाराव्या । अध्यायास ॥१॥
अकोल्यात एक । भक्त बच्चूलाल । आडनांव त्याचे । अग्रवाल ॥२॥स्वामींच्या भेटीची । मनी तळमळ । स्वामीच एकदा । अकोल्यात ॥३॥अवचित आले । त्याचेच घरास । इच्छा व्यक्त करी । पूजा करूं ॥४॥अनुमति होतां । षोडशोपचारे । पूजा सजवीली । स्वामींची कीं ॥५॥सुग्रास भोजन । पीतांबर शाल । दागीने मोहरा । दशसहस्र ॥६॥श्रीराम मंदीर । व्हावें ही प्रार्थना । स्वामीनी वरली । आशीर्वादें ॥७॥स्वामीनी उठोनी । दागीने नि वस्त्रे । परतोनी दिली । बच्चूलाला ॥८॥मजसी कांही न । यांचे प्रयोजन । उपाधी ह्या सा-या । विषासम ॥९॥आपुलें वैभव । ठेवी स्वतःकडे । विठ्ठल तिष्ठतो । मजसाठी ॥१०॥दोन पेढे फक्त । घेऊनी स्वच्छंदें । स्वामी परतले । शेगांवास ॥११॥तरी कालांतरें । वैभव वाढतां । मंदीर बांधले । घरापुढे ॥१२॥
शेगांवी मठांत । भक्त पीतांबर । गरीब वस्त्रेही । जीर्ण त्याची ॥१३॥त्याच्या सेवेवरी । संतुष्ट होवोनी । स्वामीनी दुपट्टा । त्यास दिला ॥१४॥इतरांचे मनी । पीतांबराविशी । दाटला मत्सर । अविवेकी ॥१५॥गुरूचें जें वस्त्र । आपण नेसावें । गुरुचा करीतो । अपमान ॥१६॥खुलासा तो करी । गुरूंचे आज्ञेने । नेसतो ते कोणी । मानेचि ना ॥१७॥वाद मिटविला । स्वामीनी तो सारा । संचार कराया । धाडीयेले ॥१८॥विश्वास दिधला । माझा आशीर्वाद । सन्मार्गाने करी । लोकोद्धार ॥१९॥
कोंडोळीस आला । आम्रतरुतळी । सद्गुरुचिंतनी । रात्र गेली ॥२०॥दुसरे दिवशी । गेला झाडावरी । परि तेथे मुंग्या । मुंगळे ही ॥२१॥बसावया नाही । जागा फांदीवर । मुंग्यांच्या चाव्यानी । पछाडला ॥२२॥नटराजापरी । नाचत राहीला । तोल परि मुळी । नाही गेला ॥२३॥त्याचा तो प्रकार । पाहूनी गुराखी । बोलावीते झाले । गांव सारा ॥२४॥लोकांनी पुसीले । आलासी कोठून । चढला कशास । झाडावर ॥२५॥शेगांवीचा भक्त । स्वामींचा म्हटलें । त्यानी धाडियेले । संचारास ॥२६॥मुंग्यांच्या चाव्यानी । परि मी त्रासलो । म्हणूनी चढलो । झाडावर ॥२७॥लोक दटावती । फसवीसी काय । स्वामींचे सांगोनी । नांव आम्हां ॥२८॥तेव्हां देशमुख । नांव श्यामराव । म्हणाले परीक्षा । घेऊं ह्याची ॥२९॥वृक्ष वठलेला । आहे हा निष्पर्ण । करी डेरेदार । आळवोनी ॥३०॥तुझी भक्ति जरि । असेल साजीरी । दाखवी पुरावा । एणे रीती ॥३१॥एरव्ही खाशील । मार पहा खूप । पीतांबर करी । गयावया ॥३२॥माझीया भक्तीची । कठीण परीक्षा । ऐसी नका घेऊं । विनवीतो ॥३३॥मंडळी मानेना । तेव्हां पीतांबरें । धावा सुरूं केला । गुरुलागी ॥३४॥उत्स्फूर्त स्तवन । पीतांबर बोले । डोलाया लागले । सारे जण ॥३५॥उदंड गजर । जैसा का रंगला । पालवी फुटली । वृक्षावरी ॥३६॥पाने तोडूनीया । खातरही केली । जयजयकार केला । पीतांबरा ॥३७॥नंतर लोकानी । कोंडोली गांवात । पीतांबर नांवें । मठ केला ॥३८॥
पुढें काय झालें । शेगांवी एकदा । स्वामी उद्विग्नसे । बसलेले ॥३९॥मठात रहाया । मन न लागते । लोक बिचकले । नवे काय ॥४०॥शेगांव सोडूनी । जातील कां स्वामी । चिंता उपजली । सर्वां मनी ॥४१॥स्वामीनी म्हटलें । सरकारी जागा । बक्षीस मिळाया । अर्ज करा ॥४२॥लोकां मनी शंका । राजा तो परका । जागा देईल कां । सरकारी ॥४३॥करी साहेबाने । एक एकराची । खरेंच मंजूर । जागा केली ॥४४॥आणिक म्हटलें । व्यवस्था राखाल । देईन एकर । आणीकही ॥४५॥
नमो गजानना । बारावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४६॥
अध्याय १३नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ तेराव्या । अध्यायास ॥१॥ 
जमीन मिळाली । मठ बांधावया । वर्गणी पाहिजे । जमवीली ॥२॥टीका करणा-या । कांहींचे म्हणणें । भीक मागणें हें । संतनांवें ॥३॥दैवी शक्ति जरी । मठ कशासाठी । स्वामीना हवा कीं । तुम्हालाच ॥४॥जगदेव तेव्हां । टवाळखोराना । म्हणाले स्वामीना । नको कांहीं ॥५॥आकाशाची छत्री । निजाया धरित्री । संग्रह कांही का । करतात ॥६॥संत कार्यासाठी । देतां एकपट । दसपट हित । आपलेंच ॥७॥वर्गणी जमली । कोट बांधावया । केली सुरवात । प्रथमतः ॥८॥
एकदा स्वामीनी । काय ठरवीलें । रेतीच्या गाडीत । चढले कीं ॥९॥गाडीवान तेव्हां । खाली उतरला । स्वामींचा आग्रह । बैस जागी ॥१०॥गाडीवान म्हणे । हनुमान श्रेष्ठ । रामभक्त जरी । तिष्ठतो ना ॥११॥असो गाडी आली । बांधकामाजागी । स्वामीनी हेरली । एक जागा ॥१२॥जेथे कां बैसले । स्वामी तयेवेळी । तेथेच समाधी । आज आहे ॥१३॥
स्वामीनी निर्देश । केला त्यानुसार । आंखणी जाहली । कोटासाठी ॥१४॥अकरा गुंठ्यानी । जाहली अधिक । कोणाची कागाळी । दफ्तरात ॥१५॥मोजणीस आले । जोशी अधिकारी । अयोग्य वाटले । दंड देणे ॥१६॥आज्ञापत्र स्पष्ट । मिळतां भक्तांचा । उत्साह वाढला । मठासाठी ॥१७॥
नंतर एकदा । गळत्या कुष्ठाचा । एक रोगी आला । मठाकडे ॥१८॥सर्वड गांवचा । गंगाभारतीशा । नांवाचा गायक । परित्यक्त ॥१९॥लोक बजावती । स्वामींचे चरण । नाही स्पर्शायाचे । ध्यान धरी ॥२०॥एकदा स्वामीना । एकटे पाहून । धरीले चरण । अवचित ॥२१॥स्वामीनी थप्पड । लाथाही मारून । ढकलूनी दिला । बाजूकडे ॥२२॥कफाचा बडका । त्यावरी थुंकला । रागाने निघून । गेले स्वामी ॥२३॥बडक्याचे झाले । मलम पाहून । सर्वांगी फांसला । आनंदाने ॥२४॥किळसवाणे तें । करणें पाहून । पाटलानी त्याला । धिक्कारीले ॥२५॥परि उत्तरला । कळली न तुम्हा । स्वामींची विचित्र । पहा कृपा ॥२६॥स्वामीनी जेथेही । स्नान केले तेथे । जमीन सुगंधी । जाहलीसे ॥२७॥तिथेच लोळण । घेईन मी आता । वाटतें होणार । चमत्कार ॥२८॥नास्तिकास दिसे । केवळ ती माती । निरोगी जाहला । कुष्ठ देह ॥२९॥गंगाभारतीचे । गान बहरले । निवांत आसरा । आश्रमात ॥३०॥गांवाहून आली । पत्नी आणि मुलें । आग्रह करती । परतण्या ॥३१॥गंगाभारती तो । त्याना उत्तरला । लटकी तुमची । माया पहा ॥३२॥तुमचा मी नव्हे । स्वामींचा जाहलो । संसाराचे पाश । नको आता ॥३३॥नंतर स्वामीनी । गंगाभारतीस । मलकापुरास । धाडीयेले ॥३४॥
