Learning Sanskrit

गीतेचा सखोल अभ्यास - स्वाध्याय ५

Slez - Thu, 02/04/2010 - 07:41
स्वाध्याय ५ - धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ....
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः |मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ||१-१||
(१) अन्वय:- "सञ्जय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः मामकाः पाण्डवाः च किं अकुर्वत एव ?(२) सञ्जय = सञ्जय ह्या विशेषनामाचे सम्बोधन एकवचन.(३) सञ्जय हा राजे धृतराष्ट्र यांचा सारथी होता. युद्धामधे राजे तर जाणार नव्हते. तेव्हां सञ्जयाला तसं कांही काम नव्हतं. मग व्यासानी त्याला काम दिलं. त्याला अशी दिव्य दृष्टी दिली किं बसल्या जागीं युद्धांत सगळीकडे, कुठे, कुठे, काय चाललंय् तें तो पाहूं शकेल. आणि प्रत्यक्ष दिसत असलेल्या सगळ्याची इत्थंभूत हकीकत त्यानं राजाना सांगायची.(४) १९७२-७३ च्या सुमारास माझे एक स्नेही सकाळीसकाळी मला म्हणाले, "अभ्यंकर, मला पटायला लागलंय् कीं महाभारत खरंच प्रत्यक्ष घडलेलं आहे." म्हटलं, "गुप्ताजी, सुबह सुबह, यह क्यों बता रहे हो ?" तर म्हणाले, "यह जो टीव्ही हम देख रहे हैं, वही तो लगाया था, व्यासजीने सञ्जयके सामने । मजाभी देखिये, कि, सञ्जय जिनको कॉमेन्टरी बता रहे हैं, वे तो अंधे थे। उनको क्या मालूम कि, सञ्जयकी दिव्यदृष्टी मात्र एक टीव्ही है । और सञ्जयके सामने जो दृश्य दिखाई दे रहे थे, उनका प्रसारण ऐसी एन्टेनासे हो रहा था, जिसको युद्धके आखिर तक कोईभी बाधा नही होनी थी । अर्जुनजीके रथपर जो वायुसूत के चिन्हवाला ध्वज था, वही तो एन्टेना था । बस ऑडिओ ऑफ् रक्खा था । व्यासजीका पूरा सेटिंग पर्फेक्ट् था, है कि नहीं ?"(५) सारथ्याच्या भूमिकेचं पण खास महत्त्व असतं. विमानाच्या उड्डाणादरम्यान पायलट्ला कप्तान म्हणतात. सारथी चांगला हवा ह्याचं महत्त्व अर्जुनाला देखील माहीत होतं. म्हणूनच, त्यानं स्वतः श्रीकृष्णालाच सारथी बनण्याची विनंती केली. सारथ्याला, खास करून युद्धामध्ये कायम सतर्क चौफेर नजर ठेवावी लागते. सारथी गाफिल राहिला तर, संपलंच. सतर्क, चौफेर नजर हा चांगल्या सारथ्याचा स्वभावच बनलेला असला पाहिजे. अशा स्वभाववैशिष्ट्यामुळेंच व्यासानी सञ्जयाला कॉमेन्टेटर बनविलं असणार.(६) धर्मक्षेत्रे = धर्मक्षेत्र ह्या नामाचे सप्तमी विभक्ति एकवचन(७) धर्मक्षेत्र ह्या समासाचा विग्रह "धर्मस्य क्षेत्रम्". म्हणून षष्ठी तत्पुरुष. (८) धर्मस्य = धर्म ह्या पुल्लिंगी सामान्यनामाचे षष्ठी एकवचन.(९) धर्म = न्याय. म्हणून धर्माचे क्षेत्र म्हणजे जिथे धर्माचा, न्यायाचा निवाडा होईल, असे क्षेत्र. कुरुक्षेत्राची तशी महती होती, किं तिथं जी युद्धं झाली, त्या सर्वात न्यायी पक्षाचाच विजय झाला. कदाचित् कुरुक्षेत्राच्या ह्या अशा इतिहासामुळेच कौरव आणि पाण्डव यांच्यापैकी कुणाचा पक्ष न्यायी होता, तेंच ठरावें म्हणून युद्धासाठी कुरुक्षेत्राची निवड केली गेली.(१०) धर्म = यम. यम हा प्राण्यांचे प्राण हरण करतो. पण कुणाचे प्राण केव्हां हरण करायचे, ह्यामध्ये यम कधीही अन्याय करीत नाही. म्हणून यमाला न्यायदेवता म्हणून देखील मान्यता आहे. यम हा धर्मज्ञ आणि धर्मानुसार वागणारा देखील.(११) धर्म = युधिष्ठिर. हा कुन्तीपुत्र यमाच्या कृपेनेच झालेला होता. यमाप्रमाणेच तो न्यायप्रिय, तत्त्वचिंतक व सत्यवादी होता. म्हणूनच धर्मराज हें युधिष्ठिराचे दुसरे नांव देखील होते.(१२) क्षेत्रे = क्षेत्र ह्या नपुंसकलिंगी सामान्यनामाचे सप्तमी एकवचन. क्षेत्र शब्दाचा अर्थ, प्रदेश, बाजू(१३) धर्मक्षेत्र :- युद्धात दोन क्षेत्रे, दोन बाजू असतातच. एक बाजू एका सैन्याची, दुसरी दुस-या सैन्याची. एकीकडे युधिष्ठिर म्हणजे धर्मराज होते. ते ज्या बाजूला होते, तें धर्मक्षेत्र. ह्या अर्थाने धर्मक्षेत्र, हें विशेषनाम.(१४) धर्मक्षेत्र = "इथे न्यायाचा निवाडा होतो" अशी ज्या क्षेत्राची ख्याति होती, तें क्षेत्र. या अर्थाने कुरुक्षेत्र ह्या नामाचे विशेषण.(१५) कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्र ह्या ’अ’कारान्त नपुंसकलिंगी सामासिक विशेषनामाचे सप्तमी एकवचन. अर्थ, कुरुक्षेत्रावर(१६) कुरुक्षेत्र ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कुरूणां क्षेत्रम् = कुरुक्षेत्रम्, (तस्मिन्) षष्ठी तत्पुरुष.(१७) "तस्मिन्" असं सांगितलं कीं "कुरुक्षेत्र" ह्या सामासिक शब्दाचे सप्तमी एकवचन दर्शविले जाते.(१८) कुरूणाम् = कुरुः ह्या शब्दाचे षष्ठी बहुवचन. अर्थ, कुरूंचें. (१९) कुरुः = "कुरु"वंशाचा वंशज, कौरव. तसं तर पाण्डव सुद्धा कुरु वंशाचेच वंशज होते. पण राजे धृतराष्ट्र यांच्या मुलाना कौरव ही संज्ञा दिली गेली.(२०) कुरुक्षेत्र = त्या रणांगणात कौरवांसाठी जी बाजू दिली गेली होती तें क्षेत्र. विशेषनाम(२१) कुरुक्षेत्र = कुरु वंशजांच्या आधिपत्याखाली असलेलं क्षेत्र. विशेषनाम.(२२) समवेताः = समवेत ह्या विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा बहुवचन.(२३) समवेत = (सम् + अव + इ) = समवे (२ आ.) ह्या धातूचे कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण (क. भू. धा. वि.)(२४) सम् = मिळून, सर्वंकशपणे(२५) अव = खाली उदाहरणार्थ अवमान म्हणजे खाली मान, म्हणजेच अपमान, निंदा, नालस्ती(२६) इ = "इ" हा धातु (२ प.), (१ उ.) व (४ आ.) असा तीन गणांमध्ये चालतो. हा खुलासा स्वाध्याय ३ मध्ये "अध्याय" ह्या शब्दाच्या वेळी आलेला आहे. अर्थ, येणे, जाणे(२७) अव + इ = अवे = खाली येणे, खाली जाणे, अवतरणे, उतरणे(२८) समवे = मिळून खाली येणे,, एके जागी जमणे. (टीप :- खाली येणे, उतरणे, या अर्थाने हें एके जागी जमणें बहुधा कुठल्या भल्या कामासाठी जमणें असूं शकत नाही. इथें तर कौरव आणि पाण्डव युद्धासाठी जमले होते. अव या उपसर्गाचाच अर्थ मुळात नकारात्मक आहे.)(२९) युयुत्सवः = युयुत्सु ह्या इच्छार्थी विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. अर्थ मनात युद्धाची इच्छा असलेले.(३०) मामकाः = मामक ह्या विशेषणात्मक नामाचे प्रथमा बहुवचन. अर्थ माझे. (३१) नामाला "क" हा प्रत्यय लावल्याने शब्दाच्या अर्थाला लडिवाळपणा येतो, जसे बाल --> बालक. (३२) मम म्हणजे माझे हें विशेषण संबंधित नामाचे लिंग, वचन वेगळे असतील तेव्हांही समानपणे वापरता येते. मम वरून मामक हें विशेषणात्मक नाम केल्याने त्याचे बहुवचन वापरून माझे सारे हें अधिक स्पष्ट सांगता येते. अशा रीतीने, मामकाः = मम सर्वे(३३) पाण्डवाः = पाण्डव ह्या विशेषनामाचे प्रथमा बहुवचन. अर्थ पण्डूचे. किंबहुना पण्डूच्या संमतीने झालेले. राजा पण्डू मृगयेला गेला असताना त्याच्या हातून प्रणयक्रीडेत रमामाण असलेल्या हरिणाच्या जोडप्याला बाण लागतो. ते यक्ष आणि यक्षीण असतात. ते पण्डूला शाप देतात कीं "तूं स्त्रीबरोबर प्रणयक्रीडा करूं जाशील, तर तुला तत्काळ मरण येईल." ह्या शापामुळे पण्डूला संसारात रस उरला नाहीं. व राज्यकारभार धृतराष्ट्राकडे सोपवून त्याने वनवास पत्करला. त्याच्या दोन्ही राण्या कुंती व माद्री ह्याही त्याच्याबरोबर गेल्या. कुंतीला दुर्वास ऋषीनी दिलेल्या वराची माहिती तिने पण्डूला सांगितली व पण्डूला शाप असला तरी राज्याला पण्डूचे वारस असूं शकतील हें सांगितले व पण्डूच्या अनुमतीने युधिष्ठिर, भीम व अर्जुन ह्यांना अनुक्रमे यमदेवता, वायुदेवता व इन्द्रदेवता यांच्या कृपेने जन्म दिला. माद्रीने पण त्या मन्त्राने अश्विनीकुमारांच्या कृपेने नकुल व सहदेव याना जन्म दिला. अशा रीतीने, पण्डूच्या संमतीने जन्मलेले म्हणून पण्डूचे ते पाण्डव.(३४) च = आणि समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय.(३५) किम् = काय किम् ह्या प्रश्नार्थक सर्वनामाचे नपुंसकलिंगी द्वितीया एकवचन. ह्या वाक्यात किम् हा शब्द अकुर्वत ह्या क्रियापदाचे कर्म आहे. म्हणून किम् ह्या शब्दाची द्वितीया आहे.(३६) अकुर्वत = कृ (८ उ) ह्या धातूचे परस्मैपदी अनद्यतन भूतकाल तृतीय पुरुष बहुवचन. अर्थ "केले". (३७) अकुर्वत हा शब्द भूतकाळदर्शक आहे, हेंही विचारणीय आहे. एकंदरीने असा समज आहे, कीं सञ्जयाला व्यासानी दिव्यदृष्टी दिलेली होती. त्यामुळे युद्धक्षेत्रावर काय चालले आहे तें सर्व तो बसल्याजागी पाहूं शकत होता व धृतराष्टाना सांगूं शकत होता किंबहुना सांगत होता. पण इथे ’अकुर्वत’ हा शब्द भूतकाळदर्शक आहे. त्यावरून असं दिसतं कीं गीतोपदेशाचा प्रसंग सञ्जयानं धृतराष्ट्राना सांगण्यापूर्वी घडून गेलेला होता. यादृष्टीनं महाभारतातील संदर्भ बघितयावर लक्षात येतं कीं, भीष्मपितामह शरशय्येवर पडेपर्यंत सञ्जय युद्धक्षेत्रावर जें जें घडत होतं तें स्वतः तिथें हजर राहून बघत होता. किंबहुना व्यासानी त्याला दिलेली दिव्यदृष्टि म्हणजे एक व्हीडियो कॅमेरा होता, असं म्हणता येईल. सञ्जय हा जातिवंत सारथी तर होताच. त्यामुळं स्वतःचा बचाव करत सर्वत्र संचार कसा करायचा, हें कौशल्य त्याच्याकडे होतंच. म्हणूनच तर युद्धक्षेत्रावर जिथं जिथं जें जें महत्त्वाचं घडत होतं, त्या सगळ्याचं निःपक्षपातीपणें, मारल्या जाणा-या कुणाबद्दलही हर्ष-खेद न ठेवतां सर्वंकष चित्रीकरण करायचं कामच व्यासानी सञ्जयाला दिलेलं होतं. भीष्मपितामहांच्या पतनानंतर सञ्जय राजवाड्यावर आला, तेव्हां व्हीडियोप्लेअर व टीव्हीची व्यवस्थाही व्यासानी करून दिली. आणि "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.." ह्या धृतराष्ट्रांच्या प्रश्नापासून भगवद्गीतेला सुरवात झाली.(३८) एव = अव्यय. धृतराष्ट्रानी "मामक आणि पाण्डव ह्यांनी काय काय केलं बरं?" असा जो प्रश्न विचारला, त्या प्रश्नातला, "..बरं?" हा भाव व्यतीत करणारं अव्यय.(३९) सञ्जय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः मामकाः पाण्डवाः च किं अकुर्वत एव ? या संपूर्ण वाक्याचा साकल्यानं अर्थ -धर्माच्या बाजूच्या आणि कुरूंच्या बाजूच्या रणक्षेत्रावर, (किंवा ज्याची धर्मक्षेत्र म्हणून ख्याती आहे अशा कुरुक्षेत्रावर) युद्ध करण्याच्या हिरीरीने माझे आणि पण्डूचे (असे जे सर्व तिथे) उतरले, त्यांनी, सञ्जया, काय काय केलं बरं?(४०) "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" ह्या वाक्यांशाचं गांधीजीनी त्यांच्या गीताबोध ह्या पुस्तिकेत खूप सुंदर विवेचन मांडलं आहे. ते म्हणतात ..कुरुक्षेत्रावरील लढाई ही केवळ एक निमित्त आहे. अथवा असं म्हणूं कीं, खरं कुरुक्षेत्र तर आपलं शरीरच होय. आपलं शरीर कुरुक्षेत्र पण आहे आणि धर्मक्षेत्र पण आहे. आपण त्याला ईश्वराचं निवासस्थान मानूं आणि त्याचे व्यवहार तशा जाणीवेने करूं, तर तें धर्मक्षेत्र असेल. ह्या शरीररूपी क्षेत्रावर नेहमीच कांही ना कांही लढाई चालूंच असते. आणि ह्या लढाईचं बहुतांशी कारण "हें माझं, हें तुझं" ह्या विवादातूनच होत असते. स्वजन-परजन ह्या भेदातून ही लढाई होत असते. म्हणूनच भगवंतानी अर्जुनाला हेंच सांगितलं कीं, सा-या अधर्माचं मूळ रागद्वेष ही आहेत. माझं म्हटलं कीं राग (अनुराग) उत्पन्न होतो. दुस-याचं म्हटलं कीं द्वेष उत्पन्न होतो, वैरभाव उत्पन्न होतो. (कुरुक्षेत्र घडतं).."
Categories: Learning Sanskrit

गीतेचा सखोल अभ्यास - स्वाध्याय ४

Slez - Thu, 02/04/2010 - 07:37
स्वाध्याय ४ - धृतराष्ट्र उवाच |
(१) धृतराष्ट्र उवाच = धृतराष्ट्रः उवाच । (२) धृतराष्ट्रः = धृतराष्ट्र ह्या अकारान्त पुल्लिंगी नामाचे प्रथमा विभक्तीचे एकवचनी रूप.(३) महाभारत युद्धाचे वेळी हस्तिनापूर साम्राज्याचे राजे. खरं तर, शंतनूनंतर भीष्मानी दिलेल्या वचनानुसार त्यानी गादीवरील हक्क सोडल्याने शंतनू-सत्यवती ह्यांचा पुत्र विचित्रवीर्य ह्याला गादीवर बसविण्यात आले. विचित्रवीर्य हा वयाने खूपच लहान होता. पण गादीला नंतरही वारस असावा म्हणून भीष्मानी काशीच्या राजाच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन्ही कन्याना त्यांच्या स्वयंवर मंडपातून अपहरण करून आणले. थोरल्या अंबेचे शल्यावर प्रेम होते. म्हणून तिला शल्याकडे पाठविण्यात आले. पण भीष्मानी तिचे अपहरण केले होते म्हणून शल्याने तिचा स्वीकार केला नाही. विचित्रवीर्याच्या अकाली मृत्यूमुळे गादीला वारस नव्हताच. तेव्हां सत्यवतीच्या संमतीने भीष्मानी सत्यवतीचे पराशरपुत्र वेदव्यास यांना पाचारण केले. त्यांनी अंबिका, अंबालिका व एक दासी यांना गर्भदान दिले व धृतराष्ट्र, पाण्डु आणि विदुर यांचा जन्म झाला. धृतराष्ट्र जन्मतः आंधळे होते. म्हणून पाण्डूला गादीवर बसविण्यात आले. पण एकदा शिकारीला गेल्यावेळी पाण्डूच्या हातून प्रणयक्रीडेत मग्न असलेल्या हरिणयुगुलाला बाण मारला गेला. त्या युगुलाने दिलेल्या शापामुळे पाण्डूला विरक्ती आली व राज्यकारभार धृतराष्टाकडे सोपवून पाण्डु, कुन्ती व माद्रीसह वनवासास गेला. तेव्हापासून धृतराष्ट्रच राजा होते.(४) धृतराष्ट्रः = ह्या शब्दाचा "धृतं राष्ट्रं येन सः" असा समासविग्रह पण होऊं शकतो. ह्या तृतीया बहुव्रीहि समासानुसार धृतराष्ट्र ह्या शब्दाचा "ज्याने राज्याची धुरा सांभाळली" असा अर्थ बनतो. तो देखील योग्यच ठरतो.(५) धृतराष्ट्रः = ह्या शब्दाचा "धृतः राष्ट्रेण" असा समासविग्रह पण होऊं शकतो. ह्या तृतीया तत्पुरुष समासानुसार धृतराष्ट्र ह्या शब्दाचा "(आंधळा असूनही) राष्ट्राने धारण केले, राजा म्हणून मान्य केले", असा अर्थ बनतो. तो देखील योग्यच ठरतो.(६) उवाच = वच् (२ प. वक्ति, उक्त) (टीप :- कोणत्याही धातूबद्दल महत्त्वाची ओळख म्हणून (अ) मूळ धातु (ब) गण (क) पद (ड) वर्तमानकाळ तृतीय पुरुषी एकवचनाचे रूप (इ) कर्मणि भूतकालवाचक विशेषण, ह्या गोष्टी दिल्या जातात.) उवाच हें वच् चें परोक्षभूतकाळ तृतीय पुरुषी एकवचनाचे रूप. अर्थ, उवाच = म्हणाला, - ली, - ले.(७) धृतराष्ट्रः उवाच ह्या सम्पूर्ण वाक्याचा अर्थ, धृतराष्ट्र म्हणाले.
Categories: Learning Sanskrit

गीतेचा सखोल अभ्यास - स्वाध्याय 3

Slez - Thu, 02/04/2010 - 07:35
स्वाध्याय ३ - अथ प्रथमोऽध्यायः | (१) अथ = स्वाध्याय १ च्या वेळी ह्या शब्दाचे विवेचन करताना आपट्यांचा शब्दकोश पहायचा राहिला. आपट्यांचा शब्दकोश म्हणजे एक अफलातून चीज आहे. "अथ" बद्दल तिथं म्हटलंय् किं ब्रम्हाच्या कंठातून जे दोन महत्त्वाचे उद्गार निघाले, ते म्हणजे ॐ आणि अथ. म्हणून दोन्ही उद्गाराना मंगलकारी मानलेलं आहे.(२) प्रथमः = प्रथम ह्या अनुक्रमवाचक संख्याविशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा विभक्ति एकवचन. अर्थ, पहिला.(३) अध्यायः = (१) अधि + इ या धातूपासून बनलेल्या पुल्लिंगी सामान्यनामाचे प्रथमा विभक्ति एकवचन. अर्थ, अभ्यासाचा, समजून घेण्याचा, शिकण्याचा भाग, पाठ. (४) "इ" हा धातु (२ प.), (१ उ.) व (४ आ.) असा तीन गणांमध्ये चालतो. "अधि" ह्या उपसर्गाने सुद्धा "अधि + इ" हा धातु (१ प.) व (१ आ.) असा दोन गणामध्ये चालतो. तरी पण शिकणे, अभ्यासणे, ह्या अर्थाने तो (१ आ., अधीते) असाच वापरला जातो.(५) "इ" धातूवरून अयनम् किंवा आयः (विरुद्धार्थी व्ययः) अशी देखील नामें बनतात. आयः म्हणजे आलेला, आपला झालेला.(६) "अधि" हा उपसर्ग स्वामित्वदर्शक आहे, जसें "अधिकार". (७) "य" हा धातूला लागणारा प्रत्यय सुद्धा आहे. ह्या प्रत्ययानें विधेयकाचा म्हणजे करण्याजोगा असा अर्थ प्राप्त होतो. अधिकार प्राप्त होईल अशा रीतीने जो आत्मगत करायचा तो अध्याय. जो अभ्यास आपल्याला यावा आणि ज्या अभ्यासावर आपलं स्वामित्व व्हावं, तसा पाठ म्हणजे अध्याय. (८) अथ प्रथमोऽध्यायः | ह्या सम्पूर्ण वाक्याचा अर्थ - इथे अभ्यासाचा पहिला पाठ सुरूं होतो.
Categories: Learning Sanskrit

गीतेचा सखोल अभ्यास - स्वाध्याय २

Slez - Thu, 02/04/2010 - 07:31
स्वाध्याय २ - ||ॐ श्रीपरमात्मने नमः ||
ॐ म्हणजे एकाक्षर ब्रम्ह. यालाच प्रणव असं पण म्हणतात. तो प्राणाचा, जीवसृष्टीचा संकेत आहे. हा एक उद् घोष आहे. कोणत्याही कार्यारंभी करायचा उद् घोष. सारं वातावरण पावन पुनीत करायचं सामर्थ्य यात असतं. तसं तें व्हावं, रहावं म्हणून हा उद् घोष करायचा. असंही म्हणतात कीं विश्वाच्या निर्मितीच्या वेळी हाच ॐ कार नाद सारं विश्व व्यापून राहिला. आजचे शास्त्रज्ञ ज्याला "बिग् बॅङ्ग" म्हणतात, कदाचित् तेंच ॐ काराची महती मांडणा-या ऋषीमुनीना अभिप्रेत होतं. ॐ काराच्या उद् घोषानं त्या विश्वनिर्मितीच्या वेळच्या ॐकार नादाशी केव्हांही समन्वय "रेझोनन्स" साधता येतो. अशा रेझोनन्स निशी सुरूं केलेल्या कार्यावर वातावरणातील कुठल्याही विपरीत शक्तींची बाधा होऊं शकत नाहीं. तितक्या निष्ठेनं, तितक्या श्रद्धेनं, तितक्या एकाग्रतेनं, तितक्या ताकदीनं ॐ काराचा उद् घोष करायचा आणि सुरवात करायची. मग सगळं ठीकच होणार ह्याविषयी निश्चिंत रहायचं.
श्रीपरमात्मने नमः ।हें नमन वाक्यच आहे, असं वाटण्याइतपत अशी ही नमनं आपल्या संवयीची झाली आहेत. पण इथं क्रियापद तर दिसत नाही. तेव्हां "अस्तु" असं क्रियापद घेऊन हें वाक्य पूर्ण करावं. म्हणजे श्रीपरमात्मने नमः (अस्तु) । असं वाक्य. अर्थात् नमन करणारा कर्ता आपण स्वतः. तेव्हां संपूर्ण वाक्य, श्रीपरमात्मने मम नमः अस्तु ।
श्रीपरमात्मने = (१) श्रीपरमात्मन् ह्या शब्दाचे चतुर्थी एकवचन. ज्याला "नमः" म्हणायचं, त्याची चतुर्थी वापरायची हा नियम आहे.(२) श्रीपरमात्मन् ह्या सामासिक शब्दात तीन पदें आहेत श्री + परम + आत्मन् ।(३) आधी दुस-या आणि तिस-या पदांचा मिळून म्हणजेच "परम + आत्मन्" मिळून "परमः आत्मा = परमात्मा" असा विशेषणपूर्वपदी कर्मधारय घ्यायचा.(४) मग "श्रीयुतः परमात्मा" असा मध्यमपदलोपी कर्मधारय घ्यायचा.(५) श्रीयुतः = श्रिया युतः म्हणजे "श्री"नें संपन्न तृतीया तत्पुरुष(७) श्रिया हें "श्री" ह्या स्त्रीलिंगी नामाचे तृतीया विभक्ति एकवचन(८) युतः हें यु ह्या द्वितीय गणाच्या परस्मैपदी धातूचे (२ प.) कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. अर्थ (८-१) युत = जोडलेले. म्हणून श्रीयुत = "श्री"शी जोडलेले (८-२) युत = संपन्न. म्हणून श्रीयुत = "श्री"नें संपन्न(९) परमः = "परम" ह्या विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन. अर्थ, ज्याहून मोठा, ज्याहून श्रेष्ठ, दुसरा, नाही असा. इथें परम ह्या शब्दाची व्युत्पत्ति पर = दुसरा. आणि "म" हा नकारात्मक प्रत्यय. परम म्हणजे (असा) दुसरा नाही, ह्यासम हाच(१०) सर्वसामान्यपणें कोणत्या तरी इष्टदेवतेला वंदन सांगून सुरवात करायची. श्रीरामरक्षेची सुरवात "श्रीगणेशाय नमः" अशी होते. इथे संवादामध्ये स्वतः श्रीकृष्ण आहेत. तेव्हां श्रीपरमात्म्याचंच देवत्व मानून, त्याला वंदन करून व्यासांनी श्रीमद्भगवद्गीतेची सुरवात केलेली आहे.(११) मम = अस्मद् ह्या प्रथमपुरुषी सर्वनामाचे षष्ठी एकवचन. अर्थ "माझा". अस्मद् आणि युष्मद् या प्रथमपुरुषी आणि द्वितीयपुरुषी सर्वनामांना लिंगभेद नाहीं. त्यामुळे त्यांची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी रूपें एकच आहेत.(१२) नमः = नम ह्या पुल्लिंगी नामाचे प्रथमा विभक्ति एकवचन. अर्थ, नमस्कार(१३) अस्तु = हें ह्या वाक्याचे क्रियापद अध्याहृत (म्हणजे, गुप्त किंवा समजून घ्यायचे) आहे. अस् ह्या द्वितीय गणाच्या परस्मैपदी धातूचे (२ प.) आज्ञार्थ तृतीय पुरुष एकवचन. अर्थ "असो"(१४) श्रीपरमात्मने मम नमः अस्तु । ह्या संपूर्ण वाक्याचा अर्थ श्रीने संपन्न, ह्यासारखा दुसरा नाही अशा श्रीपरमात्म्याला माझा नमस्कार असो.
Categories: Learning Sanskrit

गीतेचा सखोल अभ्यास - स्वाध्याय १

Slez - Tue, 02/02/2010 - 22:11
||अथ श्रीमद्भगवद्गीता ||
हा गीतेचा सखोल अभ्यास करण्याचा, स्वाध्यायाचा उपक्रम आहे. सखोल अभ्यास म्हणजे कसा, त्याचें विवेचन करण्याची जरूर नाहीं. सुरूंच होतोय् स्वाध्याय, हा असा -->
स्वाध्याय १अथ श्रीमद्भगवद्गीता ।
अथ = आतां सुरवात होते. ’अथ’ हा शब्द अव्यय (बदल न होणारा) आहे. हा शब्द अव्यय असला तरी, "आतां सुरवात होते", ह्या अर्थाने तो क्रियापदाचे काम करतो. म्हणून "अथ श्रीमद्भगवद्गीता" हें संपूर्ण वाक्य आहे. अथ ह्या शब्दानंतर, ज्याची सुरवात होते, त्याची प्रथमा विभक्ती असते.
श्रीमद्भगवद्गीता = (१) ह्या सामासिक शब्दांत तीन पदें आहेत, श्रीमत् + भगवत् + गीता । (२) पहिली दोन पदे मिळून श्रीमद्भगवत् हा सामासिक शब्द मानावा. त्याचा विग्रह "श्रीमान् भगवान्" असा. त्यामुळे विशेषण हे पूर्वपद असणारा कर्मधारय समास. किंवा(२ अ) श्रीमत् च भगवत् च = श्रीमद्भगवत् असा समाहार द्वंद्व (३) श्रीमान् = श्रीमत् ह्या "मत्"-प्रत्ययान्त विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन. "श्री" ह्या स्त्रीलिंगी नामाला "मत्" हा प्रत्यय लागून श्रीमत् हें विशेषण तयार झाले. (४) श्री = ऐश्वर्य, वैभव, सर्वशक्तिमानता अशा सर्व दैवी गुणांचा समुच्चय. सगळ्याच देवांचे ठायी अशी "श्री" असते. म्हणून सर्व देवांच्या नांवाआधी "श्री" ही उपाधि जोडली जाते. किंबहुना देवाचे नांव लिहिताना, देवाच्या दैवत्वाचा आदर राखावा. म्हणून नेहमी देवाच्या नांवाचा उल्लेख "श्री" ही उपाधि जोडूनच करावा, हा संकेत आहे. उदाहरणार्थ नुसतं गणेश न म्हणतां "श्रीगणेश" म्हणावं. (४) भगवान् = "भगवत्" ह्या "वत्"-प्रत्ययान्त विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन. "भग" ह्या पुल्लिंगी नामाला "वत्" हा प्रत्यय लागून "भगवत्" हें विशेषण तयार झाले. पण भगवान् हा शब्द विशेषण असला तरी तो नाम म्हणूनच रूढ झालेला आहे. म्हणून श्रीमद्भगवत् हा सामासिक शब्द "श्रीमान् भगवान्" असा विशेषण हे पूर्वपद असणारा कर्मधारय समास असा विग्रह ग्राह्य होतो. (५) भग ह्या शब्दाचे आपट्यांच्या संस्कृत-इंग्रजी शब्दकोशात १८ अर्थ दिले आहेत !!(६) भग = व्रण. गौतम ऋषी स्नानाला गेले असताना, गौतमपत्नी अहिल्या पर्णकुटीत एकटी असताना, इन्द्रदेव पर्णकुटीत गौतमांच्या रूपात दाखल झाले. तें गौतमांना त्यांच्या तपःसामर्थ्यामुळें लगेचच समजले. त्यांच्या शापाने इन्द्राच्या तोंडावर व्रण उठले व तो कायमचा "भगवान्" झाला. अहिल्या शिळा झाली. पुढें श्रीरामावतारामध्यें श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला. पण इन्द्र मात्र "भगवान्"च राहिला.(६) भग = भक्त. "भञ्ज्" किंवा "भज्" ह्या धातूंपासून तयार झालेले नाम. भक्त हें खरं तर, ह्या दोन्ही धातूंचें कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. शब्दाची जात म्हणून "भक्त" हें विशेषण असलें, तरी त्याचा नाम म्हणून वापर रूढ झाला आहे. ज्याचे भक्त असतात, जो भक्ति घडवितो, तो भगवान्.(७) भग = तेज, आभा. म्हणून भगवान् म्हणजे तेजःपुंज. जो तेजोमय आहे, ज्याच्याभोवती तेजोवलय आहे तो भगवान्. (८) वत् आणि मत् = हे दोन्ही प्रत्यय नामाला लागले की त्याचे विशेषण बनते. दोन्ही प्रत्यय "नें युक्त" असा अर्थ प्रदान करतात. पण वत् या प्रत्ययाचा अर्थ "च्या सारखा" असाही होतो. जसें मृतवत् म्हणजे मेल्यासारखा. बुद्धि ह्या शब्दाला वत् आणि मत् हे दोन्ही प्रत्यय लागून बुद्धिमान् आणि बुद्धिवान् असे समानार्थी शब्द बनतात. पण हें अपवादात्मक उदाहरणच असेल. एरव्ही श्रीवत् किंवा भगमत् हे शब्द कानाला सुद्धा बरोबर वाटत नाहीत. त्यामुळे कोणत्या नामाला कोणता प्रत्यय वापरावा याच्यामागे कानाला बरे वाटले पाहिजे हाही विचार दिसतो.(९) श्रीमद्भगवत् हा समास आणि तिसरे पद "गीता", मिळून श्रीमद्भगवद्गीता ह्या सामासिक शब्दाचा विग्रह "श्रीमद्भगवता गीता". (९) श्रीमद्भगवता हें श्रीमद्भगवत् ह्या नामाचें, खरें तर विशेषणाचें, पुल्लिंगी तृतीया विभक्ति एकवचन, अर्थ श्रीमद्भगवान् ह्यांनी. (९) गीता = गै ह्या प्रथमगण परस्मैपदी (१ प.) धातूच्या कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणाचे स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ति एकवचन. अर्थ गायलेली.(१०) "श्रीमद्भगवद्गीता" हा तृतीया तत्पुरुष समास. त्याचा विग्रह "श्रीमद्भगवता गीता". म्हणून "श्रीमद्भगवद्गीता" ह्या शब्दाचा अर्थ श्रीमद्भगवानांनी गायलेली, ह्या अर्थानुसार "श्रीमद्भगवद्गीता" हें विशेषण आहे. आणि तें स्त्रीलिंगी आहे. ज्या नामाचें हें विशेषण आहे, तें स्त्रीलिंगी नाम कोणतें हा साहजिक प्रश्न आहे. ह्याचा खुलासा, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु" हा जो उल्लेख असतो तिथें मिळतो. "उपनिषत्" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. म्हणून त्याचे विशेषणही स्त्रीलिंगीच असायला हवें. म्हणून "श्रीमद्भगवद्गीता" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. आपण "गीता" "गीता" म्हणतो, तें इतकं रूढ झालेलं आहे, कीं त्याचा उल्लेख स्त्रीलिंगी कां अशी शंकाही मनांत येत नाही. एरव्ही एक काव्य किंवा गीत म्हणून त्याचा उल्लेख नपुंसकलिंगी असायला हवा होता. असो.(११) "श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु" असा उल्लेख करून व्यासानी गीतेच्या प्रत्येक अध्यायाला उपनिषदांचा दर्जा देऊन टाकला आहे. "श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु" इथें दोन्ही शब्द बहुवचनाचे आहेत. म्हणजे, प्रत्येक अध्याय, एकेक उपनिषद. ह्याचें अधिक विवेचन पहिल्या अध्यायाच्या शेवटी हा उल्लेख येईलच. त्यावेळी करूं.(१२) तसं तर गीता ही स्वतंत्र रचना नव्हे. महाभारताच्या भीष्मपर्वात ती गोवलेली आहे. भीष्मपर्व म्हणजे युद्धामध्ये जेव्हां भीष्मपितामह कौरवांचे सेनानी होते, तो काल. भीष्मपर्वातील १२२ अध्यायापैकी अध्याय २५ ते ४२ म्हणजेच गीतेचे अध्याय १ ते १८.
Categories: Learning Sanskrit

Download the Pre board 2 papers!

PRE BOARD 2

For the Bal Bharatians: You can download the Pre Board 2 papers from here. its in the Pdf format.

Mukund


Categories: Learning Sanskrit

Happy Youth Day!

अद्य राष्ट्रीय युवा दिवसः अस्ति। अस्मिन् दिवसे एव १८६३ वर्षे स्वामिनः विवेकानन्दस्य जन्म अभवत्। तम् महात्मनम् मम शतम् शतम् प्रणामः।

Today is National youth Day. Swamiji was born on this date in 1863 AD.

Swami Vivekananda  (January 12, 1863–July 4, 1902), born Narendranath Dutta is the chief disciple of the 19th century mystic Sri Ramakrishna Paramahamsa and the founder of Ramakrishna Mission. He is considered a key figure in the introduction of Vedanta and Yoga in EuropeAmerica and is also credited with raising interfaith awareness, bringing Hinduism to the status of a world religion during the end of the 19th century.revival of Hinduism in modern India. He is best known for his inspiring speech beginning with “sisters and brothers of America”, through which he introduced Hinduism at the Parliament of the World’s Religions at Chicago in 1893.


Categories: Learning Sanskrit

Happy Birth Day to Swami Vivekananda!!

Shat Shat Naman

शत् शत् नमन

१८६३ में जन्मे एक महात्मा
जिन्होंने की विश्व शांति की स्थापना
सप्तर्षि मंडल के ऋषि ने लिया बालक का अवतार
जिससे नर-नारी का हुआ पूर्ण उद्धार

जानते हैं नरेन्द्र था यह बालक
जो बना विश्व का प्रतिपालक
सबमें थी इसकी रूचि
चाहे हो पढाई कुश्ती या तैराकी
संगीत में माहिर होने पर भी
बिताया इसने अपना जीवन एकाकी

रामकृष्ण के स्सनिध्य में
बालक पला बढ़ा
मुख से प्रेम वाणी सुनकर
इसका चरित्र परिमार्जित हुआ

श्री रामकृष्ण मिशन की स्थापना पर
सबमें थी उमंग
बालक नरेन्द्र से बने ये स्वामी विवेकानंद
नर-नारी की सेवा
यही था इनका नारा
चले जिसपर यह विश्व सारा

परन्तु अल्पायु में ही समय ने अपनी दिशा मोड़ी
उसपार उड़ चले स्वामी जन जन की संगती छोड़ी
भुला न पायेंगे उस नक्षत्र को कभी
भारत क्या जग्वासी सभी

तो आइये करें उस स्वामी को हम
!!शत् शत्  नमन!!
!!!!शत् शत्  नमन!!!!

Preachings of Swami Vivekananda

“Arise! Awake! And stop not till the goal is reached!”
-swami Vivekananda

“Each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity within, by controlling nature, external and internal. Do this either by work, or worship, or psychic control, or philosophy – by one, or more, or all of these – and be free. This is the whole of religion. Doctrines, or dogmas, or rituals, or books, or temples, or forms, are but secondary details.”
-swami Vivekananda

“Look upon every man, woman, and everyone as God. You cannot help anyone, you can only serve; serve the children of the Lord, serve the Lord Himself, if you have the privilege.”
-swami Vivekananda

“The Vedanta recognizes no sin it only recognizes error. And the greatest error, says the Vedanta is to say that you are weak, that you are a sinner, a miserable creature, and that you have no power and you cannot do this and that.”
-swami Vivekananda

“You cannot believe in God until you believe in yourself.”
-swami Vivekananda

Shat Shat Naman

-Mukund Marodia


Categories: Learning Sanskrit

Give Articles! Benefit of All!

Namaskar!

All the revered blog readers are requested to give Articles etc. in Sanskrit for the Blog.You can mail them to sanskritforall@gmail.com and I’ll post them with your name. You can send any article which has been written by you or anything related to Sanskrit which you find in any Magazine etc. to get them posted on the blog.

This would enrich all of us and would even help in the continuity of the Blog.

Tree of Knowledge

The Tree of Knowledge-Help it Grow

Help it Grow!!!!!

Signing off

Mukund


Categories: Learning Sanskrit

Went for National level ‘Know India Quiz competition’ to Udaipur!

अहम् प्रथमजन्वरीतः चतुर्जन्वरीमासात् उदयपुरम् अगच्छत्। तत्र मया मम सहपाठिना सह सामान्यज्ञानस्य प्रतियोगितायै गतम्। इयम् प्रतियोगिता ‘अखिल-भारतीय-भारत-को-जानो प्रतियोगिता ‘ नाम्ना विख्याता। भारत-विकासपरिषदेन सम्चालिता इयम् प्रतियोगिता प्रतिभागिनाम् भारतस्य ज्ञानम् निरीक्षितम्। मम दलम् किञ्चित अपि स्थानम् न प्राप्तम्। परम् अहम् हताशः न अभवत् यतः अहम् अजानीम् यत् मया अधिकः परिश्रमः न कृतः। आगतवर्षे अहम् अस्यै प्रतियोगितायै परिश्रमः करिष्यामि।

(We went there from 1-4 January, but didn’t win due to less preparation. But we tried our best. Next year we aim to get the National Trophy.)