झ्यामसिंग भक्त । आला शेगांवास । स्वामीना बोलावी । मुंडगांवी ॥३५॥भंडा-याकरीता । अमित लोकांची । दिंडीच निघाली । उत्साहात ॥३६॥चतुर्दशी तिथी । त्याने योजलेली । रिक्त तिथी वर्ज्य । खरे तर ॥३७॥स्वामींची सूचना । दुर्लक्षली त्याने । पाऊस पडला । पंक्तीवर ॥३८॥अन्न वांया गेले । शेतीचीही हानी । होणारसी चिंता । सर्वां झाली ॥३९॥झ्यामसिंग तेव्हां । वरमूनी प्रार्थी । स्वामीना संकट । निवाराया ॥४०॥स्वामीनी नजर । नेली गगनात । ढग दूर गेले । ऊन आले ॥४१॥झ्यामसिंगानेही । उद्या पौर्णिमेला । भंडारा घातला । आनंदाने ॥४२॥
भक्त पुंडलिक । भोकरे नामक । वारी दरवर्षी । करीतसे ॥४३॥वारीस निघता । लागण जाहली । ग्रंथीरोगाची ती । कणकण ॥४४॥चालवेना तरी । वाहन अव्हेरी । गांठ वाढतेच । कांखेमध्ये ॥४५॥रडतखडत । मठात पोचेतो । स्वामी खुणावती । दुरूनच ॥४६॥स्वतःचीच कांख । दाबूनी जोराने । स्वामी ओरडले । गांठ गेली ॥४७॥पुंडलीकाच्याही । तापाला पडला । तात्काळ उतार । आश्चर्य तें ॥४८॥
नमो गजानना । तेरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४९॥
अध्याय १४नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ चौदाव्या । अध्यायास ॥१॥ 
तात्या बंडोपंत । नांवाचे ब्राम्हण । होते मेहकर । तालुक्याचे ॥२॥त्याने उदारता । अवास्तव केली । त्याने झाले जीणे । दारिद्र्याचे ॥३॥तगादे पाठीस । सावकाराचे नि । बायको मुलेही । भंडावती ॥४॥जीव द्यावा किंवा । जावे हिमालयी । म्हणोनी सोडीले । घरदार ॥५॥राख फांसूनीया । लंगोटी लावूनी । आला स्थानकास । प्रवासास ॥६॥अनोळखी विप्र । म्हणे तेव्हा त्याला । हिमालयाआधी । शेगांवी जा ॥७॥बंडूतात्यालागी । वाटले आश्चर्य । अनोळखी विप्र । मनकवडा ॥८॥शेगांवी स्वामीनी । खूण सांगीतली । अनोळखी विप्र । भेटल्याची ॥९॥प्राण का त्यागावा । हताश होऊन । कशासाठी जावे । हिमालयी ॥१०॥कानात बोलले । बाभूळाजवळी । म्हसोबा मळ्यात । आहे गुप्त ॥११॥एकटाच खण । मध्यरात्रवेळी । वावभर माती । काढूनीया ॥१२॥मिळेल जें धन । त्याने कर्ज फेड । राही संसारात । संभाळून ॥१३॥स्वामींचे सांगणे । तंतोतंत खरें । तांब्याची घागर । सांपडली ॥१४॥चारशे मोहरा । पाहतां नाचत । स्वामींचा करी तो । जयजयकार ॥१५॥स्थिति सुधारली । आला शेगांवासी । स्वामी सांगताती । उपदेश ॥१६॥परोपकारही । करताना लक्ष्मी । आदर राखूनी । संभाळावी ॥१७॥
असेच एकदा । मार्तण्ड पाटील । साधण्या अवस । सोमवती ॥१८॥नर्मदेस जाण्या । करीती आग्रह । ती तो आहे नित्य । मजपाशी ॥१९॥पर्वाची महती । मज नाही कांही । विघ्न ओढवेल । निष्कारण ॥२०॥तरीही आग्रह । भक्तांचा अतीव । आले तीर्थस्थानी । सारे जण ॥२१॥ओंकारेश्वराचे । दर्शनास सारे । स्वामीनी लावीले । पद्मासन ॥२२॥परत निघता । स्वामींची सूचना । बैल करतील । अपघात ॥२३॥सडकेने जाण्या । गर्दीही प्रचंड । नावेने निघाले । खूप लोक ॥२४॥सर्वांसमवेत । स्वामीही चढले । खडकावरती । आदळली ॥२५॥बुडाया लागली । नौका खालीखाली । उडी टाकोनीया । माजी गेला ॥२६॥भयभीत भक्तां । स्वामी सांगताती । आता नर्मदेचा । धावा करा ॥२७॥स्वामींचा आदेश । भक्तानी पाळतां । पात्रात कोळीण । प्रकटली ॥२८॥कोण तूं प्रश्नाच्या । उत्तरी म्हणाली । ॐकार-सन्तान । मज जाणा ॥२९॥नर्मदाच नांव । जळ हेंच रूप । ओलेच वसन । नित्य माझे ॥३०॥सहज नावेस । ढकलूनी तिने । किनारी लावीली । अलगद ॥३१॥सारे सुखरूप । वळून पाहती । कोळीण अदृश्य । गेली कोठे ॥३२॥स्वामीना पुसता । म्हणाले कोळीण । होती ती स्वतःच । नर्मदा ना ॥३३॥
संत माधवनाथ । चित्रकूटवासी । त्यांचा माळव्यात । शिष्यगण ॥३४॥शेगांवास आले । त्यांचे एक शिष्य । नांव सदाशिव । वानवळे ॥३५॥भजन संपता । स्वामींनी म्हटलें  । सदाशिवरावाना । सहजीच ॥३६॥इतुक्यात येथे । येऊनीया गेले । माधवनाथचि । काय म्हणूं ॥३७॥चुकामूक झाली । थोडा वेळ आधी । येते तरी होती । गुरुभेट ॥३८॥खुणेसाठी परि । म्हटले हा विडा । त्यांचा जो राहीला । सवें न्यावा ॥३९॥सदाशिव जेव्हां । गुरूंना भेटले । विड्याची ती पाने । देते झाले ॥४०॥माधवनाथानी । तेव्हां सांगीतले । योगसिद्धीमुळे । भेट होते ॥४१॥शेगांवास गेलो । जेवणही केले । विडा तो राहीला । घ्यावयाचा ॥४२॥
नमो गजानना । चौदावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४३॥
अध्याय १५नमो गजानना । आपल्या कृपेने । सुरू पंधरावा । अध्याय हा ॥१॥ 
शिवजन्मोत्सव । अकोल्यात शके । अठराशे तीस । वैशाखात ॥२॥सभेचे अध्यक्ष । लोकमान्य होते । स्वामींचा आशिष । मिळावा कीं ॥३॥सभेला येण्याची । विनंति कराया । खापर्डे वकील । स्वतः आले ॥४॥स्वामीनी स्वतःच । म्हटले सभेत । असतील दोन । थोर व्यक्ति ॥५॥टिळक नि अण्णा । पटवर्धनही । येईन देखेन । दोघानाही ॥६॥टिळकानी दिला । लोकाना आठव । समर्थांची कृपा । शिवराया ॥७॥आज नष्टचर्य । दास्यत्वाचे आहे । शिक्षणाने व्हावे । राष्ट्रप्रेम ॥८॥परदेशी राजा । ऐसे कां शिक्षण । जाणूनबुजून । देईल हो ॥९॥ऐकूनी भाषण । ऐसे रोखठोक । स्वामीजी बोलले । भविष्य कां ॥१०॥ऐशा बोलण्याने । काढण्या नाही कां । दोन्ही दंडावरी । पडतील ॥११॥स्वामी जे बोलले । तैसेच जाहले । बंदीत टाकले । टिळकाना ॥१२॥
राजद्रोहामुळे । खटले भरले । मुंबईच्या वा-या । खापर्ड्याना ॥१३॥खापर्ड्यांचे सवे । कोल्हटकरही । निघाले असतां । मुंबईला ॥१४॥खापर्ड्यानी तेव्हां । कोल्हटकराना । शेगांवा धाडीले । आशीर्वादा ॥१५॥स्वामीनी म्हटले । यश ना येईल । शिवाजीस सुद्धा । कैद झाली ॥१६॥परि ही भाकर । खाववा टिळका । कांही थोरकार्य । घडवेल ॥१७॥टिळकांचे तोंडी । दात नसल्याने । भाकर सेवीली । कुस्करून ॥१८॥म्हटले त्रिकाल । जाणताती साधू । पाहूं कामगिरी । आतां काय ॥१९॥मंडाले येथील । कारागृही ग्रंथ । गीतारहस्याचा । सिद्ध झाला ॥२०॥
भक्त कोल्हापुरी । श्रीधर काळे हा । योजी विद्यार्जन । परदेशी ॥२१॥निघण्याचे आधी । दर्शनास आला । शब्द बोलवेना । स्वामींपुढे ॥२२॥स्वामीच म्हणती । भौतिकशास्त्राची । नको अभिलाषा । व्यर्थ गोष्ट ॥२३॥भारतात जन्म । हेंच थोर पुण्य । योग नि अध्यात्म । अभ्यासावें ॥२४॥ज्ञान हें मिळतां । होशील कृतार्थ । कशास तूं जाशी । जपानला ॥२५॥इथेच होईल । अभ्युदय मान । परतूनी जाई । कोल्हापुरा ॥२६॥स्वामींचा आदेश । मानीतां भूषवी । प्राचार्यपदाला । कालांतरें ॥२७॥
नमो गजानना । पंधरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥२८॥
अध्याय १६नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सोळाव्या । अध्यायास ॥१॥ 
मुंडगावातील । भक्ता पुंडलीका । आग्रह करीते । भागाबाई ॥२॥अंजनगांवासी । जाऊनीया घेऊं । केकाजीशिष्याचा । कानमंत्र ॥३॥स्वप्नांत स्वामीनी । केला मंदस्वरें । गण गण् गणात । बोते मंत्र ॥४॥पुसलें आणीक । तुला कांहीं हवें । पादुका मागतो । पुंडलीक ॥५॥दुसरे दिवशी । आली भागाबाई । पुंडलीक नाही । जाण्या राजी ॥६॥पादुकांची वाट । पाहतो विश्वासे । होतील स्वप्नीचे । बोल सत्य ॥७॥शेगांवाहूनचि । मुंडगांवी येण्या । भक्त झ्यामसिंग । निघालेला ॥८॥स्वामीनी म्हटले । माझीया पादुका । नेऊनी या देई । पुंडलीकां ॥९॥वाटेतच त्याला । दिसे पुंडलिक । प्रसाद कांही कां । पुसे आर्त ॥१०॥आश्चर्य जाहले । झ्यामसिंगालाही । वृत्तांत ऐकून । स्वप्नातील ॥११॥
अकोल्यात एक । सावकार पुत्र । त्र्यंबक कंवर । स्वामीभक्त ॥१२॥उच्चशिक्षणास । हैद्राबादी राहे । सुट्टीमध्ये आला । अकोल्यास ॥१३॥मातृहीन भाऊ । म्हणे वहिनीस । स्वामीना भोजन । द्यावें वाटे ॥१४॥भाकर पिठले । मिर्ची आणि कांदा । साधेच भोजन । घेऊनीया ॥१५॥पोचतां स्टेशनी । उशीर जाहला । पुढील गाडीने । मग आला ॥१६॥तिकडे शेगांवी । ताटे वाढलेली । नाना पक्वान्नांची । होती जरी ॥१७॥स्वामी म्हणताती । माझे तो भोजन । चवथे प्रहरी । नका थांबूं ॥१८॥भोजन घेऊन । भाऊ येत आहे । माहीत स्वामीना । अंतर्ज्ञानें ॥१९॥त्र्यंबक पोचतां । स्वामीनी म्हटलें । किती बा विलंब । केलास तूं ॥२०॥ पक्वान्नाचे नाही । कौतुक मानीले । भाकरी चवीने । खाते झाले ॥२१॥
शेगांवात एक । शेतकरी त्याचे । नांव तुकाराम । शेगोकार ॥२२॥स्वामीना चिलीम । भरून देण्याचे । काम करीतसे । भक्तिप्रेमें ॥२३॥बसलेला होता । शेतांत अपुल्या । ससा कीं मारीला । शिका-याने ॥२४॥बंदुकीचा छर्रा । याचेच कानाचे । जवळी घुसला । अडकला ॥२५॥डॉक्टरानी खूप । यत्न जरी केले । छर्रा तो निघेना । कांही केल्या ॥२६॥तुकारामालागी । डोकेदुखी झाली । कांही केल्या स्वस्थ । वाटेना कीं ॥२७॥दुस-या भक्ताने । म्हटले उपाय । आतां फक्त एक । गुरुसेवा ॥२८॥मठ झाडण्याचे । काम स्वीकारूनी । सेवा त्याने केली । चौदा वर्षे ॥२९॥एके दिनी ऐसा । मठ झाडताना । छर्रा अचानक । निघाला कीं ॥३०॥स्वस्थता वाटली । परि त्याने सेवा । चालूच ठेवली । निरंतर ॥३१॥
नमो गजानना । सोळावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३२॥
अध्याय १७नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सत्राव्या । अध्यायास ॥१॥ 
स्वामी अकोल्यात । असताना एका । भक्ताचे मनांत । काय आलें ॥२॥विष्णूसा नामक । म्हणे भास्करास । मलकापुरास । न्यावे वाटे ॥३॥तैसाच आग्रह । भास्कराने केला । स्वामींचा इशारा । हट्ट व्यर्थ ॥४॥तरी भास्कराने । केली गाडीमध्ये । आसने राखीव । परस्पर ॥५॥स्वामीना म्हटलें । विष्णूसास दिलें । वचन स्वामीना । आणीनसे ॥६॥स्वामीनी म्हटलें । संकटास तुझे । आमंत्रण मात्र । पाही आतां ॥७॥गाडी जैसी आली । अकोला स्टेशनी । राहीले बसून । फलाटावर ॥८॥गाडी सुरूं होतां । राखीव डब्यातं । न जातां शिरले । स्त्रियांचेंच ॥९॥नग्न वावरतां । रेल्वेचा कायदा । मोडल्याने आलें । वॉरंट कीं ॥१०॥अटक कराया । आला जो शिपाई । त्याचाच धरीला । हात घट्ट ॥११॥जठारसाहेब । तेव्हां पाठवीती । मन वळवीण्या । देसायाना ॥१२॥कोर्टात नेण्यास । कष्टाने धोतर । नेसवीले मार्गी । फेडलेच ॥१३॥जठारसाहेब । गुन्हा विवरती । स्वामी तिकडे न । लक्ष देती ॥१४॥वायफळ गप्पा । म्हणत भास्करा । म्हणती चिलीम । भरून दे ॥१५॥जठार मनात । करीती विचार । अवधूता काय । जनरीत ॥१६॥भास्करास हवे । होते तारतम्य । पांच रुपे दंड । त्यास केला ॥१७॥स्वामीनी म्हटले । झाली ना फजीती । हट्ट निष्कारण । केलास तूं ॥१८॥तेव्हांपासूनीया । रेलगाडी वर्ज्य । त्यांचे प्रवासास । बैलगाडी ॥१९॥