Content with the Participation Certificates.....


Categories: Learning Sanskrit

दशाधिकद्वीसहस्रम्वर्षस्य शुभकामनाः ! (Happy New Year 2010!!)

!!नवप्रभातस्य किरणानाम् स्पन्दनं ,नववर्षः तव शुभम् अभिनन्दनम् !!

अद्य नव-वर्षः प्रारंभः अभवत्। नव-दशकः नव-वर्षः च आरंभः जायेते। यथा एव घटिकायाम् द्वादशवादनम् अभवत् तथा एव सर्वे प्रसन्नाः अभवन्। नव-वर्षः नवजीवनस्य प्रतीकः वर्तते। अनेके जनाः नववर्षस्य प्रथमम् दिवसम् संकल्पम् कुर्वन्ति। ते स्वसंकल्पस्य जीवनपर्यन्त पालनम् कुर्वन्ति। मया एव अद्य संकल्पः कृतः यत् अहम् प्रतिदिनम् श्रीमद्भग्वद्गीतायाः पाठम् करिष्यामि।

सर्वान् नववर्षस्य विपुलाः शुभकामनाः !!!!

Happy New Year 2010

-Mukund


Categories: Learning Sanskrit

पाउलें चालती शिरडीची वाट !!

Slez - Thu, 12/31/2009 - 02:21
पाउलें चालती शिरडीची वाट !!मुंबई ते शिर्डी २२ नोव्हेंबर २००९ ते २९ नोव्हेंबर २००९श्री साई-श्रद्धा पदयात्रिक सेवा मंडळ, गोराई, बोरीवली (पश्चिम) यांच्याबरोबर केलेल्या पदयात्रेचेस्वानुभव-निवेदन सौ. सरस्वती अभ्यंकर, दिंडोशी, मुंबई
खरं तर, या पदयात्रिक मंडळाच्या पदयात्रेबरोबर २००७ साली आम्ही साऊळ विहिरीपासून ते खंडोबाचे मंदिरात पालखी नाच व नंतर समाधीमध्ये साई-दर्शन हा छोटासा अनुभव घेतलेला होता. तेव्हांपासून मुंबई ते शिर्डी अशी संपूर्ण पदयात्रा हा काय अनुभव असतो, तो घ्यावा असा विचार तेव्हांपासूनच मनांत घोळत होता. गेल्या वर्षी मुक्ता पण (आव्हाड)सरांच्याबरोबर पदयात्रा करून आलेली होती. यंदाही ती दोघं जाणारच होती. त्यामुळं मोठ्या विश्वासाची सोबत होती. एकंदरीनं यंदा आपण पण जायचंच असा हिय्याच केला, असं म्हणायला हरकत नाहीं. इतके सगळे जण मिळून जातात, त्यांच्याबरोबर जायचं, असं तें इतकं सोपं असणार नव्हतं, याची कांहीशी धास्तीही मनात होती. शिवाय आतां वयाची साठी उलटून गेल्यामुळे कसं काय झेपेल, ही मोठी शंका होतीच. मग असंही मनांत आलं, कीं झेपायचं असेल, तर आत्तांच झेपेल.
दस-याच्या निमित्तानं हणजे २८ सप्टेंबर २००९ दिवशी सरांनी साईंची चरणपूजा त्यांच्या घरीच ठेवली होती. संध्याकाळी आरती-प्रसादाला मंडळाचे संस्थापक श्री. गुरुनाथ गाड स्वतः आले होते. सरानी आम्हाला सांगितलंच होतं, कीं श्री. गाड यांच्याशी ओळख होणं महत्त्वाचं आहे. नुसतीच ओळख नव्हे, तर ते कांहीं मोलाचे मार्गदर्शनही देतील. त्याप्रमाणं त्यांच्याशी ओळख झाल्या-झाल्या त्यांनी आम्हां नव्यानं पदयात्रेत सामील होऊं इच्छिणा-यांच्याकडे एक नजर टाकून म्हणाले, जमेल तुम्हाला, पण हेंही स्पष्टच सांगितलं कीं, उद्यापासूनच तुम्हाला दररोज साधारण ५-६ किलोमीटर तरी चालायचा सराव करायला सुरवात केली पाहिजे. आधी दीड-दोन किलोमीटर आणि वाढवत वाढवत ५-६ किलोमीटर पर्यंतचा सराव व्हायला पाहिजे. पदयात्रेत जाण्याची इच्छा असणा-या प्रत्येकाने दोन फोटो व फॉर्म भरून द्यायचा होता. पोलिसाना पण तशी सविस्तर माहिती द्यावी लागते, हें तेव्हां समजलं. आता चालण्याचा सराव करायला बरोबर ७ आठवड्यांचा अवधी हाताशी होता. सरानी आणि श्री. गाढ यानी पण, हें पण आग्रहानं सांगितलं कीं, जी पादत्राणें घालून तुम्ही पदयात्रा करणार असाल, ती घालूनच सराव करा. पदयात्रेसाठी म्हणून खास नवीन पादत्राणें त्यावेळी वापरायली काढलीत तर त्यांचा जास्त त्रास होईल.
तेव्हांच मुक्ताबरोबर ठरवलं कीं आरे कॉलनीत गांवदेवीचं देऊळ आहे, तिथपर्यंत जाऊन यायचं. सरांचा तर गेल्या ब-याच वर्षांचा दैनंदिन ठेकाच असतो, दररोज १२-१ किलोमीटर रपेटीचा. त्यांनी पहिल्या दिवशी गांवदेवीच्या देवळापर्यंत नेलं. तिथून ते त्यांच्या रोजच्या वाटेला गेले. मी व मुक्ता परत येताना रिक्षानं परतलो. हचरेकरांचं मात्र कौतुक होतं, कीं पहिल्याच दिवशी ते सरांच्याबरोबर संपूर्ण ११-१२ किलोमीटरचा फेरफटका करून आले. दुसरे दिवशी ते येतील की नाही, असं वाटत होतं. पण आले. त्यांच्याकडे पाहून आमचीही हिम्मत वाढत गेली. व गांवदेवीला जाऊन येणं, म्हणजे ५-६ किलोमीटरचं अंतर अंगवळणीच पडून गेलं.
सकाळचं फिरणं झालं कीं झालं, असंही नव्हतं. पदयात्रा कशी असेल असा विचार मनात यायचाच. एके दिवशी हरचेकर म्हणाले, आपण सकाळचं चालतोय तें ठीक आहे. पण पदयात्रेमध्ये आपल्याला संध्याकाळी पण चालायचं आहे. तें काल लक्षात आल्यावर संध्याकाळी ओबेरॉय् मॉल् च्या बाजूने हाय्-वे कडे जाऊन मोहन गोखले रस्त्यानं फेरी करून आलो. तेव्हां आम्ही पण ठरवलं कीं आपण पण संध्याकाळी सुद्धां किती चालूं शकतो तें पहायला पाहिजे.
मध्यंतरीच्या काळात, मंडळाच्या दोन सभाही झाल्या. काय काय सामान बरोबर असावे लागेल, यासंबंधी सूचना मिळाल्या. मंडळाचे कार्यकर्ते, वाटेत कुठे कुठे थांबायचे, तिथे पदयात्रिकांची खानपानाची, विश्रांतीची कायकाय सोय असेल, याविषयी ठिकठिकाणच्या भक्तमंडळींना भेटून सर्व व्यवस्थेची खातरजमा करून आलेले होते.
आणि अखेर आम्ही खूप उत्सुकतेने वाट पहात होतो, तो रविवार २२ नोव्हेंबर २००९ चा दिवस उजाडला. सकाळी ६॥ वाजताच सगळे पदयात्री श्री. गाड यांच्या निवासस्थानी हजर झाले होते. साईंच्या पादुकांची पालखी सुंदर फुलानी सजवलेली होती. श्री. गाढ-भाऊंच्या घरालाच नव्हे तर आजूबाजूलाही सणाचे स्वरूप आले होते. मंडळाचा बॅनर व ध्वज लाऊन तीन टेंपो सज्ज होते. जोडीला श्री. म्हात्रे यांची कार पण होती. सर्वानी आपापले सामान टेंपोमध्ये ठेवायला दिले, तें एका टेंपोत. दुस-या टेंपोत नाश्ता-जेवणें यासाठीची शिधासामग्री आणि तिस-या टेंपोत मिनरल् वॉटरच्या बाटल्या, प्रथमोपचाराची पेटी, नव्या को-या २ डझन मध्यम आकाराच्या बादल्या, वगैरे. याच टेंपोला सर्चलाइट्ची पण व्यवस्था होती. मंडळाच्या कार्यकर्त्याना पदयात्रेचं किती डीटेल्ड प्लॅनिंग करावं लागतं, ह्याचं ते तीन टेंपो म्हणजे चालतं-बोलतं प्रदर्शनच होतं. श्री साईनाथमहाराजकी जय अशा उद्घोषात सर्वात पुढे पालखी, तिच्यामागे ध्वज, त्यामागे पदयात्री अशी पदयात्रेला सुरवात झाली. हो, पालखीमागच्या ध्वजाच्यापुढें कुणीच कधी जायचं नाहीं, हाही पदयात्रेचा महत्त्वाचा नियम.
तिथून पालखी गोराई येथीलच साईमंदिरात आली. तेथे प्रार्थना, आरती करून अल्पोपहारानंतर पुढे एका सोसायटीत असलेल्या साईमंदिरात पालखी पोंचल्यावर तिथल्या रहिवाशानी सर्व पदयांत्रींचे चहा-पाणी देऊन स्वागत केले. पुढे गोराई खाडीजवळील साईमंदिराचे दर्शन करून पदयात्रा वजीरा नाक्याजवळील गणेश मंदिरात श्रीगजाननाचे दर्शन घेऊन पुढे निघाली. तेव्हा सकाळ्चे १०॥ झाले होते. वाटेत एके ठिकाणी थोडी विश्रान्ती घेऊन मग मात्र पालखी निघाली आमच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठीकाणी, म्हणजेच मंडळाचे अध्यक्ष श्री अजय पाटील याच्या य़ोगेश्वर सोसायटी, कान्दरपाडा लिंक रोड, दहिसर (पश्चिम) इथे पोंचली तेव्हा दुपारचे साधारण १२ वाजले होते. तिथल्या रहिवाशानी पालखीचे जंगी स्वागत केले. केळीचे खांब रांगोळ्या काढून सर्वच आवार सुशोभित केलेलं होतं. पालखी उतरण्याची व्यवस्था बेसमेंटमध्ये होती. दुपारची आरती करून सर्व पदयात्रीना (सुमारे ८० जणाना) प्रसादाचे जेवण दिले गेले. मग थोडी विश्रांती, नंतर चहापान करून ४॥ चे सुमारास पालखी निघाली. संध्याकाळी ६॥ चे सुमारास आम्ही घोडबंदर रोडवरील "एक्स्प्रेस् इन्" या हॉटेलच्या आवारात पोंचलो. तेथे एक पदयात्री श्री. जोशी यांच्या मातोश्री, मिसेस् व भगिनी या सर्वांतर्फे इडली-चटणी व मसाला दूध असा नाश्ता दिला गेला. मग सातचे सुमारास सांजारती करून आम्ही कूच केले ते थेट रात्रीच्या भाइंदरपाडा श्रीदत्तमंदिराजवळील श्री. भोईर यांच्याकडील मुक्कामाकडे.
निघण्याआधी कार्यकर्त्यानी सर्व पदयात्रीना फ्लूओरेसेंट जॅकेट्स् ओळखपत्रे व हॅट्स् या गोष्टी दिल्या. रात्रीच्या पादचा-यांसाठी किती महत्त्वाच्या गोष्टी नाही कां ? केव्हांही कुठेही रात्रीचं पायी जायचं असेल, तर ह्या गोष्टी लक्षात ठेऊन बरोबर असाव्यात ! शिवाय सर्वांनी दोन-दोनांच्या ओळीनी चालायचं. अगदी शाळेतल्या मुलांना चालवतात तसं. हा सर्व रस्ता म्हणजे एका बाजूला दाट झाडी आणि डोंगर तर दुसरीकडे दूरवर समुद्राची खाडी. शुक्ल षष्ठीचं चांदणं तें काय असणार ? त्यामुळं तसा अंधारच होता. पण घोडबंदर रोडवर वाहनांची रहदारी बरीच असते. त्यामुळं अंधार फार जाणवला नाहीं. रात्री ९-९॥ चे सुमारास पदयात्रा मुक्कामाला पोंचली. श्री. गाढ यांच्या घरापासून एव्हाना २१ कि.मी अंतर आलेलों होतो. जेवणं करून निद्राधीन होणार त्याआधी सूचना मिळाली कीं पहाटे ३ वाजतां पहिली शिट्टी होईल. श्री. भोईर यांचं घर म्हणजे प्रशस्त वाडाच आहे. महिला पदयात्रींची झोपायची सोय त्यांच्या घरातच केली होती.
सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर, पदयात्रेचा दुसरा दिवस
सूचनेप्रमाणें बरोबर तीन वाजतां शिट्टी झाली व आम्ही सर्वजणी ताड्कन् उठलों. आन्हिकं आवरून, चहापान करून सर्वजण पालखीपाशी जमलों. पूजा-आरती करून ३॥ च्या सुमारास यात्रा निघाली सुद्धा. सकाळी ८॥ च्या सुमारास वाटेतील एका सोसायटीत थोडा वेळ मुक्काम झाला. आज नाश्त्याला पोहे होते. आरती करून पुन्हा निघालो, तें ११॥ च्या सुमारास श्रीसाईबाबा मंदिर, भिवंडी-कल्याण फाटा येथे पोंचलों. (गोराईपासून ३५ कि.मी.) तिथे सर्वानी आंघोळी केल्या. दुपारचीच आंघोळ असल्यामुळे, गरम पाणी हवे असं पण वाटलं नाही. ६॥-७ तासांच्या २०-२२ कि.मी. चालण्यानंतर आंघोळ करतांना खूप बरं वाटत होतं. मध्यान्हीची आरती करून सर्वांची जेवणं झाली व मग वामकुक्षी.
रात्रीचा मुक्काम पडघा इथे होता. गाढ-भाऊ सांगायचेच कीं एकदा पडघा गाठलं कीं आपण शिर्डीला पोंचलोच समजायचं. विश्रांतीनंतर ठीक ३॥ वाजता प्रस्थान ठेवलं. वाटेत लिंबू-सरबत पी, संत्रे खा, चहा पी, असें करत पाय चालत होते. पण पायांना खरी लय मिळत होती, ती "श्री साई, जय साई" अशा स्वतःच्याच जपाची. आणि एकदाचें पडघ्याला श्री. बिडवी यांच्याकडे पोंचलों. तिथे पोचणारे आम्ही सीनियर सिटिझन्स हेच शेवटचे होतो. पण पोंचलो. आजच्या दिवसभराचे अंतर ४५-५० कि.मी. झालेले होते. बाप रे!! खरंच आपण इतकं चाललो ? खरं तर, जेवणही नको, लहान बाळासारखे पाय हळुवार कुरवाळावेत आणि सरळ झोपून जावें असे वाटत होते. पण सरांनी आग्रह केला. थोडे तरी खा. उद्या परत असाच बराच पल्ला आहे. मनात आले, बाप रे!! पण सरानी धीर दिला. पडघा तर आलं. मग थोडं तोंडावर पाणी मारून जरा फ्रेशन्-अप् झालों. जेवण केलं. "अन्नदाता सुखी भव" हें अनाहूतपणे मनात उमटलं. पायाला थोडा मसाज केला आणि झोपून गेलों.
रात्री मधेच जाग आली. वाटलं, अरे अजून शिट्टी कशी झाली नाही. शिट्टी वाजली कीं जाग येते किंवा जाग आली असेल तर शिट्टी वाजली असणार असंच मनांत ठसलं होतं.
तिसरा दिवस मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २००९
नेहमीप्रमाणे ३॥ च्या सुमारास चालायला सुरवात केली. चालणं हें आतां अंगवळणी पडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे जपाबरोबर गाणी भेंड्या अधूनमधून होऊं लागल्या. सकाळी ११ च्या सुमारास शहापुरात (गोराईपासून ८० कि.मी.) पोंचलों. दोन-दोनांच्या ओळीनें गावांत प्रवेश केला. रस्त्याने सुद्धा लोक पालखी थांबवून दर्शन घ्यायचे. शहापुरात श्री. परदेशी यांच्या वाड्यावर दुपारची आरती भोजन विश्रांती असे नियोजन होते. हो, श्री. परदेशी राहतात तो वाडा लोकमान्य टिळकांच्या भगिनींचा. छान सुस्थितीत आहे.
आज श्री. हरचेकरांच्या लग्नाचा वाढदिवस होता. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पण फॅमिलीतर्फे सगळ्याना जिलेबीची व्यवस्था केली. आणखी एक पदयात्री लंडनला परीक्षा देऊन आले होते. त्यांचा रिझल्ट् ही त्यांना आजच समजला. ते उत्तम उत्तीर्ण झालेले होते. साईनी कृपाप्रसाद दिला होता.
आज दुस-या टप्प्यात शहापूरचा घाट चढायचा होता. त्यामुळे व्यवस्थित जेवण करून विश्रांतीसाठी पहुडलों. ३ च्या सुमारास चहा घेऊन ३॥ च्या सुमारास कूच करायला सगळेजण तयार होते. अर्थात् निघण्या अगोदर शहापूरच्या प्रसिद्ध लस्सीचा आस्वाद घ्यायला कुणी चुकणार कसे ? चालणं सुरूं झालं. ४ ते ५॥ च्या दरम्यान उतरत्या उन्हाचा थोडा त्रास वाटला. संध्याकाळनंतर इतक्या मोठ्या सुदूर रस्त्याला दिवे कसे असणार. अमेरिकेत सुद्धा नाहीत. पण रात्री व पहाटे आतां चांदणं बरं असायचं. रात्री ९॥-९॥। च्या सुमारास खर्डीला (गोराईपासून १०० कि.मी.) श्री. देसाई यांच्याकडे पोंचलों. अर्थात् आम्ही सीनियर सिटीझन्स नेहमीप्रमाणें लेट लतीफच होतो. अर्ध्या अधिक लोकांची झोपायची सुद्धा तयारी झालेली होती. आम्ही जेवणें केली, पायांना मसाज केला व झोपेच्या अधीन झालों.
गेले दोन दिवस रोजचे ४५-५० कि.मी. चालणें झाल्यानें पायांना थोडे फोडही आलेले होते. पण सरानीं सांगितलं, कीं फोडूं नका. आपोआप बसतील. तें जास्त बरं. एरव्ही फोड फोडले तर, पाणी निघते. तिथे ओलेपणा राहतो व धूळ जंतू गेले तर उपद्व्याप होतो. अशा अनुभवी टिप्स् मिळाल्या. त्याचंही समाधान वाटलं.
चौथा दिवस बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २००९
दुपारपर्यंत लतीफवाडीला पोंचायचें होते. कसारा घाट चढताना उन्हं पण जाणवत होती. विचार आला, हिमालय चढताना शेर्पा कसे बरं चढत असतील, तेंही पाठीवर सामान घेऊन ? लगेच उत्तर आलं, थोडं पुढे झुकून ! आमच्याकडे कांहीं तसं सामान नव्हतं. पाण्याची बाटली, स्वेटर, जॅकेट्, टोपी अशा वर लागणा-या गोष्टी असलेली शबनम तेवढीच काय ती होती. तीही पाठीकडे सरकवून थोडं पुढे वाकून चालायचं बघितलं. आणि खरंच चालणं थोडं सोपं वाटूं लागलं. आणि पोंचलो लतीफवाडीला. (गोराईपासून १२० कि.मी.)
आज घाट चढायला सुरूं करण्याअगोदरच श्री. पांडे यांच्याकडे सकाळचा नाश्ताच नव्हे तर आंघोळीही झालेल्या होत्या. त्यामुळे लतीफवाडीला आरती आणि जेवणं झाल्यावर सर्वानी विश्रांती घेतली. इथें श्री. हरचेकरानी "गुरूचे श्रेष्ठत्व" हा विषय गोष्टींचे दाखले देत सुंदरपणे सांगितला. त्यांची विषयाची मांडणी करण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.
इथून पुढे इगतपुरीचा घाट चढायचा होता. घाट तसा अवघड, कारण घाटातील चढण दम काढणारी आहे. शिवाय वाहनांची रहदारी पण बरीच असतेच. मग पदयात्रीनी एक कल्पना काढली. दोन-दोनांच्या रांगा केल्या व सर्वानी मिळून भजन करीत पुढे जात रहायचें, दिंडीप्रमाणें. कोणी फार मागे नाही, कोणी फार पुढे नाही. भजनाच्या तालात पावलांना पण थिरक आली होती. महिला पण मागे नव्हत्या. कांहीनी फुगड्या घातल्या, कांहींचे नाच पण झाले. ढोलकीवादक श्री. कदम यांचे वादन इतके अप्रतीम होते कीं सर्वानीच त्याना भरभरून दाद दिली. चढण कधी संपली तें कळले सुद्धा नाही. आजूबाजूला हिरवा-गार प्रदेश, एका बाजूला डोंगर, तर दुस-या बाजूला दरी आणि खालून जाणारी रेल्वे लाइन. सगळीकडे वनराईचा वास दरवळत होता. १०० टक्के प्रदूषणविरहित हवा ! छाती भरभरून शुद्ध हवा घेण्यात काय मजा असते, तें शब्दांत काय सांगावं ? घाटात उतरणीवर एका गुरे घराकडे परत नेणा-या कातकरी बाईबरोबर तिचा १२-१३ वर्षाचा मुलगा होता. त्याच्या हातात क्रिकेटची बॅट् होती, त्यानं स्वतः बनवलेली. बॅटीला लाल आणि हिरवा रंग लावून तिचा तिरंगाही केलेला होता. देशभरात खेड्यापाड्यात सुद्धा क्रिकेट् किती लोकप्रिय आहे याचा अजून काय दाखला हवा ? त्या मुलाबरोबर थोड्या गप्पा मारताना त्यानं हें पण सांगितलं कीं बॅटीला लावलेले रंग पण झाडाच्या पाना पासून तयार केलेले होते.
आजच्या संध्याकाळच्या चालण्याच्या वेळी गाण्याच्या भेंड्या खेळताना समजलं, कीं सराना खूप गाणी येतात. चांदणं पडलं तसं आकाशातले, सप्तर्षी, व्याधाचा बाण, मृगनक्षत्र असं सगळं बघतबघत जरा रमतगमत चालत होतो. साधारणपणे ९ च्या सुमाराला इगतपुरीला श्री. दळवींच्याकडे पोंचलों. (गोराईपासून १५० कि.मी.) त्यांच्याकडे जेवणाचा सुंदर मेनू होता - शिरा, पुलाव, कोशिंबीर, वगैरे. रात्री झोपायला बारा वाजले. महिलांची सोय घराच्या पडवीत आणि पुरुषांची अंगणात. पांघरूण ओढणार एवढ्यात गाढ-भाऊ सांगत होते, कीं उद्याची शिट्टी पहाटे ३ च्या ऐवजी २ लाच होईल. मुली म्हणाल्या, दोनच तास उरलेत. मग झोपायचं कशाला ? पण आम्ही झोपलों.
पांचवा दिवस, गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २००९
शिट्टी झाली तसे सगळे उठलो. इथे पाण्याचा त्रास आहे. लोकांनी टाक्या केल्या आहेत. पण आडात नाही, तर पोह-यात कुठून अशीच परिस्थिति असते. आणि एकदम इतकी मंडळी आली म्हणजे मोठी अडचणच. पण, श्री, दळवींसारखे भक्त श्रद्धेच्या आधारावर अडचणींचा पाढा वाचत बसत नाहीत. हें पाहून समजतं कीं श्रद्धेचं बळ काय असतं.
ठरल्याप्रमाणे पहाटे २॥-३ ला चालायला सुरवात केली. पालखी केव्हांच पुढे निघालेली होती. इगतपुरीला हाय्-वे ओलांडून घोटीच्या रस्त्याने धामणगांवला (गोराईपासून १७० कि.मी.) पोचायचे होते. ह्या वाटेत धुक्याचा एक सुखद अनुभव घेतला. समोरून अंगावर येणारे धुके क्षणात मागचा पुढचा रस्ता हरवून टाकायचे.
वाटेत इतर पदयात्रीनी बेफिकीरपणे टाकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि इकडेतिकडे केलेली घाण पाहिल्यावर आमच्या मंडळाच्या लोकांनी नव्याको-या बादल्या कां घेतल्या होत्या तो त्यांचा दूरदर्शीपणा व कांटेकोरपणा न बोलता न सांगता मनात ठसून गेला.
दुपारी धामणगांवला श्री. गाढवे यांच्याकडे आरती, जेवण, विश्रांती.
संध्याकाळचा रस्ता हा कांही हमरस्ता नव्हता. पण मुखी साईनाम आणि पायांना गति. ७॥ च्या सुमारास वाटेत एका मारुतीमंदिरात सायंआरती झाली. पुढें एके ठिकाणी एका गांवातील लोकानी पालखी थांबवून, सर्व पदयात्रीना दूध, केळी, उपासाचे सांडगे-पापड असा फराळ देऊन स्वागत केले. रात्री १० ला श्री. गीते यांच्याकडे मुक्काम झाला. (गोराईपासून १८५ कि.मी.) आचा-यानी सुंदर जेवण बनवलेले होते. गीते यांचे घर प्रशस्त ! त्यामुळे सर्वांची झोपायची चांगली सोय झाली.
सहावा दिवस शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २००९
ठरल्याप्रमाणे ३ वाजता शिट्टी वाजली. खरं तर जाग यायचीच. लहानपणापासूनच असं ब्रम्हमुहूर्ताला उठून अभ्यास करायची संवय असती, तर कुठे पोंचलो असतो ?!
आताशी, "अजून किती अंतर ?" हें विचारायचं सोडून दिलं गेलं होतं. सुरवातीला विचारायची. आणि उत्तर मिळायचं, "तें काय ? तो खांब दिसतो ना, तिथंपर्यंत." मग कधी तो खांब झाड व्हायचा, कधी घर, कधी विजेच्या तारेवरचा पक्षी !
आता रस्त्याला इतर ठिकाणाहून निघालेले इतर मंडळांचे पदयात्री भेटायचे. दुपारी मणेगांव सिन्नर येथे (गोराईपासून २१० कि.मी.) पोंचलों. दिवसा-ढवळ्या पोंचलों असं हें पहिलं मोठं शहर. त्याआधी, मधे कुठे तरी शीघ्रकवी श्री. नामदेवबुवा पदयात्रेत सामील झालेले होते. जेवणानंतर त्यांच्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला.
श्री. आव्हाड सरांचे नातेवाईक भेटायला आलेले. सिन्नरमधून निघायला बराच उशीरच झाला, जवळजवळ १॥ तास. रात्रीचा मुक्काम पांगरी येथे मंडळानं स्वतः उभारलेल्या "श्रीसाईश्रद्धा कुटीर" या प्रशस्त वास्तूत मुक्काम झाला. (गोराईपासून २२५ कि.मी.)
सातवा दिवस शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २००९
पहाटे ३॥ च्या सुमारास चालायला सुरवात झाली. चढत्या उन्हात एका पदयात्रीच्या नाकातून रक्त येऊं लागले. पण विशेष सीरियस् नव्हते. थोड्या वेळानें थांबले सुद्धा. आणखी एक सीनियर सिटिझन् बाकावर बसले असताना पाहतापाहता जमिनीवर पडलेच. त्याना चक्कर आल्याचं आजूबाजूच्यांच्या लगेचच लक्षात आलं. कांदा हुंगायला आणि वर्तमानपत्रानं वारं दिल्यावर तेही सांवरले.
दुपारचा मुक्काम पाथरी येथील वनराई हॉटेलमध्ये झाला. (गोराईपासून २४० कि.मी.) मध्यान्ह आरतीनंतर जेवणामध्ये वनराईचे मालक श्री. जोशी यांच्याकडून बाजरीची भाकरी होती. पदयात्रेमध्ये अशा प्रत्येक पदार्थाचं, पक्वान्न नसला तरी, खूप अप्रूप वाटतं खरं. संध्याकाळी चालायला सुरवात करण्याआधी अनुभवकथन व सूचनांचा कार्यक्रम हॉटेलच्या आवारातच मंडळानं मुद्दाम ठेवला होता. सगळी व्यवस्था चोखच होती. त्यामुळं सूचना अशा नव्हत्याच. पण पदयात्रींचे अनुभव रेकॉर्ड करून संकलित करायला हवे होते, असें वाटले.
रात्रीचा मुक्काम देरडे येथे श्री. इनामके यांच्याकडे झाला. (गोराईपासून २६० कि.मी.) श्री. इनामके यांनी पालखीच्या स्वागतासाठी घरासमोर चक्क मोठा मांडव घातलेला होता. त्यांच्याकडे पालखी येणार म्हणून त्यांचे पाहुणे-रावळे पण आलेले होते. मोठ्या मुंबईतल्या कुठल्याशा कोप-यातल्या गोराईहून आलेली श्री साईंची पालखी. पण श्रीसाईंची पालखी म्हटलं कीं बाकी सगळे संदर्भ निरर्थक मानणारी ही खेडोपाडीची मंडळी. असाच आहे आपला देश, अशाच भावूक साध्या-भोळ्या गांवक-यांचा. हीच आपली संस्कृति आहे. संस्कृतीची आणखी वेगळी व्याख्या कशाला शोधायची ?
जेवणाला पोळ्या, भाकरी, भरलेल्या वांग्यांची भाजी आणि गोड पदार्थ म्हणून शिरा होता. मस्तच होता. सगळ्यानीच तावच मारला, असं म्हटलं पाहिजे. झोप अर्थातच छान झाली.
झोप छान लागण्याचं खरं कारण हेंही होतं कीं उद्यां पहाटे ३ वाजता शिट्टी वाजणार नव्हती. कारण शिर्डी इथून फक्त २० कि.मी. वर, हो, फक्त २० कि.मी.वर होती. त्यामुळे सकाळि ६-६॥ ला पालखी निघाली तरी चालणार होते. कारण सकाळच्या वेळी साऊळ विहिरीपर्यंत १५ कि.मी. जायचं होतं.
आठवा दिवस रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २००९
सर्व महिलावर्गानं गरम पाण्यानं मस्त आंघोळी केल्या. सगळ्यांचाच मुड् फ्रेश् आणि रिलॅक्स्ड् होता. ६॥-७ वाजतां निघून वाटेत संत्री, पेरू, डाळिंबं असे स्टॉल् लागले कीं, थांबत, एकंदरीनं रमतगमत १०॥-११ च्या सुमारास साऊळ विहिरीला श्री. के. सी. पाण्डे यांचेकडे पोचलों. (गोराईपासून २७५ कि.मी.) साऊळ विहिरीचा उल्लेख श्रीसाईसच्च्ररितात आलेला आहे. तात्यां कोते बाबांची अनुमति न घेतां शिर्डी सोडतात. पण त्यांच्या घोड्याला साऊळ विहिरीजवळ लटका भरतो. ज्यानी श्रीसाईसच्चरित् वाचलेलं आहे, त्यांना सहजपणें भावतं, कीं, "ही कां ती साऊळ विहीर.?"
मला तर तिथं साऊळ विहीर फाट्याला पोंचल्यावरंच मनात आलं, "साईराम भेटला आपल्याला." निघतानाच मनात होतं, "Now or never". वाढत्या वयात यानंतर शरीर किती साथ देईल, ह्याचा काय भरंवसा धरायचा ? तसं गाडीनं वगैरे येणं होईलही. पण मुंबई ते शिर्डी चालत ? हंऽऽऽ इथवर तर आलों. आलों कसले ? त्या अद्भुत शक्तीने आणलं. कृतार्थता डोळ्यातून वहात होती. मुक्ताच्या पण तें लक्षांत आलं. बोलली नाही. पाठीवर हात मात्र ठेवलान्.
बहुतेकांचे नातेवाईक रविवार सुट्टीचा दिवस असल्याने, "येऊं" म्हणाले होते. आले सुद्धा. मुक्ताचा सत्यजित, मनालीला व तिच्या आई-वडिलाना घेऊन आला. सर्वच पदयात्रीना नातेवाइकांकडून स्नेही-संबंधींकडून कौतुक ऐकण्यानं मोठं समाधान वाटत होतं. त्यामुळं जेवणं झाल्यावर विश्रांती हवी असं कुणालाच वाटत नव्हतं सगळीकडे गप्पागोष्टीना जणूं ऊत आला होता.
३॥-४ च्या सुमाराला सगळे पुन्हा उठले. शिर्डीत श्रीसाईदर्शनाचा सोहळा अनुभवायचा होता. त्यामुळं महिलाच नव्हे तर पुरुषवर्ग सुद्धा परीटघडीचे वेगळे बांधून आणलेले कपडे घालून तयार झाले. नामदेवबुवांचा भजनरंग झाला. टाळा पण होत्या. त्यांची पण साथ झाली. मग शेवटच्या ५ कि.मी. साठी नेहमीप्रमाणे रांगा लागल्या. बॅण्डही होता आणि फटाके पण. अगदी शोभायात्राच सजली. पण निघण्यापूर्वी कृतज्ञतेचा व क्षमायाचनेचा हृद्य सोहळा सुरूं झाला. या सात-आठ दिवसात आपल्या हातून चुकूनही कुणी दुखावलं गेलं असेल तर माफी असावी म्हणून प्रत्येक पदयात्री दुस-या प्रत्येकाची पाया पडून माफी मागत होता. मोठेसुद्धा निःसंकोचपणें लहानांच्या पण पाया पडत होते. खरं तर सर्वजण सगळ्याना नांवानिशी ओळखत होते, असंही नव्हतं. तरी पण, क्षमायाचनेत कृतज्ञतेत पूर्ण स्वाभाविकता होती. आम्ही सर्व सहयात्री होतो, त्या एका साईरामाचे. ही ओळख कमी कां होती ?
मग वाजतगाजत दिंडी निघाली. ५ कि.मी.चें अंतर केव्हां संपले, तें कळलेसुद्धा नाहीं. प्रथम खंडोबाच्या देवळात पालखी आली. ह्या खंडोबाच्या देवळाचे तेव्हांचे पुजारी भगत म्हाळसापति ह्यानी चांदपाटलाच्या व-हाडासोबत आलेल्या बाबांचे "आवो साई" असें अनाहूतपणें म्हणत स्वागत काय केले, बाबांचे त्यानी नामकरणच केले. बाबा "साईबाबा" झाले.
पालखी खंडोबाला प्रदक्षिणा करून येईतोंवर कित्येक पुरुष गाभा-यापासून देवळाच्या उंबरठ्यापर्यंत पालखीच्या मार्गात पालथे पडलेले होते. पालखी त्यांच्या पाठीवरून गेली, तेव्हां सहजपणें "जय साई" म्हणत प्रत्येकानं तो पदन्यास झेलला. प्रयेकाला त्या मालिशीनं धन्य वाटलेलं होतं, त्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.
द्वारकामाईत म्हणजे समाधीमंदिरात भक्तांची रीघ नेहमीच असते. पण पदयात्रींना दर्शनासाठी स्वतंत्र प्रवेश देतात. श्रीसाईंचे भावपूर्ण दर्शन घेऊन, पालखी चावडीकडे गेली. तिथे महिलाना प्रवेश नसतो. महिलावर्ग चावडीच्या बाहेर थांबला. तिथून पालखी नियोजित शेवटच्या सम्मेलनाच्या जागी पोंचली. तिथेच पदयात्रेचे विसर्जन झाले. सर्वानी काहीशा जड अंतःकरणानंच एकमेकाचा निरोप घेतला.
मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मनांत काय चाललं असेल, त्यावेळी ? म्हणत असतील ना, "येणार ना पुढल्या वर्षी ? श्री साईश्रद्धा पदयात्रिक सेवा मंडळ आपल्या सेवेची पुन्हा संधि द्याल, म्हणून आतूरच असेल."
जय साईराम !
Categories: Learning Sanskrit

परगच्छत् वर्षम् (The Going Past Year)

एतत् वर्षम् समाप्तिम् प्रति आगतम्। अन्यवर्षाणाम् अनुरूपम् अस्मिन् वर्षे अपि अनेकाः घटनाः घटिताः। काश्चित् घटनाः अस्माकम् जीवनेन सम्बद्धिताः तु काश्चित् सम्बद्धिताः न आसन्। परन्तु कालचक्रम् सदा प्रवर्तते। अस्माभिः जीवनम् सानन्देन सरसेन जीवितव्यम्।

नववर्षे वर्धन्ताम् सर्वेषाम् विभवाः सौख्यानि च एषा मम शुभकामना !!


Categories: Learning Sanskrit

अन्तिमः कार्यदिवसः (Last Working Day of My School of 2009)

अद्य मम विद्यालये अस्य वर्षस्य अन्तिमः कार्यदिवसः आसीत्। सर्वे परस्परम् मिलित्वा नववर्षस्य शुभ्कामनाः अयच्छन्। शिक्षकगणः नववर्षाय सर्वेभ्याम् छात्रेभ्यः आशीर्वादः अयच्छत्। अधुना विद्यालये शीतकालीन-अवकाशः आरभ्यते।


Categories: Learning Sanskrit

पूर्व-बोर्ड परीक्षा समाप्ता (Pre Board Exams 1 concluded!)

परगतसप्ताहे मम पूर्व-बोर्ड परीक्षा समाप्ता। आसु परीक्षासु मम प्रदर्शनः अधस्तरः अभवत्। परन्तु अहम् प्रदर्शनः सम्यक्कर्तुम् परिश्रमः करिष्यामि।


Categories: Learning Sanskrit

Went to Sankrit Katha Lekhan Competition!Stood 3rd!

परह्यः मया संस्कृत-कथा लेखनस्य प्रतियोगितायाम् गतम्।तत्र आवाम् दत्तेषु चित्रेषु आधारिता कथा लेखितव्या। अहम् मम सहभागिनी च तत्र तृतीय-पुरस्कारम् अलभावहि। निर्णायकाः आवयोः प्रदर्शनात् अतीव प्रसन्नाः अभवन्। मम अध्यापिका अपि अतीव प्रसन्ना अभवत्। तया संपूर्णायाः कक्षायाः मध्ये मह्यम् शुभकामनाः दत्ताः।संस्कृत-भाषायाम् कथा लेखनम् मह्यम् नव अनुभवः सिद्धः। अहम् अतीव प्रसन्नः अभवत्। अद्यत्वे अहम् इदम् कार्यम् प्रति अग्रसरः भविष्यामि।


Categories: Learning Sanskrit

Samskrit Learning Post 15: Videos, Listings And More..

Vadatu Samskrutam - Sat, 11/21/2009 - 21:06
Universities, organizations, inidividuals are propogating their love for Samskrit language devotedly through course materials, internet lists, videos and more.

Below is a glimpse of the notable examples of 'Samskrit knowledge centers'

http://sanskritdocuments.org/
with mission as "Learn Sanskrit! Love Sanskrit!! Live Sanskrit!!!"

http://sanskritlinks.blogspot.com
created with goal to consolidate various links related to Samskrit.