एकदा अकोला । गांवास गेलेले । बापूरावांचे कीं । घरी वास ॥२०॥कुरूम गांवच्या । मेहताबशाने । निरोप दिलेला । भेटीसाठी ॥२१॥यवन मित्राना । घेऊनी राहीला । बापूरावांचेच । घरीं तेव्हां ॥२२॥दुसरे दिवशी । स्वामीनी बोकाट । मेहताबशाचे । धरीयेले ॥२३॥दणादण मार । स्वामीनी दिधला । मुकाट्याने त्याने । सोशीयेला ॥२४॥पाहूनी भ्यालेल्या । मित्राना परत । जाण्यास बोलला । मेहताबशा ॥२५॥
मित्र गेले आणि । बच्चूलाल आला । स्वामीना भोजना । बोलवाया ॥२६॥टांगा पोहोचला । घरी तरी स्वामी । नाही उतरत । टांग्यातून ॥२७॥तर्क तेव्हां केला । भक्ताने ऐसा कीं । मेहताबास ना । बोलावीले ॥२८॥चूक समजतां । त्यालाही आणीलें । उतरवीले त्यास । नाट्यगृही ॥२९॥स्वामींची व्यवस्था । रामाचे मंदीरी । खपला नाहीच । हाही भेद ॥३०॥स्वामी स्वतःहून । नाट्यगृही गेले । तेथेच भोजने । मग झाली ॥३१॥मेहताब सांगे । आतां मज जाणें । स्वामींचे आज्ञेने । पंजाबला ॥३२॥मित्रांचे म्हणणें । मशीद बांधणें । राहील ना काम । तुम्ही जातां ॥३३॥त्यानें आश्वासीलें । स्वामी असताना । काम न अडेल । मुळीसुद्धा ॥३४॥मंदीर-मस्जिद । स्वामीना समान । कार्यपूर्ती होते । त्यांच्या कृपें ॥३५॥
बापूरावांच्या त्या । कांतेस बाधली । करणी ती गेली । स्वामीकृपें ॥३६॥
नरसिंगजी जे । होते अकोट्यात । संतबंधूंमध्ये । दाट प्रेम ॥३७॥स्वामीच अकोटी । आले उठाउठी । विहिरीचे कांठी । बसलेले ॥३८॥वांकून पाहसी । पुनःपुन्हा कां रे । नरसिंगजीनी । विचारलें ॥३९॥गंगा गोदा त्याही । स्नान या तीर्थात । करती कोरडा । मीच मात्र ॥४०॥तीर्थाने येऊन । न्हाऊं घालावें तों । बसून राहीन । येथेच मी ॥४१॥छंदिष्ट दिसतो । ऐसी परस्पर । लोकांत जाहली । कुजबूज ॥४२॥तरी कुतूहलें । रेंगाळले तेथें । जळ अवचित । तुडुंबलें ॥४३॥कारंज्यापरी की । जळ उसळले । स्वामी बोलाबीती । या हो या हो ॥४४॥भाविकांनी केले । उत्साहाने स्नान । नास्तिकांची झाली । खाली मान ॥४५॥स्नाने झाल्यावरी । पाणी गेले खाली । खोल जैसे होते । तैसे पुन्हा ॥४६॥
नमो गजानना । अध्याय सत्रावा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४७॥
अध्याय १८नमो गजानना । आपल्या कृपेने । सुरू अठरावा । अध्याय हा ॥१॥
मुंडगांवी एक । बायजा मुलगी । बालपणी सुद्धा । स्वामीभक्त ॥२॥विवाह जाहला । परि दुर्दैवाने । तिचा पति होता । नपुंसक ॥३॥तिच्या सौंदर्याने । थोरला भावोजी । कराया धजला । एकांत कीं ॥४॥अचानक तेव्हां । त्याचाच मुलगा । जिन्याचेवरूनी । कोसळला ॥५॥पोरास मस्तकी । मार बसल्याने । पाप कर्माविशी । वरमला ॥६॥पिता त्यानंतर । घेऊनीया आला । स्वामींचे दर्शना । बायजाला ॥७॥
पुत्रप्राप्ती नाही । हिचे नशिबात । स्पष्टच बोलले । स्वामी तेव्हा ॥८॥तरीही स्वामीना । मानूनी सद्गुरु । येती झाली सवें । पुंडलिक ॥९॥साथ संगत ती । पाहूनीया लोक । कराया लागले । कुजबूज ॥१०॥स्वामीनीच मग । निर्वाळा दिधला । दोघांचे संबंध । निर्मळचि ॥११॥खामगांवामध्ये । कुंवरास अंगी । फोड उठलेले । दुःख भारी ॥१२॥डॉक्टर भावाने । केले उपचार । परि सल नाही । कमी झाली ॥१३॥ स्वामीपदी निष्ठा । कुंवरास होती । सुरूं केली त्याने । प्रार्थनाही ॥१४॥रात्री अचानक । दमणी दारांत । ब्राम्हण तीतून । उतरला ॥१५॥नांव म्हणे गजा । आलो शेगांवीचा । अंगारा नि तीर्थ । घेऊनीया ॥१६॥कुंवर लवूनी । हाती घेई तीर्थ । आणि मग वर । बघितले ॥१७॥नव्हता ब्राम्हण । कोणीही समोर । दारात नव्हती । दमणीही ॥१८॥तीर्थाचे होतेच । आचमन केले । अंगा-याची पुडी । मांडीपाशी ॥१९॥फोड बरे झाले । कुंवर स्वामींचे । दर्शन घेण्यास । शेगांवास ॥२०॥आला तेव्हां स्वामी । विचारती त्यास । बैलाना पुसीले । पाणी काय ॥२१॥पांच पन्नासाना । घेऊनीया स्वामी । आले पंढरीला । आषाढात ॥२२॥समवेत होता । भक्त बापू काळे । त्याचा वेळ गेला । स्नानामुळे ॥२३॥दर्शन चुकले । विठोबारायाचे । मनात दाटली । हळहळ ॥२४॥प्रभूला सांकडे । घालण्या उपास । करीतां स्वामीना । दया आली ॥२५॥वाड्यात दर्शन । विठ्ठलाचे दिले । जैसा देवळांत । हुबेहुब ॥२६॥
द्वादशी तिथीस । अचानक मरी । पंढरपुरात । पसरली ॥२७॥शेगांवीचे लोक । कुकाजीचा वाडा । सोडूनी निघाले । लगबगा ॥२८॥कवठे गांवीचा । माळकरी परी । सांथीचे आहारी । सांपडला ॥२९॥निपचित होता । तो तरी झालेला । हात पुढे केला । स्वामीनीच ॥३०॥म्हणाले जाऊं या । चल व-हाडास । उठवत नाही । कैसा येऊं ॥३१॥कैसे परतणे । मृत्यू तो समीप । स्वामीनी म्हटलें । धीर धरी ॥३२॥मस्तकी ठेऊनी । हात त्या वेळेला । म्हटले टळला । मृत्यू तुझा ॥३३॥तापाची लक्षणे । उतरली आणि । आली कांही शक्ति । आश्चर्य तें ॥३४॥मृत्यूचा जबडा । फाडूनी मजला । काढीले म्हणत । भक्त झाला ॥३५॥
एकदा दर्शना । ब्राम्हण आलेला । विधिनिषेधांच्या । गांठी मनी ॥३६॥एक काळे कुत्रे । वाटेत मेलेले । पहा याला कां न । उचलले ॥३७॥कोणालाही खंत । नाही शिवाशिव । उगाच कीं आलो । ऐशा गांवा ॥३८॥जाणूनीया मन । स्वामी अचानक । ब्राम्हणासमोर । स्वतः उभे ॥३९॥म्हणती कशास । व्हावे बा दुश्चित्त । कुत्रे हें जिवंत । झोपलेलें ॥४०॥चला आणूं पाणी । म्हणत पाऊल । टाकता कुत्र्यास । स्पर्श झाला ॥४१॥कुत्रें तें उठलें । ब्राम्हण दिङ्मूढ । पश्चात्ताप त्यास । तेव्हां झाला ॥४२॥योग्यतेची जाण । नसताना निंदा । केली त्या खंतेने । क्षमा मागे ॥४३॥
नमो गजानना । अठरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४४॥