Video by an Enthusiast: How To Use Samskrit in Your Daily Life


Study Of Spoken Samskrit In Australia:http://learnsanskrit.wordpress.com/
simple yet noteworthy and consistent diary writing, explainations and reporting in Samskrit.

http://samskrute.blogspot.com/
intention to bring out and spread Knowledge within Samskrit Language

Video Series : Learn To Read Samskrit
Categories: Learning Sanskrit

"अभंग" वृत्तात । रचीला सारांश । भगवद्गीतेच्या । अध्यायांचा

Slez - Wed, 11/11/2009 - 21:52
ॐ श्रीपरमात्मने नमः ।॥१॥ नमन गणेशा । कृपा असो द्यावी । सिद्धीस नेण्यास । उपक्रम ॥०-१॥॥२॥ "अभंग" वृत्तात । रचण्या सारांश । भगवद्गीतेच्या । अध्यायांचा ॥०-२॥॥३॥ अभंग वृत्त हे । सरळ रसाळ । भक्तिभावाचीही । हीच रीत ॥०-३॥॥४॥ इदं न मम ह्या। श्रद्धेने सादर। करीतो श्रीपाद। अभ्यंकर॥०-४॥
॥५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश पहिल्या । अध्यायाचा ॥१-१॥॥६॥ राजे धृतराष्ट्र । पुसती सांग बा । सञ्जया रणात । काय झाले ॥१-२॥॥७॥ दुर्योधनाने ना । द्रोणाना कथिले । कोणत्या पक्षात । कोणकोण ॥१-३॥॥८॥ शेजारी भीष्मानी । उत्साहे गर्जूनी । फुंकीला त्वेषाने । सिंहनाद ॥१-४॥॥९॥ तुंबळ माजले । अर्जुन कृष्णास । म्हणे रथ न्यावा । मधोमध ॥१-५॥॥१०॥ ज्येष्ठ श्रेष्ठ आप्त । स्वकीय पाहूनी । सम्भ्रम जाहला । अर्जुनास ॥१-६॥॥११॥ ज्यांचेसाठी घाट । राज्याचा करावा । तेच समर्पित । ठाकले कीं ॥१-७॥॥१२॥ युद्धाने माजती । वैधव्य दुःशील । संकर बुडवी । कुलधर्म ॥१-८॥॥१३॥ ऐसे पापी युद्ध । करण्यापरीस । मारोत मजला । निहत्थाच ॥१-९॥॥१४॥ म्हणत ऐसेनी । गाण्डीव टाकूनी । अर्जुन उतारा । रथातूनी ॥१-१०॥॥१५॥ इथेच संपला । अध्याय पहिला । अर्जुनविषाद- । योग नांव ॥१-११॥
॥१६॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश दुस-या। अध्यायाचा ॥२-१॥॥१७॥ अर्जुन संमोही । पाहूनी श्रीकृष्ण । म्हणती हें काय । भलतेंच ॥२-२॥ ॥१८॥ कैसे हें किल्बिष । अनार्य अयोग्य । अस्वर्ग्य मांडले । अशोभनीय ॥२-३॥॥१९॥ अर्जुन म्हणतो । समोरी पहा ना । प्रिय वंदनीय । भीष्म द्रोण ॥२-४॥॥२०॥ युद्ध म्हणूनी कां । यांनाही मारावे । भिक्षासेवनीही । स्मरावेसे ॥२-५॥॥२१॥ गुरूना मारूनी । भोगूं जे कां भोग । रक्तरंजित ते । लांछनीय ॥२-६॥॥२२॥ आम्ही जिंकावे कीं । ह्यानीच जिंकावे । दिशाहीन आहे । मन माझे ॥२-७॥॥२३॥ सद्धर्म कोणता । कोणता अधर्म । तूंच आता मज । समजूं दे ॥२-८॥॥२४॥ श्रीकृष्ण हंसूनी । म्हणती अर्जुना । प्रवाद हा किती । विपर्यस्त ॥२-९॥॥२५॥ शोक करावेसे । नाहीत त्यांचाच । शोक तूं मांडीला । अनाठायी ॥२-१०॥॥२६॥ तुझ्या मारण्याने । मरतील कोणी । ह्याच विचारी कीं । गफलत ॥२-११॥॥२७॥ आत्मा तो केवळ । जाण देहधारी । देहहानीचे ना । त्यास कांहीं ॥२-१२॥॥२८॥ वस्त्र जीर्ण होतां । टाकावें लागते । तैसेच आत्म्यास । देहाविशी ॥२-१३॥॥२९॥ शस्त्राने ना कटे । आगीत ना जळे । पाण्याने ना भिजे । आत्मा ऐसा ॥२-१४॥॥३०॥ शिवाय हे पहा । जन्मल्यास मृत्यू । अटळचि आहे । शोक कैसा ॥२-१५॥॥३१॥ धर्माचे म्हणता । क्षत्रियास तरी । युद्धासम नाही । धर्मकार्य ॥२-१६॥॥३२॥ युद्ध न करणे । अधर्म होईल । अपकीर्ती आणि । पाप माथी ॥२-१७॥॥३३॥ कीर्तिवंतालागी । अपकीर्ती होणे । यावीण मरण । दुजे काय ॥२-१८॥॥३४॥ युद्धात मेल्यास । पावशील स्वर्ग । जिंकशील तरी । राज्य भोग ॥२-१९॥॥३५॥ फळाविशी चिंता । आत्ताच कशास । कर्मबन्धनेच । तोडावीत ॥२-२०॥॥३६॥ मानी सुखदुःख । सम लाभहानी । जयपराजय । तेही सम ॥२-२१॥॥३७॥ समत्व योगाने । बुद्धीस निश्चल । करीता कर्मात । कुशलता ॥२-२२॥॥३८॥ अर्जुनाने केला । प्रश्न एक तेव्हां । बोले चाले कैसा । स्थितप्रज्ञ ॥२-२३॥॥३९॥ सांगती श्रीकृष्ण । निष्काम तो सदा । नाही शुभाशुभ । ईर्षा द्वेष ॥२-२४॥॥४०॥ विषयांचा तरी । सर्वत्र पसारा । इन्द्रिये चळती । सम्मोहित ॥२-२५॥॥४१॥ सम्मोहाकारणे । स्मृतिभ्रंश होतो । मग बुद्धिनाश । सर्वनाश ॥२-२६॥॥४२॥ निशा सर्वभूतां । योग्यास तो दिन । भूतांच्या उजाडी । रात्र पाहे ॥२-२७॥॥४३॥ ऐसी ब्रम्हस्थिती । येतां अविचल । अन्तकाळी सुद्धा । शान्त शान्त ॥२-२८॥॥४४॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । ऐशा संवादाने । गीतोपनिषदी । सांख्ययोग ॥२-२९॥
॥४५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश तिस-या । अध्यायाचा ॥३-१॥॥४६॥ अर्जुनाचा प्रश्न । म्हणसी तूं बुद्धि । कर्माहूनी श्रेष्ठ । निखालस ॥३-२॥॥४७॥ तरी घोर कर्मी । गुंतवूं पाहसी । मनात दुविधा । होते पहा ॥३-३॥॥४८॥ श्रीकृष्ण सांगती । कर्म टाकूनीया । नैष्कर्म्य न होते । मुळी सुद्धा ॥३-४॥॥४९॥ कोणताही जीव । क्षणैक न राहे । कर्म न करीता । ध्यानी धरी ॥३-५॥॥५०॥ कर्मास न व्हावे । माणसाने वश । अवश राहूनी । कर्म व्हावे ॥३-६॥॥५१॥ संन्यास सम्पूर्ण । आणि समबुद्धि । झाली तरी सिद्धि । येत नाही ॥३-७॥॥५२॥ मानव्य दिव्यत्व । यांचा कांहीं मेळ । जमेल तो योग । श्रेयस्कर ॥३-८॥॥५३॥ यज्ञशिष्ट तेच । सेवूनीया सन्त । सर्व दोषाहून । मुक्त होती ॥३-९॥॥५४॥ आत्मबुद्धीने जे । उपभोग घेती । पापांचा घडाच । सांचवीती ॥३-१०॥॥५५॥ अन्नाने घडतो । भूतांचा पसारा । अन्न संभवते । पर्जन्याने ॥३-११॥॥५६॥ पर्जन्य घडतो । यज्ञाचे कारणे । यज्ञ तो घडतो । कर्मातून ॥३-१२॥॥५७॥ कर्मांची साखळी । ब्रम्हाने रचीली । ब्रम्हाचा उद्भव । अक्षरी गा ॥३-१३॥॥५८॥ असे सारे चक्र । आहे गा नेमस्त । ठेवावी तयाची । बांधीलकी ॥३-१४॥॥५९॥ असक्त राहूनी । रहावे कर्मात । परम साधते । ऐशा योगे ॥३-१५॥॥६०॥ श्रेष्ठतेने वागे । त्याचे अनुयायी । वाढता बनतो । जनसंघ ॥३-१६॥॥६१॥ इथे रणांगणी । स्वतःसाठी मज । आहे कांही काय । साधायाचे ॥३-१७॥।६२॥ जरी मीच कर्म । टाकूनी राहीन । उच्छाद माजेल । जगभर ॥३-१८॥॥६३॥ संन्यास अध्यात्म । धरूनीया मनी । करी युद्धकर्म । मदर्पण ॥३-१९॥॥६४॥ रहावे स्वधर्मी । गरीबीत सुद्धा । परधर्म तरी । भयावह ॥३-२०॥॥६५॥ अर्जुन कृष्णास। करी एक प्रश्न । कोणी कां जातात । वाममार्गी ॥३-२१॥॥६६॥ काम आणि क्रोध । जीवनाचे वैरी । युक्त झाकाळूनी । फसवीती ॥३-२२॥॥६७॥ खेळ ह्यांचा चाले । ताबा घेऊनीया । मनाचा बुद्धीचा । इन्द्रियांचा ॥३-२३॥॥६८॥ काम तोही शत्रू । नको थारा त्यास । विवेकी रहावे । सर्वकाळ ॥३-२४॥॥६९॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । संवादाने सिद्ध । गीतोपनिषदी । कर्मयोग ॥।३-३५॥
॥७०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश चवथ्या । अध्यायाचा ॥४-१॥॥७१॥ श्रीकृष्ण सांगती । अथपासूनीया । योगाचा तो कैसा । इतिहास ॥४-२॥॥७२॥ ववस्वतालागी । मीच तो कथिला । त्याने तो कथिला । मनूलागी ॥४-३॥॥७३॥ मनूने कथिला । इक्ष्वाकू राजास । परंपरा ऐसी । थोर ह्याची ॥४-४॥॥७४॥ कालौघात पहा । नाशही पावला । आज उजळला । तुझेसाठी ।४-५॥॥७५॥ अर्जुन विचारी । तुझी जन्मकथा । आहे वर्तमान । समोरीच ॥४-६॥॥७६॥ विवस्वत तरी । पुराण पुरुष । तुवाच कथिले । त्यास कैसे ॥४-७॥॥७७॥ श्रीकृष्ण सांगती । तुझे नि माझेही । जन्म खूप झाले । गुह्य तेही ॥४-८॥॥७८॥ माझे स्मरणात । आहेत ते सारे । तुज नाही जाण । उरलेली ॥४-९॥॥७९॥ प्रकृति असते । माझे ठायी नित्य । लय प्रकटन । करीतो मी ॥४-१०॥॥८०॥ अधर्म माजता । घेतो अवतार । ताराया सुष्टाना । दुष्टनाशे ॥४-११॥॥८१॥ गुण आणि कर्म । यांच्या निकषाने । चातुर्वर्ण्य मीच । स्थापीयेला ॥४-१२॥॥८२॥ मीच जाण त्याचा । कर्ता नि अकर्ता । कर्मापासून त्या । अलिप्त मी ॥४-१३॥॥८३॥ कर्मे करावीत । अलिप्त राहून । तेणे कर्मबाधा । नाही होत ॥४-१४॥॥८४॥ मुळात कर्माची । व्याख्याच गहन । केल्याने होते ते । कर्म एक ॥४-१५॥॥८५॥ विरुद्ध विशेष । विपरीत ऐशा । विकर्माने सुद्धा । कर्मज्ञान ॥४-१६॥॥८६॥ अकर्म देखील । कर्माचाच पैलू । कर्म समजण्या । कामी येतो ॥४-१७॥॥८७॥ कोणतेही कर्म । सुरू करताना । कामना संकल्प । असू नये ॥४-१८॥॥८८॥ ज्ञानाग्नीने ज्याची । कर्मे भस्म झाली । पंडित त्यासीच । समजावे ॥४-१९॥॥८९॥ कर्मफलाचे ना । ज्यास देणेघेणे । कर्मे करूनीही । निष्कर्मी तो ॥४-२०॥॥९०॥ सर्व इन्द्रियांच्या । प्राणाच्या कर्मांचे । हवन अर्पावे । योगाग्नीत ॥४-२१॥॥९१॥ योगाग्नी होतसे । ज्ञानदीपाने नि । आत्मसंयमाने । प्रज्वलित ॥४-२२॥॥९२॥ ब्रम्हाने विशद । केले बहु यज्ञ । द्रव्ययज्ञ आणि । तपोयज्ञ ॥४-२३॥॥९३॥ स्वाध्याययज्ञ नि । ज्ञानयज्ञ सुद्धा । प्राणायामयज्ञ । योगयज्ञ ॥४-२४॥॥९४॥ सा-यांची निष्पत्ति । होते कर्मातून । अमृत असते । यज्ञशिष्ट ॥४-२५॥॥९५॥ द्रव्ययज्ञाहूनी । ज्ञानयज्ञ श्रेष्ठ । ज्ञानात विरती । सारी कर्मे ॥४-२६॥॥९६॥ ज्ञानबोध होण्या । करी प्रणिपात । आणि परिप्रश्न । सेवा सुद्धा ॥४-२७॥॥९७॥ ज्ञानोपदेश तो । ज्ञानी तत्त्वदर्शी । ऐशा गुरुसंगे । मेळवावा ॥४-२८॥॥९८॥ ऐसे ज्ञान होता । मोह ना होईल । पाहतां स्वस्थायी । सारी भूतें ॥४-२९॥॥९९॥ अज्ञानाकारणें । झालासे सम्मोह । ज्ञानाने उच्छेद । करी त्याचा ॥४-३०॥॥१००॥ ऐसा सिद्ध झाला । गीतोपनिषदी । ज्ञानकर्मसंन्यास । नामे योग ॥४-३१॥
॥१०१॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश पांचव्या । अध्यायाचा ॥५-१॥॥१०२॥ अर्जुन कृष्णास । कर्मयोग आणि । कर्मसंन्यासही । सांगतोसि ॥५-२॥॥१०३॥ मनी द्विधा होते । तरी दोहोमध्ये । श्रेयस्कर काय । समजावे ॥५-३॥॥१०४॥ श्रीकृष्ण म्हणती । दोन्ही श्रेयस्कर । कर्मयोग परी । जास्त योग्य ॥५-४॥॥१०५॥ कर्म करतां ही । द्वेष ना आकांक्षा । नित्य तो संन्यास । सहजीच ॥५-५॥॥५-६॥ सांख्य आणि योग । वेगळे म्हणणे । बालिशपणा तो । पांडित्य ना ॥५-६॥॥१०७॥ कोणतेही एक । जरी साध्य केले । सारखेच फळ । दोहोंचेही ॥५-७॥॥१०८॥ योग न साधता । संन्यासचि केला । दुःखास कारण । तेंही होते ॥५-८॥॥१०९॥ उठता बसता । ऐकता पाहता । जागेपणी किंवा । स्वप्नात वा ॥५-९॥॥११०॥ इन्द्रियांची कार्ये । इन्द्रियार्थी ऐसे । म्हणूनी करावी । ब्रम्हार्पण ॥५-१०॥॥१११॥ कर्मे तरी जाण । मनाने बुद्धीने । कायेने घडत । असतात ॥५-११॥॥११२॥ सा-याच कर्मांची । फळे टाकल्याने । योग्यास साधते । मनःशान्ति ॥५-१२॥॥११३॥ कर्म वा कर्तृत्व । देव ना निर्मीतो । देव नाही देत । पापपुण्य ॥५-१३॥॥११४॥ कर्मफलाविशी । आसक्त राहणे । अज्ञानाने ज्ञान । गुर्फटणे ॥५-१४॥॥११५॥ अज्ञानतिमिर । ज्याचा दूर झाला । सूर्यासम ज्ञान । उजाळते ॥५-१५॥॥११६॥ उल्हास न व्हावा । प्रिय मिळाल्याने । अप्रिय मिळतां । खेद नको ॥५-१६॥॥११७॥ स्पर्शजन्य जे जे । भोग ते सारेच । नसती शाश्वत । सुखकारी ॥५-१७॥॥११८॥ आदिअन्त त्यांच्या । प्रकृतीत आहे । त्यांत ना रमतो । बुद्धिवन्त ॥५-१८॥॥११९॥ येणे रीती झाला । गीतोपनिषदी । कर्मसंन्यासाचा । योग सिद्ध ॥५-१९॥
॥१२०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सहाव्या । अध्यायाचा ॥६-१॥॥१२१॥ श्रीकृष्ण सांगती । सदा सारी कर्मे । फळाविशी संग । सोडूनीया ॥६-२।॥१२२॥ करणारा योगी । म्हणावा संन्यासी । जाण संन्यासही । योग एक ॥६-३॥॥१२३॥ योगमार्गावर । स्वतःच स्वतःचा । बन्धू किंवा शत्रू । असतो गा ॥६-४॥॥१२४॥ प्रमाणित हवे । सारेच वर्तन । नको अति खाणे । भुकेजणे ॥६-५॥॥१२५॥ अति जागरण । स्वप्नशीलता वा । केल्याने योग ना । साध्य होतो ॥६-६॥॥१२६॥ पुनीत प्रदेशी । स्थिर आसनाने । नाही अति उंच । किंवा खोल ॥६-७॥॥१२७॥ एकाग्र मनाने । इन्द्रियावरती । ताबा ठेऊनीया । ध्यान व्हावे ॥६-८॥॥१२८॥ जेव्हां जेव्हां मन । पळाया पाहील । काबूत आणावे । लगोलग ॥६-९॥॥१२९॥ धीरे धीरे ऐसी । साधना वाढता । विचाररहित । मन व्हावे ॥६-१०॥॥१३०॥ सर्वभूताठायी । आपणासी पाहे । पाही सर्वभूतें । स्वतःठायी ॥६-११॥॥१३१॥ मज जळी काष्ठी । पाषाणीही पाहे । पाहे सर्वभूतें । मजठायी ॥६-१२॥॥१३२॥ मजसी तो प्रिय । सर्वथा सदैव । मीही त्यासी प्रिय । सर्वकाळ ॥६-१३॥॥१३३॥ अर्जुन विचारे । ऐसा साम्ययोग । सर्वकाळ स्थिर । राहील कां ॥६-१४॥॥१३४॥ मानवी मनाचा । गुण चंचलता । वारा बन्धनात । राहतो कां ॥६-१५॥॥१३५॥ श्रीकृष्ण सांगती । साम्यस्थिति आहे । कठीण जरूर । अशक्य ना ॥६-१६॥॥१३६॥ मनास काबूत । ठेवाया लागती । प्रयत्न आणीक । साधनाही ॥६-१७॥॥१३७॥ अर्जुनाचे मनी । तरीही जिज्ञासा । श्रद्धाळू चळता । त्याचे काय ॥६-१८॥॥१३८॥ श्रीकृष्ण सांगती । भले जे जे केले । वांया नाही जात । कधीच तें ॥६-१९॥॥१३९॥ योगभ्रष्टासही । शक्य पुनर्जन्म । पवित्र श्रीमन्त । कुळामध्ये ॥६-२०॥॥१४०॥ किंवा कुणा योगी- । कुळामध्ये शक्य । जन्मलाभ जरी । दुर्लभ हें ॥६-२१॥॥१४१॥ पूर्वसंचिताचा । संयोग लाभता । पुनश्च साधना । सुरू होते ॥६-२२॥॥१४२॥ अनेक जन्मांच्या । ऐशा साधनेने । परम गतीची । प्राप्ति होते ॥६-२३॥॥१४३॥ तपस्व्याहून नि । ज्ञान्याहून आणि । कर्मी लोकांपेक्षा । श्रेष्ठ योगी ॥६-२४॥॥१४४॥ म्हणून अर्जुना । बन योगी बरा । माझा गा आग्रह । तुजलागी ॥६-२५॥॥१४५॥ योग्यामध्ये सुद्धा । युक्ततम जाण । मद्गत जो झाला । अन्तरात्मी ॥६-२६॥॥१४६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । आत्मसंयमाचा । योग सिद्ध ॥६-२७॥
॥१४७॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सातव्या । अध्यायाचा ॥७-१॥॥१४८॥ श्रीकृष्ण सांगती । समग्रपणाने । मज जाणशील । ऐसे ज्ञान ॥७-२॥॥१४८॥ अवगत होतां । जाणावेसे काहीं । बाकी न उरेल । ऐक तेंच ॥७-३॥॥१४९॥ हजारोंच्या पैकी । एकादाच कुणी । सिद्धीसाठी यत्न । करूं जातो ॥७-४॥॥१५०॥ त्यांच्यापैकी कोणी । एकादा क्वचित । तत्त्वाने मजसी । ओळखतो ॥७-५॥॥१५१॥ अपरा प्रकृती । आहे गा अष्टधा । भूमी आप वायू । अग्नि आणि ॥७-६॥॥१५२॥ आकाश नि मन । बुद्धि अहंकार । जीवांची प्रकृति । परा जाण ॥७-७॥॥१५३॥ ऐशा सा-या जगा । प्रकट करीतो । मीच प्रलयही । घडवीतो ॥७-८॥॥१५४॥ माझ्यावीण कांही । नाहीच आगळे । धाग्यात मणि कां । ओवलेले ॥७-९॥॥१५५॥ प्रवाही पदार्था-। मधील रस मी । चन्द्र्सूर्यांचे ते । तेज मीच ॥७-१०॥॥१५६॥ सर्व वेदांतील । ॐ कारही मीच । अवकाशी नाद । तोही मीच ॥७-११॥॥१५७॥ मानवी पौरूष । हवेतील गंध । सर्वभूतांठायी । श्वास मीच ॥७-१२॥॥१५८॥ सात्त्विक राजस । तामस ते भाव । माझ्यातून होती । प्रसृत गा ॥७-१३॥॥१५९॥ त्रिगुणात्मक ह्या । भावांच्या मोहांत । असते जग गा । गुर्फटले ॥७-१४॥॥१६०॥ माझ्याशी शरण । होती जे जे कोणी । तरून ते जाती । माया सारी ॥७-१५॥॥१६१॥ आसूरी वृत्तीचे । अज्ञानी वा मूढ । मजकडे कधी । येतील ना ॥७-१६॥॥१६२॥ मजकडे येण्या । प्रवृत्त होतात । चार कारणानी । जन पहा ॥७-१७॥॥१६३॥ असह्य दुःखांचे । प्रयत्न थकतां । आर्त जन येती । मजकडे ॥७-१८॥॥१६४॥ जिज्ञासा दाटतां । मनांत कोण मी । जिज्ञासूही येती । मजकडे ॥७-१९॥॥१६५॥ इच्छित फलाच्या । प्राप्तीच्या आशेने । अर्थार्थीही येती । मजकडे ॥७-२०॥॥१६६॥ ज्ञानी जे जाणती । मी कोण समग्र । ते तरी राहती । मम ठायी ॥७-२१॥॥१६७॥ कामनांचा गुंता । हरपतो ज्ञान । ज्याची जी प्रकृति । तैसे होते ॥७-२२॥॥१६८॥ अज्ञानी म्हणती । होतो मी अव्यक्त । आता व्यक्त झालो । समजती ॥७-२३॥॥१६९॥ मी तरी अव्यय । मग जन्म कैसा । भूत वर्तमान । भविष्यही ॥७-२४॥॥१७०॥ जाणतो मी सारे । मज न जाणती । कोणी युक्तभावे । मोहामुळे ॥७-२५॥॥१७१॥ इच्छा द्वेष ह्यानी । मोहात् द्वंद्वात । पहा सारी भूतें । गुंतलेली ॥७-२६॥॥१७२॥ पुण्यकर्मी जन । पापमुक्त होतां । द्वंद्व मोह त्यांचे । सरतात ॥७-२७॥॥१७३॥ माझेठायी मग । आश्रय धरीतां । सारे ब्रम्हज्ञान । आकळते ॥७-२८॥॥१७४॥ काय तें अध्यात्म । कर्म अधिभूत । काय अधिदैवी । अधियज्ञी ॥७-२९॥॥१७५॥ सारे जाणूनीया । अन्तकाळी सुद्धा । युक्तच राहते । त्यांचे चित्त ॥७-३०॥॥१७६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ज्ञानविज्ञानाचा । योग सिद्ध ॥७-३१॥