अध्याय १९नमो गजानना । आपल्या कृपेने । सुरू अध्याय हा । एकोणीसावा ॥१॥ 
खामगांवाहूनी । काशिनाथ आला । लक्षणें पाहूनी । आनंदला ॥२॥वडिलानी होती । जैसी सांगितली । तैसीच देखीली । स्वामींचीही ॥३॥त्यावेळी स्वामीनी । म्हटले तयास । तारवाला तुझी । वाट पाहे ॥४॥काम झाले तुझे । त्यांच्या बोलण्य़ाचा । अर्थ नाही आला । त्यास ध्यानी ॥५॥गांवीं परततां । मिळाल्या तारेचा । मजकूर होता । मुन्सफीचा ॥६॥
धनिक गोपाळ । बुट्टीने स्वामीना । नेऊन कोंडीलें । नागपुरी ॥७॥ब्राम्हणभोजने । नित्य भजनेंही । शेगांवकराना । मज्जावचि ॥८॥उदास लोकांनी । शेगांवी जमून । हरि पाटलास । विनविलें ॥९॥जत्था घेऊनीया । पाटील पोंचलें । बुट्टींचे सदनी । नागपुरी ॥१०॥ढकलूनी दिला । द्वारपाल आणि । पंक्तीत शिरला । भक्तगण ॥११॥स्वामीही स्वतःच । उठोनीया मिठी । मारते जाहले । पाटलास ॥१२॥स्वामीनीच केले । लोकांचे स्वागत । पाहूनी बुट्टीनी । जाणीलें कीं ॥१३॥भरल्या ताटांचा । नको अवमान । दीन विनवणी । करी तेव्हां ॥१४॥हरी पाटलास । बुट्टीनी म्हटलें । सर्वानी प्रसाद । घ्यावा बरें ॥१५॥निघतां स्वामीनी । पत्नी जानकीस । पुत्रप्राप्तीवर । प्रेमें दिला ॥१६॥
परतीचे मार्गी । रघुजी भोसले । भेटले तेथील । संस्थानिक ॥१७॥शेगांवी नंतर । कितीक तपस्वी । आणि साधु येती । भेटावया ॥१८॥वासुदेवानंद । सरस्वती यांचे । येण्याचे माहीत । झाले तेव्हां ॥१९॥प्रसंग साधून । शंका कितीएक । विचारीता झाला । बाळाभाऊ ॥२०॥कर्म भक्ति ज्ञान । त्यास विवरीले । मार्ग वेगळाले । साध्य एक ॥२१॥
साळूबाईलागी । स्वैपाकाची रीती । सांगीतली अन्न । प्रिय होण्या ॥२२॥जलंब गांवीच्या । आत्मारामें होते । वेद शिकलेले । गंगातीरी ॥२३॥उच्चारी प्रमाद । होतां लगोलग । सुधारून देती । स्वामी त्याला ॥२४॥थोरवी कळतां । स्वामीसेवी रत । राहीला शेगांवी । कायमचा ॥२५॥सारी मिळकत । मठास अर्पिली । विचार टाकीले । बाकी सारे ॥२६॥आणीकही दोघे । असेच देऊनी । सारी मालमत्ता । धन्य झाले ॥२७॥
मारुतीपंतांचे । बाळापुरी शेत । राखायाचे काम । तिमाजीस ॥२८॥डोळा लागला नि । नाहीच कळले । गाढवें शिरली । कुंभाराची ॥२९॥निद्रेतच हांक । स्वामीनी दिधली । अदृश्यही झाले । लगेचच ॥३०॥जोंधळ्याची रास । अर्धी फस्त झाली । कबूली कथिली । तिमाजीने ॥३१॥शेगांवी जाण्याचे । मारुतीपंतांचे । मनी असल्याने । बोलले ना ॥३२॥स्वामीनी स्वतःच । पिकाची नासाडी । तिमाजीची खूण । सांगीतली ॥३३॥व्हावें क्षमावंत । धरावी सबूरी । स्वामींचा मानीला । उपदेश ॥३४॥
बाळापुरीं स्वामी । सुखलालाचिये । बैठकी बैसले । अवधूत ॥३५॥नारायणनामें । हवालदारास । त्यांना पाहूनीया । चीड आली ॥३६॥स्वामीना जोशात । झोडपलें त्याने । जरी समजावी । हुंडीवाला ॥३७॥साधूला मारून । सर्वनाशालाच । कशास देतोसी । आमंत्रण ॥३८॥ऐकलेच नाही । पुढे झाली दैना । आप्तेष्ट निमाले । स्वतः सुद्धा ॥३९॥
संगमनेरच्या । हरी जाखाडीच्या । मनांत रमली । विवाहेच्छा ॥४०॥इच्छेची तुच्छता । पाहून थुंकले । तरीही तथास्तु । वर दिला ॥४१॥
वासुदेव बेन्द्रे । आणि त्यांचा मित्र । रामचंद्र नाम । निमोणकर ॥४२॥संचार करीत । आले अरण्यात । मुकना निर्झर । तिथे होता ॥४३॥स्थान तें प्रसिद्ध । कपिलधारातीर्थ । योगाभ्यासीं रस । रामचंद्रा ॥४४॥समोर देखतां । योगीराज ध्यानी । प्रणाम करूनी । उगा उभा ॥४५॥त्याचे मनोगत । जाणूनी योग्याने । नेत्र उघडले । समाधानें ॥४६॥एक चित्रपट । तांबडा खडाही । रामचंद्रालागी । भेट दिला ॥४७॥योगीराज झाला । क्षणैकात गुप्त । पुन्हा तो दिसला । नाशकात ॥४८॥कोण तुम्ही प्रश्नी । नर्मदेचा खडा । दिला तो मीच बा । गजानन ॥४९॥धुमाळांचे घरी । पुनश्च दिसतां । रामचंद्र सांगे । अनुभव ॥५०॥धुमाळ सांगती । खड्याचे करावें । नेमाने पूजन । भावपूर्ण ॥५१॥
शेगांवी कोकाटे । तुकाराम यांना । संतति जगत । नाही चिंता ॥५२॥नवस बोलले । जगेल संतति । करीन अर्पण । एक तुला ॥५३॥बोलल्या नवसा । विसर पडतां । वडील मुलगा । अत्यवस्थ ॥५४।आठव जाहला । बोलले हा पुत्र । नारायण तुज । अर्पीयेला ॥५५॥व्याधी बरी झाली । मठद्वारी त्याला । सोडीला आजन्म । सेवेसाठी ॥५६॥
एकोणीश्शे दहा । साली पंढरीस । आषाढीनिमित्ते । होते आले ॥५७॥विठ्ठला म्हणाले । भाद्रपदमासी । यावेसे वाटते । वैकुंठास ॥५८॥स्वामींचे नयनी । पाहूनीया अश्रु । हरी पाटलास । चिंता झाली ॥५९॥तुजला विषय । नाही कळायचा । संगत आपुली । थोडी आतां ॥६०॥परतल्यावर । गणेशचतुर्थी । सणाची प्रतिष्ठा । झाली तेव्हां ॥६१॥स्वामीनी लोकाना । म्हटले आजचा । दिवस समजा । अखेरचा ॥६२॥गेलो ऐसे मनी । कधीही न आणा । केवळ देहाचे । विसर्जन ॥६३॥पंचमीचे दिनी । बाळाभाऊ यांसी । निजासनी केलें । स्थानापन्न ॥६४॥"जय गजानन" । ऐसे बोलोनीया । अचल शरीरें । समाधिस्थ ॥६५॥
भक्तानी पालखी । वाहूनी शेगांवी । दर्शन गांवास । घडवीलें ॥६६॥परिमल द्रव्यें । मूर्तीस सिंचूनी । समाधीचे जागीं । विसावली ॥६७॥
नमो गजानना । एकोणीसावा हा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥६८॥
अध्याय २०नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ वीसाव्या । अध्यायास ॥१॥ 
शरीर टाकलें । तरी श्रद्धावंता । दर्शन दृष्टांत । अजूनही ॥२॥
शेगांवी कोठाडे । नांव गणपत । दुकानधारक । भक्त एक ॥३॥असेच एकदा । मनी आले त्यास । घालावें भोजन । ब्राम्हणास ॥४॥अभिषेक आणि । भोजनासाठीचे । सामान मठात । पाठवीले ॥५॥पत्नी करे टीका । वाऊगा हा खर्च । अशाने संसार । चालेल कां ॥६॥पत्नीचे विचार । इतुके वेगळे । असतां सचिंत । गणपत ॥७॥स्वामीनी पत्नीस । दृष्टांत देऊनी । छळूं नको ऐसे । सांगीतलें ॥८॥पतीने योजीले । परमार्थकार्य । अहित ना होणे । तेणें कांही ॥९॥सकाळीं उठतां । तिने तो दृष्टांत । स्वप्नीचा पतीस । सांगीतला ॥१०॥चिंता ती संपली । साथसंगतीनें । केला परमार्थ । आनंदानें ॥११॥
लक्ष्मण जांजळ । नामक भक्ताला । घराचा वैताग । आला होता ॥१२॥व्यापाराचे कामी । मुंबैस आलेला । घरी परताया । स्टेशनात ॥१३॥परमहंसांच्या । वेषांत स्वामीनी । हटकले त्याला । अचानक ॥१४॥स्वामींच्या शिष्याने । हताश कां व्हावें । जावें परतोनी । विश्वासाने ॥१५॥सांगूनीया खुणा । आणीकही त्याची । विश्वास नि श्रद्धा । दृढ केली ॥१६॥खाली वांकूनीया । नमन करीतों । स्वामी अंतर्धान । पावलेले ॥१७॥तेव्हापासूनीया । जांजळ करीतो । नेमाने साजरी । पुण्यतिथी ॥१८॥
जोशी अधिकारी । काम आटपोनी । बैलगाडीने कीं । निघालेले ॥१९॥वाटेत उठले । वादळ नदीला । पूर आला गाडी । जावी कैसी ॥२०॥गाडीवान तरी । होता भयभीत । जोशींचा आग्रह । जाया हवें ॥२१॥पाणी चढतेच । बैल बिथरले । गाडीवान सोडे । कासराही ॥२२॥दोघेही मिळून । डोळे मिटूनीया । करताती धावा । गजानना ॥२३॥आश्चर्य जाहले । डोळे उघडतां । होते शेगांवात । सुखरूप ॥२४॥साक्ष पटल्याने । ब्राम्हणभोजन । आणि दानधर्म । केला बहु ॥२५॥
यादव गणेश । सुभेदार याना । कपाशीधंद्यात । झाला तोटा ॥२६॥वर्ध्यात मित्राचे । आसिरकरांचे । घरी बसलेले । चिंतेतच ॥२७॥लोचट म्हातारा । भिकारी मागतो । आणीक आणीक । भिक्षा किती ॥२८॥प्रचंड तोट्याने । आधीच त्रासलों । तेंही सांगीतलें । भिका-यास ॥२९॥गजानन देता । नको कांही शंका । स्थिती सुधारेल । पहा कैसी ॥३०॥भिक्षेकरी गुप्त । झाला कोठे गेला । ओळख स्वामींची । देऊनीया ॥३१॥कपाशीला तेजी । पुन्हा आली नफा । प्रचंड जाहला । यादवास ॥३२॥
डॉक्टर कुंवर । राजारामभाऊ । जाई खामगांवा । नोकरीस ॥३३॥तेल्हा-यापासून । निघतां वाटेत । शेगांवी दर्शन । समाधीचे ॥३४॥एकदा प्रसाद । अव्हेरूनी गेला । मार्गच चुकला । अपरात्री ॥३५॥मनोमनी क्षमा । मागीतली तेव्हां । सहजचि आला । शेगांवात ॥३६॥प्रसाद घेऊनी । पुनश्च निघाला । मुक्कामी पोचला । व्यवस्थित ॥३७॥
भावसार ह्यांचा । एकच वर्षाचा । बाळ दिनकर । व्याधिग्रस्त ॥३८॥उपाय थकले । एकच कर्तव्य । समाधीचे द्वारी । ठेवीयेले ॥३९॥बाप रतनशाने । नवस बोलीला । पांच रुपयांचा । काकुळती ॥४०॥ना तरी मस्तक । फोडीन बोलला । चळवळ करी । बाळ तेव्हां ॥४१॥आधी निपचित । होता पडलेला । सजीव जाहली । गात्रे सारी ॥४२॥
उदाहरणांचा । नाही तुटवडा । रामचंद्रकन्या । चंद्रभागा ॥४३॥प्रसूती जवळ । असताना तिला । नवज्वरव्याधी । बाधली कीं ॥४४॥उपाय थकतां । पाटील पोरीस । तीर्थ नि अंगारा । देता झाला ॥४५॥पत्नीही पीडित । वातविकाराने । वेडीपिशी वागे । निरुपायें ॥४६॥रामचंद्र करी । सूचना तिजला । प्रदक्षिणा घाली । समाधीस ॥४७॥पतीची सूचना । मानीता विकार । कांही दिवसांत । बरा झाला ॥४८॥नवस फेडणे । व्हावें विधियुक्त । बाळाभाऊ यांचा । अधिकार ॥४९॥नंतर दृष्टांतें । नांदुरे गांवीचा । नारायण माळी । यांचेकडे ॥५०॥
नमो गजानना । अध्याय वीसावा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५१॥अध्याय २१नमो गजानना । आपल्या कृपेने । एकवीसाव्याची । सुरवात ॥१॥ 
स्वामी दिवंगत । तरीही चालूच । भक्तांची काळजी । वाहणेचे ॥२॥
मंदीर बांधता । मजूराचे हाती । दगड असतां । तोल गेला ॥३॥लागले रे काय । लोक विचारती । मजूर म्हणतो । मुळी नाही ॥४॥कोणीतरी मला । अल्गद धरीले । जमीनीवरती । ठेवीयेले ॥५॥स्वामीनीच माझा । केला प्रतिपाळ । कामात अपेश । नाही आले ॥६॥
राजस्थानामध्ये । जयपूर गांवी । बाईला सतावे । भूतबाधा ॥७॥दत्तात्रेय देती । स्वप्नात दृष्टांत । जाई शेगांवास । लाभदायी ॥८॥रामनवमीचा । मुहूर्त धरावा । पिशाच्चाची मुक्ति । होईल गे ॥९॥अश्मस्तंभ उभे । करायाचे काम । उत्सवाकारणे । थांबलेले ॥१०॥खांबास टेकूनी । होती बाई उभी । खांब सरकला । गर्दीमुळे ॥११॥खांबाची शिळाच । पडली तिजवर । कष्टाने लोकांनी । हटवीली ॥१२॥ऐसी जड शिळा । अंगावर येतां । जाहले असेल । तिचे काय ॥१३॥आश्चर्य ती होती । सुरक्षित परि । दणका पिशाच्चा । पत्थराचा ॥१४॥
नाईकनवरे । यांचेही मस्तकी । तुळई पडली । मंडपाची ॥१५॥जणूं हार कोणी । शिरी चढवीला । असेच गमले । त्याना तरी ॥१६॥
एकदा पाटील । रामचंद्रांकडे । भुकेला गोसावी । दारी आला ॥१७॥पाटील चाणाक्ष । ओळखीले स्वामी । भोजन सत्वर । वाढीयेले ॥१८॥दक्षिणा म्हणून । पांच रुप्ये दिले । गोसावी सांगतो । ही तो नको ॥१९॥मठात हिशेब । ठेवण्याचे काम । झाले पाहीजे तें । सचोटीने ॥२०॥सारा व्यवहार । नीट संभाळावा । सेवा तीच माझी । दक्षिणा बा ॥२१॥
जेथे जेथे माझे । उच्छिष्ट सांडले । द्रव्याचा वाहेल । पूर तिथे ॥२२॥
पुत्राचे गळ्यात । ताईत बांधला । पत्नीसही दिले । समाधान ॥२३॥सारे बजावूनी । निरोप घेतला । गोसावी पावला । अंतर्धान ॥२४॥
बत्तीस वर्षांचे । सदेह जीवन । आजही अखंड । कृपामय ॥२५॥ऐशा चरित्राचे । होवो पारायण । वाढो भक्तिभाव । समाधानें ॥२६॥सारे जग असो । सुखी निरामय । चरणी प्रार्थना । गजानना ॥२७॥
-o-O-o-
Categories: Learning Sanskrit