॥१७७॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश आठव्या । अध्यायाचा ॥८-१॥॥१७८॥ अर्जुनाचा प्रश्न । ब्रम्ह म्हंजे काय । अध्यात्म तें काय । कर्म काय ॥८-२॥॥१७९॥ अधिभूत काय । अधिदैवी काय । अधियज्ञी काय । सांग मज ॥८-३॥॥१८०॥ आत्म्यासी नियत । ठेऊनी ज्ञेय तूं । अन्तकाळी कैसा । सांग मज ॥८-४॥॥१८१॥ अक्षर परम । तेचि ब्रम्ह जाण । अध्यात्म म्हणजे । स्वभावचि ॥८-५॥॥१८२॥ कर्म तरी जाण । भूत वर्तमान । भविष्य हें सारे । घडवीते ॥८-६॥॥१८३॥ जे जे नष्ट होते । अधिभूत सारे । पुरूष तो जाण । अधिदैवी ॥८-७॥॥१८४॥ देहधा-यामध्ये । श्रेष्ठ जो मी येथे । मीच अधियज्ञी । अर्जुना गा ॥८-८॥॥१८५॥ अन्तकाळी जो कां । मजसी स्मरूनी । देह टाकण्याचा । यत्न करी ॥८-९॥॥१८६॥ मजठायी तो गा । निश्चित पोचतो । होते हे ऐसेच । निःसंशय ॥८-१०॥॥१८७॥ देह टाकताना । जो जो कांही भाव । स्मरणी राहतो । तैसी गति ॥८-११॥॥१८८॥ आत्म्यास मिळते । म्हणूनी अर्जुना । सदैव मजसी । स्मरूनीया ॥८-१२॥॥१८९॥ कर्म वा युद्ध वा । मजसी अर्पूनी । राहशील पहा । मम ठायी ॥८-१३॥॥१९०॥ प्रयाणाचे वेळी । अचल मनाने । योगबलाने नि । भक्तिपूर्ण ॥८-१४॥॥१९१॥ भुवयांच्या मध्ये । आणूनीया प्राण । दिव्यपुरुषत्व । प्राप्त होते ॥८-१५॥॥१९२॥ सारी नऊ द्वारे । संयत करूनी । मनास रोधूनी । हृदयांत ॥८-१६॥॥१९३॥ प्राण नेऊनीया । मस्तकीच्या चक्री । ॐ कार स्थितीत । स्थिर होत ॥८-१७॥॥१९४॥ प्राण सोडण्यास । प्रयत्न केल्याने । परम गति गा । प्राप्त होते ॥८-१८॥॥१९५॥ चित्ती माझ्याविना । अन्य कांही नाही । केवळ स्मरती । मज नित्य ॥८-१९॥॥१९६॥ ऐशा नित्ययुक्त । योग्यास सुलभ । मजप्रत येणे । अन्तकाळी ॥८-२०॥॥१९७॥ मजप्रत येतां । नाही पुनर्जन्म । तें तो अशाश्वत। दुःखपूर्ण ॥८-२१॥॥१९८॥ पुनरावर्तन । भुवनी भरले । मजप्रत येतां । सरतें तें ॥८-२२॥॥१९९॥ ब्रम्हाचा दिवस । सहस्र युगांचा । रात्रही सहस्र । युगांची गा ॥८-२३॥॥२००॥ उजाडणे म्हंजे । अव्यक्तामधून । सारे व्यक्त होते । समजावे ॥८-२४॥॥२०१॥ रात्री सारे पुन्हा । अव्यक्तात लीन । होते इतुकेच । समजावे ॥८-२५॥॥२०२॥ भूतग्राम सारे । येणे रीती होते । अव्यक्त नि व्यक्त । पुनःपुन्हा ॥८-२६॥॥२०३॥ परं भाव परी । आहे सनातन । जाण अविनाशी । अक्षर हा ॥८-२७॥॥२०४॥ परम गति ती । परम धाम तें । तिथून नाहीच । परतणें ॥८-२८॥॥२०५॥ आहेही संकेत । अन्तकाळासाठी । असतां उजेड । शुक्लपक्ष ॥८-२९॥॥२०६॥ उत्तरायणाचा । महीना असतां । योग्यास ब्रम्हत्व । शक्य होते ॥८-३०॥॥२०७॥ रात्री सायंकाळी । कृष्णपक्षामध्ये । दक्षिणायनाच्या । सहा मासी ॥८-३१॥॥२०८॥ ज्यांना अन्तकाळ । येतो त्या योग्याना । चन्द्रज्योतीसम । प्रत्यय गा ॥८-३२॥॥२०९॥ शुक्ल आणि कृष्ण । गति ऐशा दोन । आवृत्ति निवृत्ति । त्यांचे भाव ॥८-३३॥॥२१०॥ जगाची रहाटी । ऐसीच चालते । योग्यास नसते । त्याचे कांहीं ॥८-३४॥॥२११॥ वेदाध्यननाने । यज्ञांनी तपाने । दानाने मिळते । जें जें पुण्य ॥८-३५॥॥२१२॥ त्याहून श्रेष्ठसे । योग्यास मिळते । स्थान म्हणूनीया । व्हावे योगी ॥८-३६॥॥२१३॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । अक्षरब्रम्ह हा । योग सिद्ध ॥८-३७॥
॥२१४॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश नवव्या । अध्यायाचा ॥९-१॥॥२१५॥ श्रीकृष्ण सांगती । गुह्यतम ऐसे । विज्ञानासहित । ज्ञान ऐक ॥९-२॥॥२१६॥ अव्यक्ती राहून । मीच सारे जग । निर्मीले मत्स्थायी । सारी भूतें ॥९-३॥॥२१७॥ कल्पाचीये अन्ती । सारी भूतें जाती । मीच निर्मिलेल्या । प्रकृतीत ॥९-४॥॥२१८॥ कल्पाचे प्रारंभी । पुन्हा सारी भूतें । प्रसृत करीतो । प्रकृतीत ॥९-५॥॥२१९॥ भूतांचा मी कर्ता । धाताही भूतांचा । प्रकृतीचे मार्गे । चालवीतो ॥९-६॥॥२२०॥ प्रकृतीचे वशी । ठेवूनीया भूतें । ऐसेनी असक्त । राहतो मी ॥९-७॥॥२२१॥ परं भाव माझा । मूढ न जाणती । मजला माणूस । समजती ॥९-८॥॥२२२॥ परंतु महात्मे । मजसी अव्यय । जाणूनी अनन्य । भजतात ॥९-९॥॥२२३॥ जगाचा मी पिता । माता आणि धाता। ऋक् साम यजु मी । ॐ कार मी ॥९-१०॥॥२२४॥ अनन्य चित्ताने । भजती जे मज । त्यांचा योगक्षेम । वाहतो मी ॥९-११॥॥२२५॥ इतर दैवते । भजतात जे कां । तीही भक्ती येते । मजप्रत ॥९-१२॥॥२२६॥ देवयज्ञ आणि । पितृयज्ञ किंवा । भूतयज्ञ ऐसे । आचरती ॥९-१३॥॥२२७॥ सर्वच यज्ञांचा । प्रभू मी भोक्ता मी । मजसी तत्त्वाने । जाणावे कीं ॥९-१४॥॥२२८॥ पत्री फळे फुले । तोयही भक्तीने ।अर्पीतां होतो मी । संतुष्ट बा ॥९-१५॥॥२२९॥ जें जें करशील । जें जें तूं खाशील । देशील घेशील । सर्व सर्व ॥९-१६॥॥२३०॥ करी मदर्पण । तरी शुभाशुभ । कर्माचे तुजसी । राहील ना ॥९-१७॥॥२३१॥ मदर्पण भाव । कोणी आचरती । स्त्रिया वैश्य शूद्र । कोणीही गा ॥९-१८॥॥२३२॥ परम गतीच । मिळते अर्पणी । ब्राम्हण राजर्षी । यांना खास ॥९-१९॥॥२३३॥ पुण्यशील वृत्ती । भक्तीमध्ये रत । होतां सुख मिळे । शाश्वत तें ॥९-२०॥॥२३४॥ होई तूं मन्मना । मद्भक्त मद्याजी । करी तूं नमन । मजप्रत ॥९-२१॥॥२३५॥ मत्परायणसा । योग साधशील । मम ठायी भक्ता । राहशील ॥९-२२॥॥२३६॥ श्रीकृष्ण अर्जुन । संवादाने सिद्ध । योग राजविद्या- ॥ राजगुह्य ॥९-२३॥
॥२३७॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ दहाव्या । अध्यायास ॥१०-१॥॥२३८॥ श्रीकृष्ण सांगती । माझे जें प्रभुत्व । महर्षीना सुद्धा । आकळे ना ॥१०-२॥॥२३९॥ मीच बहुविध । भाव रुजवीले । भूतांचिये ठायी । पहा किती ॥१०-३॥॥२४०॥ बुद्धि ज्ञान क्षमा । सुख दुःख भय । अभय अहिंसा । तप दान ॥१०-४॥॥२४१॥ यश अपयश । भव नि अभाव । शम दम तुष्टि । समताही ॥१०-५॥॥२४२॥ सात ते महर्षी । आणि चार मनु । माझेच भाव ते । ध्यानी घेई ॥१०-६॥॥२४३॥ त्यांचेच वंशज । सारी प्रजा खरी । माझ्यातून सारे । प्रवर्तते ॥१०-७॥॥२४४॥ ऐसे हे जाणून । बुद्ध जे जाहले । माझे संकीर्तनी । रमतात ॥१०-८॥॥२४५॥ ऐशा प्रियजना । देतो बुद्धियोग । अनुकंपा माझी । समजती ॥१०-९॥॥२४६॥ नाशीतो अंधार । त्यांच्या अज्ञानाचा । ज्ञानदीपाने मी । उजाळतो ॥१०-१०॥॥२४७॥ अर्जुन रंगला । स्तुति उधळीत । तूंच परब्रम्ह । परंधाम ॥१०-११॥॥२४८॥ शाश्वत पुरुष । दिव्य आदिदेव । कितीसे वर्णीती । ऋषीमुनी ॥१०-१२॥॥२४९॥ देवर्षी नारद । असित व्यासही । स्वतःही मजसी । सांगीतले ॥१०-१३॥॥२५०॥ मजसी सांगण्या । वाटते कारण । तुजसी जाणीले । नाही कोणी ॥१०-१४॥॥२५१॥ केवळ तूंच तूं । स्वतःस जाणीसी । भूतभावन तूं । जगत्पते ॥१०-१५॥॥२५२॥ कोणकोणत्या गा । विभूतीरूपांत । दिसतोस सांग । सांगोपांग ॥१०-१६॥॥२५३॥ सांग विस्ताराने । कितीवेळा ऐकूं । कान अतृप्तचि । राहतात ॥१०-१७॥॥२५४॥ श्रीकृष्ण सांगती । माझ्या विभूतींचा । नाही कांहीं अंत । तरी ऐक ॥१०-१८॥॥२५५॥ प्रमुख उल्लेख । केवळ सांगतो । सर्वभूताठायी । आत्मा मीच ॥१०-१९॥॥२५६॥ सर्वच भूतांचा । आदि मध्य अंत । आदित्यांच्यामध्ये । विष्णू जाण ॥१०-२०॥॥२५७॥ ज्योतिर्मयामध्ये । रवि आहे जाण । मरीची मी जाण । मरुतात ॥१०-२१॥॥२५८॥ नक्षत्रसमूही । चन्द्र मी शीतल । वेदांमध्ये श्रेष्ठ । सामवेद ॥१०-२२॥॥२५९॥ देवांमध्ये मी ना । वासुदेव ज्ञात । इन्द्रियांचे ठायी । मीच मन ॥१०-२३॥॥२६०॥ भूतांची चेतना । रुद्रांचा शंकर । यक्षरक्षसांचा । वित्तेश मी ॥१०-२४॥॥२६१॥ वसू मी पावक । पर्वतांचा मेरु । पुरोधसांमध्ये । बृहस्पति ॥१०-२५॥॥२६२॥ सेनानीत स्कंद । जलाशयामध्ये । सागर मी भृगु । महर्षीत ॥१०-२६॥॥२६३॥ ॐ कार वाणीत । यज्ञीं जपयज्ञ । स्थावरामध्ये मी । हिमालय ॥१०-२७॥॥२६४॥ वृक्षांत अश्वत्थ । देवर्षी नारद । गन्धर्वांचा जाण । चित्ररथ ॥१०-२८॥॥२६५॥ सिद्धांमध्ये मुनि । कपिल आणिक । अश्वांमध्ये जाण । उच्चैःश्रवा ॥१०-२९॥॥२६६॥ अमृतातून गा । उद्भव माझा ही । गजेन्द्रामध्ये मी । ऐरावत ॥१०-३०॥॥२६७॥ नरांमध्ये राजा । आयुधांत वज्र । गायींमध्ये जाण । कामधेनु ॥१०-३१॥॥२६८॥ प्रजनी कन्दर्प । सर्पात वासुकी । अनन्त नागात । वरुण मी ॥१०-३२॥॥२६९॥ पितरामध्ये मी । अर्यमा आणिक । संयमींच्यामध्ये । यम मीच ॥१०-३३॥॥२७०॥ दैत्यांत प्रल्हाद । बदलांचा काल । मृगांचा मृगेन्द्र । मीच जाण ॥१०-३४॥॥२७१॥ पक्षांत गरुड । वाहत्यांचा वात । शस्त्रधा-यामध्ये । राम मीच ॥१०-३५॥॥२७२॥ सरपटणा-या । जीवांत मकर । प्रवाहामध्ये मी । भागीरथी ॥१०-३६॥॥२७३॥ सर्गांचा मीच गा । आदि मध्य अंत । विद्यांमध्ये जाण । अध्यात्म मी ॥१०-३७॥॥२७४॥ प्रवादीं वाद मी । अक्षरीं अकार । समासांमध्ये मी । द्वन्द्व जाण ॥१०-३८॥॥२७५॥ अक्षय काल मी । धाता मी विश्वाचा । सर्वहर मृत्यू । मीच जाण ॥१०-३९॥॥२७६॥ उद्भव करीतो । मीच भविष्याचा । कीर्ति श्री नि वाचा । स्मृति मेधा ॥१०-४०॥॥२७७॥ धृति क्षमा सारे । नारीरूपी भाव । सामामध्ये मीच । बृहत्साम ॥१०-४१॥॥२७८॥ छन्दांत गायत्री । मासी मार्गशीर्ष । ऋतूंत वसन्त । मज जाण ॥१०-४२॥॥२७९॥ छळांमध्ये द्यूत । तेजस्व्यांचे तेज । जय व्यवसाय । तेही मीच ॥१०-४३॥॥२८०॥ सात्विकांचे सत्त्व । वृष्णींचा मी कृष्ण । पाण्डवामध्ये मी । धनंजय ॥१०-४४॥॥२८१॥ मुनींमध्ये व्यास । कवींचा उशना । दमनसाधनीं । दण्ड मीच ॥१०-४५॥॥२८२॥ वर्तनांत नीति । गुह्यांमध्ये मौन । ज्ञानीयांचे ज्ञान । मीच जाण ॥१०-४६॥॥२८३॥ सर्वच भूतांचे । मूळबीज मीच । त्यावीण नसते । चराचरीं ॥१०-४७॥॥२८४॥ माझ्या विभूतींच्या । वैविध्यास कधी । नसतोच अन्त । झलक ही ॥१०-४८॥॥२८५॥ जे जे विशेषत्व । ऊर्जित श्रीमत । माझ्याच तेजाचा । जाण अंश ॥१०-४९॥॥२८६॥ अन्यथा तुजसी । जाणून हे सारे । काय मतलब । अर्जुना गा ॥१०-५०॥॥२८७॥ सारे जग मज । अंश मात्र मज । ऐशापरी जाण । प्रमाण गा ॥१०-५१॥॥२८८॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । विभूतियोग हा । ऐसा सिद्ध ॥१०-५२॥
॥२८९॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अकराव्या ॥११-१॥॥२९०॥ अर्जुन म्हणतो । गुह्य हें सांगूनी । केला अनुग्रह । मजवरी ॥११-२॥॥२९१॥ ऐकूनी हें सारे । गेला माझा मोह । माहात्म्य अव्यय । भगवंता ॥११-३॥॥२९२॥ पहावे वाटते । ईश्वरी स्वरूप । शक्य कां पाहणें । इये डोळां ॥११-४॥॥२९३॥ श्रीकृष्ण म्हणती । पहा गा अर्जुना । शेकडो हजारो । रूपें तरी ॥११-५॥॥२९४॥ अनेक वर्णांच्या । अनेक आकृती । नानाविध दिव्ये । पाहूनी घे ॥११-६॥॥२९५॥ पाही आदित्यांना । वसूना रुद्राना । दोन्ही अश्विनीना । मरुताना ॥११-७॥॥२९६॥ कधी ना देखीली । ऐसीही आश्चर्ये । घेई पाहूनीया । प्रसन्न मी ॥११-८॥॥२९७॥ एकवटलेली । चराचर सृष्टी । सारे जग पाही । एके ठायी ॥११-९॥॥२९८॥ मानवी डोळ्यानी । पाहणे ना शक्य । दिव्यदृष्टी देतो । पाहण्यास ॥११-१०॥॥२९९॥ संजय वर्णीतो । धृतराष्ट्रालागी । दर्शन जे झाले । अर्जुनास ॥११-११॥॥३००॥ अनेक शरीरे । किती तळपत्या । दिव्य आयुधांनी । नटलेली ॥११-१२॥॥३०१॥ दिव्य वस्त्रे माळा । दिव्य गन्धलेप । अद्भुत दर्शन । देवाचे ते ॥११-१३॥॥३०२॥ हजारो सूर्यही । एकाच वेळी कां । प्रकट होतील । आकाशात ॥११-१४॥॥३०३॥ निव्वळ भासच । महान तेजाचा । म्हणावे इतुके । तेजःपुंज ॥११-१५॥॥३०४॥ रोमांच उठले । अर्जुनाचे देही । कृष्णास वंदन । करी म्हणे ॥११-१६॥॥३०५॥ दिसतात देव । ब्रम्हा ईश ऋषी । विशेष भूतांचे । संघ किती ॥११-१७॥॥३०६॥ अनेक बाहूनी । सजलेसे रूप । यासी आदि मध्य । अंत नाही ॥११-१८॥॥३०७॥ आगीचा डोंब कां । झाला तेजोमय । प्रकाश प्रकाश । सर्वदूर ॥११-१९॥॥३०८॥ विश्वाचे निधान । तूंच गा निश्चित । शाश्वत धर्माचे । गुपित तूं ॥११-२०॥॥३०९॥ सूर्यचन्द्र डोळे। तेजाचेच वस्त्र । विश्वात भरला । तेजाग्नि तूं ॥११-२१॥॥३१०॥ पृथ्वी नि आकाश । यातील अंतर । आणि सर्व दिशा । व्यापल्यास ॥११-२२॥॥३११॥ अद्भुत नि उग्र । ऐशा ह्या रूपाने । कंपित जाहले । तीन्ही लोक ॥११-२३॥॥३१२॥ सुरांचे संघही । कांहीसे भ्यालेले । स्तुतिसुमने की । उधळती ॥११-२४॥॥३१३॥ महर्षी सिद्धांचे । संघ विनवती । स्वस्ति म्हणताती । स्तवनात ॥११-२५॥॥३१४॥ रुद्रादित्य वसू । गंधर्व नि यक्ष । विस्मित पाहती । तुज सारे ॥११-२६॥॥३१५॥ नभी भिडलेले । नेत्र विस्फारित । रूप ऐसे तुझे । पाहूनिया ॥११-२७॥॥३१६॥ दिशाहीन मन । धृति हरपली । वाटते कालाग्नि । झेप घेतो ॥११-२८॥॥३१७॥ सा-या कौरवाना । राजाना भीष्माना । द्रोण कर्ण ह्याना । कितीकाना ॥११-२९॥॥३१८॥ वाटते सर्वाना । विक्राळ हें तोंड । ओढूनीया घेते । वेगे किती ॥११-३०॥॥३१९॥ दातांमध्ये चूर्ण । होताहेत सारे । तुकडे तुकडे । होऊनीया ॥११-३१॥॥३२०॥ जैसे कीं पतङ्गा । ज्योत आकर्षिते । नाश त्यांचा होतो । शीघ्रतेने ॥११-३२॥॥३२१॥ तैसेच वाटते । कराल मुख हें । जगाचाच घास । घेते काय ॥११-३३॥॥३२२॥ सांग तूं कोण बा । उग्ररूपधारी । प्रसन्न होई गा । वंदितो मी ॥११-३४॥॥३२३॥ श्रीकृष्ण म्हणती । लोकक्षयासाठी । ठाकलो आहे मी । काल जाण ॥११-३५॥॥३२४॥ तुजसी कांहीही । वाटत असेल । इथे जे समोरी । योद्धे उभे ॥११-३६॥॥३२५॥ त्यांच्यापैकी कोणी । नाही उरायचे । आधीच मारले । मीच त्याना ॥११-३७॥॥३२६॥ निमित्त केवळ । व्हावयाचे तुज । होई सज्ज यश । होईल गा ॥११-३८॥॥३२७॥ भीष्म द्रोण कर्ण । जयद्रथ आणि । कितीक मृतांचे । दुःख कैचे ॥११-३९॥॥३२८॥ ऐकून कृष्णाचे । वचन अर्जुन । वंदन करूनी । म्हणे ऐसे ॥११-४०॥॥३२९॥ तुझ्या ह्या रूपाला । राक्षसही भ्याले । सारेच वंदन । करतात ॥११-४१॥॥३३०॥ सखा तुज ऐसे । बरळलो किती । प्रमाद कितीक । झाले वाटे ॥११-४२॥॥३३१॥ पिता पुत्रालागी । सखा सखयास । क्षमा करतो की । तैसे कर ॥११-४३॥॥३३२॥ कधी न देखीलें । ऐसें तुझें रूप । पाहूनी झालो मी । भयग्रस्त ॥११-४४॥॥३३३॥ तरी नेहमीच्या । किरीटधारी नि । गदाधारी रूपी । राही बरा ॥११-४५॥॥३३४॥ श्रीकृष्ण सांगती । केवळ प्रसन्न । होऊनी दावीलें । ऐसे रूप ॥११-४६॥॥३३५॥ देवांचे मनीही । आस दर्शनाची । ऐशा ह्या रूपाच्या । नेहमीच ॥११-४७॥॥३३६॥ वेदाभ्यास तप । दान यज्ञ केले । तरी ऐसे रूप । नव्हे साध्य ॥११-४८॥॥३३७॥ केवळ अनन्य । भक्ती करणारा । मजसी तत्त्वाने । जाणतो गा ॥११-४९॥॥३३८॥ गीतोपनिषदी । संवाद चालता । देखीले अर्जुने । विश्वरूप ॥११-५०॥
॥३३९॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ बाराव्या । अध्यायास ॥१२-१॥॥३४०॥ अर्जुनाचा प्रश्न । नेहमीच युक्त । राहूनी जे भक्ती । करतात ॥१२-२॥॥३४१॥ किंवा जे तुजसी । मानती अव्यक्त । अक्षर यांपैकी । श्रेष्ठ कोण ॥१२-३॥॥३४२॥ माझेशी जे मन । ठेऊनी श्रद्धेने । भजती ते तरी । युक्त खरे ॥१२-४॥॥३४३॥ अव्यक्त अक्षर । मानूनी स्वयत्ने । इन्द्रिये ताब्यात । ठेऊनीया ॥१२-५॥॥३४४॥ सर्वभूतां हित । स्वतः समबुद्धि । तेही पहा येती । मजप्रत ॥१२-६॥॥३४५॥ अव्यक्तीं आसक्ती । ती तो कष्टप्रद । अव्यक्त निधान । अखेरचे ॥१२-७॥॥३४६॥ जे कां सारी कर्में । मजसी अर्पूनी । अनन्यपणाने । ध्याती मज ॥१२-८॥॥३४७॥ भवसागरी मी । त्वरेने तारीतो । समुद्धार त्यांचा । करीतो मी ॥१२-९॥॥३४८॥ बुद्धीचा निवेश । करी मम ठायी । माझेच निवासी । राहशील ॥१२-१०॥॥३४९॥ मम ठायी चित्त । करणे कठीण । वाटल्यास इच्छा । मनी धरी ॥१२-११॥॥३५०॥ इच्छा करणेही । वाटेल कठीण । मदर्थचि करी । सारी कर्मे ॥१२-१२॥॥३५१॥ हेही जरी वाटे । कठीण तरी गा । सर्वकर्मफले । त्यागावीत ॥१२-१३॥॥३५२॥ अभ्यासापरीस। ज्ञान जाण श्रेष्ठ । ज्ञानापेक्षा श्रेष्ठ । जाण ध्यान ॥१२-१४॥॥३५३॥ ध्यानापेक्षा श्रेष्ठ । कर्मफलत्याग । त्यागाने मिळते । नित्य शांति ॥१२-१५॥॥३५४॥ मित्र सर्वभूतां । सुखदुःखी सम । सतत संतुष्ट । क्षमाशील ॥१२-१६॥॥३५५॥ माझे नाहीं कांही । ऐसा मनी दृढ । मनबुद्धि मज । अर्पिलेली ॥१२-१७॥॥३५६॥ जयाविशी वाटे । सर्वानाच प्रेम । ज्याचे मनी प्रेम । सर्वांसाठी ॥१२-१८॥॥३५७॥ नाही अति हर्ष । नाहीच उद्वेग । नाही आकांक्षा वा । नाही भय ॥१२-१९॥॥३५८॥ नाही शुभाशुभ । ना मानापमान । स्तुति वा निंदा वा । मानी सम ॥१२-२०॥॥३५९॥ ऐसा भक्त मज । नेहमीच प्रिय । हे जे सांगीतले । अमृतचि ॥१२-२१॥॥३६०॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ऐसा झाला सिद्ध । भक्तियोग ॥१२-२२॥
॥३६१॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ तेराव्या । अध्यायास ॥१३-१॥॥३६२॥ श्रीकृष्ण सांगती । देह जाण क्षेत्र । ह्यास जाणणारा । क्षेत्रज्ञ तो ॥१३-२॥॥३६३॥ सारीच क्षेत्रे मी । जाणीतो म्हणूनी । क्षेत्रक्षेत्रज्ञत्व । तें ज्ञान माझे ॥१३-३॥॥३६४॥ क्षेत्र म्हंजे काय । विकारही त्याचे । प्रभाव तयाचा । कैसा असे ॥१३-४॥॥३६५॥ कितीक ऋषीनी । छंदात वर्णीले । मांडीली वैशिष्ट्ये । ब्रम्हसूत्री ॥१३-५॥॥३६६॥ पांची महाभूतें । अहंकार मन । बुद्धि नि अव्यक्ती । दशेन्द्रियें ॥१३-६॥॥३६७॥ पंचप्राण इच्छा । द्वेष सुख दुःख । चेतना नि धृति । ऐसा मेळा ॥१३-७॥॥३६८॥ तोचि जाण क्षेत्र । ह्याचा स्वभावचि । सदा बदलतो । नाही स्थिर ॥१३-८॥॥३६९॥ ज्ञान सिद्ध होण्या । हवें अमानित्व । अहिंसाही हवी । नको दंभ ॥१३-९॥॥३७०॥ क्षांति नि ऋजुता । भावें गुरुसेवा । पावित्र्य नि स्थैर्य । विनिग्रह ॥१३-१०॥॥३७१॥ सद्गुणचि ज्ञान । याच्या जें उलटें । अज्ञान म्हणती । भगवंत ॥१३-११॥॥३७२॥ जाणावेसे जें जें । ज्ञेय तया नांव । प्रकाशते तेव्हां । ज्ञान होते ॥१३-१२॥॥३७३॥ ज्ञान सिद्ध होण्या । क्षेत्र स्वच्छ हवें । म्हणूनी सद्गुण । जोपासावे ॥१३-१३॥॥३७४॥ प्रकृति पुरुष । दोन्ही ते अनादि । प्रकृति स्वभावें । गुणमयी ॥१३-१४॥॥३७५॥ प्रकृतिस्थ होतां । प्रकृतिनुरूप । पुरुष भोगतो । गुण तैसे ॥१३-१५॥॥३७६॥ भोगांत गुंतला । जीव तें पाहून । दूरच राहतो । परमात्मा ॥१३-१६॥॥३७७॥ जीवानें धरीतां । नैतिक भूमिका । शाब्बास म्हणतो । जवळूनी ॥१३-१७॥॥३७८॥ आर्तता जाहल्या । देव धांव घेतो । जैसे द्रौपदीस । सांवरीले ॥१३-१८॥॥३७९॥ भूतमात्री जरी । विखुरलें वाटे । अखंड सर्वत्र । एक तत्त्व ॥१३-१९॥॥३८०॥ सर्वान्तरी वास । करीतें जरी हें । सर्वासभोंवती । हेंचि आहे ॥१३-२०॥॥३८१॥ कोठेही न जाई । थांबे ना कधीही । जवळीच आहे । दूर सुद्धां ॥१३-२१॥॥३८२॥ नव्हे हा व्यत्यास । आहे प्रमेयचि । ज्यास उमगलें । धन्य झाला ॥१३-२२॥॥३८३॥ त्यानेच ना दिले । सारेच जीवन । अर्पण करावें । त्याचें त्यास ॥१३-२३॥॥३८४॥ क्षेत्रक्षेत्रज्ञाचा । ऐसा पहा योग । गीतोपनिषदी । झाला सिद्ध ॥१३-२४॥