रक्षाबन्धनम् (Rakhi)

Learn Sanskrit - Mon, 08/07/2017 - 16:48

अद्य सायङ्काले अहं मम भार्यया सह तस्याः भ्रातुः गृहम् अगच्छम्। मम भार्यया स्वभ्रातरं रक्षाबन्धनं कृतम्। बन्धनं परं अस्माभिः भोजनं कृतम्। गृहं प्रत्यागम्य इदानीम् अहम् अवकरः विषये Four Corners इति दूरदर्शनकार्यक्रमं पश्यामि।

२०१७-०८-०७ सोमवासरः (2017-08-07 Monday)


Categories: Learning Sanskrit

कार्यं कृतम् (Did work)

Learn Sanskrit - Sun, 08/06/2017 - 16:36

अद्य मन्दिरे शङ्करपूजा आसीत्। शतशिवलिङ्गानि कल्पितानि पूजीतानि च। किन्तु मया किञ्चित् कार्यं कर्तव्यं तस्मात् अहं पूजायां भागं न अगृह्णाम्। मनसि खेदः अस्ति।

२०१७-०८-०६ रविवासरः (2017-08-06 Sunday)


Categories: Learning Sanskrit

क्त्वा इति सप्तमः प्रत्ययः (The seventh suffix ktvaa)

Learn Sanskrit - Sat, 08/05/2017 - 08:03

सौम्यामहाभागा संस्कृतवाक्यरचना-कृदन्ताः इति पाठ्यक्रमं पाठयति – http://www.sanskritfromhome.in/course/krdantas। तस्मिन् क्रमे तया षड्प्रत्ययाः पाठिताः। ते प्रत्ययाः सन्ति ल्युट्-अनीयर्-ण्वुल्-तुमुन्-तव्य-तृच् इति। यथा पठनम्, पठनीयम्, पाठकः, पठितुम्, पठितव्यम्, पठिता/पठित्री इति। अद्य सप्तदशे पाठे सा क्त्वा-प्रत्ययस्य पाठम् आरभत। सा क्त्वा-प्रत्ययस्य मनोहराणि उदाहराणि रामायणात् अददात्। तस्याः वर्गे व्याकरण-अध्यात्मयोः पाठः मिथः भवति।

२०१७-०८-०५ शनिवासरः (2017-08-05 Saturday)


Categories: Learning Sanskrit

वर्षति (Rains)

Learn Sanskrit - Fri, 08/04/2017 - 07:12

यदा अहं भारतवर्षे आसं तदा तत्र जलं वर्षति किन्तु अत्र केन्बरानगरे न वर्षति। यावत् अहम् अत्र आगच्छम् तावत् अत्र अनवरतं जलं वर्षति। भारते ग्रीष्मकालः अस्ति तस्मात् तत्र घर्मः बाधते किन्तु अत्र शीतकालः अस्ति तस्मात् वर्षया सह शैत्यं बाधते।

२०१७-०८-०४ शुक्रवासरः (2017-08-04 Friday)


Categories: Learning Sanskrit

अपि अयं पण्डितः? (Is this a Pundit)

Learn Sanskrit - Thu, 08/03/2017 - 15:54

अद्य एकस्य पण्डितस्य लेखः समाचारपत्रे प्रकाशितः http://indianexpress.com/article/opinion/columns/nitish-kumar-bihar-jdu-bjp-alliance-lalu-prasad-yadav-corruption-4779525/। लेखकः अस्ति मान्यवरः Ashutosh Varshney, Director, Centre for Contemporary South Asia, Sol Goldman Professor of International Studies and the Social Sciences, Watson Institute for International and Public Affairs, Brown University, USA.
मान्यवरः लिखति भारतस्य राजनितौ एका समस्या अस्ति that ideology has ceased to matter in Indian politics इति। तत् परं सः तस्याः समस्याः समाधनम् अपि ददाति। सः महान् पण्डितः अस्ति। बहुप्रचलितानि समाचारपत्राणि तस्य लेखान् प्रकाशयन्ति। सः एकस्मिन् विश्वविद्यालये निर्देशकपदे आरूढः अपि अस्ति। सः खलु महान् पण्डितः अस्ति इति अस्माभिः मन्तव्यम्।
पश्यतु तस्य पण्डितस्य समाधानम् – In the short run, this problem can be overcome only if the Opposition can credibly demonstrate that the BJP, too, is corrupt.
सः न कथयति काङ्ग्रेसदलेन भ्रष्टाचारः न कर्तव्यः। सः न कथयति लालूप्रसादेन भ्रष्टाचारः न कर्तव्यः। सः न काम् अपि सकारात्मकनितिं दर्शयति। स्मर्तव्यं सः आदर्शस्य अभावम् अस्ति इति परिदेवनं करोति। पश्यतु सः कीदृशम् आदर्शं स्थापयति। तस्य आदर्शः अस्ति विपक्षस्य निन्दा एव कर्तव्या किन्तु स्वस्य भ्रष्टाचारं न त्यक्तव्यम् इति।
चिन्तनीयम् अस्ति यदि अमेरिकादेशे एतादृशाः पण्डिताः सन्ति एतादृशाः परामर्शदातारः सन्ति तर्हि अपण्डितः कीदृशः भवेत् इति।

२०१७-०८-०३ गुरुवासरः (2017-08-03 Thursday)


Categories: Learning Sanskrit

क्रमादेशः कल्पितः (Created a program)

Learn Sanskrit - Wed, 08/02/2017 - 18:01

विद्युत-ऊर्जा-उत्पादन-यन्त्रस्य कर्षण-नियन्त्रणाय (voltage control) मया अद्य एकः क्रमादेशः कल्पितः।

२०१७-०८-०२ बुधवासरः (2017-08-02 Wednesday)


Categories: Learning Sanskrit

शरदयादवः लालायति (Sharada Yadav is Salivating)

Learn Sanskrit - Tue, 08/01/2017 - 13:38

आङ्ग्लदेशस्य राज्ञीम् निकषा किमपि राजबलं नास्ति ततः अपि सा राजते। कथम् एतत्? सा कौटिल्येन जनान् चीत्वा पुरस्करोति। सा यस्मात् जनान् चिनोति यस्मात् पुरस्करोति च तस्मात् ये जनाः पुरस्कारं न प्राप्नुवन्ति ते सदैव पुरस्कारस्य अभिलाषां धारयन्ति। ये जनाः पुरस्कारम् अप्राप्नुवन् ते सदैव राज्ञ्याः गुणान् स्तुवन्ति यतो हि राज्ञ्याः प्रकाशात् ते अपि भान्ति। अस्मात् कौटिल्यात् सा अद्यापि विराजते।

तथैव सोनियामहाभागा अपि विराजते। शरदयादवाय नितीश-भाजप-दलयोः प्रणयः न रोचते। कथम्? अस्मिन् भाचित्रे पश्यतु कस्मात् शरदवर्यः आत्मानं सोनियामाहाभागया सह उपविश्य धन्यं मन्यते इति। इदम् अद्य मया लब्धं भविष्यकाले किं प्राप्स्यामि इति सः स्वप्नं पश्यति लालायति च। सः सोनिया-राहुलाभ्यां वशीकृतः। सः किमपि अन्यं न पश्यति। यदा सः स्वप्नात् जागरिष्यति तदा सः ज्ञास्यति न तत्र सोनियामहाभागा न तत्र राहुलः केवलः वराकः शरदः।

२०१७-०८-०१ मङ्गलवासरः (2017-08-01 Tuesday)


Categories: Learning Sanskrit

किरातार्जुनीयम् प्रथमः सर्गः – अन्तर्जालशिक्षा

Learn Sanskrit - Sun, 07/30/2017 - 08:40

व्योमसंस्कृतपाठशालायाः जालपृष्ठे किरातार्जुनीयकाव्यस्य प्रथमसर्गस्य अन्तर्जालपाठाः उपलब्धाः । सम्प्रति तमिळभाषामाध्यमेन इमं महाकाव्यमध्येतुं शक्नुवन्ति तमिळभाषिणः। अध्यापिका विशालाक्षीवर्या अस्मै परोपकाराय अस्माकं धन्यवादानि पूर्णरूपेण अर्हतीति नात्र संशयः ।
http://www.sanskritfromhome.in/course/kiratarjuniyam-sarga1

२०१७-०७-२९ शनिवासरः (2017-07-29 Saturday)


Categories: Learning Sanskrit

दूरदर्शनयन्त्रं परिवर्तितम् (Changed the TV)

Learn Sanskrit - Sun, 07/23/2017 - 06:46

ह्यः वयम् अस्माकं वडोदरानगरस्य गृहे यत् दूरदर्शनयन्त्रम् आसीत् तस्य स्थाने नूतनं यन्त्रम् अक्रीणीम। किन्तु यन्त्रस्य स्थापना विलम्बेन अभवत् तस्मात् अहं दूरदर्शनेन प्रसारितं वार्तावली इति कार्यक्रमं तस्मिन् यन्त्रे द्रष्टुं न अशक्नवम्।

२०१७-०७-२३ रविवासरः (2017-07-23 Sunday)


Categories: Learning Sanskrit

कृदन्ताः (krt suffixes)

Learn Sanskrit - Sat, 07/22/2017 - 08:27

सौम्यावर्या संस्कृतवाक्यरचना-कृदन्ताः (http://www.sanskritfromhome.in/course/krdantas) इति पाठ्यक्रमम् अध्यापयति। पाठः शनिवासरे प्रातः सार्धपञ्चवादने प्रवर्तते। यदा अहं केन्बरानगरे अस्मि तदा अयं कालः मह्यम् अतीव अनुकूलः अस्ति यतो हि तत्र प्रातः दशवादनं वा एकादशवादनम् इति कालः भवति। अद्य अहं वडोदरानगरे अस्मि तस्मात् प्रातः सार्धपञ्चवादने कक्षायाम् आगच्छम्। अद्य मया ज्ञातं कथं सार्धपञ्चवादनं इति कष्टप्रदः कालः अस्ति। सौम्यावर्या न केवलं सार्धपञ्चवादने पाठम् आरभते किन्तु तस्य कालस्य पूर्वम् एव पाठम् अपि सज्जीकरोति। सा खलु धन्यवादार्हा अस्ति।

२०१७-०७-२२ शनिवासरः (2017-07-22 Saturday)


Categories: Learning Sanskrit

औस्ट्रेलियावृन्दं पराजितम् (Australia Defeated)

Learn Sanskrit - Fri, 07/21/2017 - 10:44

ह्यः भारतीयमहिलाफालकवृन्देन औस्ट्रेलियावृन्दं पराजितम्। मया पराजयाय शोचितव्यं अथवा जयाय हर्षितव्यम् इति न जानामि। यदा काश्चन् भारतीयनागरिकाः पाकिस्तानदेशेन भारतस्य पराजयम् आमनयन्ते तदा वयं तेभ्यः क्रुध्यामः। तस्मात् चिन्तयामि हर्षितव्यम् अथवा शोचितव्यम्।

२०१७-०७-२१ शुक्रवासरः (2017-07-21 Friday)


Categories: Learning Sanskrit

गीतामाध्यमेन संस्कृतम्

Learn Sanskrit - Fri, 07/21/2017 - 02:56

मम सहपाठीचरः शङ्करवर्यः गतत्रयवर्षेभ्यः भगवद्गीतां   शाङ्करसम्प्रदायप्रवेशव्याख्यामाध्यमेन पाठयति । सः सदैव माम् पृच्छति स्म – छात्राः कथं गीतापठनार्थं संस्कृतशिक्षां प्राप्नुवन्ति? अपि तदर्थं कोऽपि पुस्तकोऽस्ति?

ये हिन्दीभाषां न जानन्ति तेभ्यः प्रयोजनीयं पुस्तकमेकं मया दृष्टः।  अस्मिन् पुस्तके सर्वे दृष्टान्ताः गीतायाः हितोपदेशाद्वा उद्धृताः। अत्र पश्यतु –

http://amzn.to/2uf3e7I

२०१७-०७-२० गुरुवासरः (2017-07-20 Thursday)


Categories: Learning Sanskrit

रामनाथः (Ramnath)

Learn Sanskrit - Thu, 07/20/2017 - 23:17

रामनाथः अद्य भारतस्य राष्ट्रपतिः वृत्तः। सः प्रत्याशितेभ्यः मतेभ्यः अधिकानि मतानि लब्धवान्। अहं तस्य निर्वाचनाय प्रसन्नः अस्मि।

२०१७-०७-२० गुरुवासरः (2017-07-20 Thursday)


Categories: Learning Sanskrit

भोजनम् (Lunch)

Learn Sanskrit - Wed, 07/19/2017 - 23:01

अद्य अहं मम भार्यायाः मातृस्वसुः गृहं भोजनाय अगच्छत्। सा अतिस्वादूनि भोजनानि अपचत्। खादित्वा अहम् आनन्दम् अन्वभवम्।

(2017-07-19 Wednesday)


Categories: Learning Sanskrit

Pages

Subscribe to Sanskrit Central aggregator - Learning Sanskrit