॥३८५॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ चौदाव्या । अध्यायास ॥१४-१॥॥३८६॥ आधी तेराव्यात । म्हटले पुरुष । होतो गुणमयी । प्रकृतिस्थ ॥१४-२॥॥३८७॥ सत्त्व रज तम । गुणांचे प्रभाव । इथे चौदाव्यात । सांगीतले ॥१४-३॥॥३८८॥ गुण ठेवताती । पुरुषा देहात । अपुल्या प्रकारे । गुंतवूनी ॥१४-४॥॥३८९॥ सुख आणि ज्ञान । बंधने सत्त्वाची । रजाची बंधने । राग तृष्णा ॥१४-५॥॥३९०॥ प्रमाद आळस । निद्रा तमोगुणी । बंधने ही भूल । पाडताती ॥१४-६॥॥३९१॥ रज आणि तम । याहूनी अधिक । जरी सत्त्वगुण । सात्त्विक तो ॥१४-७॥॥३९२॥ तसेंच ठरतें । कोण बा राजसी । कोण बा तामसी । म्हणावा तें ॥१४-८॥॥३९३॥ फळ तें निर्मळ । सात्त्विक गुणांचे । निष्पत्ति दुःखद । राजसाची ॥१४-९॥॥३९४॥ तामस्यास फळ । अज्ञान म्हटलें । कनिष्ठ तें पहा । दुःखाहून ॥१४-१०॥॥३९५॥ त्रिगुणांचा खेळ । माझाच हें ज्यास । समजलें तोच । खरा द्रष्टा ॥१४-११॥॥३९६॥ देहधारी होणें । कारण त्रिगुणा । त्यांच्या पलीकडे । ध्यान हवें ॥१४-१२॥॥३९७॥ ऐसे ज्ञान होतां । जन्म मृत्यू जरा । ऐसी सारी दुःखें । नष्ट होती ॥१४-१३॥॥३९८॥ ऐसे मुक्त होणें । तेंच अमरत्व । त्रिगुणापल्याड । ध्यान हवें ॥१४-१४॥॥३९९॥ अर्जुनाचा प्रश्न । कैषा आचाराने । त्रिगुणापल्याड । जाणें शक्य ॥१४-१५॥॥४००॥ श्रीकृष्ण सांगती । प्रसंग येतात । सुखाचे दुःखाचे । जातातही ॥१४-१६॥॥४०१॥ प्रसंगांचे सुद्धा । असतात गुण । त्यांना त्यांचेजागी । असो द्यावें ॥१४-१७॥॥४०२॥ सुख वा दुःख वा । लोह कीं सुवर्ण । प्रिय कीं अप्रिय । सारे सम ॥१४-१८॥॥४०३॥ निंदा किंवा स्तुति । मान अपमान । मित्र किंवा शत्रू । सारे सम ॥१४-१९॥॥४०४॥ ऐशा मनोभावें । माझे ठायीं भक्ति । अविचल होतां । ब्रम्हस्थिति ॥१४-२०॥॥४०५॥ तेंच तरी माझे । अमृत अव्यय । शाश्वत धर्माचें । अधिष्ठान ॥१४-२१॥॥४०६॥ गीतोपनिषदी । त्रिगुणात्मभेद । विवरणारा हा । योग ऐसा ॥१४-२२॥
॥४०७॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । पंधराव्या ॥१५-१॥॥४०८॥ अश्वत्थ वृक्षाच्या । उदाहरणाने । सांगीतले कैसे । फोफावती ॥१५-२॥॥४०९॥ मानव जीवनी । विषयप्रवाळ । गुणही ठेवती । गुंतवूनी ॥१५-३॥॥४१०॥ ऐशा अश्वत्थास । छाटण्या समूळ । शस्त्र तें केवळ । निःसङ्गता ॥१५-४॥॥४११॥ वाटेतील गुंता । छाटतां दिसतो । राजमार्ग आणि । नित्यस्थान ॥१५-५॥॥४१२॥ तैसे नित्यस्थान । लाभण्यास हवी । मानमोहशून्य । अध्यात्मता ॥१५-६॥॥४१३॥ माझे सुद्धा जाण । तेंच स्थान नित्य । चन्द्रसूर्याविना । तेजाळतें ॥१५-७॥॥४१४॥ माझेच अंश गा । जीवांत राहूनी । मन नि इन्द्रियें । चालवीती ॥१५-८॥॥४१५॥ केवळ ज्ञानीच । जाणती मजसी । गुणमयी तरी । गुणातीत ॥१५-९॥॥४१६॥ सूर्याचें चन्द्राचें । अग्नीचें जें तेज । जग उजाळतें । माझेंच तें ॥१५-१०॥॥४१७॥ मीच सोमरस । पोषीतो औषधी । जीवांच्या देही मी । वैश्वानर ॥१५-११॥॥४१८॥ प्राण नि अपान । समान वायूनी । पचवीतो अन्न । चतुर्विध ॥१५-१२॥॥४१९॥ वेदाभ्यासानेही । माझे ज्ञान होते । वेद मी वेदान्त । करवीता ॥१५-१३॥॥४२०॥ सर्वांचे हृदयीं । निविष्ट असा मी । स्मृति मी ज्ञान मी । विवेकही ॥१५-१४॥॥४२१॥ पुरुष असतो । क्षर नि अक्षर । सर्व देहीं स्थित । क्षर तरी ॥१५-१५॥॥४२२॥ दुसरा अक्षर । परमात्मा ऐसा । ईश्वरीय वास । लोकत्रयी ॥१५-१६॥॥४२३॥ मी तरी उत्तम । अक्षराहूनही । पुरुषोत्तमसा । सर्वश्रुत ॥१५-१७॥॥४२४॥ ऐसे गुह्यांमध्ये । गुह्यतम शास्त्र । जाणून होई गा । बुद्धिमंत ॥१५-१८॥॥४२५॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । पुरुषोत्तमाचा । योग सिद्ध॥१५-१९॥
॥४२६॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ सोळाव्या । अध्यायास ॥१६-१॥॥४२७॥ प्रथमच्या तीन । श्लोकांमध्ये यादी । मांडली सव्वीस । सद्गुणांची ॥१६-२॥॥४२८॥ मग सांगीतले । अज्ञान मत्सर । क्रोध लोभ आणि । मद दंभ ॥१६-३॥॥४२९॥ गुणसंपदा ही । दैवी वा आसुरी । असते बहुधा । अभिजात ॥१६-४॥॥४३०॥ दैवी संपदेने । मोक्ष तो सुलभ । आसुरी संपदा । गुंतवीते ॥१६-५॥॥४३१॥ आसुरी वृत्तीचे । लोक न मानती । आचारसंहिता । शुचिता वा ॥१६-६॥॥४३२॥ आशाअपेक्षांत । सदा रममाण । भ्रष्टाचारा देती । खतपाणी ॥१६-७॥॥४३३॥ कामभोगासाठी । अन्याय मार्गानी । द्रव्यार्जना देती । प्रोत्साहन ॥१६-८॥॥४३४॥ आज मिळवीलें । उद्या आणीकचि । मिळवीन हीच । खुमखुमी ॥१६-९॥॥४३५॥ आज ह्या शत्रूस । दिली खास मात । जिंकेन अजून । इतराना ॥१६-१०॥॥४३६॥ मी तो सार्वभौम। माना ईश्वरचि । कोणाची हिम्मत । माझेपुढे ॥१६-११॥॥४३७॥ अशांची पूजने । ढोंगे ती केवळ । गर्विष्ठपणाचा । तमाशाच ॥१६-१२॥॥४३८॥ ऐसे कामातुर । अहंकारी क्रोधी । मनाने मजसी । हेटाळती ॥१६-१३॥॥४३९॥ ऐशा नराधमा । हीन योनिक्रम । मिळतो सदैव । जन्मोजन्मी ॥१६-१४॥॥४४०॥ काम क्रोध लोभ । नरकास नेती । रहावे सावध । निरंतर ॥१६-१५॥॥४४१॥ शास्त्र विधी ह्याना । देऊनीया छाट । कामकारकशा । कर्मी रत ॥१६-१६॥॥४४२॥ कैसेनी पावेल । सिद्धि सुख गति । कार्य नि अकार्य । ध्यान हवें ॥१६-१७॥॥४४३॥ शास्त्रविधियुक्त । करावीत कर्मे । सतर्क सशक्त । आचरावी ॥१६-१८॥॥४४४॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । दैवासुरभेद । विवरला ॥१६-१९॥
॥४४५॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । सतराव्या ॥१७-१॥॥४४६॥ सोळाव्याचे अंती । श्रीकृष्ण म्हणाले । शास्त्रविधियुक्त । कर्म करी ॥१७-२॥॥४४७॥ इथे अर्जु्नाने । प्रश्न विचारीला । जरी श्रद्धायुक्त । कर्म केले ॥१७-३॥॥४४८॥ शास्त्रविधियुक्त । नाहीच जाहले । कैसी ती म्हणावी । कर्मनिष्ठा ॥१७-४॥॥४४९॥ अर्जुनाने प्रश्नी । श्रद्धा आणि निष्ठा । ऐसे दोन शब्द । वापरले ॥१७-५॥॥४५०॥ उत्तरांत कृष्ण । म्हणाले श्रद्धा ही । सात्त्विक राजसी । तामसीही ॥१७-६॥॥४५१॥ व्यक्तीची श्रद्धा गा । सत्त्वानुरूपचि । पुरुष असतो । श्रद्धामय ॥१७-७॥॥४५२॥ ज्याची जैसी श्रद्धा । तैसाचि तो वागे । सात्त्विक करीती । देवपूजा ॥१७-८॥॥४५३॥ राजस पूजीती । यक्षराक्षसास । तामसी पूजीती । भूतेंप्रेतें ॥१७-९॥॥४५४॥ शास्त्रविधिविना । घोर तपे केली । दंभ अहंकार । माजतती ॥१७-१०॥॥४५५॥ देहांत वसतो । माझाही जो अंश । त्याचेही करीती । उच्चाटन ॥१७-११॥॥४५६॥ आहार असतो । त्रिविध आणिक । यज्ञ तप दान । त्रिविधचि ॥१७-१२॥॥४५७॥ सात्त्विक आहारें । आयुष्य वाढतें । बल सत्त्व सुख । वाड्गताती ॥१७-१३॥॥४५८॥ रस्य स्निग्ध स्थिर । हृद्य ऐसी सत्त्वें । आहारीं असतां । सात्त्विक तो ॥१७-१४॥॥४५९॥ कटू वा आंबट । खारट तिखट । दाहक कोरड्या । पदार्थांचे ॥१७-१५॥॥४६०॥ सेवन ठरतें । राजस आहार । देती दुःख शोक । अस्वस्थता ॥१७-१६॥॥४६१॥ तामस सेवीती । नासलें आंबलें । नीरस उच्छिष्ट । चवहीन ॥१७-१७॥॥४६२॥ यज्ञ ते सात्त्विक । नसतां फलांची । अपेक्षा तरीही । विधियुक्त ॥१७-१८॥॥४६३॥ राजसींचे यज्ञ । फलाशा धरून । दंभही असतो । कार्यात त्या ॥१७-१९॥॥४६४॥ मंत्रतंत्राविना । शास्त्रविधिविना । घडतात यज्ञ । तामस्यांचे ॥१७-२०॥॥४६५॥ तपांचे प्रकार । कायिक वाचिक । आणि मानसिक । जाणावेत ॥१७-२१॥॥४६६॥ देव द्विज गुरु । प्राज्ञ यांची पूजा । शौच आर्जव नि । ब्रम्हचर्य ॥१७-२२॥॥४६७॥ अहिंसा पाळणें । ऐसी सारी तपें । कायिक ठरती । लाभदायी ॥१७-२३॥॥४६८॥ उद्वेगरहित । बोलण्याची रीत । सत्य प्रिय आणि । हितकारी ॥१७-२४॥॥४६९॥ स्वाध्याय अभ्यास । सारे मिळूनिया । वाङ्मयीन तप । सिद्ध होते ॥१७-२५॥॥४७०॥ मनीं प्रसन्नता । सौम्यत्व संयम । शुद्धतेने तप । मानसिक ॥१७-२६॥॥४७१॥ त्रविध तपांचा । श्रद्धेने आचार । फलाकांक्षेविना । सात्त्विकांचा ॥१७-२७॥॥४७२॥ राजस करीती । तपाचरण तें । व्हावा सत्कार हा । दंभ मनीं ॥१७-२८॥॥४७३॥ तामस्यांचे तप । वेड्या कल्पनांचे । काढण्यास कांटा । शत्रूंचा वा ॥१७-२९॥॥४७४॥ सात्त्विक करीती । दानासाठी दान । मनी न धरीती । उपकार ॥१७-३०॥॥४७५॥ राजस्यांचे दान । उपकार मनीं । कांहीं फलाशाही । दानापोटी ॥१७-३१॥॥४७६॥ तामस्यांचे दान । अयोग्य लोकांना । स्थान काळवेळ । अयोग्यचि ॥१७-३२॥॥४७७॥ ब्रम्हाचा प्रसिद्ध । मंत्र ॐ तत्सत् हा । त्याचेही त्रिविध । उपचार ॥१७-३३॥॥४७८॥ ब्रम्हवादी लोक । यज्ञतपदाना । प्रारंभ करीती । ॐ काराने ॥१७-३४॥॥४७९॥ मुमुक्षु जनांचे । ध्यान "तत्" वरती । यज्ञी तपी दानी । फलत्यागी ॥१७-३५॥॥४८०॥ साधुभाव ज्यांचा । त्यांची सारी कर्मे । केवळ सत्कर्मे । असतात ॥१७-३६॥॥४८१॥ श्रद्धेविना यज्ञ। तप दान केले । इहपरलोकी । असत्य तें ॥१७-३७॥॥४८२॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । त्रिविध श्रद्धेचे । विवेचन ॥१७-३८॥
॥४८३॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अठराव्या ॥१८-१॥॥४८४॥ अध्यायाप्रारंभी । अर्जुन विनवी । संन्यास नि त्याग । स्पष्ट करा ॥१८-२॥॥४८५॥ श्रीकृष्ण म्हणाले । कामनाप्रेरित । कर्मांचा त्याग जो । संन्यास तो ॥१८-३॥॥४८६॥ सा-याच कर्मांच्या । फलाशेचा त्याग । तोच समजावा । त्याग खरा ॥१८-४॥॥४८७॥ कांहींचे म्हणणें । कर्मे सदोषचि । असतात तरी । त्यागावीत ॥१८-५॥॥४८८॥ माझे मत तरी । यज्ञ तप दान । कर्में ही पावन । करणारी ॥१८-६॥॥४८९॥ त्यागूं नयेत ती । परि कर्मीं संग । आणि त्यांचे फल । त्यागावेत ॥१८-७॥॥४९०॥ नियत कर्मांचा । संन्यास अशक्य । तैसा प्रयत्नही । तामसी तो ॥१८-८॥॥४९१॥ दुःखकष्टप्रद । वाटती जी कर्में । त्यागणे राजस । अर्थशून्य ॥१८-९॥॥४९२॥ कर्में जी नियत । करणें फलाशा । त्यांची सोडूनीया । सात्त्विक तें ॥१८-१०॥॥४९३॥ देहधारी होतां । कर्में न करीता । राहणें केवळ । अशक्य तें ॥१८-११॥॥४९४॥ श्वासोच्छ्वास तरी। घडत असतो । कर्म तें टाळणें । अशक्यचि ॥१८-१२॥॥४९५॥ कर्मफलत्याग । करणारा तोच । म्हटला जातसे । त्यागी खरा ॥१८-१३॥॥४९६॥ कर्मांची फळेंही । असती अनिष्ट । इष्ट किंवा मिश्र । म्हणावीसी ॥१८-१४॥॥४९७॥ परंतु ही दृष्टी । त्यानाच ना लागू । ज्यानी फलत्याग । नाही केला ॥१८-१५॥॥४९८॥ कर्मसिद्धीलागी । पांच तत्त्वें पहा । कृतान्ती सांख्यानी । सांगीतली ॥१८-१६॥॥४९९॥ अधिष्ठान कर्ता । करणें विविध । विविध चेष्टा नि । दैव ऐसी ॥१८-१७॥॥५००॥ ऐसे असताना । कर्माचें कर्तृत्व । कर्त्याचे केवळ । कैसे होय ॥१८-१८॥॥५०१॥ ’मी केलें’ हा भाव । नाही ज्याचे मनीं । अलिप्त ठेवीतो । बुद्धिस जो ॥१८-१९॥॥५०२॥ त्याच्या युद्धकर्मी । कितीकही मेले । त्याचा दोष त्यास । नाही येत ॥१८-२०॥॥५०३॥ ज्ञान ज्ञेय आणि । परिज्ञाता सारे । उद्युक्त करीती । कर्माप्रत ॥१८-२१॥॥५०४॥ कर्माचे फलित । राहते संचित । कर्म कर्ता आणि । करणांत ॥१८-२२॥॥५०५॥ ज्ञान कर्म कर्ता । यांचे त्रिगुणात्म । विश्लेषण घेई । समजून ॥१८-२३॥॥५०६॥ सर्वांभूतीं भाव । एकचि अव्यय । ह्याचें ज्ञान होणें । सात्त्विक तें ॥१८-२४॥॥५०७॥ सर्वांभूतीं भाव । वेगळाले ऐसे । ज्ञान तें राजस । समजावें ॥१८-२५॥॥५०८॥ तत्त्वार्थहीन नि । अत्यल्प उथळ । ज्ञान तें तामसी । समजावें ॥१८-२६॥॥५०९॥ नियत कर्माचा । आचार निःसंग । रागद्वेषाविना । सात्त्विक तें ॥१८-२७॥॥५१०॥ कामप्रेरित वा । अहंकारयुक्त । कर्म तें राजसी । समजावें ॥१८-२८॥॥५११॥ मोहाने प्रेरित । हिंसाक्षययुक्त । कर्म तें तामसी । समजावें ॥१८-२९॥॥५१२॥ निःसंगवृत्तीचा । भाव अकर्त्याचा । तरी योग्य धृति । उत्साहही ॥१८-३०॥॥५१३॥ सिद्धि कीं असिद्धि । याची नाही खंत । कर्ता तो सात्त्विक । समजावा ॥१८-३१॥॥५१४॥ रागलोभ दावी । दृष्टी कर्मफलीं । हिंसाही करेल । राजस तो ॥१८-३२॥॥५१५॥ कर्मायोग्य ज्ञान । कसब नसतां । हट्टी वा आळसी । खीळ पाडी ॥१८-३३॥॥५१६॥ करी टाळाटाळ । अस्वच्छ हेतूंचा । कर्ता तो तामसी । समजावा ॥१८-३४॥॥५१७॥ बुद्धि धृति सुख । यांचेही त्रिविध । भेद कैसे होती । ध्यानी घेई ॥१८-३५॥॥५१८॥ कार्य तें कोणतें । कोणतें अकार्य । बुद्धि ती सात्त्विक । विवेकाची ॥१८-३६॥॥५१९॥ कार्य-अकार्याचा । विवेक ना जाणे । बुद्धि ती राजस । समजावी ॥१८-३७॥॥५२०॥ अधर्मास धर्म । अकार्यास कार्य । विपरीत बुद्धि । तामसी ती ॥१८-३८॥॥५२१॥ मन-इन्द्रियांची । कर्में योगयुक्त । चालवीते धृति । सात्त्विक ती ॥१८-३९॥॥५२२॥ धर्म-अर्थ-कामी । रमणारी धृति । कधी फलाकांक्षी । राजस ती ॥१८-४०॥॥५२३॥ स्वप्न-शोक-भय । दुःखानी ग्रसित । धृति असमर्थ । तामसी ती ॥१८-४१॥॥५२४॥ सुखही असते । तीन प्रकारांचे । सात्त्विक राजस । तामसही ॥१८-४२॥॥५२५॥ आधी जणूं विष । अंती अमृतशा । सात्त्विक सुखात । प्रसन्नता ॥१८-४३॥॥५२६॥ विषयवासना । इन्द्रियोपभोग । ह्यानी अमृतसे । वाटे आधी ॥१८-४४॥॥५२७॥ अंती विषासम । ज्याचा परिणाम । सुख तें राजस । समजावें ॥१८-४५॥॥५२८॥ प्रारंभापासून । मोही गुंतवून । निद्रा नि आळस । वाढवीती ॥१८-४६॥॥५२९॥ बेताल वागणें । तेंही वाढवीती । सुखें ती तामसी । समजावी ॥१८-४७॥॥५३०॥ ऐसे पाहूं जाता । त्रिगुणात्म भेद। जीवनाच्या सा-या । पैलूमध्ये ॥१८-४८॥॥५३१॥ ब्राम्हण क्षत्रिय । वैश्य शूद्र संज्ञा । कर्मांची वाटणी । करण्यास ॥१८-४९॥॥५३२॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५०॥॥५३३॥ ब्राम्हण म्हणावें । कोणास त्यासाठी । ब्रम्हकर्मछटा । ऐशा जाण ॥१८-५१॥॥५३४॥ शांति नि संयम । तपाचरण नि । शुद्धता आणिक । क्षमावृत्ति ॥१८-५२॥॥५३५॥ पारदर्शकता । ज्ञानी व विज्ञानी । देवावर श्रद्धा । ब्राम्हण्य तें ॥१८-५३॥॥५३६॥ क्षात्रतेज शौर्य । धृति नि दाक्षिण्य । युद्धातून नाही । पलायन ॥१८-५४॥॥५३७॥ दानशूरता नि । ईश्वरीय निष्ठा । क्षत्रिय वृत्तीचे । प्रमाण हे ॥१८-५५॥॥५३८॥ कृषि गोरक्षण । वाणिज्य वैश्याचे । सेवातत्परता । शूद्रकर्म ॥१८-५६॥॥५३९॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५७॥॥५४०॥ श्रीकृष्ण सांगती । आपापल्या कामी । राहूनही सिद्धि । शक्य सर्वां ॥१८-५८॥॥५४१॥ उद्धारास हवा । समर्पण भाव । रहावें मच्चित्त । अर्जुना गा ॥१८-५९॥॥५४२॥ अहंकारामुळे । जरी मनी तुझ्या । युद्ध न करीन । करशील ॥१८-६०॥॥५४३॥ प्रत्येकाचा पिंड । स्वभावानुरूप । स्वतःच्या कर्मानी । घडतसे ॥१८-६१॥॥५४४॥ आणि सर्वाभूती । ईश्वराचा अंश । चालवीतो सारी । यंत्रे जणूं ॥१८-६२॥॥५४५॥ त्यासी जा शरण । पार्था सर्वभावें । त्याच्या प्रसादाने । यश होतें ॥१८-६३॥॥५४६॥ शिष्यधर्म किंवा । पौत्रधर्म सारे । सोडूनी शरण । मजसी ये ॥१८-६४॥॥५४७॥ पापांचे क्षालन । करेन तूं नको । संशय मुळीच । मनी धरूं ॥१८-६५॥॥५४८॥ जें जें कांही गुह्य । तुज सांगीतलें । अभक्तास नाही । सांगायाचें ॥१८-६६॥॥५४९॥ कांही कैसे गुह्य । एकाग्र चित्ताने । ऐकून मनांत । ठसलें का ॥१८-६७॥॥५५०॥ संशय मनींचे । निवलेसे काय । अज्ञानतिमिर । निमाला कां ॥१८-६८॥॥५५१॥ अर्जुन म्हणाला । कबूली देतसा । संशय कसला । नाही आतां ॥१८-६९॥॥५५२॥ मोह निरसला । तुझ्या प्रसादाने । पाळीन आदेश । तुझे सारे ॥१८-७०॥॥५५३॥ संजय म्हणतो । श्रीकृष्ण अर्जुन । यांचा हा संवाद । रोमांचक ॥१८-७१॥॥५५४॥ ऐकाया मिळाला । व्यासांच्या कृपेने । सद्गदित आहे । मन माझे ॥१८-७२॥॥५५५॥ कानांत घुमतो । जणूं तो संवाद । आनंदलहरी । उसळती ॥१८-७३॥॥५५६॥ आठवतें रूप । कृष्णाचें अद्भुत । विस्मयचकित । पुन्हां होते ॥१८-७४॥॥५५७॥ जेथें जेथें कृष्ण । अर्जुन आहेत । तेथेंच विजय । निश्चयीच ॥१८-७५॥॥५५८॥ गीतोपनिषदी । मोक्षसंन्यासाचा । योग अखेरचा । ऐसा सिद्ध ॥१८-७६॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
Categories: Learning Sanskrit

Samskrit Learning Post 14: Samskrit Resources (Online)- Dictionaries....

Vadatu Samskrutam - Wed, 10/07/2009 - 11:59

Powerful virtual world of internet is getting richer and richer in reality of having Samskrit resources available to Samskrit enthusiasts.

Individuals and groups have been contributing in their ways to make Samskrit more and more interesting to learn. They range from sages to students, trainers to youtubers, dedicated teams of volunteers to curious learners.

Following are few of the notable resources available for help.

14.1 Online Samskrit Dictionaries

14.1.1 Bidirectional Dictionary (Devanagari <--> English)14.1.2 Dictionary in 'PDF, TXT' and More Formats14.1.3 Apte's Dictionary

Categories: Learning Sanskrit

Samskrit Learning Post 13: Samskrit Resources - Chimaya International Foundation

Vadatu Samskrutam - Mon, 09/28/2009 - 11:07

13.1 About Chinmaya International Foundation
Chinmaya Mission is a non profit worldwide organization which was founded in 1953 with the aim to spread the wisdom of Vedanta to any seeker, of any nationality, or group, and to enrich and enable individuals to become positive contributors to society.
Chinmaya International Foundation is the academic front of Chinmaya Mission worldwide.

13.2 Samskrit Courses by Chinmaya Foundation
Some of the ways Chinmaya Foundation offers Samskrit learning are, as follows:

13.2.1 Direct Learning Courses:
Chinmaya Foundation offers various in person learning courses across various locations in the world.

13.2.2 Online Easy Samskrit Learning Course:
This is an easy Samskrit Online Course is for beginners who are interested to start their journey into Sanskrit language. As the organization indicates, it has been designed in a manner that any individual regardless of their mother tongue, location could master Samskrit basics. Course is good for anyone above age 10.

13.2.3 Postal Samskrit Course:
This Samskrit Home Study Course is designed to facilitate learning through correspondence with 40 lessons. This course aims to impart an elementary knowledge of Samskrit to students, using English as the medium of instruction.

12.2.4 Easy Samskrit Study Kit:
This is a convenient method that supports Samskrit self-study. The kit provide self-study tools, Study Book, work Book, Interactive CD.

Apart from above, foundation also offers options for deeper learning.
Chinmaya Foundation also works on various projects worldwide, for revival of Samskrit and of knowledge embedded within Samskrit language.

12.3 References
http://www.chinfo.org/
http://www.chinmayamission.org/
Categories: Learning Sanskrit

Pages

Subscribe to Sanskrit Central aggregator - Learning Sanskrit